आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल दिन विशेष:अटलांटिक महासागराचा प्रवाह 1600 वर्षांत सर्वात कमकुवत, युरोपात उष्णतेच्या झळा वाढल्या, भारतात पावसात होईल घट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या समुद्र विज्ञानातील तज्ञांचा गंभीर इशारा

आपण ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करत आहोत. त्याचा परिणाम निसर्गावर दिसू लागला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या ताज्या संशोधनानुसार समुद्राचा पंप म्हटल्या जाणाऱ्या अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन (एमॉक) चा वेग १६०० वर्षात सर्वात कमी झाला आहे. आपण समुद्राला वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. जसे आमच्या जवळ अटलांटिक महासागर आहे व तुम्ही हिंदी महासागराजवळ राहतात. मात्र, निसर्गासाठी सर्व समुद्र एकच आहेत व पाण्याच्या अभिसरण यंत्रणेच्या माध्यमातून सर्व समुद्र एकमेकांशी जोडलेले आहेत. या संबंधांतून हवामान तयार होते. युरोप व कॅनडादरम्यान उत्तर अटलांटिक महासागरात दक्षिण व पूर्व समुद्रातून गरम पाण्याचा प्रवाह येतो व याच ठिकाणी हिमनगाचे वितळलेले पाणीही समुद्रात मिसळते. या अभिसरणाला एमॉक म्हणतात.

ही अवस्था तापमान व पाण्याच्या घनत्वातील फरकामुळे निर्माण होते. समुद्रात खारे पाणी असते, ज्याचे घनत्व नदीतून येणाऱ्या गोड पाण्यापेक्षा जास्त असते. पृथ्वीच्या मध्यभागी म्हणजे इक्वेटरच्या जवळ उष्णता जास्त असते यामुळे येथील समुद्रातील पाणी वेगाने गरम होते. मात्र आर्क्टिक व अंटार्क्टिकाजवळ समुद्राचे पाणी थंड असते. थंड खारे पाणी समुद्रात खोल जाते व त्याची जागा भरून काढण्यासाठी पृष्ठभागावरील गरम पाणी वाहू लागते. या अभिसरणामुळे सर्व समुद्र जोडले आहेत. यामुळे उन्हाळा व हिवाळ्याचे संतुलन तयार होते. वाऱ्याची दिशा व त्याचा प्रभाव निर्माण होतो. मान्सूनचा पाऊसही या प्रक्रियेमुळे होतो. यामुळे समुद्रात खोल तयार होणारे पोषक तत्त्वे वर येतात, त्यावर मासे अवलंबून असून माशांवर पृथ्वीवर एक मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

समुद्र वातावरणातील ९०% कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो व समुद्रात ही क्षमता अभिसरण प्रक्रियेमुळेच येते. आता या प्रक्रियेचा वेग धिमा होत आहे. हे अभिसरण हळू होण्याचा संबंध १९ व्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीशी आहे. यामुळे याचे कारण मानवनिर्मित विकास आहे. जसजशी ग्लोबल वॉर्मिंग वाढत गेली, त्याचा वेग कमी होत गेला. एमॉक थांबल्याने हिमनग वेगाने वितळत आहेत. त्यांचे गोड पाणी समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगते. गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने ते लवकर गरम होते. म्हणजे ज्या गरम पाण्याला हिमनगाजवळ येऊन थंड व्हायला हवे ते पाण्याला गरम करत आहे. यामुळे समुद्राचा पृष्ठभाग गरम होत आहे. उन्हाळा वाढत आहे. युरोपात उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत. भारतही त्यातून सुटलेला नाही. मान्सूनची दिशा दक्षिणेकडे बदलत आहे. उत्तर भारत कोरडा होऊ लागेल तर वाळवंटात जास्त पाऊस होईल.

शब्दांकन : रितेश शुक्ल

बातम्या आणखी आहेत...