आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनच्या संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार:पुरस्कार विजेत्या ऑलेक्झांड्रा बंकरमध्ये राहिल्या, पुतिन यांच्या निषेधाचे नेतृत्त्व केले

पूनम कौशल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

7 महिन्यांपासून युद्ध लढणाऱ्या युक्रेन आणि रशियातील या दोन संघटनांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. युक्रेनच्या सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टी या युद्ध गुन्ह्यांविरुद्ध काम करणाऱ्या संस्थेचेही नाव विजेत्यांमध्ये आहे.

ऑलेक्झांड्रा मॅत्वीचुक या संस्थेच्या प्रमुख आहेत. युक्रेनवर रशियन हल्ल्यापूर्वीही त्या मानवी हक्कांचे मुद्दे मांडत आहेत. युद्धाच्या सुरुवातीला त्या युक्रेनची राजधानी कीवमध्ये होत्या. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे त्यांना बंकरमध्ये लपून राहावे लागले. नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्या ट्रेनमध्ये होत्या आणि पोलंडहून कीवला जात होत्या.

कीवमध्ये रशियन क्षेपणास्त्राांचा मारा होत असल्याची दिव्य मराठी नेटवर्कला दिली होती माहिती

युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यावर दिव्य मराठी नेटवर्कने ओलेक्झांड्रा यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी कीवमधील एका बंकरमध्ये आश्रय घेतला होता. त्यावेळच्या परिस्थितीचे वर्णन करताना ओलेक्झांड्रा यांनी सांगितले की, येथील लोकांचा आत्मविश्वास कायम आहे. कीवमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. येथील नागरिक पोलंडच्या सीमेवर गेले आहेत.

उंच इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून लोकांना मेट्रो स्टेशन-बंकरमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बहुतेक लोक बंकरमध्ये आहेत. युद्धात सामान्य लोक मारले जात आहेत. युक्रेनमध्ये एक मोठे मानवतावादी संकट निर्माण होत आहे. कीवमध्ये भयंकर बॉम्बस्फोट झाला आहे. बेलारशियन भूमीतून रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागत आहे.

39 वर्षीय ओलेक्झांड्रा युक्रेनच्या लोकशाही समर्थक चळवळीतही सक्रिय होत्या. त्यांना 2014 मध्ये नॉर्वेचा जुर लिंडरब्रेक पुरस्कार देखील मिळाला होता.
39 वर्षीय ओलेक्झांड्रा युक्रेनच्या लोकशाही समर्थक चळवळीतही सक्रिय होत्या. त्यांना 2014 मध्ये नॉर्वेचा जुर लिंडरब्रेक पुरस्कार देखील मिळाला होता.

ओलेक्झांड्रा युद्धाच्या वेळी लोकांना मदत करताहेत

रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण करून राजधानी कीवला वेढा घातला होता. त्या नंतर ऑलेक्झांड्रा कीवपर्यंत देशभरातून आलेल्या लोकांची मदत करत होत्या. ओलेक्झांड्रा पुतिन आणि रशियाच्या विरोधातील नेतृत्त्वाच्या चेहरा बनल्या. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही त्यांनी युक्रेनचे समर्थन सुरू ठेवले.

2013 मध्ये पहिल्यांदा आल्या प्रकाशझोतात

ओलेक्झांड्रा युक्रेनच्या मानवाधिकार आयुक्त कार्यालयात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्या युक्रेनमधील मानवाधिकार समस्यांवर वार्षिक अहवाल प्रकाशित करतात. नोव्हेंबर 2013 मध्ये युक्रेनमध्ये रशिया समर्थक राष्ट्राध्यक्षांविरुद्ध युरोमैदान चळवळ सुरू झाली. ऑलेक्झांड्रा यांनी लोकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन केंद्र चालवले. 30 नोव्हेंबर रोजी सरकारने कीवमध्ये आंदोलकांवर हल्ला केला. यानंतर ऑलेक्झांड्रा चर्चेत आल्या.

पुतीन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे: ओलेक्झांड्रा

नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर ओलेक्झांड्रा म्हणाल्या की, मानवी सनदेचे उल्लंघन केल्याबद्दल रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर काढले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांनी युद्धग्रस्तांना न्याय द्यावा.

रशियाचे अध्यक्ष पुतिन, बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को आणि इतर युद्ध गुन्हेगारांवर आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाद्वारे खटला चालवला जावा. युक्रेनमधील पीडितांना न्याय मिळाल्याशिवाय कायमची शांतता येऊ शकत नाही.

ओलेक्झांड्रा यांनी बेलारूस आणि रशियामध्ये मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे मुद्दे देखील उपस्थित केले आहेत आणि दोन्ही देशांच्या सरकारांवर टीका केली आहे.

  • ओलेक्झांड्रा यांची संस्था केवळ युक्रेनमधील लोकांनाच नाही तर प्राण्यांच्या बचावासाठीही मदत करते.
  • युक्रेनमध्ये पुतिन यांनी युद्ध थांबवले नाही तर ते उर्वरित युरोपमध्ये जाऊ शकतात, असा त्यांचा विश्वास आहे.

2007 मध्ये झाली सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीची स्थापना

फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर नागरी स्वातंत्र्य केंद्राने युद्ध गुन्ह्यांची ओळख पटवून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम केले.
फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर नागरी स्वातंत्र्य केंद्राने युद्ध गुन्ह्यांची ओळख पटवून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम केले.

ही संघटना 2007 मध्ये युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्थापन झाली. युक्रेनमध्ये लोकशाही मजबूत करणे हा संस्थेचा उद्देश होता. युक्रेनमध्ये अजूनही खर्‍या अर्थाने लोकशाही नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा भाग व्हावा, अशी संघटनेची मागणी आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा या संघटनेने युद्ध गुन्ह्यांच्या प्रकरणांची चौकशी केली. आता हे खटले आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल होत आहेत.

तुरुंगात बंदिस्त बेलारूसी मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. अ‍ालिस यांना नोबेल शांतता पुरस्कार

2011 ते 2014 पर्यंत आलिस तुरुंगात होते. 2020 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
2011 ते 2014 पर्यंत आलिस तुरुंगात होते. 2020 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

​​बेलारूसच्या मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. आलिस बिलिआत्स्के यांचीही शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आलीस यांनी 1980 मध्ये बेलारूसच्या हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही चळवळ सुरू केली. ते आजपर्यंत आपल्या देशात खरी लोकशाही बहाल करण्याची लढाई लढत आहेत.

बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को रशिया-युक्रेन युद्धात व्लादिमीर पुतिन यांच्या पाठीशी उभे आहेत. आलिस यांची संस्था तुरुंगात टाकलेल्या लोकशाही समर्थकांना कायदेशीर मदत पुरवत होते. आलिस स्वतः अजूनही तुरुंगात आहेत.

रशियाच्या मानवाधिकार संघटनेच्या मेमोरियलनेही पुरस्कार

रशियाच्या मानवाधिकार संघटनेच्या मेमोरियललाही शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ही संघटना 1987 मध्ये स्थापन झाली. सोव्हिएत युनियनचे 15 भागांमध्ये विघटन झाल्यानंतर, ती रशियामधील सर्वात मोठी मानवाधिकार संघटना बनली.

स्टॅलिनच्या काळापासून आतापर्यंत राजकीय कैद्यांसाठी आवाज उठवला गेला. 2009 मध्ये रशियाने चेचन्यावर आक्रमण केले आणि संघटनेच्या नतालिया एस्तेमिरोवाची हत्या झाली तेव्हा या संघटनेने जागतिक स्तरावर आवाज उठवला. रशियन सरकारने त्यांचे वर्णन परदेशी हेरांची संघटना असे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...