आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • A Police Photographer Turned Out To Be Photographing Bhagat Singh Wearing A Cap; Although Known, He Did Not Say

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हब्रिटिश राजवट हादवणारा विधानसभेतील स्फोट:भगतसिंग यांचा फोटो काढणारा निघाला पोलिस फोटोग्राफर

वैभव पळनीटकर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत... या मालिकेच्या सहाव्या कथेत वाचा 'दिल्ली सेंट्रल असेंब्ली ब्लास्ट-1929' ची कहाणी...

सर्वात आधी हे छायाचित्र पाहा...

भगतसिंग हे नाव ऐकलं की टोपी घालून मिशी असलेल्या तरुणाचं चित्र डोळ्यांसमोर येतं. हे चित्र काढण्याची कथाही रंजक आहे. 4 एप्रिल 1929 रोजी सेंट्रल असेंब्ली बॉम्बस्फोटाच्या 4 दिवस आधी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त पोलिसांच्या नजरेपासून लपत छपत दिल्लीच्या कश्मिरी गेट येथील रामनाथ फोटोग्राफर्सकडे पोहोचले. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) चे सदस्य जयदेव कपूर यांनी छायाचित्रकाराला एक विशेष सूचना दिली - 'आमचा मित्र आपच्यापासून दूर जात आहे, आम्हाला त्याचे खूप चांगले छायाचित्र हवे आहे.'

भगतसिंग स्टुडिओत पोहोचले तेव्हा त्यांनी खाकी शर्ट आणि डोक्यावर फेल्ट हॅट घातलेली होती. या ड्रेसमध्ये ते बॉम्बस्फोट घडवणार होते. त्यांच्या मनात ही घटना घडवून आणण्याबरोबरच त्याचे वर्तमानपत्रांचे कव्हरेज कसे असेल याचाही अंदाज होता. भगतसिंग यांचा विचारही तसाच होता. क्रांतिकारी उपक्रमांची जबाबदारी घेऊन त्यांना ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायची होती.

आज 93 वर्षांनंतर मी त्याच काश्मिरी गेटसमोर उभा आहे, जो या क्रांतिकारी उपक्रमांचा साक्षीदार आहे. रस्त्याच्या कडेला भगतसिंगचे पोस्टर विकणाऱ्यांना हे छायाचित्र पहिल्यांदा याच ठिकाणी क्लिक केले होते, याची कल्पनाही नाही.

विधानसभेत स्पोटाच्या दिवशी क्रांतीकारकांची अखेरची भेट झाली तेव्हा

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 3-4 दिवसांपूर्वीच दिल्ली विधानसभेला भेट देऊन रेकी करायला सुरुवात केली होती. विधानसभेच्या सार्वजनिक गॅलरीत बसून त्यांनी रिकामी जागा कुठे आहे आणि कुठे बॉम्ब टाकायचे हे ठरवले होते.

दिनांक 8 एप्रिल 1929. सकाळची वेळ दिल्लीच्या कुदसिया पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करणारे नेहमीप्रमाणे ये-जा करत होते. भगतसिंगांसोबत क्रांतिकारकांची शेवटची भेट याच उद्यानात होणार होती. भगतसिंगचा साथीदार सुखदेव याला विधानसभा स्फोटाचे संपूर्ण नियोजन आणि त्यात असलेले धोके याची माहिती होती. त्यामुळे भगतसिंगांनी दुर्गा भाभी आणि काही क्रांतिकारकांना कोणत्या ना कोणत्या बहाण्याने लाहोरहून दिल्लीला बोलावले.

दिल्लीतील कुदसिया पार्क. हे तेच ठिकाण आहे जिथे भगतसिंग, बीके दत्त, सुखदेव आणि दुर्गा भाभी यांची एकत्र अखेरची भेट झाली होती.
दिल्लीतील कुदसिया पार्क. हे तेच ठिकाण आहे जिथे भगतसिंग, बीके दत्त, सुखदेव आणि दुर्गा भाभी यांची एकत्र अखेरची भेट झाली होती.

लाहोरमध्ये सॉंडर्सची हत्या करून भगतसिंग ज्यांच्यासोबत पळून गेला होता या त्याच दुर्गा भाभी आहेत. दुर्गा भाभींनी भगतसिंगसाठी संत्री आणि रसगुल्ला आणला होता. भगतसिंगांना रसगुल्ला खूप आवडत असे.

क्रांतिकारकांची शिस्त पहा की, या भेटीनंतरही दुर्गा भाभींना आज भगतसिंग काय करणार आहेत हे कळाले नाही. HSRA मध्ये मोठ्या आणि महत्त्वाच्या नियोजनाचे मुद्दे फक्त कोअर ग्रुपच्या सदस्यांनाच सांगायच्या, असा नियम होता.

आजही कुदसिया पार्कमधील जुनी झाडे क्रांतिकारकांच्या त्या सभेची साक्ष देतात. बागेत बांधलेली इमारत जवळपास मोडकळीस आली आहे, पण तिथे भगतसिंगांच्या स्मृतींचा फलकही लावलेला नाही. इतकेच नाही तर इथे येणाऱ्यांनाही हे क्रांतिकारकांच्या भेटीचे ऐतिहासिक ठिकाण आहे, हे माहीत नाही.

कुदसिया पार्कमध्ये भगतसिंग, बीके दत्त सुखदेव आणि दुर्गा भाभी बसून बोलत आहेत. यासोबतच रसगुल्ला आणि संत्रीही खात आहेत. छायाचित्रण: गौतम चक्रवर्ती
कुदसिया पार्कमध्ये भगतसिंग, बीके दत्त सुखदेव आणि दुर्गा भाभी बसून बोलत आहेत. यासोबतच रसगुल्ला आणि संत्रीही खात आहेत. छायाचित्रण: गौतम चक्रवर्ती

आजच्या संसदेप्रमाणेच त्यावेळीही दोन विधेयकांवर गदारोळ झाला होता

दुर्गा भाभींसोबतच्या शेवटच्या भेटीनंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त दिल्ली विधानसभेच्या सभागृहात जाण्याची तयारी करू लागले. आज जे संसद भवन आहे, 1929 मध्ये त्याला कौन्सिल हाऊस असे म्हणत होते. या परिषदेच्या सभागृहात असेंब्ली हॉल होता, जी आजची लोकसभा आहे. आज महागाई आणि जीएसटी यांसारख्या मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ सुरू असताना 93 वर्षांपूर्वी येथे ‘ट्रेड डिस्प्यूट बिल’ आणि ‘पब्लिक सेफ्टी बिल’ यावर चर्चा सुरू होती.

या दोन्ही विधेयकांबद्दल क्रांतिकारकांमध्ये प्रचंड संताप होता. ‘ट्रेड डिस्प्यूट बिल’ यापूर्वीच मंजूर झाले होते, ज्या अंतर्गत कामगारांच्या संपावर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर 'पब्लिक सेफ्टी बिल'च्या माध्यमातून ब्रिटिश सरकार संशयितांना कोणत्याही खटल्याशिवाय कोठडीत ठेवू शकते. स्वातंत्र्याचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले होते.

विधानसभा सभागृह बॉम्ब फोडून भगतसिंग यांना कामगार, शेतकरी आणि तरुणांना संदेश द्यायचा होता. विधानसभेच्या सभागृहात जाण्यासाठी आधीच पासेसची व्यवस्था करण्यात आली होती.

आजचे संसद भवन. 93 वर्षांपूर्वी भगतसिंग आणि बीके दत्त यांनी येथे बॉम्ब फेकला होता. तेव्हा त्याला कौन्सिल हाऊस असे म्हणत होते.
आजचे संसद भवन. 93 वर्षांपूर्वी भगतसिंग आणि बीके दत्त यांनी येथे बॉम्ब फेकला होता. तेव्हा त्याला कौन्सिल हाऊस असे म्हणत होते.

8 एप्रिल 1929, सकाळी 11 ची वेळ. विधानसभेचे कामकाज सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त दाखल झाले. भगतसिंग यांनी खाकी रंगाचा शर्ट आणि हाफ पॅन्ट घातली होती. शर्टावर राखाडी रंगाचा कोट घातला होता. डोक्यावर इंग्लिश फेल्ट टोपी होती. ही टोपी त्यांनी लाहोरमधील एका दुकानातून विकत घेतल्याचे सांगितले जाते.

दोन्ही क्रांतिकारकांनी आधीच रेकी केली होती, त्यामुळे सर्व काही नियोजनानुसारच करायचे होते. घाई न करता दोघेही सभागृहाचे कामकाज ऐकत होते आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करत होते.

बॉम्बस्फोटापूर्वी सभागृहाचे कामकाज ऐकताना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. भगतसिंग करड्या रंगाचा कोट आणि इंग्लिश फेल्ट हॅट घातली होती. छायाचित्रण: गौतम चक्रवर्ती
बॉम्बस्फोटापूर्वी सभागृहाचे कामकाज ऐकताना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. भगतसिंग करड्या रंगाचा कोट आणि इंग्लिश फेल्ट हॅट घातली होती. छायाचित्रण: गौतम चक्रवर्ती

दुपारचे साडे बारा वाजले होते. मध्यवर्ती विधानसभेचे अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल दोन्ही विधेयकांच्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यासाठी उभे राहिले. त्यानंतर सभागृहाच्या रिकाम्या जागेवर दोन बॉम्ब पडले आणि एकापाठोपाठ एक असे दोन जोरात स्फोट झाले. सगळीकडे गोंधळ उडाला होता. 'इन्कलाब झिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद'च्या घोषणांनी सभा दुमदुमली. त्यांनी गुलाबी रंगाचे पॅम्फलेट हवेत उडवले, जे HSRA च्या सहकाऱ्यांनी केले होते.

भगतसिंगचा पूर्ण बाह्यांचा खाकी रंगाचा इटालियन कॉलर असलेला शर्ट. हा शर्ट घालून भगतसिंग दिल्ली विधानसभेत दाखल झाले होते. (फोटो: सर्वोच्च न्यायालय)
भगतसिंगचा पूर्ण बाह्यांचा खाकी रंगाचा इटालियन कॉलर असलेला शर्ट. हा शर्ट घालून भगतसिंग दिल्ली विधानसभेत दाखल झाले होते. (फोटो: सर्वोच्च न्यायालय)

स्फोटाच्या वेळी सायमन कमिशनचे सर जॉन सायमन, मोतीलाल नेहरू, मोहम्मद अली जिना, आरएम जयकर आणि एनसी केळकर हेही सभागृहात उपस्थित होते. इंग्रजांची ही दोन्ही विधेयके मंजूर होतील हे जवळपास निश्चित झाले होते.

या सभागृहात पत्रकार म्हणून उपस्थित होते.. दुर्गादास. स्फोटाचा आवाज ऐकून या स्फोटाची बातमी जगाला कळावी यासाठी त्यांनी प्रेस रुमच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती परदेशी वृत्तसंस्थांना देण्यासाठी त्यांनी माहिती डिक्टेक्ट केली. मात्र पोलिसांनी विधानसभेचा मुख्य दरवाजा लगेचच बंद केला.

विधानसभेची रिकामी जागा पाहून भगतसिंग यांनी बॉम्ब फेकला आणि इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. बटुकेश्वर दत्त एकत्र HSRA चे पत्रकं फेकत आहेत. छायाचित्रण: गौतम चक्रवर्ती
विधानसभेची रिकामी जागा पाहून भगतसिंग यांनी बॉम्ब फेकला आणि इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. बटुकेश्वर दत्त एकत्र HSRA चे पत्रकं फेकत आहेत. छायाचित्रण: गौतम चक्रवर्ती

स्फोटानंतर लगेचच भगतसिंग यांनी त्याच पिस्तुलाने गोळीबार केला ज्याने साँडर्स या ब्रिटीश अधिकाऱ्याचा त्यांनी बळी घेतला होता. गोंधळानंतर चेंगराचेंगरी झाली, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त सहज पळून जातील एवढी गर्दी होती, पण एचएसआरएची योजना त्यांना अटक करुन घेण्याची होती.

बॉम्बस्फोटापूर्वी ज्या काही क्रांतिकारी घटना घडल्या, मग ती काकोरीची घटना असो किंवा सॉंडर्सची हत्या असो, त्याला मीडियात नकारात्मक कव्हरेज मिळाले. यावेळी त्यांच्या कृतीला चेहरा मिळावा आणि त्यांनी त्यांच्या कृतीची जबाबदारी घ्यावी, अशी क्रांतिकारकांची इच्छा होती.

यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून ते न्यायालयीन कारवाईपर्यंत क्रांतीकारकांची मते एवढ्या ठामपणे मांडली जावी, की ती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हावीव आणि सर्वसामान्य लोकांमध्ये क्रांतिकारी चळवळीबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी अशी योजना होती.

दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोटानंतर फेकण्यात आलेल्या पत्रकांमध्ये लिहिलेले होते, 'बधिरांना ऐकण्यासाठी मोठा आवाज हवा असतो.' या पॅम्प्लेटचा पहिला शब्द 'नोटिस' होता. शेवटी सेनापती बलराज यांचे नाव नोंदवण्यात आले होते.

घटनेनंतर बटुकेश्वर दत्तला नवी दिल्ली पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि भगतसिंगला दर्यागंज पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या मुख्य आयुक्तांनी गृह सचिवांना पत्र लिहिले. “आज दुपारी विधानसभेत झालेल्या स्फोटांबाबत दिल्लीच्या एसपीकडून मिळालेल्या अहवालानुसार, बॉम्ब फेकणाऱ्या दोघांनी पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. भगतसिंग यांनी स्फोटांना जबाबदार असल्याचे सांगितले.

उर्दूमध्ये लिहिलेल्या या एफआयआरमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर यांची नावे आहेत. विधानसभा बॉम्ब प्रकरणादरम्यान नवी दिल्ली पोलीस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली होती (फोटो- सर्वोच्च न्यायालय)
उर्दूमध्ये लिहिलेल्या या एफआयआरमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर यांची नावे आहेत. विधानसभा बॉम्ब प्रकरणादरम्यान नवी दिल्ली पोलीस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली होती (फोटो- सर्वोच्च न्यायालय)

दिनांक 9 एप्रिल 1929. स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी या घटनेचे प्रसारमाध्यमांतून बरेच कव्हरेज झाले. एका वृत्तपत्राने लिहिले- 'सरकारला लाल इशारा. तुम्ही लोकांना मारू शकता विचारांना नाही. हिंदुस्तान टाइम्सने एचएसआरएच्या लाल पत्रकाची संपूर्ण प्रिंट छापली होती. क्रांतिकारकांच्या नियोजनानुसार लोकांना आता त्यांचे बंड समजू लागले होते. सुमारे दोन वर्षे देशभरातील वृत्तपत्रे भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल प्रसिद्धी देत राहिले.

दिल्ली विधानसभा बॉम्ब प्रकरणही न्यायालयात चालले होते. यादरम्यान भगतसिंग यांना दिल्लीतील तत्कालीन व्हाइस रीगल लॉजच्या तळघरात कैद करण्यात आले होते. आज या ठिकाणी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंचे कार्यालय आहे. भगतसिंग ज्या आठ बाय दहाच्या खोलीत कैद होते ती खोली अजूनही सुरक्षित आहे. त्या खोलीत एक खाट पडलेली असून भिंतीवर भगतसिंग यांचे चित्र आहे.

दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू कार्यालय. ब्रिटीश काळात ही इमारत व्हाइस रीगल लॉज म्हणून ओळखली जात होती.
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू कार्यालय. ब्रिटीश काळात ही इमारत व्हाइस रीगल लॉज म्हणून ओळखली जात होती.

भगतसिंग यांच्यावर संशोधन करणारे इतिहासकार एस. इरफान हबीब म्हणतात की, भगतसिंग यांनी वापरलेला बॉम्ब कोणाला मारण्यासाठी नव्हता. मोठा आवाज करणं हेच त्याचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे रिकामी जागा पाहून त्यांनी बॉम्ब फेकला.

कलकत्त्यात बॉम्ब बनवायला शिकले, आग्रा येथे तयार केला आणि झाशीत चाचणी केली

डिसेंबर 1928 मध्ये सॉंडर्सच्या हत्येनंतर काही महिन्यांनी, भगतसिंग आणि बाकीचे क्रांतिकारक दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे एकत्र आले. येथे भगतसिंग यांनी आपल्या सोबतच्या क्रांतिकारकांना संदेश दिला - 'एक हजार पत्रकांऐवजी, केवळ एका कृतीने कितीतरी अधिक शक्तिशाली प्रचार तयार केला जाऊ शकतो.' चळवळ सामान्य लोकांच्या हृदय आणि मनापर्यंत नेण्याचा हा प्रयत्न होता. त्यासाठी मोठा धमाका हवा होता.

त्यानंतर बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकण्यासाठी क्रांतिकारक कलकत्ता (कोलकाता) येथे पोहोचले. तिथे भगतसिंग हे छज्जुराम यांच्या हवेलीमध्ये राहिले. त्यांनी बॉम्ब बनवण्यात माहिर असलेल्या लोकांचा शोध घेतला. त्या काळात त्यांना जतीन दास, यतिंद्र घोष या क्रांतिकारकांची साथ मिळाली.

आता हे क्रांतिकारक आग्रा येथे गेले. आग्रा येथे आल्यानंतर या लोकांनी हिंग बाजारात एक छोटी जागा भाड्याने घेतली. येथे एक छोटेसे वाचनालयही उघडण्यात आले. दुसरीकडे बॉम्ब बनवायलाही सुरुवात केली. झाशीच्या जंगलात बॉम्बची चाचणी करण्यात आली. बॉम्बचा फक्त स्फोट होईल या हेतूने तो तसा आधीच तयार करण्यात आला होता. कोणाच्याही जीवाला हानी पोहोचवू नका, असा संदेश होता.

विधानसभेत बॉम्ब फेकून अटकेत कोण जाणार?.. यावरून होता वाद

बॉम्बची चाचणी झाली आणि आता कारवाईचे नियोजन सुरू होते. सायमन कमिशनवर निशाणा साधावा, अशा सूचना आधीच आल्या होत्या, पण नंतर संसाधनांचा अभाव होता. यानंतर दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोट करावा यावर सर्व क्रांतिकारकांचे एकमत झाले. भगतसिंग यांनी ही कारवाई करण्यासाठी त्यांचे नाव पुढे केले, परंतु लाहोर कट प्रकरणातील फाईल ज्यामध्ये सॉंडर्सची हत्या झाली होती ती अद्याप बंद झालेली नाही.

चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांना बॉम्बस्फोटासाठी पाठवण्याच्या विरोधात होते. बैठकीत कानपूरचे क्रांतिकारक शिव वर्मा आणि बटुकेश्वर दत्त यांची नावे बॉम्ब खटल्यासाठी अंतिम करण्यात आली.

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचे हे पोस्टर लाहोरमधील नॅशनल आर्ट प्रेसमध्ये छापण्यात आले होते. पंजाबच्या वेगवेगळ्या भागात ते वाटण्यात आले हाते.
भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचे हे पोस्टर लाहोरमधील नॅशनल आर्ट प्रेसमध्ये छापण्यात आले होते. पंजाबच्या वेगवेगळ्या भागात ते वाटण्यात आले हाते.

सुखदेवला हा निर्णय कळताच ते संतापले. या कामासाठी फक्त भगतसिंग यांनीच जावे, अशी त्यांची धारणा होती. सुखदेवने तर भगतसिंगला भित्रा म्हटले आणि एका मुलीच्या प्रेमामुळे त्याला मरण्याची भीती वाटते, असेही म्हटले.

यानंतर भगतसिंगांनी एक लांबलचक पत्र लिहून सुखदेव यांना उत्तर दिले ते वाचा त्यांच्याच शब्दात...

खुशी के वातावरण में मैं कह सकता हूं कि जिस प्रश्न पर हमारी बहस है, उसमें अपना पक्ष लिए बिना नहीं रह सकता। मैं पूरे जोर से कहता हूं कि मैं आशाओं और आकांक्षाओं से भरपूर हूं और जीवन की आनंदमयी रंगीनियों से ओत-प्रोत हूं, पर आवश्यकता के वक्त सब कुछ कुर्बान कर सकता हूं और यही वास्तविक बलिदान है। ये चीजें कभी मनुष्य के रास्ते में रुकावट नहीं बन सकतीं, बशर्ते कि वह मनुष्य हो। निकट भविष्य में ही तुम्हें प्रत्यक्ष प्रमाण मिल जाएगा।’

अखेरीस पण भगतसिंग यांच्या बाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

रामनाथने फोटोग्राफर भगतसिंग यांचा फोटो आधीच काढला होता, पण बॉम्बच्या घटनेनंतरही हे फोटो तयार झाले नव्हते. अटकेनंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात भगतसिंग यांचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला बोलावले. तेव्हा तेच फोटोग्राफर आले ज्यांनी 4 दिवसांपूर्वी भगतसिंग यांचा फोटो काढला होता. त्यांनी लगेच भगतसिंग यांना ओळखले.

जयदेव कपूर यांना माहीत नव्हते की, ज्या रामनाथ छायाचित्रकारांकडे ते भगतसिंग यांचे छायाचित्र काढण्यासाठी गेले होते त्याचा पोलिसांसोबत फोटो काढण्याचा कंत्राट आहे.

जयदेव फोटो आणायला गेले तर पोलिस त्यांना पकडतील अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्यावर कारवाई करता यावी म्हणून त्यांनी सोबत पिस्तूलही नेले, पण रामनाथ फोटोग्राफर्सनी केवळ फोटोच दिले नाहीत तर निगेटिव्हही दिली.

नंतर या फोटोग्राफरने कोर्टात साक्ष देण्यासही नकार दिला. 4 दिवसांनी हा फोटो लाहोरहून प्रकाशित होणाऱ्या ‘बंदे मातरम्’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आणि भारतीय क्रांतिकारी चळवळीचा चेहरा देशासमोर आला.

संदर्भ :

  1. भगत सिंह डॉक्यूमेंट्स
  2. चमन लाल इतिहासकार इरफान हबीब
  3. हिस्ट्री ऑफ मॉर्डन इंडिया, बिपिन चंद्रा
  4. द दिल्ली आर्काइव्स

संपादक मंडळ: निशांत कुमार, अंकित फ्रान्सिस आणि इंद्रभूषण मिश्रा

म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत......या मालिकेतील या 5 कथाही वाचा...

चिमूटभर मिठाने उतरवला इंग्रजांचा गर्व:गांधींजी केवळ हिंदूंचे नेते नाही, हे दांडी यात्रेतून केले सिद्ध

विस्मृतीत गेलेले नौदलाचे बंड:पटेलांनी थांबवले नसते तर गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज तोफेने उडवले असते

बारडोलीतून देशाला मिळाले 'सरदार':पटेल शेतकऱ्यांना म्हणाले, स्त्रियांशिवाय घर चालत नाही आणि तुम्ही मोठ्या सत्याग्रहाचे स्वप्न पाहता

खुदीराम यांचा ब्रिटिशांवर बॉम्ब हल्ला:वयाच्या 18व्या वर्षी फासावर, लोक त्यांच्या राखेचे ताईत घालू लागले

गांधी टोपीमुळे थांबले असहकार आंदोलन:चौरी-चौरामध्ये देणगीतून उभारले 19 हुतात्म्यांचे स्मारक

बातम्या आणखी आहेत...