आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ओरिजिनल:टाेकियो ऑलिम्पिकसाठीचे खेळाडू शास्त्रीय पद्धतीच्या आधारे हाेणार तयार; हृदयाचे ठोके स्पष्ट करणार फिटनेस; आहारापासून सरावापर्यंत सर्व देखरेखीत

अनिल बन्सल | सोनिपत10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनिपतमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स; प्रथमच साईची तज्ञ समिती जखमी खेळाडूंवर लक्ष ठेवणार

क्रीडा मंत्रालयाने मिशन ऑलिम्पिकसाठी आता विशेष माेहिम हाती घेतली. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे ऑलिम्पिकचे खेळाडू तयार हाेतील. हद्रयातील ठाेके खेळाडूंच्या फिटनेसची टक्केवारी स्पष्ट करणार आहे. यात खेळाडूंची तयारी वैज्ञानिक पद्धतीने होईल, ज्यात आहार, जीवनशैलीसह खेळातील सराव या सर्व गोष्टी क्रीडा वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील. सोनिपत येथे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये या सुविधा आहे. साहित्य उपलब्ध होण्यास सुरुवातीचा निधी ४० लाखांदरम्यान आहे. हे क्रीडा केंद्र क्रीडा विज्ञानाच्या आधारावर चालेल.

> व्हिओ २ मॅक्स : याने हृदयाच्या ठोक्याची माहिती मिळते. यामुळे खेळाडूंच्या हृदयाच्या ठोक्यांच्या माहितीआधारे ताे खेळाडू किती तंदुरुस्त आहे हे समजेल.

> हायपोक्सिक चेंबर : असे ठिकाण, जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. दर्जा उंचावण्यासाठी हे चेंबरफायदेशीर. समुद्रतळाशी ऑक्सिजनचे प्रमाण २०.९ असते, मात्र येथे १०.१ टक्के प्रमाण कमी करत सराव करता येतो.

> क्रायोथेरपी : बाधीत स्नायूना आराम देण्याची प्रक्रिया. यात नुकसान झालेल्या टिशूला बाजूला करण्यास सहायक ठरते. यात १८० डिग्रीपर्यंत तापमान कमी करता येते.

> हायड्रोथेरपी:

यात जलतरणिकेत व्यायाम करून घेतला जातो. कारण, खेळातील तणाव कमी करण्यासाठी. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. साध्यांच्या दुखण्यावर परिणाम करतो.

शरीरचा स्टॅमिना सांगणारे मशिन :

मशीनद्वारे शरीराची ताकद व स्टॅमिना समजतो.पाणी, प्रोटीन, मिनरल, स्थूलता, वेस्ट- हिप रेशियो, फॅट फ्री मांस, बेसल मेटाबॉलिक रेटची माहिती मिळते.

खेळाडूंच्या रिहॅबवर लक्ष

रिओ ऑलिम्पिकदरम्यान सायना जखमी असताना खेळली व दीपा कर्माकर सतत जखमी होत असलेल्या घटना घडताय. ऑलिम्पिकदरम्यान असे पुन्हा घडू नये यासाठी तयारी केली जात आहे. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी समिती तयार करण्यात येत आहे. क्रीडा वैज्ञानिक, क्रीडा वैद्यकीय तज्ञ आणि फिजिओथेरपिस्टचा समावेश असेल. ही समिती खेळाडू जखमी झाल्यानंतर रिहॅबिलिटेशनदरम्यान त्याच्यावर लक्ष ठेवेल. समिती वैद्यकीय अहवालाच्या आधारे लक्ष ठेवतील की, खेळाडूंनी योग्य डॉक्टर व रुग्णालयाची निवड केली किंवा नाही. रिहॅबदरम्यान त्याला संपूर्ण वेळ द्यावा लागेल की नाही. दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यावर खेळाडू मैदानात परतण्यावर लक्ष देतील. साईसमोर दीपा कर्माकरचे उदाहरण आहे.

फिजिओलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्टची नियुक्ती

खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना दुखापतीतून लवकर बाहेर पडण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने हे मदतीचे पाऊल उचलले आहे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडूंच्या सरावाबरोबर दुखापतीतून बरे होण्यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ञ असेल. वजीर सिंग, व्यवस्थापक, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, सोनिपत.