आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे पश्चिम बंगालमध्ये पैश्यांचे ढीग सापडत आहेत तर दुसरीकडे लोकसभेत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी अनुक्रमे राजकीय नैतिकता आणि भाषिक नैतिकता धोक्यात आहे. पश्चिम बंगालचा विचार केला तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांचा भ्रष्टाचार पहिल्यांदाच जगजाहीर होत आहे.
ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस राज्यात पहिल्यांदा सत्तेवर आली, तेव्हा वर्षानुवर्षे सत्तेत असलेला काँग्रेसचा फॉर्म्युला बंगालसाठी योग्य नव्हता आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी इथल्या लोकांचा चांगला विचार कधीही केला नाही, असे म्हटले गेले.सर्वांनी असे स्वीकारले होते की बंगालच्या जनतेच्या लोकांच्या विकासाठी तृणमूलचं योग्य आहे.
पार्थ चॅटर्जी हे तृणमूलचे सरचिटणीस आणि तृणमूल सरकारमधील एक मोठे मंत्री देखील आहेत.पार्थ यांच्या अटकेच्या आठवडय़ानंतर त्यांना गुरुवारी मंत्रिपदावरून हटवण्यात आले मात्र शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांच्या निकटवर्तीय अर्पिताकडून जप्त करण्यात आलेल्या पैशांचा हिशेब कोण देणार?
वेगवेगळ्या फ्लॅट्सच्या कपाटात जमा झालेल्या या पन्नास कोटी रुपयांच्या मागे किती लोकांचे अश्रू दडलेले आहेत? किती लोकांच्या भावना दुखावल्या असतील? किती लोकांची आयुष्यभराची कमाई इथे ठेवली असेल? या सर्व प्रश्नांचे उत्तर कोण देईल?
ज्या अर्पिताच्या घरातून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तिने ईडीला स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व पैसे फक्त पार्थ यांचे आहेत. त्यांची माणसे इथे पैसे ठेऊन जायची आणि पार्थ स्वतः वेळोवेळी या सर्व गोष्टींची तपासणी करत होते.अर्पिताचे सत्य बाहेर येईलच, पण ममता बॅनर्जींना पार्थ यांना केवळ मंत्रिपदावरून हटवून सर्व प्रकरणातून निसटता येईल का?
हा पैसा लोकांकडून गोळा करून फ्लॅटमध्ये जमा केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री, त्यांचे सरकार आणि संपूर्ण यंत्रणा काय करत होती? सरकारने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का केले?
येत्या काही दिवसांत इतर राज्यांतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अटकेच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण बंगालमधून अशी कोणतीही बातमी येत नाही. तिथे आजवर सर्व अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत होते का?असा प्रश्न उपस्थित होतो आणि याचा उत्तर हो असेल तर या नोटा कुठून आल्या?
प्रादेशिक पक्षांना तिथल्या प्रदेशांच्या आणि लोकांच्या भावना अधिक जवळून समजतात, त्यामुळे तिथले लोक त्यांना मतदान करत आहेत, पण काही प्रादेशिक पक्षांनी या ताकदीचा वापर जनतेला त्रस्त करण्यासाठी केला आहे. या भ्रष्टाचाराला ममता सरकार यांनी दुर्लक्ष न करता याचे उत्तर देणं गरजेचे आहे.
दुसरीकडे लोकसभेत यावरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. नेत्यांना भाषिक नैतिकतेचा विसर पडल्याने हे वाद होतात. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना राष्ट्र पत्नी असे म्हंटले.माझी भाषा बंगाली आहे मात्र हिंदी बोलत असल्यामुळे ही चूक घडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
तसे पाहता पतीपेक्षा पत्नी हा शब्द उच्चारण्यास कठीण आहे. मग त्यांनी हा निरर्थक प्रयत्न का केला? यावरून त्यांना काही तरी सिद्ध करायचे असू शकते.नंतर चौधरी यांनी चूक मान्य केली. मात्र भाजपच्या नेत्यांनी यावर तोपर्यंत वाद सुरूच ठेवला.
याबाबत स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना घेरले. स्मृती यांनी याप्रकरणावर सोनिया गांधी यांना माफी मागण्यास सांगितले. यावर उत्तर देतांना सोनिया गांधीही संतापल्या आणि त्या स्मृतींना तुम्ही माझ्याशी बोलू नका असे म्हणाल्या. यानंतर संघर्ष सुरु झाला आणि सभागृहाच्या कामकाजात खंड पडला.
माफीनाम्यावर हा वाद मिटवता आला असता, पण आता हे प्रकरण खूप पुढे गेले असून लोकसभेचे कामकाज ठप्प झाले आहे. आजकाल असे दिसते की या लोकसभा, राज्यसभा केवळ ठप्प पडण्यासाठीच आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.