आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट बरोबरीची:पुरुषांच्या नजरेत तीच स्त्री महान, जी नोकरी करेल, मूल जन्माला घालेल आणि एकटीनेच संगोपन करेल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाचा पृथ्वीवर जन्म का झाला आहे? चला हे थोडे सरळ असे म्हणूया की पुरुषाचा पृथ्वीवर जन्म का झाला आहे? यासाठी का की, मोठेपणी तो लग्न करेल. लग्न करून मूल जन्माला घालेल. मग मोठे झाल्यावर त्या मुलांचे लग्न लावून देईल. नंतर त्या मुलांच्या मुलांना आपल्या अंगा-खांद्यावर खेळवेल.

ऐकून हसू येतंय ना. हसण्याचीच गोष्ट आहे. लग्न, प्रेम, नाते, संतती, हे सर्व जीवनाच्या सतत क्रमाचा एक भाग आहे. हे तर होतच राहते. मात्र हेच जीवनाचे पहिले आणि अंतिम ध्येय नसते.

मानवी जीवनाचे ध्येय तर दुसरेच होते. उद्देश होता, जो गेल्या वीस हजार वर्षांत मानवाने शोधला आणि मिळवला. उद्देश होता जीवन, निसर्ग आणि विज्ञानाच्या रहस्यांचा शोध. सफरचंद झाडावरून तुटल्यानंतर जमीनीवरच का पडते, आकाशात का जात नाही?

पृथ्वी गोल का आहे, पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते. दिवस-रात्र कसे होतात, हवामान कसे बदलते. मानवाच्या शरीरात एका नव्या मानवाचा देह कसा आकार घेतो. इजिप्तचे पिरॅमिड कसे बनले. मानव चंद्रापर्यंत कसा पोहोचला? इंटरनेटचा शोध कसा लागला?

कित्येक रहस्यांचा शोध, प्रश्नांचे उत्तर मानवाने शोधले, कारण मानव असण्याचे, जिवंत असणाचे ध्येय हेच आहे. सॉरी, हे वाक्य पुन्हा लिहूया. मनुष्याने नव्हे, पुरुषांनी शोधले कारण पुरुष असण्याचे मोठे ध्येय हेच होते.

स्त्री असण्याचे ध्येय काय आहे? स्त्रीचा जन्म पृथ्वीवर कोणत्या उद्देशाने झाला आहे?

आता काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांनी म्हटले की महिलांनी 30 वर्षांच्या आत लग्न केले पाहिजे, 22 ते 30 वर्षांदरम्यान मूल जन्माला घातले पाहिजे, कारण असे केले नाही तर समस्या निर्माण होतात.

असे म्हणणारे सरमा पहिले नाही. पुरुष जेव्हापासून आपली शस्त्रे आणि जहाज घेऊन पृथ्वीच्या शोधात निघाले आहेत, तेव्हापासून ते स्त्रियांना हेच शिकवत आणि सांगत आहेत की पुरुषांच्या जीवनाचे ध्येय तर महान काम करणे आहे, पण स्त्रियांच्या जीवनाचे ध्येय महान पुरुषांना जन्म देणे आहे.

स्त्रीचा हाच गुण आहे, हीच संपत्ती की ती आपल्या शरीरात गर्भ घेऊन जन्मली आहे आणि जोपर्यंत ती त्या गर्भात महान पुरुषांची संतती धारण करत नाही, तिचे जीवन व्यर्थ आहे.

तर वास्तवात ही गोष्ट नवी नाही. गोष्ट ही आहे की गेल्या 20 हजार वर्षांपासून ही गोष्ट वेगवेगळ्या रुपात वारंवार सांगितली जात आहे. आता जिथे जग बदलत आहे, मुली विज्ञान आणि राजकारणापासून ते ज्ञान आणि कर्माच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत, तरीही आईच्या महानतेचा, गर्भाच्या पावित्र्याचा शिक्का तिच्यावर कायम असतो.

पुरुष कोणत्याही निमित्ताने तोंड उघडून स्वतःच्या असंस्कृतपणाचा परिचय देत असतो. मातृत्वाचे महिमामंडन सतत जारी राहते. एकदा पृथ्वीही गोल फिरणे बंद करू शकते. मात्र या पुरुषांच्या तोंडून आईच्या महानतेचा राग बंद होऊ शकत नाही.

पुरुषसत्ताक समाजाने हजारो वर्षांपासून महिलांना जो पाठ शिकवला आहे, आता महिला त्यावरून पलटत आहेत. पुरुषांनी सांगितले की महिलेची सर्वात मोठी ताकद आहे मूल जन्माला घालणए. हा महिलेचा सर्वात महान गुण आहे आणि आता महिला त्याच महान कामापासून आपले हात झटकत उभ्या राहिल्या आहेत. त्या जीवनातील इतर कामांत बरोबरीचा हिस्सा मागत आहेत आणि आई होण्यास नकार देत आहेत.

ही कोणतीही कल्पना नसून, वास्तवातील समस्या आहे. जपान, चीन, स्पेन, पोर्तुगाल आणि कोरियासारख्या देशांत जन्मदर घटला आहे. या नावांत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे ते देश आहेत, जिथे आर्थिक विकासानंतरही पितृसत्तेची मूळं अजुनही मजबूत आहेत. ज्यांनी आपल्या महिलांना नोकरी आणि सत्तेत वाटा तर दिला मात्र पुरुषांची सत्ता कमजोर झाली नाही.

महिला घराबाहेर पडून काम करायला लागल्या, मात्र घरातील कामात पुरुषांची कोणतीही हिस्सेदारी झाली नाही. महिला पैसे कमवायला लागल्या. मात्र पुरुषच घराचा प्रमुख राहिला. मूल जन्माला घालण्यापासून ते त्याचे पालनपोषण करेपर्यंत सर्व मेहनत एकट्या महिलेच्या वाट्याला आली.

एकूणच सशक्तीकरणाच्या नावे पुरुषांनी महिलांना दुप्पट श्रमाच्या चक्कीत भरडले. आणि आता परिणाम हा आहे की महिलांना कळत आहे की कशा प्रकारे त्यांना पुन्हा मूर्ख बनवले आहे. त्यांचा वापर केला आहे.

आता या फसवणुकीचे उत्तर महिला अशा पद्धतीने देत आहेत की त्या आई होण्यास नकार देत आहेत. या देशांत केवळ जन्मदरच नव्हे तर लग्नाचा दरही सर्वात कमी आहे. तरुण मुलींना कळत आहे की यांच्या जाळ्यात अडकण्याचा अर्थ आहे नोकरीही करा, मूलही जन्माला घाला, नंतर एकट्याने त्याचे संगोपन करा. यात कुणीही मदत करणार नाही. सगळी जबाबदारी एकट्या महिलेची असेल आणि सर्व महानता पुरुषाची.

मातृत्वाचे माहात्म्य सागंणाऱ्या समाजाचा दुटप्पीपणा इतका खोल आहे की त्याने कधीही या महान श्रमात मदत करण्याचा विचार केला नाही. मूल जन्माला घालण्यासाठी आपले करिअर, प्रमोशनशी तडजोड महिलाच करेल. देश आणि समाज तिला कसलिही सूट देणार नाही. समाज केवळ आई महान आहे म्हणत तिला मूर्ख बनवेल.

तर भावा, नारी ही आता मूर्ख राहिली नाही. ती चंद्रापर्यंत जाऊन आली आहे आणि तिला तुमची सर्व हुशारी कळली आहे. म्हणूनच ती मूल जन्माला घालण्यासच नकार देत आहे. इथपर्यंत की, आता जगासमोर बिघडत्या डेमोग्राफीचे नवे संकट निर्माण झाले आहे. नवे मानवच नसतील तर जुने कधीपर्यंत पृथ्वीवर राज्य गाजवतील?

पुरुष आहेत तर काय झाले? अमर होऊन थोडीच आले आहेत. आपली जमीन-संपत्ती, वारसा सांभाळण्यासाठी त्यांना वारस तर हवा. आणि तो वारस महिलाच जन्माला घालू शकते.

मात्र महिला तर मूल जन्माला घालण्यास नकार देत आहेत. म्हणूनच पुरुषांनी एकदा पुन्हा जुने भटारगाणे सुरू केले आहे की आई महान आहे. 20 च्या आधी लग्न करा, 30 च्या आधी मूल जन्माला घाला. पतीला संतान द्या. कुटुंबाला वारस द्या. देशाच्या भविष्यासाठी नागरिक द्या.

या सर्वांच्या मोबदल्यात स्त्रीला तुम्ही काय देणार?

ठेंगा?

तुमच्या ठेंग्यासाठी ती आता इतकी मोठी किंमत मोजणार नाही. कारण तिला माहिती आहे की मूल जन्माला घालणे तिचा कोणताही मोठा गुण नाही. तिच्या शरीरात गर्भपिशवी हा एक अतिरिक्त अवयव आहे, जो एका नव्या मानवाला आपल्या शरीरात धारण करतो.

मात्र याच्या आधी आणि नंतर सर्व जबाबदारी एकट्या स्त्रीची नसते. या जबाबदारीत तिला पुरुषाचीच नव्हे, तर संपूर्ण समाज आणि देशाची साथ हवी आहे. तुम्हाला मूल हवे, तुम्हाला देशासाठी नागरिक हवे, तर तुम्हाला अर्धे काम करावे लागेल.

महिला खोट्या महानतेची किंमत आता एकटीने मोजायला तयार नाही. त्या आता आणखीन मूर्ख बनायला तयार नाही. झाडावरून पडणारे सफरचंद पाहून तीही गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकत होती. वास्को द गामासारखी नव्या जगाच्या शोधात निघू शकत होती. मात्र करू शकली नाही कारण ती तुमच्यासाठी स्वयंपाकघरात अडकली होती, तुमचे मूल जन्माला घालत होती.

मात्र आता नाही. या गोष्टींना एक हजार वर्षे झाली आहेत. या एक हजार वर्षांत महिला दहा हजार वर्षे पुढे निघून गेल्या आहेत. आता त्या महान पुरुषांना जन्म देणाऱ्या महान गर्भाच्या नव्हे तर स्वतः महान होण्याच्या प्रवासात आहेत.

तुम्हाला या प्रवासाचा भाग व्हायचे असेल तर चला, अन्यथा तुमचा रस्ता मोकळा आहे.

बातम्या आणखी आहेत...