आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत ट्रकचालकाला किडनी देणारे उद्याेगपती चिट्टिलापल्ली शेअर विकून करताहेत लाेकांना मदत

तिरुवनंतपुरम / के. ए. शाजीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 हजार काेटींच्या कंपनीचे परोपकारी मानद चेअरमन चिट्टिलापल्ली नेहमी असतात चर्चेत

के. चिट्टिलापल्ली हे व्ही-गार्ड कंपनीचे मानद चेअरमन आहेत. राज्यातील छोट्या व्यावसायिकांना येणारी आर्थिक चणचण लक्षात घेऊन हे दानशूर व्यावसायिक आपल्या कंपनीचे शेअर विकून सतत मदत करतात. यामुळे ते नेहमीच चर्चेतही असतात. १० वर्षांपूर्वी एका अनोळखी ट्रकचालकाला त्यांनी आपली किडनी दान केली होती. फोर्ब्ज मासिकानुसार, त्यांच्या कंपनीची मालमत्ता ८.८ हजार कोटी रुपये आहे. दैनिक भास्करने त्यांच्याशी व्यवसाय, परोपकारासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

किडनी दानाची प्रेरणा कशी मिळाली?
दूरच्या नात्यातील एका महिलेस किडनीचा त्रास होता. कुटुंबाला किडनीसाठी आटापिटा करताना पाहिले. मला धक्का बसला. मग ठरवले की, किडनी दान करणार. ६० वर्षांचा असताना एका ट्रकचालकाला किडनी दान केली. १० वर्षांनंतरही मी ठणठणीत आहे. तो ट्रकचालक अजूनही ट्रक चालवतो यामुळे मी आनंदी आहे.

समाजकार्यासाठी शेअर विकून ९० कोटी रु. जमवले आहेत, त्याचा कसा वापर कराल ?
चिट्टिलापल्ली स्क्वेअर बनवणार. ते सामाजिक उपक्रमांचे केंद्र असेल. तेथे बगिचा, जॉगिंग ट्रॅक, क्रीडा-योगाची सुविधा, हेल्थ क्लब, अॅम्फिथिएटर आणि सभागृहासारख्या सुविधा असतील.

भविष्यातील काय योजना आहेत?
चिट्टिलापल्ली फाउंडेशनद्वारे व्यावसायिक तयार करतोय. तंगीचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांसाठी के. चिट्टिलापल्ली कॅपिटल प्रा. लि. कंपनीच्या नोंदणीसाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला आहे. त्यातून सोप्या अटींवर गरजूंना स्वस्त कर्ज मिळेल. आपल्या सर्वांची काहीतरी सामाजिक जबाबदारी असून ती आपल्याला पार पाडायची आहे, असे आम्हाला वाटते.

तुमच्या यशाचे रहस्य काय?
आतापर्यंतच्या प्रवासात मी अनेक चढ- उतार पाहिले आहेत. व्ही- गार्ड व वंडरला दोन्ही उद्योगांत गुणवत्तेला प्राधान्य दिले. आम्ही ग्राहकांपासून ते कच्च्या मालाचे पुरवठादार, वितरकांसोबत नम्रपणे वाटचाल करतो. हाच यशाचा मंत्र आहे.

पुस्तक लिहायला कसे सुरू केले?
योगायोगाने कंपनीच्या इन-हाऊस मासिकांमध्ये रोजच्या आव्हानांच्या व्यावहारिक तोडग्यांवर लिहिण्याची संधी मिळाली. आठवणी लिहिल्या. हे लेख पुस्तकाच्या रूपात आले आहेत. तसेच मी अवयवदानावरही पुस्तक लिहिले आहे.

आतापर्यंतचा प्रवास कसा झाला?
मी ७० च्या दशकात तिरुवनंतपुरमच्या एका कंपनीत काम करायचो. कंपनी संकटात सापडली. करिअर अंधारमय दिसू लागले. मग काम सुरू केले. तेव्हा व्होल्टेज कमी- जास्त व्हायची समस्या होती. दोघांसोबत स्टॅबिलायझर बनवणे सुरू केले.

व्ही-गार्डचे कॉर्पोरेट कार्यालय व शाखा पर्यावरणपूरक आहेत?
ही काही मोठी गोष्ट नाही. मी शेतकरी कुटुंबात वाढलो आहे. लहानपणापासून हिरवळ पाहिली. कार्यालय सुंदर दिसावे व लोक सुदृढ राहावेत यासाठी कार्यालयात मोकळ्या ठिकाणी झाडे लावली. मात्र, आर्किटेक्टची तशी इच्छा नव्हती. त्यांना इमारत जर्जर होण्याची भीती होती. सुदैवाने १३ वर्षांनंतर आमचे कॉर्पोरेट कार्यालय हिरवेगार असमन मजबूतपणे उभे आहे.

तुम्ही स्ट्रे डॉग फ्री मूव्हमेंटसाठी पुढाकार घेतला होता, त्याचे काय झाले?
पूर्वी चिट्टिलापल्ली फाउंडेशनकडे वैद्यकीय मदतीसाठी अर्ज यायचे. त्यात दिसले की, भटकी कुत्री चावणे व त्यांच्यामुळे अपघात होत आहेत. ते मला खटकले. मी एक प्राणिमित्र आहे. तरीही सार्वजनिक ठिकाणी भटकी कुत्री आवडत नाहीत. मात्र, याबाबत खूप प्रगती झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...