आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • As Soon As They Reach Here, The Pimps Who Tell The Merits Of Girls Fall Behind, Only Sex Workers Live In 7 Out Of 16 Streets. 7 Of The 16 Lanes

गंगुबाईच्या परिसरातून ग्राऊंड रिपोर्ट:कामाठीपुऱ्यातील 16 पैकी 7 गल्ल्यांमध्ये फक्त सेक्स वर्कर्स, हिरोईन होण्यासाठी आलेली तरुणी अशी बनली गंगूबाई काठियावाडी

राजेश गाबा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा राजेश गाबांचा खास रिपोर्ट...

नाव- गंगुबाई काठियावाडी

खरे नाव- गंगा हरजीवनदास

पत्ता- घर क्र. 10, रेशमवाली चाळ क्र. 39, तळमजला, कामाठीपुरा, 12वी लेन, मुंबई

जन्मस्थान- काठियावाड, गुजरात

जन्मतारीख - माहित नाही

मृत्यू - 1 फेब्रुवारी 1980, मुंबई

शुक्रवार, दुपारी 12 वाजता मी मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुराकडे निघालो.

लोकल ट्रेनमध्ये अंधेरीहून ग्रँट रोड स्टेशनला उतरलो. तेथून टॅक्सीने 25 मिनिटांत कामाठीपुरा गाठले.

दुकानातून डोकावताना सेक्स वर्कर्स…
कामाठीपुरा येथील दुकाने सामान्य बाजारासारखी दिसत आहेत, मात्र दुकानांच्यावरून सेक्स वर्कर्स डोकावताना दिसतात. थोडे पुढे गेल्यावर दुकानांसमोरच्या रस्त्यावर नटलेल्या सेक्स
वर्कर्सची टोळी दिसते.

शो केसमध्ये ठेवलेल्या शोपीसप्रमाणे त्या स्वतःला सादर करत आहे. भर उन्हातही त्या दुकानाजवळच्या शेडखाली उभ्या राहून ग्राहकांची वाट पाहात आहेत.

काही पावलं पुढे गेल्यावर एक माणूस जवळ येतो. तो मला म्हणाला, 'सर, माझ्याकडे ताजा माल आहे. चला, माझ्याबरोबर या...'

त्या माणसाकडून स्वतःची कशीबशी सुटका करुन घेतली तोच दुसरा माणूस आला. माझ्या लक्षात आले की हे सर्व दलाल आहेत, जे दलालीसाठी ग्राहकांना सेक्स वर्कर्सच्या घरापर्यंत नेण्याचे काम करतात.

तेव्हा टोपी घातलेला एक माणूस म्हणतो, 'काय हवंय?' मी म्हटलं- 'फक्त फिरायला आलोय', मग तो म्हणाला- 'आमची दाढी पांढरी झाली आहे, या भागात कोणी फिरायला येत नाही. आता तुम्ही पुढे जाऊन एखाद्या घरात शिराल. मी तुम्हाला चांगली मुलगी दाखवतो, माझा नंबर घ्या.'

आम्ही पुढे निघालो, कारण या रेड लाईट एरियात येण्याचा आमचा उद्देश गंगूबाई काठियावाडीच्या जीवनाचा शोध घेणे हा होता. या रेड लाईट एरियात त्यांचे आयुष्य गेले.

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ज्या गंगूबाई काठियावाडीला एक दबंग स्त्री आणि वेश्या म्हणून दाखवण्यात आले आहे, ती नेमकी कोण होती, ती कुठे राहायची, काय करायची, तिची कहाणी काय होती, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोहोचलो.

कोपऱ्यातील दुकानातील माणूस तुम्हाला पत्ता सांगेल...

गंगूबाईंच्या घराचा पत्ता विचारत आम्ही पुढे निघालो तेव्हा तिथे भेटलेली एक व्यक्ती आम्हाला म्हणाली, 'सर, 12 क्रमांकाच्या गल्लीत कोपऱ्यावर एक दुकान आहे, तिथे तुम्हाला पत्ता समजेल.'

दुकानदाराने सांगितले की, 'गंगूजींनी अनेक मुले दत्तक घेतली होती. ती सर्व मुले त्यांच्यासोबत एकाच घरात राहत होता. गंगूजींची दत्तक मुलगी बबिता या 12 क्रमांकाच्या गल्लीत राहते. बाकीचे लोक मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.

त्यांच्यासोबतचे अनेक लोक आता या जगात नाहीत. 1980 मध्ये दम्याच्या आजारामुळे गंगूबाईंचे निधन झाले होते. तुम्हाला बबिताकडून सगळी माहिती मिळेल.’ आम्ही चिंचोळ्या रस्त्यांवरून पुढे निघालो, तिथे छोटी-छोटी घरे होती.

तिथे जो कारखाना आहे, ते गंगूबाईंचे घर होते...

तिथे आम्हाला शिंप्याच्या दुकानात काम करणा-या एका व्यक्तीने सांगितले की, 'सर, तुम्ही जो पत्ता सांगत आहात घर क्र. 10 रेशमवाली चाळ, क्र. 39, तळमजला, कामाठीपुरा 12 वी लेन आता तिथे कारखाना आहे, हे एकेकाळी गंगूबाईंचे घर होते. याच ठिकाणी त्यांचा दरबार भरायचा. येथून त्या कामाठीपुरातील वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिला आणि इतर लोकांना मदत करत असे. त्यांच्या भल्यासाठी त्या काम करायच्या.'

पुढे कामाठीपुराच्या अनेक गल्ल्यांमध्ये दुकानाबाहेर आणि घराबाहेर नटलेल्या मुली दिसल्या. तिथे काही वृद्ध महिला खाटेवर बसलेल्या दिसल्या. त्यानंतर आम्ही 12 व्या गल्लीत बबिता यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या घरातील एका छोट्याशा खोलीत एका कोपऱ्यात देवाचे छोटेसे मंदिर आणि जवळच गंगूबाईंचा फोटो आहे.

कमी उंचीच्या बबिता आणि त्यांचा बँकेत काम करणारा मुलगा विकास गौडा यांच्याशी भेट झाली. बबिता सांगतात, 'गंगूबाईंनी मला लहानाचे मोठे केले, लग्न लावून दिले. माझ्यासाठी ती माझी आई आणि माझ्या मुलांची आजी होती. आम्ही लहानपणापासून त्यांच्याशी जोडलेलो होतो. लहान मुले, मोठे, मुली असे मिळून 20 ते 30 लोक घरात राहत होतो. कामाठीपुरा येथील मुलींना काही अडचण आली की, गंगू माँ पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना सोडवत असे. अगदी साधी पांढरी साडी आणि ब्लाउज असा आईचा पेहराव असायचा. ती टिकली लावत नसे. गुरुवारी ती गरीबांना पैसे वाटायची. रविवारी रेसला जायची. तिला पत्ते खेळण्याचाही शौक होता.'

आता गंगूबाईची खरी कहाणी तीन कथांमधून जाणून घेऊया...

पहिला किस्सा: हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आल्या होत्या गंगूबाई...

गंगूबाईंना आपली आजी म्हणणाऱ्या विकास चंद्र गौडा यांच्या म्हणण्यानुसार, 'त्या हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. मात्र हुसैन झैदींच्या पुस्तकात आणि चित्रपटात दाखवण्यात आले की, रमणीक लालने त्यांना 500 रुपयांना एका कोठ्यावर विकले, मात्र हे चुकीचे आहे.

खरी गोष्ट अशी आहे की, गंगू माँ हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आल्या होत्या, त्याकाळात त्यांना काही अडचण आल्या आणि त्या अडकल्या, पण त्या शिकलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले होते.

तेव्हा त्यांना वाटले की माझे आयुष्य खराब झाले आहे, पण आता मी सर्वांसाठी जगेन. गरीब अनाथांसाठी त्यांनी काम सुरू केले. वेश्याव्यवसायात ज्यांना लग्न करायचे होते, त्यांनी त्यांचे लग्न लावून दिली. रेड लाईट एरियातील या सर्व मुलींची ती आई झाली.'

दुसरा किस्सा: करीम लाला त्यांना बहीण मानत...
गंगूबाईंसोबत डॉन करीम लालाच्या माणसांनी चुकीचे काम केले असे चित्रपटात दाखवले गेले आहे, तर हे चुकीचे आहे. करीम लालाची माणसं येथे येऊन मुलींची छेड काढत असल्याने गंगूबाई करीम लालाला भेटल्या होत्या. गंगूबाईंनी करीम लालाकडे जाऊन आपली समस्या सांगितली होती. नंतर लालाने गंगूबाईंना आपली बहीण बनवले होते.

तेव्हा लाला म्हणाले होते की, आता पुढे कोणी त्रास दिला तर मला सांग, मी आहे. गंगूबाईंना मिळालेला हा पाठिंबा होता. गंगूबाईंनी या पाठिंब्यातून रेड लाईटमध्ये काम करणा-या अनेक मुलींची लग्ने लावून दिली होती. आज त्या सर्व जणी चांगले आयुष्य जगत आहेत.

तिसरा किस्सा : नेहरूंना म्हणाल्या होत्या, माझ्याशी लग्न केले तर हे सर्व सोडून देईल
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित ही घटना आहे. त्यावेळी कामाठीपुरामधून वेश्याव्यवसाय हटवण्यासाठी आंदोलन झाले होते. मग सर्व मुली गंगू माँकडे आल्या. त्यानंतर गंगू माँनी आझाद मैदानावर भाषण केले. रेड लाइट एरियातील मुलींच्या पाठिशी गंगूबाई उभ्या झाल्या होत्या. दिल्लीहून दोनदा फोन आला.

गंगू माँ काही मुलींसोबत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा नेहरूजींनी गंगूबाईंना लग्न करून या घाणेरड्या जागेपासून दूर जाण्यास सांगितले. तेव्हा गंगूबाई त्यांना म्हणाल्या की, जर तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार असाल तर मी हे सर्व सोडून देईल.

हे ऐकून नेहरू स्तब्ध झाले आणि त्यांनी गंगूबाईंच्या विधानाशी असहमती दर्शवली. तेव्हा गंगूबाई म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान तुम्ही रागावू नका. मला फक्त माझा मुद्दा सिद्ध करायचा होता. उपदेश करणे सोपे आहे, परंतु स्वीकारणे कठीण आहे. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईंना वचन दिले की ते त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतील. खुद्द पंतप्रधानांनी मध्यस्थी केल्यावर कामाठीपुरा येथील वेश्यांना हटवण्याचे काम कधीच झाले नाही. आजही कामाठीपुरा येथे रेड लाइट एरिया अस्तित्वात आहे.

चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे...
बबिता सांगतात, 'जो चित्रपट येतोय गंगूबाई, त्यात आमच्या आईला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. पैसा कमवण्यासाठी हे लोक काहीही दाखवत आहेत. आम्हाला कुणीही भेटले नाहीत. पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ते प्रकाशक आले होते. संजय लीला भन्साळी आम्हाला भेटले नाहीत. माझी आई समाजसेविका होती. आपले संपूर्ण आयुष्य तिने कामाठीपुरा येथील लोकांसाठी काम करण्यात घालवले. आमच्या आईची बदनामी करण्यासाठी ते चित्रपट बनवत आहेत.'

चित्रपटामुळे कुटुंब आले आहे अडचणीत
गंगूबाईंची दत्तक नात भारती सांगते की, 'चित्रपट सुरू झाल्यापासून आम्हाला इथून घर बदलावे लागेल. आम्ही कार्यक्रमांना जाऊ शकत नाही. आम्हाला आमचे नंबर बदलावे लागले आहेत.'

गंगूबाईंची दत्तक मुलगी सुशीला शिवराम रेड्डी यांनी सांगितले की, 'गंगूबाईंनी आम्हाला दत्तक घेतले होते. ती माझी आई आहे. येणाऱ्या चित्रपटात त्यांनी माझ्या आईला वेश्या म्हणून सादर केले आहे. हे चुकीचे आहे.'

कामाठीपुरामध्ये दोन हजार मुली सेक्स वर्कर...
कामाठीपुरा येथे काम करणाऱ्या एका एनजीओकडून समजले की, आजही कामाठीपुरामध्ये दोन हजार मुली आणि महिला वेश्याव्यवसायात सक्रिय आहेत.

बातम्या आणखी आहेत...