आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Aryan Khan Drugs Case Status; What Is NDPS Act? Mumbai Cruise Ship Raided By Narcotics Control Bureau

एक्सप्लेनर:ड्रग्ज घेणे, ते बाळगणे बेकायदेशीर; शाहरुखचा मुलगा आर्यनवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप, 6 महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा

रवींद्र भजनी21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर..

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा थोरला मुलगा आर्यन खान याला शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले होते. आर्यन त्याच्या मित्रांसह कार्डेलिया द इम्प्रेस या क्रूझ शिपवरुन मुंबईहून गोव्याकडे जात होता. त्याच्यावर अमली पदार्थांचे सेवन करणे यासह अन्य आरोप आहेत. एनसीबीने त्याच्यासह इतर सात जणांची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांड दिला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मिळालेल्या टिपच्या आधारावर, NCB च्या 20 अधिकाऱ्यांनी क्रूझ शिप 'कार्डेलिया द इम्प्रेस'चे तिकिट बुक केले होते आणि हे अधिकारी प्रवासी म्हणून त्यावर गेले. शिपवरील प्रवासी अमली पदार्थांचा वापर सुरु करेपर्यंत हे अधिकारी थांबले. प्रवासी ड्रग्ज घेण्यास सुरुवात करताच, अधिकारी सक्रिय झाले आणि त्यांनी आर्यनसह आठ जणांना रंगेहात अटक केली. यानंतर, कॅप्टनला सांगून जहाज दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीअर येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर नेण्यात आले.

शाहरुखचा मुलगा आर्यनला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांड दिला आहे.
शाहरुखचा मुलगा आर्यनला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांड दिला आहे.

सध्या या प्रकरणाची स्थिती काय आहे?

 • एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी आठ जणांना न्यायालयात हजर केले आणि 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली, पण त्यांना फक्त एक दिवसाची कोठडी मिळाली.
 • सोमवारी आर्यन खानसह सर्व आठ जणांना वैद्यकीय तपासणीनंतर एनसीबीने न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांडवर सोपवले.
 • आर्यन आणि इतरांवर "एनडीपीएस कायदा 1985 अन्वये प्रतिबंधित अमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि खरेदीमध्ये सहभागी" असल्याचा आरोप आहे.
 • एनसीबीच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आर्यनवर केवळ बेकायदेशीर औषधे सेवन केल्याचा आरोप असेल. तपास अधिकारी इतर बाबींचा तपास करत आहेत. आर्यनवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम 8 (सी), 20 (बी), 27 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत शिक्षेची तरतूद काय आहे?

 • कलम 8: या कायद्याचे उल्लंघन करणारा कोणताही मादक पदार्थ जाणूनबुजून खरेदी करणे किंवा वापरणे. जप्त केलेल्या ड्रग्जच्या आधारावर ही केस होते.
 • कलम 20: आर्यनच्या बाबतीत, जप्त केलेल्या चरसचे प्रमाण एनडीपीएस कायद्यांतर्गत 'स्मॉल' श्रेणीमध्ये येते. या कलमांतर्गत जास्तीत जास्त शिक्षा 6 महिने किंवा 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही आहे.
 • कलम 27: ही कलम प्रतिबंधित ड्रग्जच्या वापरावर लागू होते. यात जास्तीत जास्त एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
 • कलम 35: या सेक्शनमध्ये हे ठरवले जाते की, ड्रग्ज बाळगणा-या आरोपीची मानसिक स्थिती, हेतू काय होता. आरोपीला हे सिद्ध करायचे असते की त्याचा हेतू कायद्याचे उल्लंघन करण्याचा नव्हता. त्याच्याकडे असलेल्या अंमली पदार्थांवर बंदी आहे याची त्याला माहिती नव्हती.

क्रूझवर कोणत्या प्रकारचे ड्रग्ज सापडले?

 • अटक मेमोनुसार, एनसीबीने आर्यन खानजवळून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमए (एक्स्टेसी) च्या 22 गोळ्या मिळाल्या. त्याची किंमत अंदाजे 1 लाख 33 हजार रुपये इतकी आहे एनसीबीने आर्यनव्यतिरिक्त मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंटला ताब्यात घेतले आहे.

क्रूझवर ड्रग्ज कसे नेण्यात आले?

 • आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले की काही प्रवाशांनी त्यांच्या कपड्यांमध्ये ड्रग्जसाठी विशेष खिसे बनवले होते. ताब्यात घेतलेल्या एका मुलीने तिच्या शूजमध्ये​​​​​​​ ड्रग्ज लपवले होते.
 • क्रूझवर रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांनी त्यांच्या पँटमधील गुप्त कप्प्यात, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागात आणि​​​​​​​ कॉलरमध्ये लपवून ड्रग्ज नेल्याचा दावा केला जातो.

ही क्रूझ मुंबईतील इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवरून निघाली होती. क्रूझ कंपनी प्रवाशांचे सामान तपासत नाही. ही जबाबदारी सीआयएसएफ आणि पोर्ट ट्रस्टच्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे.
ही क्रूझ मुंबईतील इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवरून निघाली होती. क्रूझ कंपनी प्रवाशांचे सामान तपासत नाही. ही जबाबदारी सीआयएसएफ आणि पोर्ट ट्रस्टच्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे.

मग क्रूझवर जाण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी झाली नाही का?

 • झाली होते. वास्तविक, क्रूझ जहाजांवर पॅसेंजर एंट्री ही बॅलार्ड पीअरवरील ग्रीन गेटद्वारे होते. सीआयएसएफ आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे सुरक्षा अधिकारी या गेटवर सुरक्षेसाठी​​​​​​​ तैनात असतात. कार्डेलिया इम्प्रेसचे व्यवस्थापन करणारी कंपनी वॉटरवेज लेझर टुरिझमचे अधिकारी प्रवाशांचे सामान तपासू शकत नाही. ही जबाबदारी सुरक्षा दलांची​​​​​​​ आहे आणि ते प्रवाशांना तपासणीनंतर जहाजात चढण्याची परवानगी देतात.
 • क्रूझच्या वतीने प्रवाशांना वेलकम ब्रीफ दिले जाते. त्यात क्रूझवरील कार्यक्रमाचा तपशील असतो. यात क्रूझवर प्रवास करताना काय करता येते आणि काय करता येत नाही याचा तपशील असतो. क्रूझवर मादक पदार्थांच्या वापरास परवानगी नाही, असे यात स्पष्टपणे नमुद केलेले असते.

कॉर्डेलियाची क्रूझ, ज्यावर एनसीबीने छापा टाकत आर्यन आणि इतरांना अंमली पदार्थासह रंगेहाथ पकडले.
कॉर्डेलियाची क्रूझ, ज्यावर एनसीबीने छापा टाकत आर्यन आणि इतरांना अंमली पदार्थासह रंगेहाथ पकडले.

कार्डेलिया इम्प्रेसकडे अशा पार्टीजसाठी परवाना होता का?

 • नाही. क्रूज शिप्सकडे पार्टी आयोजित करण्यासाठी परवाना अनिवार्य आहे. शिपिंग विभागाचे महासंचालक अमिताभ कुमार यांनी एका मीडिया हाऊसला सांगितले की,​​​​​​​ मर्चंट शिपिंग कायद्यांतर्गत कार्डेलियाला परवाना देण्यात आला नव्हता. ऑपरेटरनी परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यात काही त्रुटी आढळल्या होत्या, ज्यामुळे परवाना देण्यात आला नव्हता.
 • कार्डेलियाचे सीईओ आणि वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष जरगेन बेलओम यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटल्यानुसार त्यांच्या क्रूझचा​​​​​​​ या घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने एका खासगी कार्यक्रमासाठी क्रूझ बुक केली होती.
 • क्रूझमध्ये 2,000 लोकांची क्षमता आहे आणि गोव्याच्या प्रवासात 600 लोक उपस्थित होते असा दावा सूत्रांनी केला आहे. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर​​​​​​​ या पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते. दिल्लीच्या कंपनीने आयोजित या कार्यक्रमात बहुतेक लोक दिल्लीचे आहेत, जे विमानाने मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले होते.
बातम्या आणखी आहेत...