आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Avoid Eating Pain Killers If There Is Pain Or Fever, Corona Can Be Serious If The Patient; Special Advice For Patients With Heart Disease, Diabetes And BP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICMR चा इशारा:वेदना किंवा ताप असेल तर पेन किलर खाणे टाळा, कोरोना असल्यास गंभीर होऊ शकतो रुग्ण; हृदयरोग, मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांसाठीही विशेष सल्ला

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हृदयरोग, मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी -

कोरोनामध्ये पेन किलर औषधी घातक ठरू शकतात. ICMR (इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च) ने ताज्या रिपोर्टमध्ये इबुप्रोफेन (Ibuprofen) सारख्या अनेक पेन किलर्समुळे कोरोना धोका अधिक वाढतो असे म्हटले आहे. हृदयरोग्यांसाठी हानिकारक मानली जाणारी ही औषधे मूत्रपिंडाचा धोकादेखील वाढवतात.

कोरोनामध्ये पेन किलर औषधी घातक ठरू शकतात. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, लोकांनी एनएसएआयडी (नॉन-स्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स) टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच ही औषधे घ्यावीत. आवश्यक असल्यास पॅरासिटामॉल घ्या. हे सर्वात सुरक्षित वेदनाशामक औषधांपैकी एक आहे.

शरीरात ताप किंवा वेदना असल्यास लोक तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी पायरेटिक औषधे घेतात. यापैकी सर्वात पॅरासिटामॉलसोबत इबुप्रोफेन मिसळून तयार केलेली औषधे आहेत.

हृदयविकार, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यामुळे कोरोनाचा धोका वाढत नाही
आयसीएमआर सांगते की, हृदयरोग, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना इतरांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्गाचा धोका जास्त असतो, असे नाही. मात्र जगातील आतापर्यंतच्या अनुभवावरून या आजारांनी ग्रस्त लोकांमध्ये कोरोना झाल्यावर गंभीर लक्षणे दिसली आहेत. म्हणून, अशा लोकांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

मधुमेह: साखर तपासा, औषधे घेत राहा
आयसीएमआरचा सल्ला आहे की, मधुमेहाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि योग्य व्यायामाची आवश्यकता असते. या रूग्णांनी वारंवार त्यांची साखरेची पातळी तपासून पहावी आणि नियमितपणे औषधे घ्यावीत.

हृदयरोग: डॉक्टर न मिळाल्यास औषध घेत रहा
त्याचप्रमाणे हृदयरोग असलेल्या रुग्णांना वेळेवर औषधे घेणे खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार थांबवू नका. जर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकत नसाल तरी तुमची सुरु असलेली औषधे घेत राहा. विशेषतः कोलेस्ट्रॉल (स्टॅटिन) आणि मधुमेहावरील औषधे नियमिच घ्यावी.

रक्तदाब: बीपीच्या औषधांनी कोरोनाची तीव्रता वाढत नाही

ICMR च्या म्हणण्यानुसार, उपलब्ध माहितीचा आढावा घेतल्यानंतर, शास्त्रज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात की, ब्लड प्रेशरच्या औषधांमुळे कोरोना होण्याची शक्यता किंवा त्या नंतरची तीव्रता वाढते याचा पुरावा मिळालेला नाही. यामध्ये ACE इनहिबिटर आणि अँजिओटेन्सीन रिसेप्टर ब्लॉकर्स म्हणजेच ARB या दोन्ही औषधांचा समावेश आहे.

ACE इनहिबिटरमध्ये रॅमीप्रील (Ramipril), एनालाप्रिल (Enalapril) इत्यादी औषधांचा समावेश आहे. त्याच वेळी, ARB मध्ये लोसार्टन (Losartan), टेल्मिसार्टन (Telmisartan) इत्यादी औषधांचा समावेश आहे. ICMRचे म्हणणे आहे की, ही औषधे हार्ट अटॅक रोखण्यासाठी आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. ही औषधे बंद करणे हानिकारक ठरु शकते.

शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा, मासांहारी असाल तर ते खाणे सुरु ठेवू शकता
लोकांनी त्यांची जीवनशैली निरोगी ठेवण्याची सल्ला आयसीएमआरने दिला आहे. सिगारेट आणि अल्कोहोलपासून दूर रहा. आपले रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा आणि नियमितपणे व्यायाम आणि शारीरिक हालचाली करत राहा. घराबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळा. जास्त मीठ खाऊ नका. आपण मांसाहारी असल्यास आपण ते खाणे सुरु ठेवू शकता. प्रथिने आणि फायबरसह फळे आणि भाज्या खाणे सुरु ठेवा.

तज्ज्ञांचा सल्ला - लसी घेण्यापूर्वी किंवा नंतर पेनकिलर खाऊ नका
जगभरातील तज्ज्ञांनी कोरोना लस घेण्यापूर्वी किंवा नंतर पेनकिलर न घेण्याचा सल्ला दिला आहे. ईबुप्रोफेन (अ‍ॅडविल, मोट्रिन आणि इतर ब्रँड) सारख्या काही वेदनाशामक औषधे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करते. तर लस घेण्याचा उद्देशच ती वाढवणे हा आहे.

व्हायरलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ही वेदनाशामक औषधांनी उंदरांच्या शरीरातील अँटीबॉडीज बनण्याची गती कमी केली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील फार्मासिस्ट जोनाथन वतनबे म्हणतात की, जर एखाद्याला पेनकिलर घेण्याची गरज असेल तर त्यांनी एसिटामिनोफेन (टायलेनॉल) किंवा पॅरासिटामोल घ्यावे. हे सर्वात सुरक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...