आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरमहिलेच्या गर्भाशिवाय 30 हजार बालके जन्माला घालणार:काय आहे 'बेबी पॉड' आणि याद्वारे नवजात कसे जन्माला येतील?

लेखक: अनुराग आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1999 मध्ये 'मॅट्रिक्स' हा हॉलिवूड चित्रपट आला होता, ज्यामध्ये एका कारखान्यात माणसांची निर्मिती म्हणजेच पैदास केली जात असल्याचे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाने जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले. पण स्त्रीच्या गर्भाशिवाय मुले निर्माण करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का?

शास्त्रज्ञ आणि चित्रपट निर्माते हाशम अल-घायली यांनी या प्रश्नाला 'होय' असे उत्तर दिले आहे. घायली यांनी दावा केला आहे की, त्यांच्या 'इक्टोलाइफ' कंपनीमध्ये लवकरच पॉडमध्ये म्हणजेच एका प्रकारच्या मशीनमध्ये मूले जन्माला घालणे शक्य होणार आहे.

अशा परिस्थितीत दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून समजून घेऊया की, 'बेबी पॉड' म्हणजे काय आणि त्याद्वारे मूल कसे जन्माला येते?

प्रश्न 1: निसर्गाला आव्हान देऊन यंत्रात बालकांची पैदास करण्याचा दावा करणारे कोण आहेत?

उत्तरः लॅबमध्ये बालके जन्माला घालण्याचा दावा ज्या हाशम अल-घायलींनी केला आहे, ते जर्मनीची राजधानी बर्लिनचे रहिवासी आहे. व्यवसायाने वैज्ञानिक असण्यासोबतच घायली एक चित्रपट निर्माते देखील आहेत.

ते म्हणाले- 'इक्टोलाइफ' ही जगातील पहिली कृत्रिम बालके जन्माला घालणारी कंपनी बनेल. ते म्हणाले- गेल्या 50 वर्षांत जगभरातील शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात जे काही शोध लावले आहेत, ते सर्व एकत्रितपणे पुढे नेण्यात आले आहेत.

'इक्टोलाइफ' कंपनीने आपल्या वेबसाइटवर सांगितले आहे की, या प्रकल्पावर काम करण्यासाठी सुरुवातीला 75 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेत 400 'बेबी पॉड्स' बसवण्यात आले आहेत. या मशीनद्वारे 30 हजार बालके जन्माला घातली जातील.

ज्या लॅबमध्ये पॉडच्या माध्यमातून मूल तयार करण्याची तयारी सुरू आहे, त्याचे हे काल्पनिक चित्र आहे.
ज्या लॅबमध्ये पॉडच्या माध्यमातून मूल तयार करण्याची तयारी सुरू आहे, त्याचे हे काल्पनिक चित्र आहे.

प्रश्न 2: 'बेबी पॉड' म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

उत्तरः 'बेबी पॉड' हे एक मशीन आहे, ज्याद्वारे गर्भाशयाशिवाय मूल जन्माला येते. स्त्रीच्या गर्भाप्रमाणेच या मशीनची रचना करण्यात आली आहे. म्हणूनच त्याला कृत्रिम गर्भ असेही म्हणतात.

हे यंत्र कसे काम करते हे समजून घेण्यासाठी गर्भाची वाढ कशी होते हे जाणून घेणे आवश्यक आहे.

वास्तविक, गर्भात असलेल्या गर्भाला नाळेद्वारे आईच्या शरीरातून ऑक्सिजन, पोषक तत्व आणि हार्मोन्स मिळतात.

यावेळी बाळाने सोडलेला कार्बन डायऑक्साइड आईच्या रक्तात मिसळतो आणि बाहेर जातो. गर्भात भ्रूणासाठी एक विशिष्ट तापमान आणि वातावरण असते. 'बेबी पॉड'ही एखाद्या महिलेच्या गर्भाप्रमाणेच भ्रूणाची वाढ होण्यास मदत करते.

प्रश्न 3: 'बेबी पॉड' द्वारे मूल जन्माला घालण्याची प्रक्रिया काय आहे?

उत्तरः जर पुरुषाला वंध्यत्वाची समस्या असेल आणि एखादी स्त्री आई होऊ शकत नसेल तर या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकेल.

यासाठी सर्वप्रथम पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीची अंडबीजे एका मशीनमध्ये मिसळली जातात. यानंतर हे यंत्र गर्भासारखे काम करू लागते.

'बेबी पॉड'मध्ये आधुनिक सेन्सर बसवण्यात आले आहेत. ते एका अॅपला जोडण्यात आले आहेत. या अॅपद्वारे, पालकांना रिअल टाईम स्किन, नाडी, तापमान, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, श्वासोच्छवासाची गती, हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आणि शरीराच्या इतर अवयवांचे निरीक्षण करणे शक्य होईल.

स्त्रीच्या गर्भाप्रमाणेच या कृत्रिम गर्भामध्येही 'अम्नीओटिक फ्लुइड' टाकण्यात आले आहे. 9 महिन्यांनी हा द्रव काढल्यानंतर नवजात शिशुला मशीनमधून बाहेर काढले जाईल.

कंपनीने व्हिडिओ जारी केला आहे आणि म्हटले आहे की अशा प्रकारे पालक आपल्या मुलाची मशीनमध्ये वाढ होताना पाहू शकतील.
कंपनीने व्हिडिओ जारी केला आहे आणि म्हटले आहे की अशा प्रकारे पालक आपल्या मुलाची मशीनमध्ये वाढ होताना पाहू शकतील.

प्रश्न 4: कृत्रिम गर्भधारणा नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा वेगळी असेल का?

उत्तरः या तंत्रज्ञानावर काम करणारे शास्त्रज्ञ घायली यांनी दावा केला आहे की, हा कृत्रिम गर्भ इतका प्रगत असेल की सामान्य माणूस याबद्दल विचारही करू शकत नाही. ते म्हणाले- पालक आता त्यांच्या आवडीनुसार मुलाला जन्म देऊ शकतील.

या कृत्रिम गर्भामध्ये मुलाची बुद्धिमत्ता, उंची, केस, डोळ्यांचा रंग, शारीरिक ताकद आणि त्वचेचा रंगही ठरवता येईल.

प्रश्न 5: कृत्रिम गर्भाची गरज का भासली?

उत्तर: कृत्रिम गर्भाच्या गरजेवर, वैज्ञानिक अल-घायली यांनी दावा केला आहे की जपान, बल्गेरिया आणि दक्षिण कोरिया सारख्या लोकसंख्या कमी होत असलेल्या देशांमध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी कृत्रिम गर्भाची सुविधा वापरली जाईल.

याशिवाय अशी अनेक विवाहित जोडपी आहेत जी शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत किंवा इतर काही समस्या असतात. जर त्यांना दुसऱ्या महिलेच्या गर्भाचा वापर न करता मुलाला जन्म द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरेल.

एवढेच नाही तर वंध्यत्व असलेले जोडपे आणि गर्भ पिशवी काढलेल्या महिलांसाठीही हे तंत्रज्ञान अतिशय खास ठरणार आहे.

प्रश्न 6: बेबी पॉडद्वारे फक्त प्रयोगशाळेत किंवा घरीही बाळाचा जन्म होऊ शकतो का?

उत्तरः एक्टोलाइफ या कंपनीच्या मते, जर एखाद्या जोडप्याकडे प्रयोगशाळेत विकसित होत असलेल्या त्यांच्या बाळाला पाहण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर ते 'बेबी पॉड' घरीही घेऊन जाऊ शकतील.

प्रत्येक पॉडमध्ये बॅटरी असते जी आपल्या बेडरूममध्ये काळजीपूर्वक उचलून नेली जाऊ शकते. सर्व प्रकारच्या चाचण्यांनंतरच या मशीनमध्ये बाळ बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा स्थितीत जन्मजात गुंतागुंतीची, म्हणजेच जन्माच्या वेळी कोणताही आजार होण्याची शक्यता कमी असते.

प्रश्न 7: कृत्रिम गर्भाद्वारे मूल होण्यात सर्वात मोठी समस्या कोणती आहे?

उत्तरः पुरुषांचे शुक्राणू आणि स्त्रियांचे अंडबीज मिसळल्यानंतर पहिले 10 दिवस हा सर्वात महत्त्वाचा काळ असतो. या 10 दिवसांत शुक्राणू आणि अंडबीजे एकत्रित येत भ्रूणाचे रूप धारण करतात. शुक्राणू आणि अंडबीजाचे भ्रूणात रुपांतर करण्यामागील विज्ञान अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत ही नैसर्गिक प्रक्रिया कृत्रिम गर्भातच अवलंबणे हे शास्त्रज्ञांसमोर आव्हान आहे.

उतींद्वारे गर्भापर्यंत रक्त पोहोचण्यासाठी आईच्या गर्भाशयात स्वतःची नैसर्गिक व्यवस्था असते. शास्त्रज्ञांना अद्याप कृत्रिम गर्भासाठी ही यंत्रणा विकसित करता आलेली नाही.

कृत्रिम गर्भाशयात गर्भाच्या विकासासाठी ही दोन मोठी आव्हाने सध्या शास्त्रज्ञांसमोर आहेत.

व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, 9 महिने पूर्ण झाल्यानंतर पॉडमधून एक विशेष प्रकारचा द्रव काढून त्या बालकालाही बाहेर काढले जाईल.
व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, 9 महिने पूर्ण झाल्यानंतर पॉडमधून एक विशेष प्रकारचा द्रव काढून त्या बालकालाही बाहेर काढले जाईल.

प्रश्न 8: कृत्रिम गर्भाशयात मूल जन्माला घालण्याबद्दल तज्ञ काय म्हणतात?

उत्तरः किंग्ज कॉलेज लंडनचे प्राध्यापक अँड्र्यू शॅनन यांच्या मते, हे तंत्रज्ञान लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. शॅनन यांनी म्हटले आहे की, अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात गर्भातून वेळेपूर्वी बाहेर काढून नवजात अर्भकांना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले आहे आणि ते निरोगी राहिले. या नवजात बालकांना नळीद्वारे पाणी आणि दूध दिले जाते.

याशिवाय बायोकेमिकल आणि अँटीबॉडीज बनवण्याची प्रक्रिया गर्भात नैसर्गिकरित्या घडते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे समजून घेतल्यावर कृत्रिम गर्भाद्वारे मूल जन्माला घालणे शक्य होईल.

यूसीएल इन्स्टिट्यूट फॉर वुमेन्स हेल्थच्या प्रोफेसर जॉयस हार्पर म्हणाल्या- 'विज्ञानात काहीही अशक्य नाही. मला शंका नाही की येत्या काळात बहुतेक लोक आयव्हीएफद्वारे मुले जन्माला घालू शकतील.'

प्रश्न 9: याआधीही कृत्रिम गर्भाशयात मुले जन्माला घालण्याची चर्चा झाली आहे का?

उत्तरः आतापर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाने किंवा संस्थेने कृत्रिम गर्भात मानवाची निर्मिती केल्याचा दावा केला नसला तरी याआधी मेंढ्यांवर अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

याशिवाय शास्त्रज्ञांनी कृत्रिम गर्भाशयात उंदराच्या भ्रूणांचेही 11 दिवस यशस्वी संगोपन केले आहे. साधारणपणे माणसांच्या आधी प्राण्यांवर प्रयोग केले जातात. सोनोग्राफीमुळे मानवाच्या गर्भाशयातील मुलांचा विकास जाणून घेण्यास मदत झाली असेलही, परंतु स्त्रीच्या शरीराबाहेर कृत्रिम गर्भाशयात मुले निर्माण करण्याचा दावा यापूर्वी कोणीही केला नव्हता.

प्रश्न 10: या तंत्रज्ञानाबाबत सर्वात मोठा वाद कोणता आहे?

उत्तरः या तंत्राबाबत सर्वात मोठा वाद हा आहे की जेव्हा यंत्रातून मूल जन्माला येईल तर याचे नियंत्रण कोण करणार? हे लागू झाल्याने नवजाताचे लिंग निदान आणि भ्रूणहत्या कशाप्रकारे थांबवता येतील? हे अणु तंत्रज्ञानासारखेच असल्याचे संशोधकाचे म्हणणे आहे. योग्य कायदा नसेल तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही खूप आहे.

बातम्या आणखी आहेत...