आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंडेप्थ:ज्या पार्टीत आर्यन खान एन्जॉय करत होता ती रेव्ह पार्टी म्हणजे नेमके काय; तिथे वापरण्यात आलेल्या ड्रग्ज आणि त्याचा परिणामांची संपूर्ण कहाणी वाचा येथे

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर..

13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि 22 एमडीएमए गोळ्या. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या ड्रग्जची ही यादी आहे. या संदर्भात शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली आहे. जेव्हा NCB ने छापा टाकला तेव्हा कॉर्डिएला क्रूझवर एक रेव्ह पार्टी चालू होती.

रेव्ह पार्टी म्हणजे काय? येथे कोणत्या प्रकारचे ड्रग्ज वापरले जातात? विविध ड्रग्ज कोणत्या प्रकारचे परिणाम दर्शवतात? भारतात हे ड्रग्ज कसे आणि कोठून येतात आणि देशातील किती लोक अमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडले आहेत? आज भास्कर इन डेप्थमध्ये आम्ही याबद्दल सविस्तर सांगत आहोत...

म्युझिक, डान्स, ड्रग्ज आणि सेक्सचे पॅकेज बनत आहेत या रेव्ह पार्टीज
1950 च्या दशकात लंडनमधील अनेक लोकांनी जुन्या पद्धतीपासून वेगळी जीवनशैली निवडण्यास सुरुवात केली. त्यांना बोहेमियन म्हणतात. त्यावेळी रेव्ह हा शब्द धमाकेदार बोहेमियन पार्टीसाठी वापरला जात असे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि 1990 च्या दशकात डीजेच्या संकल्पनेमुळे रेव्ह पार्टी वाढल्या.

भारतातही रेव्ह पार्टीची संकल्पना लोकप्रिय होत आहे. इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, डीजे, व्हिज्युअल इफेक्ट्स, फॉग मशीनचा वापर अशा पार्ट्यांमध्ये केला जातो. यासाठी महागडी एंट्री फी आकारली जाते. गेल्या दशकात झालेल्या छापेमारीमधून जे वास्तवर समोर आले आहे, त्यानुसार रेव्ह पार्टीजची इमेज ही ड्रग्ज आणि सेक्सचा अड्डा म्हणून निर्माण झाली आहे. म्हणून, अशा पार्ट्यांवर अमली पदार्थ एजन्सींकडून नजर ठेवली जाते.

जुहूमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर मुंबई पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 96 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात अनेक मुलींचाही सहभाग होता
जुहूमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर मुंबई पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 96 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात अनेक मुलींचाही सहभाग होता

भारतात वापरले जाणारे ड्रग्ज आणि त्यांचा प्रभाव
ड्रग्ज आपल्या मेंदू प्रणालीवर परिणाम करतात. म्हणूनच विविध ड्रग्ज आपल्या विचार, भावना आणि कृतींवर परिणाम करतात. या आधारावर ड्रग्ज प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात ...

  • डिप्रेसेंट : असे ड्रग्ज जे फंक्शनल अॅक्टिव्हिटी कमी करतात. असे ड्रग कमी प्रमाणात घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला रिलॅक्स वाटू लागते. परंतु जर जास्त प्रमाणात घेतले तर ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते किंवा तिचा मृत्यू देखील होऊ शकतो. दारू, गांजा, हेरॉईन, मॉर्फिन अशी या ड्रगची काही उदाहरणे आहेत.
  • हॅल्युसीनोजेन्स: असे ड्रग्ज घेतल्याने एखाद्या व्यक्तीला भ्रामकपणा होतो आणि त्याला वास्तव समजत नाही. तो खरोखर तेथे नसलेल्या गोष्टी ऐकू किंवा पाहू लागतो. यामुळे अस्वस्थता, मळमळ, भावनिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. एलएसडी, मॅजिक मशरूम आणि केटामाइन ही अशा ड्रगची काही उदाहरणे आहेत.
  • स्टिमुलेंट्स: अशा ड्रग्जच्या सेवनाने मेंदूला जलद गतीने कार्य करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो. यामुळे ताप, झोप न येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. कॅफीन, निकोटीन, कोकेन आणि MDMA ही काही उदाहरणे आहेत.

ड्रोनमधून ड्रॉप करून, कार्गोमध्ये लपवून ड्रग्जचा सप्लाय केला जातो

सप्टेंबरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 3,000 किलो हेरॉईन जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे 21 हजार कोटी रुपये आहे. अफगाण हेरॉईनची ही खेप इराणमधील बंदर अब्बास पोर्टमधून 'सेमी-प्रोसेस्ड स्टोन पावडर' च्या नावाने आली होती. याआधी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फरिदाबादमधून 2500 कोटी रुपयांचे 354 किलो हेरॉईन जप्त केले होते. अलीकडच्या काळात अमली पदार्थ ताब्यात घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

यावर्षी जानेवारी ते जुलै 2021 पर्यंत, एजन्सींनी 3040 किलो हेरॉईन, 4.30 लाख किलो पॉपी स्ट्रॉ, 3.35 लाख किलो गांजा आणि 215 किलो एसिटिक एन्हाइड्राइड​​​​​​​ जप्त केले आहेत. या व्यतिरिक्त, अफू, मॉर्फिन, चरस, केटामाइन, कोकेन, मेथाक्वालोन, इफेड्रिन आणि इतर फार्मा ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले आहेत. तज्ज्ञांचा​​​​​​​ असा विश्वास आहे की, भारतात बहुतेक ड्रग्ज अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि म्यानमारमधून येतात. त्यांना पुरवण्याचे अनेक मार्ग आहेत ...

  • तस्कर ड्रग्जची छोटी पाकिटे बनवून सीमेपलीकडे फेकतात. 2016 मध्ये रिलीज झालेल्या उडता पंजाब या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, कसा पाकिस्तानचा एक माणूस कुंपणावरुन ड्रग्जचे पॅकेट फेकतो जे भारतीय शेतावर पडते. त्याचप्रमाणे, उर्वरित सीमांवर सुरक्षा दलांकडून लपवून ड्रग्ज पुरवली जातात. सीमा गस्त वाढवल्यानंतर​​​​​​​ तस्करांनी आता ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
  • अशी काही प्रकरणे देखील आली आहेत जेव्हा लोक हेरॉइन आणि कोकेन टॅबलेटच्या रुपात देशात आणतात. काही लोक त्यांना सामानात शिवून घेतात किंवा सीलबंद​​​​​​​ कपडे, गॅझेट इत्यादींमध्ये ठेवतात.
  • ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सहज समुद्रामार्गे आणले जाजात. टॉक स्टोन, जिप्सम पावडर आणि तुळशीच्या बियाण्याच्या नावाने बॉक्समध्ये ड्रग्जचा सप्लाय केला जातो.

भारतात 3 कोटींपेक्षा जास्त लोक गांजा आणि 2.3 कोटी लोक अफूचे सेवन करतात

2019 मध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने भारतातील ड्रग्जच्या वापरावर एक अहवाल जारी केला. त्यात असे दिसून आले की भारतात 10-75 वयोगटातील 16 कोटी लोक दारू पितात. यापैकी 5.2% असे आहेत जे अल्कोहोलशिवाय जगू शकत नाहीत. सुमारे 3.1 कोटी लोक भांग आणि गांजाचे सेवन करतात. सुमारे 2.3 कोटी लोक अफू आणि सुमारे 10.7 लाख लोक कोकेनचा वापर करतात.

ग्लोबल बर्डन डिसीज स्टडी 2017 च्या आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 7.5 लाख लोकांचा बेकायदेशीर ड्रग्जच्या सेवनामुळे मृत्यू होतो. त्यापैकी सुमारे 22,000 भारतातील आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, भारतात ड्रग्जमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...