आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सप्लेनर:दम्याच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे का कोविड-19? जागतिक अस्थमा दिनानिमित्त जाणून घ्या या रुग्णांवर होणारा कोरोनाचा परीणाम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत लठ्ठपणा, डायबिटीज, हायपरटेंशन, हृदयाच्या आजारांसंबंधीत लोकांमध्ये कोविड-19 चा धोका सर्वात जास्त दिसला आहे.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये इन्फेक्शन आणि मृतांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या आकड्यांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. कोरोना इन्फेक्शन हा एक श्वासासंबंधीत आजार आहे आणि भारतात 100 पैकी 4 वयस्करांना दमा आहे. पर्यावरणीय प्रदुषणामुळे या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो की, कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंमागे दमा हे मोठे कारण आहे का?

या जागतिक दमा दिन (5 मे) रोजी, आम्ही कोविड -19 संक्रमण आणि दम्याचा काय संबंध आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मुंबईतील जसलोक रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील श्वसन चिकित्सा आणि पल्मोनोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. राहुल बाहोट यांच्याशी बोललो. चला, या दोघांवर त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या?

दम्याच्या रुग्णांसाठी कोरोना इन्फेक्शन जीवघेणे आहे का?

  • नाही. आतापर्यंत असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाही. आतापर्यंत लठ्ठपणा, डायबिटीज, हायपरटेंशन, हृदयाच्या आजारांसंबंधीत लोकांमध्ये कोविड-19 चा धोका सर्वात जास्त दिसला आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ एलर्जी अस्थमा अँड इम्युनोलॉजीनुसार दमा आणि कोविड-19 विषयी अनेक अभ्यास झाले आहेत. जास्तीत जास्त अभ्यासात आढळले आहे की, ज्यांना दमा आहे त्यांच्यापेक्षा डायबिटीज, हायपरटेंशन आणि इतर गंभीर आजार असलेल्यांना कोरोनाचा जास्त धोका आहे.
  • दम्याच्या रुग्णांमध्ये कोरोना इन्फेक्शन असल्यासंबंदीचे 389 अभ्यास झाले आहेत. आणि याचे सिस्टमेटिक रिव्ह्यू आणि मेटा-एनालिसिस सांगते की, कोविड-19 आणि दम्याचा काहीच संबंध नाही. रुग्णालयात दाखल करण्याचा काळ आणि आयसीयूमध्ये दाखल करण्याचा काळ किंवा मृत्यूशींही याचा काहीच संबंध नाही.

कोविड-19 इन्फेक्शनमुळे दम्याचे लक्षण वाढतात का?

  • नाही. हे सत्य आहे की, आपल्या श्वसन प्रणालीचे अनेक व्हायरस ब्रोंकाइटल दम्याच्या लक्षणांमध्ये तेजी आणतात. मात्र याचे कोणतेही पुरावे नाही की, कोविड-19 व्हायरसही दम्याच्या लक्षणांना वाढवते. दमा आणि अॅलर्जी विभागात काम करणाऱ्या क्लिनिशियन्सनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की एलर्जीक रायनाइटिस, दमा, श्वसन नलिकेच्या वरच्या भागाचे इन्फेक्शन कोविड-19 इन्फेक्शनसोबत होऊ शकते.

कोविड-19 आणि दम्याच्या वाढत्या लक्षणांमध्ये साम्य आहे का?

  • हो. कोविड-19 इन्फेक्शनमध्ये सतत कोरडा खोकला येतो आणि श्वासाची गती वाढते. असेच लक्षण दम्याचेही आहेत. यामुळे कोरोनामुळे असे होत आहे की, दम्यामुळे हा त्रास होतो, हे समजून घेणे दम्याच्या रुग्णांसाठी अवघड जाते. मात्र कोविड-19 महामारीमध्ये आपण पाहिले आहे की, ज्या लोकांनी दम्यावर नियंत्रण मिळवले आहे, त्यांच्यामध्ये महामारीचे लक्षण जास्त दिसत नाहीत.

कोविड-19 इन्फेक्शनमध्येही नेबुलायजर्सचा वापर सुरू ठेवावा का?

  • दम्याच्या रुग्णांसाठी नेबुलाइजेशन वापरण्यासाठी सोपे आणि सुविधाजनक असतात. पण यापेक्षा मोठ्या संख्येत एअरोसोल निघतात जे कोविड-19 ट्रान्समिळनचा धोका वाढवते. याव्यतिरिक्त मर्यादित डोस असणारे इनहेलरचा वापर करा. दोघांचा प्रभाव समान असतो, मात्र कोविड-19 ट्रान्समिशनचा धोका खूप कमी होतो.

दम्याच्या रोग्यांच्या उपचारांमध्ये स्टेरॉइड्सचा वापर करायला हवा का?

  • हो. कॅनडाच्या संशोधनात सल्ला आहे की, दम्याच्या अटॅक्समध्ये सिस्टेमिक स्टेरॉइड्सचा वापर केला गेला पाहिजे. मग कोविड-19 शी संबंधीत असो किंवा नसोत. ओमलीजुमाब, मेपोलीजुमाब, रेसलिजुमाब, बेनरालीजुमाब आणि डुपिलुमाबचे क्लीनिकल ट्रायल्स सांगतात की, ही औषधे व्हायरल इन्फेक्शन वाढण्याच्या धोक्याला वाढवत नाही तर दम्याच्या लक्षणांना शांत करते. या माहितीच्या आधारावर स्टेरॉइड्सचा वापर दम्याच्या उपचारांमध्ये जारी ठेवला जाऊ शकतो.

दम्याच्या रुग्णांना कोरोना व्हॅक्सीनचा काही धोका आहे का?

  • नाही. दम्याचे सर्व रुग्ण कोविड-19 व्हॅक्सीन घेऊ शकतात. जर एखाद्या रुग्णाला व्हॅक्सीनच्या एखाद्या केमिकलचा हायपरसेंसिटिव्हिटी किंवा गंभीर अॅलर्जीक रिअॅक्शनचा धोका असेल तर त्यांनी व्हॅक्सीन टाळायला हवी. यामुळे दम्याच्या रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर लस घ्यावी.

दम्याचे औषध व्हॅक्सीनच्या इफेक्टिव्हनेसला प्रभावित करेल?

  • नाही. सौम्य ते मध्यम रोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉईड्समुळे कोविड -19 लसची कार्यक्षमता कमी होत नाही किंवा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होत नाही. अशा परिस्थितीत, जे रुग्ण दमा नियंत्रित करण्यासाठी औषध वापरत आहेत किंवा इंजेक्शन घेत आहेत, त्यांनी लसच्या दोन इंजेक्शन दरम्यान एक आठवड्याचे अंतर ठेवावे.
बातम्या आणखी आहेत...