आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरजगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान B-21 लॉन्च:राफेलपेक्षा 2 पिढ्यांनी पुढे; रडारला हुलकावणी देण्यास सक्षम

लेखक: अनुराग आनंद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान B-21 रेडर लॉन्च झाले आहे. शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी ते अमेरिकन वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट झआले. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे विध्वंस करण्यास सज्ज होईल,

B-21 रेडर हे फ्रान्सच्या राफेल विमानांपेक्षाही 2 पिढ्यांनी पुढे आहे. राफेल 4.5 व्या पिढीचे आहे, तर B-21 हे सहाव्या पिढीतील अत्याधुनिक विमान आहे. अमेरिकेच्या वायुदलात समावेश होताच याच्या वैशिष्ट्यांची चर्चा जगभरात होत आहे.

याच B-21 रेडरची वैशिष्ट्ये आणि याच्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया...

सर्वात आधी एका ग्राफिक्समधून जाणून घेऊया याची वैशिष्ट्ये

आता जगातील सर्वात धोकादायक विमानाविषयीच्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

प्रश्न 1 - या विमानाला B-21 रेडर हे नाव कसे मिळाले?

उत्तर - हे विमान अमेरिकेची बॉम्बर विमाने B-1, B-2 च्या श्रेणीतील असल्याने याचे नाव B ने सुरु झाले आहे. तर त्याच्या नावात रेडर जोडले जाण्याचा संबंध दुसऱ्या महायुद्धाशी असल्याचे नॉर्थ्रॉप ग्रूमॅन या कंपनीने म्हटले आहे.

वास्तविक, 18 एप्रिल 1942 रोजी अमेरिकन वायुदलाचे कर्नल जिमी डूलिटल यांनी 80 सहकाऱ्यांसह जपानच्या बेटांवर हल्ला केला होता.

पर्ल हार्बरवरील हल्ल्याचा सूड घेण्यासाठी अमेरिकेने सर्वात मोठा हवाई हल्ला तेव्हा केला होता. हा हल्ला करणाऱ्या या तुकडीला डूलिटल रेडर्स असे संबोधण्यात आले. याच तुकडीच्या सन्मानार्थ या विमानाला B-21 रेडर हे नाव देण्यात आले आहे.

प्रश्न 2 - B-21 रेडर हे सहाव्या पिढीचे एकमेव विमान आहे की या श्रेणीत आणखीही दुसरे विमान आहे?

उत्तर - अमेरिकन वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेले B-21 रेडर हे सहाव्या पिढीतील एकमेव विमान आहे. चीन, जपान, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या तंत्रज्ञानावर काम करत आहे.

प्रश्न 3 - B-21 रेडर विमान अमेरिकेसाठी किती महत्वाचे आहे?

उत्तर - जगभरात विकसित केल्या जात असलेल्या आधुनिक शस्त्रांदरम्यान B-21 रेडर अमेरिकेसाठी एक धोरणात्मक संपत्ती ठरू शकेल. अद्याप कोणत्याही देशाकडे असे शस्त्र नाही. त्यामुळे याच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हल्ल्याचा इशारा देऊन जगाच्या भौगोलिक राजकारणात अमेरिका वर्चस्व गाजवू शकते.

प्रश्न 4 - अमेरिकेला नव्या स्टील्थ बॉम्बरची गरज का आहे?

उत्तर - अमेरिकेच्या वायुदलातील रडारला हुलकावणी देत हल्ला करणाऱ्या विमानांची संख्या सध्या केवळ 10 टक्के इतकी आहे. एखाद्या देशाने रडार तंत्रज्ञान आणखी अद्ययावत केले तर ही 10 टक्के विमानेही अपयशी ठरू शकतात. त्यामुळे रशिया आणि चीनला शह देण्यासाठी अमेरिकेला अशा विमानाची गरज होती, जे कुणालाही थांगपत्ता न लागू देता एखाद्या देशात शिरून त्यावर हल्ला करू शकेल. हीच गरज B-21 रेडर पूर्ण करते.

प्रश्न 5 - अमेरिकेत किती B-21 रेडर विमान तयार केले जात आहेत?

उत्तर - सध्या अमेरिकेच्या वायुदलाने नॉर्थ्रॉप ग्रूमॅन कंपनीकडून 6 B-21 रेडर विमाने खरेदी केली आहेत. अमेरिका आणखी 100 विमाने खरेदी करणार असल्याचे कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेला अशी किमान 200 विमाने खरेदी करण्याची गरज आहे.

प्रश्न 6 - अमेरिकेने नॉर्थ्रॉप ग्रूमॅन कंपनीलाच हे विकसित करण्याची जबाबदारी का दिली?

उत्तर - नॉर्थ्रॉप ग्रूमॅन ही स्टील्थ तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम कंपनी आहे. यापूर्वीही कंपनीने B-1, B-2 सारखी शक्तिशाली विमाने विकसित केली आहेत. ही विमाने आजही अमेरिकन वायुदलात समाविष्ट आहेत. याशिवाय जगातील टॉप लढाऊ विमान F-35 आणि मानवरहित X-47B तसेच ग्लॉबल हॉक विमानही याच कंपनीने विकसित केले आहे. म्हणूनच अमेरिकन सरकारने या कंपनीला ही जबाबदारी दिली आहे.

प्रश्न 7 - कंपनीने B-21 विमानचे फोटो आणि वैशिष्ट्ये शेअर का केली नाही?

उत्तर - हे विमान विकसित करणाऱ्या नॉर्थ्रॉप ग्रूमॅनचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक डफ यंग म्हणाले की, B-21 हे संपूर्ण जगात नव्या प्रकारचे संशोधन आहे. तथापि, अमेरिकन सरकार किंवा कंपनीने अद्याप B-21 ची वैशिष्ट्ये आणि फोटो शेअर केले नाही.

सध्या B-21 चे जे फोटो शेअर होत आहेत, ते काल्पनिक आणि कलाकारांनी तयार केलेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चीन, रशिया आणि इतर देशांनी याच्या डिझाईनची नक्कल करून ते हाणून पाडण्यास सक्षम असलेले तंत्रज्ञान विकसित करू नये यासाठी असे करण्यात आले आहे.

आता एका ग्राफिक्समधून जाणून घ्या की B-21 रेडर आणि राफेलमध्ये काय फरक आहे...

बातम्या आणखी आहेत...