आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टनव्या राज्यातही पोलिस गाडी अडवू शकणार नाही:जर असेल या सीरीजचा क्रमांक; फक्त जास्त कर भरावा लागेल

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी आणि नोकरीच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी एक म्हणजे तुमच्या वाहनाची नोंदणी बदलण्याची समस्या. नवीन शहरात दुसऱ्या राज्याच्या वाहनाचा नंबर बघितल्यावर पोलिस आधी थांबवतात. तुमच्याकडे BH सीरीजची नंबर प्लेट असल्यास, तुमच्या वाहनासोबत या पुढे तसे होणार नाही.

15 सप्टेंबर 2021 पासून BH मालिकेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, तरी देखील फारक कमी लोकांना या बद्दल माहिती आहे.

वास्तविक, BH सीरीजची नंबर प्लेट काय आहे, ती कोणी घेऊ शकते का, त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, हे सर्व आज कामाची गोष्ट मध्ये तुम्हाला कळेल…

प्रश्न 1- सर्वप्रथम, हे सांगा की नोकरीमुळे राज्य बदलल्यास सध्या वाहनांच्या नोंदणीची काय प्रक्रिया आहे?

उत्तर- मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 47 नुसार, तुम्ही एका वर्षासाठी कोणत्याही राज्यात दुसऱ्या राज्याचे वाहन चालवू शकता. एका वर्षाच्या आत, तुम्हाला तुमच्या वाहनाची नवीन राज्यात नोंदणी करावी लागेल. त्यासाठी जुन्या आरटीओकडून एनओसी आणणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया प्रत्येक राज्यात वेगळी असते आणि कागदपत्रेही वेगळी दिसतात. यामुळे लोक दुसर्‍या राज्यात आपले वाहन पुन्हा नोंदणी करण्यास कचरतात.

प्रश्न 2- BH सीरीजची नंबर प्लेट म्हणजे काय?

उत्तर- भारत सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये नॉन ट्रांसपोर्ट वाहनांसाठी BH नंबर प्लेट किंवा भारत मालिका नोंदणी क्रमांक लाँच केला. BH मालिका नंबर प्लेट एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहन नोंदणी हस्तांतरित करण्याचे बंधन काढून टाकते. BH क्रमांकांसाठी, सामान्य क्रमांकाच्या तुलनेत अधिक कर भरावा लागतो.

हे एका उदाहरणाने समजून घेऊया… मोटार वाहन कायद्यानुसार तुमच्या गाडीचा नंबर महाराष्ट्राच्या नंबर प्लेटवर नोंदवला जातो. तुम्ही नोकरी बदलल्यास किंवा बदली केल्यास, तुम्ही तुमची कार फक्त 12 महिन्यांसाठी नवीन राज्यात चालवू शकता. यानंतर तुम्हाला कारची नवीन राज्यात नोंदणी करावी लागेल. दुसरीकडे, जर तुमच्याकडे BH मालिकेचा नोंदणी क्रमांक असेल, तर याची गरज भासणार नाही.

प्रश्न 3- BH सिरीजचा क्रमांक कोणीही घेऊ शकतो का?

उत्तर - नाही. ही नंबर प्लेट प्रत्येकासाठी नाही. तपशील जाणून घेण्यासाठी खालील क्रिएटिव्ह वाचा

प्रश्न 4- नवीन नंबर प्लेट सध्याच्या क्रमांकापेक्षा वेगळी कशी असेल?

उत्तर- नवीन नंबर प्लेटचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असेल. सध्या वाहनांवरील नंबर प्लेट राज्यांनुसार फॉरमॅट केल्या जातात. प्रथम राज्य, नंतर RTO कोड, नंतर दोन अक्षरे आणि शेवटी 4-अंकी अनुक्रमांक. MP-09-AB-1234 च्या उदाहरणाने समजून घेऊ. येथे MP म्हणजे मध्य प्रदेश, 09 म्हणजे RTO कोड इंदूर, AB अर्थ वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेबळा असू शकतो. त्यात A ते Z पर्यंतची अक्षरे असू शकतात. आणि शेवटी 4 अंकी संख्या जी 0001 ते 9999 पर्यंत काहीही असू शकते.

प्रश्न 5- BH सीरीज कार मालक रोड टॅक्स ऑनलाइन भरू शकतात का?

उत्तर - अगदी. अशा लोकांसाठी रोड टॅक्स ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

एकदा रोड टॅक्स भरला की तो 14 वर्षांसाठी लागू राहतो. त्यानंतर तुम्हाला वार्षिक शुल्क भरावे लागेल. कारच्या चलानच्या आधारे भरावा लागणारा रोड टॅक्सही नाममात्र आहे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कारसाठी 8% पैसे द्यावे लागतील. 10 लाख ते 20 लाख दरम्यानच्या कारसाठी 10% आणि वरील कारसाठी 20% शुल्क द्यावे लागतील.

प्रश्न 6- BH मालिका नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर- सर्वप्रथम, राज्य प्राधिकरण वाहनाचा मालक या निकषासाठी पात्र आहे की नाही हे तपासते. कार मालक देखील MoRTH च्या वाहन पोर्टलवर लॉग इन करून या सुविधेबद्दल तपशीलवार माहिती घेऊ शकतात. नवीन कार खरेदी करताना, तुम्ही या कामासाठी कोणत्याही ऑटोमोबाईल डीलरची मदत घेऊ शकता. जर एखाद्याने ऑटोमोबाईल डीलरची मदत घेतली तर डीलरला मूळ मालकाच्या वतीने वाहन पोर्टलवर फॉर्म (20) भरावा लागेल.

खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, ज्यांची कार्यालये 4 पेक्षा जास्त राज्यांमध्ये आहेत, त्यांना फॉर्म (60) भरावा लागेल. यासोबतच कर्मचार्‍यांचे ओळखपत्र कामाच्या प्रमाणपत्रासह सादर करावे लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र लावावे लागेल.

प्रश्न 7- BH मालिका क्रमांक फक्त नवीन कार खरेदीदारांसाठी उपलब्ध असेल का?

उत्तर- नाही तसे नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, आता जुन्या वाहनांवरही बीएच-सीरीजचा क्रमांक घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी मंत्रालयाने अटी व शर्ती घातल्या आहेत.

प्रश्न 8- BH मालिकेसाठी अर्ज कसा करू शकता?

उत्तर-

जुन्या वाहनांसाठी

  • तुमचे वाहन दुसऱ्या राज्यातील असल्यास, तुम्हाला वाहनाच्या नोंदणीकृत आरटीओकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावे लागेल.
  • नवीन आरटीओमध्ये तुम्हाला किमान 2 वर्षे रोड टॅक्स भरावा लागेल. तुमचा जुना आरटीओ कर परत केला जाईल. तुम्ही राज्यात किती काळ राहाल यावर, तुम्ही 2 च्या पटीत 14 वर्षांपर्यंत कर देखील जमा करू शकता.
  • आता तुम्ही बीएच सीरीजसाठी अर्ज करू शकता. कंपनीशी संबंधित कागदपत्रे, वाहन नोंदणी आणि स्वतःची कागदपत्रे आवश्यक असतील.

नवीन वाहनांसाठी

नवीन वाहनांसाठी बीएच सीरीजची नोंदणी केवळ वाहन खरेदीच्या वेळीच करता येते.

कामाची गोष्ट या सीरीजमधील आणखी बातम्या वाचा..

मुले शाळेत गेल्यावर, मी घरातील कामे आवरते, नंतर जेवते:यामुळे होईल अ‍ॅसिडिटी, जे ठरते गॅस्ट्रिक कँसरचे कारण

माझ्या आईला सवय आहे. ती सकाळी उठते, आमच्यासाठी आणि पप्पासाठी टिफिन बनवते, घर पुसल्यानंतर, भांडी आणि कपडे धुते, आंघोळ करून काहीतरी खाते. हे सर्व काम करताना दुपार होते. अनेकदा समजावून सांगूनही ती आपली सवय बदलत नाही.

नोव्हेंबर महिना हा गॅस्ट्रिक कॅन्सर जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. यावर एक बातमी करण्याच्या हेतूने मी काही तज्ञांशी बोलले आणि समजले की, या आजाराचे सर्वात मोठे कारण अ‍ॅसिडिटी आहे. डॉक्टरांकडून सविस्तर सर्व काही समजून घेतल्यानंतर मी माझ्या आईलाही सावध केले.

तुम्हीही ही बातमी काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या, कारण उशिरा जेवणं, घरातील सगळी कामं उरकून जेवणं ही एकट्या माझ्या आईची सवय नाही. असे करणार्‍या महिला प्रत्येक घरात उपस्थित असतात.

मग कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी...

घरातील बायकांना समजावून सांगा की कामाला थोडा उशीर होऊ शकतो. पण एकदा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण झाली की, मग गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. हे आम्ही नव्हे तर डॉक्टर सांगत आहेत. विश्वास बसत नसेल तर स्वतः वाचा- पूर्ण बातमी

परदेशात कॉल करण्याचे बनावट बिल:ग्राहकानेच लढवला व्होडाफोनविरुद्ध खटला, कंपनीला द्यावा लागला 97 हजार दंड

सतर्क राहून ग्राहक मंचात तक्रार कशी करावी? आम्हाला आमचा खटला लढवायचा असेल तर ते कसे शक्य होईल, या सर्व प्रश्नांवर सविस्तर वाचा.. पूर्ण बातमी...​​​​

बातम्या आणखी आहेत...