आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारावरून ग्राउंड रिपोर्ट:इनक्यूबेटरमध्ये होरपळताना तळपत होती तान्ही मुलं, आग इतकी भयंकर होती की गार्ड्सला सुद्धा श्वास घेणे झाले होते अशक्य

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आश्चर्यकारक बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी देखील याच वार्डात भीषण आग लागली होती.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत 10 नवजातांचा मृत्यू झाला. ही मुले केवळ 1 ते 3 महिन्यांची होती आणि अशक्त असल्यामुळे त्यांना न्यूबोर्न केअर युनिटमध्ये (SNCU) ठेवले होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे 3 वर्षांपूर्वी देखील याच वार्डात आग लागली होती, परंतु सुरक्षेचे उपाय केले नाहीत. यावेळी आग लागल्यानंतर सुरक्षा रक्षकांना खिडकीतून आतमध्ये प्रवेश करावा लागला. तेथे इतका धूर होता की मुले तर दूरच, गार्ड्सना देखील श्वास घेणे अशक्य झाले होते. ही आग इतकी भयानक होती की तिथे ठेवलेली सर्व मशीन्स जळून खाक झाली.

आग लागल्यानंतर वार्डात सर्वात आधी पोहोचणाऱ्यांमध्ये रुग्णालयाच्या सिक्योरिटी स्टाफमधील काही लोक होते. यातील एक गौरव रहपाडे यांनी दिव्य मराठीला संपूर्ण कहानी सांगितली. वाचा त्यांच्यात शब्दांत...

'मी शुक्रवारी रात्री 9 वाजता हॉस्पिटलमध्ये ड्युटीसाठी पोहोचलो. रात्री सुमारे 1.30 वाजता हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होतो. तेवढ्यात पहिल्या मजल्यावरील सिक न्यूबोर्न केअर युनिटमधून धूर येत असल्याचा मला फोन आला. मी उपस्थित काही सिक्योरिटी गार्ड्सना बोलावले आणि सर्व सहकारी वर गेलो. वॉर्डसमोर समोर पोचल्यावर आम्हाला आयसीयूच्या दारातून काळा धूर येताना दिसला. असे असले तरी आम्ही दरवाजा उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते जमले नाही.'

'अग्निशामक यंत्रणाच्या मदतीने आम्ही धूर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला,पण तेही यशस्वी झाले नाही. धुरामुळे तेथे श्वास घेणेही कठीण झाले होते. यामुळे आम्ही खाली गेलो. तेवढ्यात अग्निशमन दलाची गाडी पोहोचली होती. आम्ही पाठीमागून त्याच्या शिडीवर चढून वॉर्डच्या खिडकीत पोहोचलो. खिडकी तोडली आणि मागील मार्गाने मुलांना बाहेर काढले. दुर्दैवाने, आम्ही फक्त 7 मुलांना वाचवू शकलो.'

इनक्यूबेटरमध्ये दोन मुले होरपळत होती

घटनास्थळी उपस्थित आणखी एका सिक्योरिटी गार्डने सांगितले की, 'खोलीत चहूबाजूने धूर पसरला होता. अनेक मुलांचे मृतदेह काळे पडले होते. दोन इनक्यूबेटरमधून आग बाहेर पडत होती. त्यात ठेवलेली मुलं होरपळत होती.'

वार्डमध्ये 17 मुले होती

जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते यांच्यानुसार, वार्डात 17 नवजात मुलांवर उपचार सुरू होता. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले की, रात्री 1.30 ते 2 वाजेदरम्यान सिक न्यूबोर्न केअर युनुटमध्ये आग लागली. दरम्यान आम्ही या आगीच्या वास्तविक कारणांबद्दल काहीही सांगू शकत नाही. आम्ही फायर कॉलेजच्या तज्ञांना बोलविले आहे, त्यांच्या अहवालानंतरच काहीतरी स्पष्ट होईल.

3 वर्षांपूर्वीही लागली होती आग

आश्चर्यकारक बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी देखील याच वार्डात भीषण आग लागली होती. मात्र त्यावेळी मुलांना वेळेत वाचवण्यात यश आले होते, त्यामुळे मोठी दुर्गटना टळली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य समितीने सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंदाते यांना अहवाल पाठविला होता. डॉ खंडाटे यांनी गेल्या वर्षी पीडब्ल्यूडी विभागाकडे नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठविला होता, परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...