आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामच्या अटकेची फिल्मी कहाणी:9 तास चकवा दिल्यावर म्हटले आत्महत्या करेन; ACP चंचल म्हणाल्या- दार उघडा, नाहीतर तोडून टाकू

लेखक: अनुराग आनंद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

81 वर्षीय आसारामला गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने आणखी एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 4 वर्षांपूर्वीही यूपीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो जोधपूर कारागृहात बंद आहे. आसारामला अटक करणे हे अत्यंत अवघड काम होते. त्याच्या अटकेनंतरच आसारामचे सर्व कारनामे उघड होऊ लागले.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही आसारामच्या पहिल्या अटकेची संपूर्ण फिल्मी कथा सांगत आहोत. यासाठी, आम्ही तत्कालीन ACP जोधपूर पश्चिम आणि सध्या भिलवाडाच्या अॅडिशनल SP चंचल मिश्रा यांच्याशी सविस्तर बातचीत केली, त्या अटक करण्यासाठी गेलेल्या 5 लोकांच्या कोअर टीमचा भाग होत्या आणि त्या प्रकरणाचे तपास अधिकारीही...

हा फोटो आसारामच्या अटकेनंतरचा आहे. या छायाचित्रात काळी टोपी घातलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव चंचल मिश्रा आहे आणि दुसऱ्या महिला अधिकाऱ्याचे नाव गुप्ता पारीक आहे.
हा फोटो आसारामच्या अटकेनंतरचा आहे. या छायाचित्रात काळी टोपी घातलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव चंचल मिश्रा आहे आणि दुसऱ्या महिला अधिकाऱ्याचे नाव गुप्ता पारीक आहे.

21 ऑगस्ट 2013 पासून सुरू झाले प्रकरण

21 ऑगस्ट 2013 ची गोष्ट आहे. जोधपूर पश्चिमचे उपायुक्त अजय लांबा यांच्या ऑफिसमध्ये दिल्ली पोलिसांचे एक पथक दाखल झाले. पथकासोबत एक अल्पवयीन मुलगी होती, जी आसारामवर बलात्काराचे आरोप करत होती. मुलीने म्हटले की, मनई गावातील आश्रमात 15 ऑगस्टच्या रात्री तिच्यावर रेप झाला आहे.

सुरुवातीला अधिकार्‍यांचा विश्वास बसला नाही, मात्र जेव्हा मुलीने आश्रमातील प्रत्येक भागाबद्दल सांगायला सुरुवात केली तेव्हा लांबासमोर सीन क्रिएट झाला. जोधपूरपासून 38 किमी अंतरावर असलेल्या आश्रमात गेल्याशिवाय कोणीही त्याबाबत इतके चांगल्या पद्धतीने कसे सांगू शकते, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला.

यानंतर जोधपूर पोलिसांनी आसारामविरुद्ध CrPC चे कलम 342, 376, 354 (A), 506, 509 व 134 च्या अंतर्गत पोक्सोचे कलम 8 व जेजेएचे कलम 23, 26 मध्ये गुन्हा दाखल केला. IPS अजय लांबा यांनी जोधपूर पश्चिमच्या ACP चंचल मिश्रा यांना कॉल केला आणि त्यांना या केसच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर बनवले.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तिचा जबाब नोंदवण्यात आला. शेवटी जबाब पडताळण्यात आले. आसारामने मुलीवर बलात्कार केल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर आसारामला चौकशीसाठी अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. 27 ऑगस्टला त्याला समन्स पाठवण्यात आला होता की, 30 ऑगस्टला अटकेसाठी जोधपूरला हजर राहावे, मात्र आसाराम ठरलेल्या तारखेला तेथे पोहोचला नाही.

यानंतर पोलिसांनी स्वत: आश्रमात जाऊन आसारामला अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच पोलिसांसमोरचे खरे आव्हान सुरू झाले….

31 ऑगस्ट 2013, आसारामच्या अटकेचा दिवस…

ACP चंचल यांनी सांगितल्यानुसार, आसाराम वारंवार लोकेशन चेंज करत होता. अचानक पोलिसांना तो इंदुरात असल्याची माहिती मिळाली. चंचल मिश्रा यांच्यासह 5 अधिकाऱ्यांचे पथक ताबडतोब राजस्थानहून इंदूरला रवाना झाले. तेथे काय-काय घडले, या सर्व प्रसंगाची कहाणी IPS चंचल यांच्याच शब्दांत...

आम्ही इंदूरला पोहोचलो तेव्हा आश्रमाभोवती MPचे पोलिस तैनात होते. आसारामला अटक करण्याची जबाबदारी आम्हा 5 जणांवर होती. आत पोचलो तर तिथे आसारामचे प्रवचन चालू होते. समोर सुमारे 4 हजार भाविक बसलेले होते.

आम्हाला पाहताच आसारामने मंचावरून आपल्या भक्तांना भडकावण्यास सुरुवात केली. तो म्हणाला-
देखो ये लोग आ गए हैं। ये लोग हमें अरेस्ट करके ले जाना चाहते हैं। क्या आप मुझे ले जाने दोगे?'

या प्रश्नाला उत्तर देताना जमाव ओरडून सांगत होता की, नाही बाबा, घेऊन जाऊ देणार नाही. भाविकांचा हा जमाव पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होता. आसारामच्या नावाचा जप केला जात होता. आसारामचा मुलगाही मंचावरून जमावाला भडकावत होता.

गर्दी सतत वाढत होती. खासगी जागा असल्याने पोलीस आश्रमात येणाऱ्या भाविकांना कायदेशीररीत्या रोखू शकत नव्हते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आसाराम पोलिस अधिकाऱ्यांना भेटला नव्हता. अखेर सायंकाळी त्याचा मुलगा नारायण साई याने पोलिस अधिकाऱ्यांना भेटण्याचे मान्य केले. आम्ही नारायण साईला समजावून सांगितले की, त्याच्या वडिलांना कोणत्याही परिस्थितीत अटक झालीच पाहिजे, पण तो तयार झाला नाही.

रात्रीच्या वेळी आसाराम त्याच्या झोपडीत गेला, जिथे तो आराम करत असे. इथल्या अनेक खोल्या सारख्या होत्या. मोठ्या कष्टाने आम्हाला तो हजर असलेली खोली शोधता आली. या कक्षालाही भक्तांनी चारही बाजूंनी वेढा घातला होता.

खोलीत आसाराम सिंधी भाषेत काहीतरी बोलून आपल्या मुलावर ओरडत होता. खिडकीजवळ उभ्या असलेल्या राजस्थान पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला सिंधी भाषा येत होती. अशा स्थितीत पिता-पुत्रातील संभाषण त्यांना समजले. आसाराम आपल्या मुलाला सिंधी भाषेत सांगत होता की- आणखी लोकांना बोलव... लवकर फोन बोलव.

याची माहिती मिळताच मला आसारामचा डाव समजला. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दीड वाजले होते. कशीतरी सकाळ व्हावी अशी आसारामची इच्छा होती. त्यानंतर देशभरात भक्तांची उग्र निदर्शने करून तो अटकेतून सुटणार होता.

माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून मी पुढील 10 मिनिटांत आसारामला अटक करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर मी म्हणाले: आसाराम दार उघडा..

आसारामचा आतून आवाज आला, मला सोडा, नाहीतर आत्महत्या करेन.

मला राग आला आणि दाराला लाथ मारून म्हटले- 'आसाराम, दार उघड नाहीतर तोडून टाकेन.'

पोलिसांचा राग आसारामला जाणवला असावा. बाकीचे अधिकारीही आपापल्या परीने दार उघडण्याचा प्रयत्न करत होते. सकाळपासून नाटक करणाऱ्या आसारामला आता पोलिस अधिकाऱ्यांसमोरच हार मानावी लागली. शेवटी घाबरून त्याने दरवाजा उघडला. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही आसारामला अटक केली.

अटकेनंतर भक्तांचा पोलिसांच्या वाहनाला घेराव

अटक झाल्यानंतरही आसाराम पोलिसांसोबत चालायला तयार नव्हता. तो आम्हाला आपली ताकद दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करू लागला. बाहेर संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीला घेरले होते.

जमावाला पांगवण्यासाठी तेथे उपस्थित पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. सर्व गेटसमोर हजारो भाविक जमिनीवर लोळण घेतलेले आहेत. शेवटी आम्ही एक भिंत तोडून बाहेर आलो. यानंतर कसेतरी आम्ही आसारामसोबत इंदूर विमानतळावर पोहोचलो आणि तिथून त्याला जोधपूरला नेले.

हिंसा न करता शांततेत आसारामला अटक करणे हे आमच्या टीमसाठी मोठे यश होते. संत रामपाल असो की राम रहीम, या सर्वांच्या अटकेदरम्यान प्रचंड हिंसाचार झाला होता. अनेक ठिकाणी केंद्रीय पोलिसांनाही पाचारण करावे लागले होते. आमच्या टीमची तयारी इतकी मजबूत होती की, आम्ही हे मिशन सहज पार पाडले.

'भक्त फोन करून जिवे मारण्याची धमकी द्यायचे'

ही केस सॉल्व्ह करणे आमच्या टीमसाठी इतके सोपे नव्हते. आम्हाला रोज फोनवर धमक्या येत होत्या. आमच्याकडे एका अशा व्यक्तीची केस आहे ज्याचे देशात आणि जगात कोट्यवधी फॉलोअर्स आहेत, जी देशातील बड्या नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत.

असे असतानाही मी आणि इतर अधिकारी कोणतीही भीती न बाळगता तपास करत होतो. याचे एक कारण हेही होते की, आम्हाला वरिष्ठ अधिकार्‍यांचे पाठबळ होते. मलाच नाही तर या केसचे प्रभारी अजय लांबा सर यांनाही धमकीचे फोन यायचे. मात्र, त्याच्या अटकेनंतर लगेचच गुजरातमधील दोन बहिणींनीही आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

अखेर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आमचा तपास अहवाल मंजूर केला. याप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...