आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ashwini Jagtap Complete Story; Laxman Jagtap Wife | Pimpri Chinchwad By Election | BJP | Ashwini Jagtap

कोण आहेत अश्विनी लक्ष्मण जगताप:पोलिस अधिकाऱ्याची मुलगी ते आमदाराची पत्नी.... आता मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार का?

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना भाजपच्या वतीने चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदार संघात अवघ्या काही दिवसातच पोटनिवडणूक लागली. त्यामुळे प्रचाराला जास्त वेळ मिळाला नाही. मात्र, आमदार जगताप यांच्या निधनानंतर मिळालेल्या उमेदवारीमुळे त्यांच्या पाठीशी लोकांची सहानभूती होती.

या सर्व पार्श्वभूमीवर अश्विनी जगताप कोण आहेत ते पाहूयात...

13.91 कोटींची मालमत्ता

अश्विनी जगताप यांनी निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जात त्यांचा व्यवसाय शेती असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न (वर्ष 2021-22) 66.36 लाख रुपये घोषित केले आहे. याशिवाय मुलगा आदित्यचे वार्षिक उत्पन्न 37.88 लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडे एकूण 13.91 कोटींची मालमत्ता आहे. त्या चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा.लि. मध्ये संचालक आणि चंद्ररंग फार्म आणि नर्सरी मध्ये भागीदार आहेत. व्यवसाय, गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि लाभांश हे त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांगितले आहेत.

कोण आहेत अश्विनी जगताप

  • चिंचवड विधानसभा मतदार संघातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी.
  • राजकीय पार्श्वभूमी नसली तरी पतीसोबत निवडणुकीच्या प्रचारात अग्रेसर असत.
  • पतीच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसात भाजपच्या वतीने विधानसभेची उमेदवारी जाहिर.
  • मुळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या अश्विनी जगताप यांचे वडील पोलिस अधिकारी.
  • सामाजिक कार्यात तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर.
  • प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा.
  • प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदार संघांमध्ये महिला बचत गटांचे जाळे तयार केले.
बातम्या आणखी आहेत...