आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2022... हे ते वर्ष होते जेव्हा शार्क टँक भारतात प्रथम सुरू झाले. हा शो आल्यावर एकच नाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडावर होते. ते नाव होते अश्नीर ग्रोव्हर यांचे. लोकांना अश्नीर यांचा हजरजबाबी आणि नो-नॉनसेन्स अॅटिट्यूड आवडला.
नंतर आले 2023, शार्क टँकने दुसऱ्या सीझनची घोषणा केली. चाहते खूप उत्साहित होते. मात्र यावेळी एक ट्विस्ट होता. अश्नीर या शोचा हिस्सा नव्हते. मात्र अश्नीर आता शार्क टँकपेक्षाही मोठे ब्रँड बनले होते.
अश्नीर कोणत्याही कंपनीचा भाग नव्हते, मात्र त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत होती. इन्स्टाग्राम रील्सपासून ते यूट्यूब शॉर्टसपर्यंत, प्रत्येक ठिकाणी अश्नीर आणि त्यांचे वन लायनर्स दिसत होते. याचदरम्यान अश्नीर यांनी त्यांचे आत्मचरित्र 'दोगलापन' रिलीज केले. 2022 मधील शार्क अश्नीर आता सेलिब्रिटी बनले आहेत.
सध्या अश्नीर ग्रोव्हर दिल्ली विमानतळामुळे चर्चेत आहे. एका प्रवासादरम्यान जेव्हा त्यांना विमानतळावर एन्ट्रीसाठी 30 मिनिटे लागली, तेव्हा त्यांनी ट्विट करून आपली नाराजी जाहीर केली. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनला जाणाऱ्या पंजाबींची संख्या पाहून ते असेही म्हणाले की दिल्ली विमानतळाला पंजाब विमानतळ घोषित केले पाहिजे.
आज लक्झरी लाईफमध्ये जाणून घ्या, मीम वर्ल्डमधील पोस्टर बॉय अश्नीर ग्रोव्हर यांच्या आलीशान जीवनाविषयी...
आयआयटी-आयआयएम दोन्ही ठिकाणी अश्नीर यांनी शिक्षण घेतले आहे, 1 वर्ष फ्रान्समध्ये इंजिनिअरिंग केले
अश्नीर ग्रोव्हर लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी होते. पाचवीत ते पहिल्यांदा वर्गात प्रथम आले होते. यानंतर त्यांनी ठरवले की त्यांना जीवनात प्रथमच यायचे आहे. 12 वीत त्यांना 91 टक्के मिळाले होते, तेव्हा ते आयआयटीची तयारी करत होते.
गमतीची गोष्ट म्हणजे आयआयटीसोबतच अश्नीर यांना दिल्तीतील प्रसिद्ध सेंट स्टिफन्स कॉलेजमध्येही प्रवेश मिळाला होता. मात्र त्यांनी आयआयटी दिल्लीची निवड केली आणि तिथे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केली. खूपच कमी लोकांना माहिती आहे की अश्नीर यांनी एक वर्ष फ्रेंचमधून इंजिनिअरिंग केली आहे.
वास्तविक आयआयटी दिल्लीत इंजिनिअरिंग करताना अश्नीर यांना एक वर्षांसाठी स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत फ्रान्समध्ये इंजिनिअरिंगची संधी मिळाली. ग्रॅज्युएशननंतर अश्नीर यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले.
लक्झरी कार्सची आवड - झोमॅटो फाऊंडर दीपिंदर गोयल यांना पाहून लागली स्पोर्टस कारची आवड
शार्क टँकच्या प्रोमोमध्येही अश्नीर आपली ग्रीन पोर्शे चालवताना दिसले होते. प्रोमोमध्ये अश्नीर यांनी सांगितले होते की, मला रात्री दिल्लीतील रस्त्यांवरून आपली स्पोर्टस कार चालवण्याची आवड आहे. तथापि अश्नीर यांना लक्झरी कारची आवड झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्यामुळे लागली.
एका मुलाखतीत अश्नीर यांनी सांगितले होते की, झोमॅटोमध्ये प्रत्येक नव्या फंडिंगनंतर दीपिंदर एक स्पोर्टस कार खरेदी करायचे. हे पाहून अश्नीर यांनीही ठरवले की ते जेव्हा फाऊंडर बनतील तेव्हा त्यांच्याकडेही लक्झरी कार्स असतील. आज अश्नीर यांच्याकडे मर्सिडिजपासून ते पोर्शेपर्यंत सर्व आलीशान कार्स आहेत.
त्यांची सर्वात प्रसिद्ध कार मर्सिडिज मेबॅक एस650 आहे. या कारची किंत अडीच कोटी रुपये आहे. तर अश्नीर यांच्या ग्रीन पोर्शे केमॅनची किंमत एक कोटी तीस लाख रुपये आहे. या दोन कारशिवाय अश्नीर यांच्याकडे ऑडी ए6 कारही आहे.
अश्नीर यांच्या कार कलेक्शनविषयी मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांच्या बहुतांश कार या सेकंड हँड असतात. ते मानतात की सेकंड हँड कार खरेदी केल्याने स्क्रॅचची चिंता मिटते आणि मालक न संकोचता आपली गाडी पळवू शकतो.
दक्षिण दिल्लीत लॅव्हिश अपार्टमेंट, किंमत सुमारे 30 कोटी रुपये
भारत पेमधून बाहेर झाल्यानंतर अश्नीरच नव्हे तर त्यांच्या घरातील डायनिंग टेबलही चर्चेत राहिला. बातमी व्हायरल झाली की अश्नीर यांच्याकडे 10 कोटींचा डायनिंग टेबल आहे. मात्र नंतर अश्नीर यांनी नंतर हे चुकीचे असल्याचे सांगितले. अश्नीर यांच्याकडे 30 कोटींचा अपार्टमेंट नक्कीच आहे.
अश्नीर यांच्याकडे दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये एक डबल स्टोरी लॅव्हिश अपार्टमेंट आहे. हे घर 18000 स्क्वेअर फुट भागात विस्तारलेले आहे. अश्नीर सांगतात की ते नॉन-ड्रिंकर आहेत. मात्र त्यांच्या घरात एक शानदार बार आहे. ते सांगतात की ते एक थेंबही दारू पित नाही. मात्र त्यांच्या घरात 150 लिटर प्रत्येक प्रकारची दारू आहे.
क्रिक-पे नावाने नवे स्टार्टअप बनवत आहेत अश्नीर
अश्नीर आपल्या स्टार्टअपच्या नावाकडे विशेष लक्ष देतात. त्यांचे मानणे आहे की स्टार्टअपचे नाव आणि यश एकमेकांशी जोडलेले असते. जेव्हा त्यांनी आपल्या स्टार्टअपचे नाव भारत-पे ठेवले होते, तेव्हा लोकांना वाटले की ही कोणतीतरी सरकारी कंपनी आहे. यामुळे लोकांना त्यांच्या स्टार्टअपवर विश्वास व्हायला लागला.
अश्नीर यांनी सांगितले की त्यांनी जाणीवपूर्वक असे नाव ठेवले होते. भारत-पे सुरू झाल्यानंतर केवळ 3 वर्षांतच कंपनीचे मूल्यांकन 20 हजार कोटी रुपये झाले होते. ते आता अशा प्रकारे त्यांचे नवे स्टार्टअप क्रिक-पे घेऊन येत आहे. क्रिक-पे एक फँटसी क्रिकेट स्टार्टअप असेल. आपल्या नव्या स्टार्टअपविषयी अश्नीर यांनी एक मजेशीर घोषणाही केली आहे.
त्यांच्या पुढच्या स्टार्टअपमध्ये जे कर्मचारी 5 वर्षे पूर्ण करतील, त्यांना अश्नीर भेट स्वरुपात एक मर्सिडिज देणार आहेत.
रंजकः कियारा अडवाणीमुळे अश्नीर यांचा घटस्फोट होता होता राहिला
अश्नीर ग्रोव्हर यांनी आपले पुस्तक दोगलापनमध्ये खुलासा केला आहे की कियारा अडवाणीमुळे त्यांचा घटस्फोट व्हायच्या मार्गावर आला होता. वास्तविक अश्नीर त्यांच्या एका मित्राला लग्नाविषयी विचारणा करत होते. त्यांच्या मित्राने त्यांना एका मॅचमेकरविषयी सांगितले.
तेव्हा अश्नीर यांनी गमतीत मॅचमेकरला त्यांच्यासाठी परफेक्ट मॅचविषयी विचारले. तेव्हा त्याने अश्नीर यांच्यासाठी कियारा अडवाणी परफेक्ट मॅच असल्याचे सुचवले. यानंतर अश्नीर गमतीत आपल्या आईला म्हणाले की, 'जर मी आज लग्न केले असते, तर माझे लग्न कियारा अडवाणीशी झाले असते.'
अश्नीर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी अश्नीर यांच्याशी बोलणे सोडले आणि दुसऱ्या दिवशी अर्धा तास अश्नीर यांना खूप सुनावले. सांगितले जाते की याच भांडणात माधुरींनी अश्नीर यांना शार्क टँकमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते आणि अश्नीर यांच्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.