आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंख फुंकल्याने रक्तदाब नियंत्रित होतो:बर्लिन विद्यापीठाचे संशोधन-शंखनादाने जीवाणू मरतात, सकाळ-संध्याकाळ वाजवणे लाभदायक

लेखक: संजय सिन्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही शंख फुंकला आहे का? जर नसेल तर शिकून घ्या. कारण याचे केवळ आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिक लाभही आहेत. शंखनादाने केवळ वातावरणच शुद्ध होत नाही तर अनेक आजारही बरे होतात.

ज्या भागात नियमितपणे शंखनाद केला जातो, तेथील वातावरणातील हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात असे बर्लिन विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.

थायरॉईडचे रुग्ण आणि फुफ्फुसांसाठी शंखनाद लाभकारक

शंखनादाचे विशिष्ट तरंग असतात. शंखनादाचा आपले शरीर, मन आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. थायरॉईड आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी हा ध्वनी लाभदायी आहे. थायरॉईडमध्ये हार्मोन सिक्रेशनवर नियंत्रण ठेवले जाते. शंख फुंकणे आणि श्वासोच्छ्वासाने फुफ्फुसांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. यामुळे फुफ्फुस फुलते. दिल्लीच्या शादीपूरमधील आरकेएलसी मेट्रो रुग्णालयातील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. आरके यादव सांगतात की कोणत्याही प्रकारचे सांगितिक वाद्य वाजवल्याने आपले फुफ्फुस फुलते. म्हणजेच फुफ्फुसांत ऑक्सिजन घेणे आणि कार्बनडायऑक्साईड सोडण्याची प्रक्रिया चांगली होते. गॅस एक्स्चेंड सेंटरमधील उणीवा दूर होतात. शंख फुंकल्यानेही असे होते.

1 जानेवारी 2022 रोजी वाराणसीतील विश्वनाथ मंदिरात 1008 शंखांनी शंखनाद करण्यात आला. यात सर्वात कमी वयाच्या चार वर्षीय वेदांशनेही शंख वाजवला.
1 जानेवारी 2022 रोजी वाराणसीतील विश्वनाथ मंदिरात 1008 शंखांनी शंखनाद करण्यात आला. यात सर्वात कमी वयाच्या चार वर्षीय वेदांशनेही शंख वाजवला.

शंखनादामागील विज्ञान

उत्तर प्रदेश पोलिसांतील निवृत्त आयपीएस अधिकारी राजीव शर्मांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये एक शोधपत्रिका वाचली होती. ज्याचे नाव होते 'ब्लोईंग ऑफ शंखः अॅन इंडिजेनस ट्रॅडिशन फॉर फिटनेस अँड वेलनेस' त्यांनी सांगितले की शंख फुंकणे हे मानवी शरीर आणि मेंदूसाठी एक चांगला व्यायाम आहे. यामुळे प्रोस्ट्रेट, युरिनरी ट्रॅक्ट, फुफ्फुस, छाती आणि मानेचे स्नायू मजबूत होतात. याच्या ध्वनीने केवळ मानसिक तणावच दूर होत नाही तर मेडिटेशनमध्येही मदत मिळते.

स्नायू शरीरात आत ओढले जातात

राजीव शर्मांनी सांगितले की जेव्हा शंख वाजवला जातो तेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो. या प्रक्रियेत फुफ्फुस, पोट आणि बेंबीचा भाग आत ओढला जातो. पोटाचे स्नायू ओढले जातात. सोबतच रेक्टल स्नायूही ताणले जातात. श्वासोच्छ्वासामुळे बेंबीचा भागही फुलतो. शंख वाजवताना रक्तप्रवाह थेट मेंदूच्या दिशेने असतो. शंख फुंकणे हा युरिनरी ब्लॅडरसाठीही चांगला व्यायाम आहे.

शंखात असते 100 टक्के कॅल्शियम

बनारस हिंदू विद्यापीठातील अॅस्ट्रोलॉजीचे गेस्ट लेक्चरर डॉ. इंद्रजीत बली मिश्रा सांगतात की, शंखात 100 टक्के कॅल्शियम असते. मंदिर किंवा अशा घरांतही यात रात्री पाणी भरून ठेवले जाते. या पाण्यात कॅल्शियम मिसळते. हे पाणी सर्वांवर शिंपडले जाते. हे पाणी शरीरावर शिंपडल्याने हानिकारक जीवाणू मरतात. हे पाणी पिल्याने शरीराला अतिरिक्त कॅल्शियम मिळते.

एखाद्या चांगल्या प्रशिक्षकाकडूनच शंख वाजवणे शिकावे

शंख योग्य पद्धतीने वाजवल्यावर याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगले परिणाम होतात. शिकल्याशिवाय शंख वाजवू नये हे लक्षात घ्यावे. यासाठी अनुभवी शिक्षक किंवा प्रशिक्षकाची गरज असते.

गुजरातमधील वस्त्रनगरी सूरतमध्ये शंख ध्वनी क्लब चालवणाऱ्या भरत शाह यांनी 'शंखनाद' नावाचे पुस्तक लिहिले आहे. भरत हे सुरत महानगरपालिकेतील निवृत्त अभियंता आहेत. डझनभर लोक त्यांच्याबरोबर दररोज सकाळी विशिष्ट वेळी शंख वाजवतात. त्यांनी आतापर्यंत 10,000 हून अधिक लोकांना शंख फुंकण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

ते सांगतात की शंखाचा ध्वनी भ्रामरी प्राणायामाशी संबंधित आहे. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आराम मिळतो.

शंख वाजवताना तोंड आकाशाकडे असावे

डॉ.इंद्रजित बली मिश्रा सांगतात की, उभे राहून शंख फुंकताना तुमचा चेहरा वरच्या दिशेने असावा. यासोबतच शंखही आकाशाकडे असावा. पंचतत्वात आवाजाला महत्त्वाचे स्थान आहे, असे ते स्पष्ट करतात. आवाजासाठी जागा रिकामी असावी. त्यामुळे वरच्या दिशेने तोंड करून शंख फुंकणे उत्तम मानले जाते.

पद्मासनात बसूनही तो वाजवला जाऊ शकतो. यामध्ये पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवल्यास शंख योग्य रितीने वाजवता येतो. शक्य तितका जास्त श्वास घ्या, श्वास सोडा आणि पुन्हा श्वास घ्या. असे दोन ते तीन वेळा करा. शंख फुंकताना तोंडाने श्वास घेऊ नये. शंखाचे तोंड ओठांच्या मध्ये (थोडेसे उजव्या बाजूला) ठेवा आणि त्यात हळूहळू हवा फुंका. हे सलग अनेक वेळा करा. पहिल्या प्रयत्नात ध्वनी काढणे अवघड असते.

असली आणि नकली शंख कसा ओळखावा?

डॉ इंद्रजित बली मिश्रा सांगतात की, आजकाल बाजारात नकली शंखांची चलती आहे. कृत्रिम शंखही उपलब्ध आहेत. म्हणूनच असली शंख ओळखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही शंख खरेदी करायला जाल तेव्हा शांत ठिकाणी तो फुंकून बघा. फुंकताना जास्त ताकद तर लावावी लागत नाही ना ते पहा. शंख फुंकल्यानंतर लगेच कानाजवळ घ्या. जर तो असली शंख असेल तर त्याचा आवाज शंखाच्या आत गुंजत राहतो. लक्षपूर्वक ऐकल्यावर समुद्राच्या लाटांसारखा आवाज येतो.

शंख ओळखण्याची एक पद्धत म्हणजे तो पाण्यात टाकणे. जर तो असली शंख असेल तर तो पाण्याच्या वर येतो. मात्र, आजकाल बाजारात मिळणारे बनावट शंखही पाण्यातून वर येतात. पूर्वीच्या काळी धान्यात शंख ठेवावा असे म्हटले जायचे. दाण्याच्या आत टाकल्यावर तो वर येतो. पण ते फारसे वैज्ञानिक नाही. असली शंख त्याच्या आवाजानेच ओळखला जातो. कृत्रिम शंखाचा ध्वनी कर्कश असतो. पण असली शंखाचा ध्वनी गंभीर असतो.

पांचजन्य शंख सर्वोत्तम

सर्व प्रकारच्या शंखांमध्ये पांचजन्य शंख सर्वोत्तम मानला जातो. भगवद्गीतेतही पांचजन्य शंखाचे वर्णन केले आहे. एक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने पाचजन्य शंख बाहेर काढला आणि ध्रुव ऋषींच्या कानाजवळ नेला. यामुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.

पाचजन्य शंखाचे पाच भाग असतात. त्याला सिंहानुसा म्हणतात. तो आकाराने खूप मोठा असतो. मात्र ते खूपक कमी असतात. महाभारतातही युद्धाच्या आधी आणि संध्याकाळी युद्ध संपण्यापूर्वी पाचजन्य शंखातून शंखनाद केला जायचा. ते म्हणतात की शंखाचा ध्वनी ब्रह्मांडाशी निगडित आहे. शंखात ओम असा ध्वनी असतो.

आता बहुतेक शंख ओडिशातून येतात जे आकाराने लहान असतात.

सकाळी आणि संध्याकाळीच शंखनाद करा

डॉ. इंद्रजित म्हणतात की शंखाच्या ध्वनीने नकारात्मक ऊर्जा दूर जाते. पुराणात असे मानले गेले आहे की, शंखाची आकृती आणि पृथ्वीची रचना जवळजवळ सारखीच आहे. नासाच्या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, शंखातून निघणारा आवाज खगोलीय उर्जेसारखा आहे. यामुळे जंतू नष्ट होतात. नवीन ऊर्जेचा संचार होतो. ते म्हणतात की सूर्याची किरणे सकाळी आणि संध्याकाळी प्रखर नसतात. या दरम्यान शंख फुंकण्याचा परिणाम होतो. वातावरणातील जंतू नष्ट होतात. पण दुपारी किंवा इतर वेळी सूर्याची किरणे प्रखर असतात, अशा स्थितीत शंखध्वनीचा फारसा परिणाम होत नाही.

1 जानेवारी 2022 रोजी वाराणसीमध्ये 1008 शंखांचा शंखनाद

यावर्षी 1 जानेवारीला बाबा विश्वनाथ मंदिरात 1008 लोकांनी शंखनाद केला. डॉ.इंद्रबली मिश्रा सांगतात की शंख फुंकण्याचे ठराविक वय नसते. तो कोणत्याही वयात फुंकता येतो. चार वर्षीय वेदांश मिश्रा याने विश्वनाथ मंदिरात शंख फुंकला होता.

शंखाच्या आकारातून लहरींचे कंपन

जेव्हा तुम्ही शंख कानाजवळ घेऊन लक्षपूर्वक ऐकता तेव्हा तुम्हाला समुद्राच्या लाटा हळू हळू येत असल्यासारखा आवाज ऐकू येतो. वास्तविक, पृथ्वीची वैश्विक ऊर्जा किंवा नैसर्गिक कंपने शंखात प्रवेश केल्यानंतर मॅग्निफाईड होतात. शंखातून ध्वनी कंपने होतात. त्यामुळे वातावरणात पसरणारे प्रदूषणही कमी होते. शंख फुंकल्याने मनोवैज्ञानिक स्पंदने निर्माण होतात ज्यामुळे व्यक्तीमध्ये दृढनिश्चय आणि इच्छाशक्ती वाढते.

पंडित श्रीपती त्रिपाठी सांगतात की शंख फुंकल्याने रोग तर दूर होतोच पण चेहऱ्याची चमकही वाढते. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. शंख फुंकल्याने चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात आणि सुरकुत्या नाहीशा होतात.

बातम्या आणखी आहेत...