आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हबस्तर धुमसतेय धर्मांतराच्या आगीत:गावांत 90% लोकसंख्या ख्रिश्चन, धर्म बदलण्याची स्पर्धा, आदिवासी नाराज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी सध्या नारायणपूर भागात आहे, जिथे 3 जानेवारी रोजी ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या घरांवर हल्ला झाला होता. या भागातील सर्वात मोठ्या रोमन कॅथोलिक चर्चवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला म्हणजे बस्तरच्या शेकडो गावांमध्ये सुरू असलेल्या विभाजनाच्या बिघडलेल्या वातावरणाचे द्योतक आहे, जिथे ख्रिश्चन धर्म मानणारे आदिवासी आणि मूळ धर्माचे आदिवासी यांच्यातील वैर अधिक वाढत चालले आहे.

भुमियाबेडा, तेरदुल, घुमियाबेडा, चिपरेल, कोहडा, ओरछा, गुदाडी आणि अशी अनेक नावे. ही त्या गावांची नावे आहेत जिथे गेल्या 20-25 वर्षांत आदिवासी लोकसंख्येचे झपाट्याने धर्मांतर झाले आहे, म्हणजेच त्यांचा आदिवासी धर्म सोडून त्यांनी ख्रिश्चन धर्माचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. नारायणपूर जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या, घनदाट जंगलात असलेली गावे तितक्याच वेगाने लोकसंख्या ख्रिस्ती धर्म स्वीकारत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही गावांमध्ये त्यांची टक्केवारी 90 टक्क्यांपर्यंत आहे, जरी ही गावे लहान आहेत आणि 100-200 लोकसंख्या किंवा 20-30 घरे आहेत. तरी आदिवासींनी असे करण्याची अनेक कारणे आहेत, परंतु चर्चच्या प्रार्थनेने आरोग्य आणि आयुष्य सुधारू शकते हे सर्वात मान्य कारण आहे. त्याची वास्तविकता काहीही असो, परंतु प्रत्येक धर्मांतरित ख्रिश्चन हेच बोलत असल्याचे दिसते. गोंड जातीतून ख्रिश्चन झालेले आणि नंतर या धर्माचे प्रसारक झालेले पियाराम उसेंडी सांगतात की,

पियाराम उसेंडी
पियाराम उसेंडी

"2007 मध्ये मी खूप अस्वस्थ होतो. माझ्या घरातील सर्वजण आजारी होते. यादरम्यान कोणीतरी मला चर्चमध्ये जाण्यास सांगितले. मी गेलो तेव्हा फादर आणि त्यांच्या लोकांनी माझ्या आजारी पालकांसाठी प्रार्थना केली. मी देखील प्रार्थना करण्यास सुरूवात केली आणि नंतर ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. आता मी एक पास्टर आहे. दोन दिवसांपूर्वीच जमावाने माझे घर फोडले, प्रार्थनागृहाची नासधूस केली, देव त्यांना माफ करो. यावेळी ते घराच्या अंगणात तोडण्यात आलेल्या सामनांसह आणि फेकून दिलेल्या पलंग, कपडे आणि भांड्यामध्ये उभे आहेत.

तोडफोडीनंतर विखुरलेले सामान.
तोडफोडीनंतर विखुरलेले सामान.

चर्च तरुणांना मोटारसायकल देते, पगार देते

आत्तापर्यंत बस्तरच्या नारायणपूर जिल्ह्याची चर्चा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुझमाडच्या जंगलामुळे होत असे, मात्र यावेळी त्याची चर्चा धर्मांतरामुळे होते आहे. या जिल्ह्यातील मूळ आदिवासी जातीचे लोक ज्यात गोंड, ओरांव, मुरिया, मुडिया, अबुझमाडीया यांचा समावेश आहे. ते ख्रिश्चन धर्माकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. आदिवासी समाजातील लोक ख्रिश्चन का होत आहेत हा खरा प्रश्न आहे. याची दोन कारणे आहेत. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, चर्चची प्रार्थना त्यांच्या पालकांच्या आणि नातेवाईकांच्या आजारपणात खूप प्रभावी ठरली आहे. याच्या उलट मुळधर्माचे आदिवासी म्हणतात की, प्रार्थना म्हणजे दिखावा आहे. जे लोक ख्रिस्ती झाले आहेत त्यांना चर्चकडून मोफत शिक्षण, धान्य, उपचार, पैसा दिला जातो. अनेक तरुणांना मोटारसायकल दिल्या असून, अनेकांना मासिक पगारही दिला जात आहे.

जमावाची पोलिसांशी देखील झटापट झाली.
जमावाची पोलिसांशी देखील झटापट झाली.

गावोगावी प्रार्थनागृहे बांधली

संपूर्ण परिसरात किंवा संपूर्ण बस्तरमध्येच, प्रार्थनेने बरे होण्याचे प्रकरण इतके जबरदस्त पसरले आहे की, नारायणपूरच्या शांतीनगरसह काही वस्त्यांमध्ये आणि अगदी दुर्गम खेड्यांमध्येही ख्रिश्चन समाजाचे प्रार्थनागृह ( येथे प्रार्थना घर म्हणजे गावातीलच एखाद्या खरातील खोली) तयार करण्यात आले आहेत. एडका, भाटपाल, रेमावन, चिंगरण, बेनूर, गरांजी अशी अनेक गावे आहेत ज्यात गेल्या काही वर्षांत प्रार्थना गृहे बांधली गेली आहेत. या प्रार्थनागृहांमध्ये दर रविवारी पूजा करणे अनिवार्य आहे. वाद्यसंगीताच्या साथीने भजन-कीर्तने गायली जातात. कधी-कधी मोठ्या खेड्यातून आणि जिल्हा मुख्यालयातील पाद्रीही येथे प्रवचन देण्यासाठी येतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी 20-30 घरे असलेल्या संपूर्ण गावांना पाचारण करण्यात येते. आजारी, वृद्ध, गरीब, दुःखी यांची नावे घेऊन प्रार्थना केली जाते. अशा परिस्थितीत जर कोणाचे भले झाले तर त्याची प्रार्थनेवर आणि नंतर ख्रिश्चन धर्मावरही श्रद्धा वाढते. इथेच लोकांना मदत करण्याचा मुद्दा समोर येतो.

जमावाने चर्चची देखील तोडफोड केली होती.
जमावाने चर्चची देखील तोडफोड केली होती.

मन:शांतीशिवाय काहीही मिळत नाही

चर्चच्या ख्रिश्चन आदिवासींना मदत करण्याचा हा मुद्दा तितकासा खोटा वाटत नाही कारण ख्रिश्चन आणि गैर-ख्रिश्चन आदिवासींमध्ये त्यांच्या राहणीमानात, बोलण्यात आणि घरांमध्येही स्पष्ट फरक आहे. ख्रिश्चनीकरण केलेले आदिवासी शहरी कपड्यांमध्ये, मोटारसायकलवर आत्मविश्वासाने बोलताना दिसतात, तर मूळ आदिवासी अजूनही लाजाळू, घाबरलेले, गरिबीला तोंड देताना दिसतात. गावांमध्ये अशी अनेक घरे आहेत जी तेथील लोक ख्रिश्चन झाल्यानंतर पक्की बनवली गेली. पास्टर पियाराम उसेंडी यांचे जीवन 15 वर्षांत खूप बदलले आहे. त्यांच्यासोबत उभे असलेले चैत्राम पोटाई यांनीही काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. पैसे-वाहन मिळण्याच्या प्रश्नाला ते स्पष्टपणे नकार देतात. वास्तविक ते मान्य करतात की, पूर्वी ते गरीब होते, खूप त्रासात होते, परंतु आता सर्व काही चांगले आहे. पियाराम म्हणतात की, ते आणि इतरांना केवळ मनःशांती आणि प्रेम पसरवण्यासाठी येशू ख्रिस्ताची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. पियाराम यांचे आता नारायणपूर येथे मोठे घर असून, मागील बाजूस मोठे प्रार्थनागृह आहे. त्यांची मुले चांगल्या शाळेत शिकत आहेत. बाईक आहे आणि सर्व सुविधा आहेत.

चैतराम पोटाई हे आदिवासीतून ख्रिश्चन झाले आहेत.
चैतराम पोटाई हे आदिवासीतून ख्रिश्चन झाले आहेत.

ख्रिश्चन आणि मूळ आदिवासी यांच्यातील वादाचे सर्वात मोठे कारण कबर

ख्रिश्चन झालेले आदिवासी आणि मूळ धर्माचे आदिवासी यांच्यात संघर्ष, कर्मकांड न पाळणे, गायता पखना (याला देवाचे रूप मानून वाद मिटवले जातात), सर्वात मोठा लढा म्हणजे मृतदेहाबाबतचा आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीचा मृतदेह आता गावात पुरला जात आहे. मूळ धर्माचे आदिवासी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीचा मृतदेह गावातील सार्वजनिक जमिनीवर दफन करू देत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तीची कबर असल्यास जमीन दूषित होईल. दर महिन्याला बस्तरच्या विविध भागातून अशा वादांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ख्रिश्चन झालेले आदिवासी आता कबरी खोदून त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह गावाबाहेर फेकले जात असल्याचा आरोप करत आहेत. 1 ते 2 जानेवारी दरम्यान झालेल्या रक्तरंजित संघर्षाचे मूळ कारण नारायणपूर येथील भटपाल येथे 23 ऑक्टोबर रोजी धर्मांतरित महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ न देणे हे होते. सुमारे 3 दिवस याठिकाणी प्रचंड गोंधळ सुरू होता आणि तेथून दोन्ही गट आपापल्या लोकांना एकत्र करत होते. पोलिस-प्रशासनालाही याची माहिती होती, मात्र आधार नसल्याने कारवाई झाली नाही.

घरेही तोडण्यात आली.
घरेही तोडण्यात आली.

आता जाणून घ्या 2 तारखेला हिंसाचार का झाला

2 जानेवारी रोजी नारायणपूर, एडका आणि आजूबाजूच्या गावांमध्ये ख्रिश्चनांवर झालेले हल्ले हे गोरा गावात 1 जानेवारीला रात्री झालेल्या भांडणाचे परिणाम होते. या लढ्यात जखमी झालेले सिंगलू दुग्गा सांगतात की, गोरा हे इतके शांत गाव होते की, 50 वर्षांपासून कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही, असा या गावाचा गौरव झाला होता. पण आता येथील वातावरण खराब झाले आहे. सिंघलू यांनी सांगितले की, गोंडबहुल गावातील 20 घरांतील लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. ते आदिवासी प्रथांचा अपमान करतात. 31 डिसेंबर रोजी असेच भांडण झाले आणि ते शांत झाले. 1 जानेवारीच्या रात्री अचानक इतर गावातील 200-250 ख्रिश्चन धर्म मानणारे आदिवासी गोरा येथे पोहोचले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्हाला 6-7 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर मूळ धर्माचे आदिवासीही एकत्र आले. सिंघलूू यांनी चर्च आणि प्रार्थनागृहांवर हल्ला झाल्याच्या आरोप फेटाळला आहे. मात्र, हा हल्ला म्हणजे आधीच्या घटनेचा परिणाम असल्याचे स्पष्टच आहे.

फेकून देण्यात आलेले सामान.
फेकून देण्यात आलेले सामान.

फादर म्हणतात, आम्ही कोणालाही ख्रिश्चन होण्यास सांगत नाही

नारायणपूरमधील सर्वात मोठ्या रोमन कॅथलिक चर्चवर 2 जानेवारीला हल्ला झाला होता, आम्ही केरळहून येथे आलेल्या फादरशी बोललो. फादर यांनी कॅमेरावर काहीही बोलण्यास नकार दिला, परंतु आमच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यांना आम्ही विचारले की, जर चर्च एखाद्याचे भले करत असेल तर त्याला ख्रिश्चन होण्यास का सांगते, अगरबत्ती जाळू नका, मूर्तीपूजा करू नका असे का म्हणते? फादर म्हणाले की, आम्ही कोणालाही ख्रिश्चन होण्यास सांगत नाही. लोकांना आवडत असेल त्यामुळे ते येतात. तुम्ही नकार का देत नाही या प्रश्नावर ते म्हणतात की आता इतक्या लोकांमध्ये ख्रिश्चन नसलेले कोण हे कसे ओळखणार? ते म्हणाले की, आम्ही सर्वांना क्षमा करायला, प्रेम करायला आणि स्वीकारायला शिकवतो. ज्यांनी चर्चची तोडफोड केली त्यांना माफ कराल का? असे मी विचारल्यावर ते काहीच बोलले नाही.

बैजनाथ सलाम, पास्टर.
बैजनाथ सलाम, पास्टर.

सामाजिक प्रश्नाचे राजकारणीकरण

खेड्यापाड्यातील आदिवासी ख्रिश्चन बनणे आणि ख्रिश्चन न होणे हा मुद्दा सामाजिक वाटत असला तरी आता तो मोठ्या प्रमाणावर राजकीय बनवला जात आहे. 2 जानेवारी रोजी, चर्च तोडफोड प्रकरणी प्रशासनाने नारायणपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष रूपसाई सलाम यांच्यासह काही भाजप कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे साहजिकच हे प्रकरण राजकीय बनले. आता भाजप स्पष्टपणे बिगर ख्रिश्चन आदिवासींच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यांचे माजी मंत्री आणि या भागातील एक मोठे नेते केदार कश्यप यांच्याशी आम्ही चर्चा केली असता, त्यांनी सुरुवातीला याला राजकीय मुद्दा म्हणण्यास टाळाटाळ केली, पण नंतर त्यांनी हे मान्य केले की, काँग्रेस सरकारच्या दबावाखाली पोलिस आणि प्रशासनाने सलाम आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आणखी एक राजकीय महत्त्वाकांक्षी संघटना सर्व आदिवासी समाज देखील यामध्ये पूर्णपणे सहभागी आहे. त्यातही दोन-तीन गट आहेत आणि सर्वांनी या घटनेचा आणि आदिवासी अस्मितेचा त्यांच्या मुख्य अजेंड्यात समावेश केला आहे. यंदा निवडणूक आहे, त्यामुळे हा मुद्दा सोडायला कोणालाच आवडणार नाही आणि आगामी काळात हा बस्तरचा मुख्य राजकीय मुद्दा बनेल.

भाजप नेते आणि माजी मंत्री केदार कश्यप.
भाजप नेते आणि माजी मंत्री केदार कश्यप.

केदार यांचा युक्तिवाद - सरकारी कागदपत्रातही ख्रिश्चन व्हा

माजी मंत्री केदार कश्यप सध्या नारायणपूरमध्ये आहेत. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी बस्तरमधील वाढता ख्रिश्चन प्रभावावर प्रकाश टाकला. हे संपूर्ण गाव ख्रिश्चन झाले आहे, परंतु सरकारी कागदपत्रांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या शून्य का आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर एखाद्याला ख्रिश्चन बनायचे असेल तर त्याने कागदपत्रांमध्ये पूर्णपणे ख्रिश्चन बनले पाहिजे. ते पूर्ण सरकारी लाभ घेत राहतील, त्यांच्या समाजात राहतील आणि त्यांच्या समाजातील लोकांचे आतून ब्रेनवॉश करून त्यांना ख्रिश्चन बनवायचे, असे करण्यामागचे कारस्थान असल्याचे केदार सांगतात. माजी मंत्री म्हणतात की, आज केवळ नारायणपूरसारख्या छोट्या शहरातच ख्रिस्ती समाजाचे 14 आश्रयस्थाने आहेत. शेकडो ख्रिश्चन इतर राज्यांतून येथे येत आहेत, मदतीच्या नावाखाली आश्रयस्थानात ब्रेनवॉशिंग होत आहे आणि यामुळे आदिवासी संस्कृती नष्ट होण्याचा धोका आहे.

आणखी काही ग्राउंड रिपोर्ट वाचा...

कांझावाला केस; आरोपींच्या घरांना कुलूप:शेजारी म्हणाले- BJP नेता मित्तल सट्टेबाजी करायचा, अन्य चौघे सरळमार्गी

जिथे दीक्षा घेतली, त्यासाठीच दिले बलिदान:मुनी सुज्ञेयसागर यांनी मुलाच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कॉलेजची इमारत महाराष्ट्रात, मैदान कर्नाटकात:कानडी-मराठीच्या वादातील 865 गावे, घरोघरी शिवरायांचा फोटो

गाडीखाली मुलगी पाहून घाबरलो:कांझावाला प्रकरणाचा साक्षीदार म्हणाला, पोलिस म्हणाले- 'तु तुझे काम कर'

73 मृत, 32 अंध, तरीही राजरोसपणे कच्च्या दारुची विक्री:तस्कर म्हणाला- हा तर कुटिरोद्योग, ठाण्यातच मिळेल

ऋषभ पंतची मर्सिडीज ज्या ठिकाणी उलटली तो ‘ब्लॅक स्पॉट’:येथे दर महिन्याला होतात 7 ते 8 अपघात

ऋषभ पंतचा अपघात, प्रत्यक्षदर्शींच्या शब्दांत:हायवेवरील खड्ड्यामुळे 5 फूट उसळून उलटली मर्सिडीझ, पंत स्वतः बाहेर आला... रस्त्यावर बसला

बातम्या आणखी आहेत...