आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Aryan Khan Rhea Chakraborty Whatsapp Chat Leak; What Is End To End Encryption? | Whatsapp Chat Leak Cases

एक्सप्लेनर:व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना त्यांची प्रायव्हसी जपणार असे सांगतो, मग आर्यनपासून रियापर्यंतचे चॅट कसे लीक होतात?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

शाहरुख खानचा मुलगा आर्यन शनिवारी तुरुंगातून बाहेर आला. त्याच्या लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटसह अनेक गोष्टी त्याच्या जामिनात अडथळा ठरल्या. याआधीही रिया चक्रवर्तीपासून ते अर्णब गोस्वामी यांचे चॅट लीक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

एकीकडे व्हॉट्सअ‍ॅपचा दावा आहे की त्यांच्या यूजरचा कंटेंट एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहे. म्हणजेच, व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स काय शेअर करत आहेत हे कंपनीलाही माहीत नाही, दुसरीकडे मात्र प्रत्येक कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये या अ‍ॅपवरून मेसेज लीक होतात. आर्यन खानचे प्रकरण असो, रिया चक्रवर्ती किंवा पेगाससचे प्रकरण, प्रत्येक वेळी चॅट असे लीक झाले.

एंड-टू-एंड इन्क्रिप्शन म्हणजे काय? चॅट लीक कसे होतात? व्हॉट्सअ‍ॅप लीकशी संबंधित मोठी प्रकरणे कोणती आहेत? जाणून घेऊया...

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट किती सुरक्षित आहे?

डेटा सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ व्हॉट्सअॅपच नाही तर टेलिग्राम, सिग्नल आणि आयमेसेजसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सच्या चॅट देखील लीक होऊ शकतात. खरं तर या सर्व प्लॅटफॉर्मवरील संदेश एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहेत. जेव्हा ते पाठवले जातात तेव्हा इतर कोणीही ते वाचू शकत नाही.

एंड-टू-एंड इन्क्रिप्शन म्हणजे काय?

WhatsApp जवळजवळ प्रत्येक जाहिरातीमध्ये एंड-टू-एंड इन्क्रिप्शनचा दावा करतो. म्हणजेच तुम्ही पाठवलेला मेसेज व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवरून थेट रिसीव्हरकडे जातो. दरम्यान, त्यांना कोणीही पाहू किंवा ऐकू शकत नाही. मजकूर असो, व्हिडिओ असो, व्हॉईस मेसेज असो, डॉक्युमेंट असो किंवा फोटो असो, तुमचे मेसेज लॉकद्वारे सुरक्षित असल्याचे व्हॉट्सअॅप सांगतो. मेसेज अनलॉक करण्यासाठी आणि ते वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी फक्त सेंडर आणि रिसीव्हरकडे एक विशेष की असते. हे सर्व ऑटोमॅटिकली घडते. यासाठी यूजरला कोणत्याही विशेष सेटिंगची आवश्यकता नसते.

मग या चॅट लीक कशा होतात?

बहुतेक प्रकरणांमध्ये लीक झालेले मेसेज हे चॅटचे स्क्रीन शॉट्स असतात. रिसीव्हर किंवा इतर कोणीही ज्याला दोन लोकांचे संभाषण मिळाले आहे, तो ते इतर कोणाशी तरी शेअर करतो. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयता धोरणामध्ये 'थर्ड-पार्टी इन्फॉर्मेशन' नावाच्या सबहेडखाली हे स्थान दिले आहे. आर्यन खान किंवा रिया चक्रवर्तीसारख्या अलीकडच्या प्रकरणांविषयी सांगायचे झाल्यास तपास अधिकाऱ्यांना मेसेज वाचण्यासाठी या लोकांचे फोन मिळाले होते.

जर कुणाला हवे असल्यास फोनमधून डिलीट केलेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्ससुद्धा एक्सेस केले जाऊ शकतात. असे अनेक टेक बॅकडोअर्स आहेत ज्याद्वारे हॅकर्स तुमच्या खासगी चॅट्समध्ये प्रवेश करू शकतात.

फोनच्या क्लोनिंगद्वारे, त्या फोनमधील सर्व कंटेंट कॉपी केला जाऊ शकतो. याद्वारे क्लोनर त्या फोनचा सर्व डेटा पाहू आणि वाचू शकतो. याद्वारे युजरच्या नकळत त्या फोनमध्ये स्पायवेअरही टाकले जाऊ शकते. जसे पेगासस प्रकरणात आरोप झाले आहेत. पेगासस स्पायवेअरद्वारे हे विकसित केलेल्या इस्रायली कंपनीने फोनवरील सर्व व्हॉट्सअ‍ॅप चॅट वाचले.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे चॅट बॅकअप. जे व्हॉट्सअ‍ॅप क्लाउडवर स्टोअर करते. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवर क्लाउची सुविधा नाही. हे मेसेज थर्ड पार्टी क्लाउड जसे की Google Drive आणि iCloud वर सेव्ह केले जातात. क्लाउडवर स्टोअर केलेले मेसेजइनक्रिप्ट केलेले नसतात. अशा परिस्थितीत जर यूजरचे क्लाउड स्टोरेज हॅक झाले असेल, तर हॅकर बॅकअपमधून चॅटमध्ये प्रवेश करू शकतो.

चॅट बॅकअप बंद करता येऊ शकतात का?

होय असे होऊ शकते. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन चॅट बॅकअप पर्याय डिसेबल करा. असे केल्याने तुमच्या चॅट क्लाउडवर सेव्ह होणे थांबेल.

आर्यनच्या आधी कोणत्या स्टार्सचे ड्रग्ज चॅट लीक झाले आहेत का?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीचा हवाल्याने व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाले होते. ज्यामध्ये 'हॅश' आणि 'वीड' असे शब्द वापरले होते. याप्रकरणी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची एनसीबीने तासन्तास चौकशी केली होती. दीपिकाला देखील एनसीबी कार्यालयात बोलावून तिची अनेक तास चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीदरम्यान दीपिकाने ती मोठी सिगारेट आणि छोट्या सिगारेटबद्दल बोलत असल्याचे सांगितले होते.

या वर्षी जानेवारीमध्ये, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या सुमारे एक हजार पानांच्या व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्या होत्या. BARC ही ती संस्था आहे, जी देशातील 45 हजार घरांमध्ये टीव्हीवर बसवण्यात आलेल्या बार-ओ-मीटरद्वारे दर आठवड्याला कोणते चॅनल बघितले जात आहे हे सांगते. यानंतर टीआरपी घोटाळ्यावरुन वाद झाला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या चॅट लीक झाल्याची चर्चा होती. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये 'बड' हा शब्द वापरण्यात आला होता. तसेच अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ‘रुपया’, ‘डॉलर’ आणि ‘पाऊंड’ या कोडवर्ड्सचाही ड्रग्जसाठी वापर करण्यात आला असल्याचे समोर आले होते.

गोपनीयतेच्या संदर्भात व्हॉट्सअ‍ॅप किती वेळा वादात सापडले आहे?

  • नवीन आयटी नियमांनुसार, भारत सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना कोणत्याही मेसेजचा ओरिजिनेटर सांगण्यास सांगितले होते. म्हणजेच, सरकारी एजन्सींना आवश्यक असल्यास सोशल मीडिया कंपन्यांकडून संदेशाचा स्त्रोताची माहिती घेता येऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपने हा नियम स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात गेले. कंपनीने त्यावेळी एंड-टू-एंड इनक्रिप्शन​​​​​​​ आणि वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा हवाला दिला.
  • व्हॉट्सअ‍ॅपही आपले नवीन धोरण यूजर्सवर लादल्यामुळे वादात सापडले आहे. कंपनीने त्यांची नवीन यूजर पॉलिसी न पाळणाऱ्यांचे अकाउंट सर्व्हिस कमी करण्याचा दावा केला होता. या युजरपॉलिसीमध्ये फेसबुकसोबत डेटा शेअरिंगचा उल्लेख होता. या धोरणावर खूप वाद झाले.
  • 2018 मध्ये, मार्क झुकेरबर्गने अमेरिकन सिनेटसमोर असेही म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज इतके खासगी आहेत की व्हॉट्सअ‍ॅप देखील ते वाचू शकत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...