आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:अयोध्या : शरयू तटावर रामलल्लाची नगरी पिवळ्या रंगाने सजतेय; 4 ऑगस्टपासून अयोध्येतील मठ, मंदिरांत श्रीरामचरितमानसचे पठण सुरू होणार

विजय उपाध्याय | अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्येत ठिकठिकाणी भिंतींवर भगवान रामाची चित्रे रेखाटली जात आहेत. अयोध्येला पिवळ्या रंगाने सजवले जात आहे
  • इतिहासाचे पान ... इंग्रज जजच्या आदेशाने 1902 मध्ये लावले तीर्थक्षेत्रावर शिलालेख

अयोध्येत ५ ऑगस्टला श्रीराम मंदिराचे भूमिपूजन हाेणार आहे. शरयू नदी दुथडी वाहू लागली आहे. शरयू सोडल्यास भगवान राम यांच्या काळातील कोणतीही निशाणी अयोध्येत राहिलेली नाही, असे सांगितले जाते. आता लवकरच त्यांच्या पवित्र जन्मभूमीवर विशाल मंदिर साकारले जाईल. सध्या शरयूच्या तटावरील नागेश्वरनाथ मंदिरात भाविक महादेवाला श्रावणाचा जलाभिषेक करू लागले आहेत. राम की पौडी येथे पंचक्रोशीतील लोकांची गर्दी होऊ लागली आहे. गोंडा येथे केवलराम (६०) म्हणाले, दीर्घकाळ कायदेशीर लढाई सुरू होती. विहिंपचे लोक आंदोलन करत होते. परंतु रामलल्लाचे मंदिर होईल, यावर विश्वास बसत नव्हता. आता आम्ही हयातीत अयोध्येत रामलल्लाचे मंदिर पाहू शकणार आहोत. दरम्यान, अयोध्येत ‘पेंट माय सिटी’ हे अभियान सुरू आहे. सध्या रस्त्यांच्या सफाईचे काम बाकी आहे. काही ठिकाणी घाईमुळे बांधकाम व दुरुस्तीची कामे केली जात आहेत. अवध विद्यापीठातील फाइन आर्टच्या ७० विद्यार्थिनींनी सजावटीसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मनोज दीक्षित व फाइन आर्ट विभागाच्या अध्यक्ष डॉ. सरिता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली सजावटीचे काम केले जात आहे. विद्यार्थिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत चंदन तिलक, गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून करतील. अयोध्येत ४ ऑगस्टला मठ, मंदिरांत श्रीरामचरितमानसचे पठण सुरू होईल. त्यासाठी २५ केंद्रे तयार केली आहेत.

इतिहासाचे पान ... इंग्रज जजच्या आदेशाने १९०२ मध्ये लावले तीर्थक्षेत्रावर शिलालेख

अयोध्येतील विविध तीर्थस्थळी शिलालेख आहेत. हे शिलालेख भव्य असल्याचे जाणवते. इंग्रज न्यायाधीश एडवर्डच्या आदेशानुसार १९०२ मध्ये ठिकठिकाणी विवेचनी सभेने लावले होते. हे शिलालेख उखडल्यास ३ हजारांचा दंड व तीन वर्षांची कैद अशा शिक्षेचे आदेश काढले होते. श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास यांनी ही माहिती दिली. या शिलालेखांची माहिती अयोध्या संस्थानने संकलित केली आहे. संस्थानचे संचालक व्ही.पी. सिंह म्हणाले, १८९८ मध्ये अयोध्येतील मोठी छावणीचे महंत राम मनोहर प्रसाद यांनी तीर्थयात्रेकरूंच्या सुविधेसाठी प्रमुख तीर्थक्षेत्रावर शिलालेख लावण्यास सुरुवात केली. पहिला शिलालेख श्रीरामजन्मभूमीवर लावला. त्यावर एका वर्गाने आक्षेप घेतला. तेव्हा जज एडवर्ड यांनी महंत यांच्या बाजूने निकाल दिला. अयोध्येतील सर्व तीर्थक्षेत्रांवर १४८ शिलालेख लावले.

निमंत्रण : कोठारी बंधूंची बहीेण, भागवत येणार

भूमिपूजन कार्यक्रमासाठी जवळपास सर्वधर्मीय प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात येत आहे. त्यात मोहन भागवत यांच्यासह संघाचे १० पदाधिकारी, राम मंदिर आंदोलनाचे नेते अशोक सिंघल परिवाराचे सदस्य, आंदोलनात प्राणार्पण करणाऱ्या कोठारी बंधूंची बहीण पूर्णिमा, कारसेवकांचे कुटुंबीय, योगगुरू रामदेव, कबीर पंथ, रामकृष्ण मिशन, गायत्री परिवार, बौद्ध धर्मस्थळाचे प्रतिनिधी सहभागी होतील.