आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर ओरिजिनल:भारत व भारतीय वंशाच्या लोकांसाठी सकारात्मक असेल बायडेन कार्यकाळ

वॉशिंग्टन डीसीहून दैनिक भास्करसाठी रोहित शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनचा सामना करण्यासाठी बायडेन भारताशी मैत्री करतील

बायडेन यांच्या धोरणांत भारतीय वंशाच्या अमेरिकींची भूमिका महत्त्वाची असेल. त्यांनी कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार केल्यानंतरच याचा अंदाज आला होता. या जोडीने निवडणूक जिंकून इतिहास रचला. तेव्हापासून अनेक भारतीयांना प्रशासनात स्थान मिळाले आहे. २० भारतीय वंशाच्या अमेरिकींमध्ये नीरा टंडन, विवेक मूर्ती, गरिमा वर्मा सारखी नावे आहेत.

बायडेन यांच्या कार्यकाळात भारतवंशाच्या लोकांचा काय प्रभाव असू शकतो याबाबत आम्ही त्यांच्या टीममधील काही सदस्यांसोबत चर्चा केली. बायडेन यांच्या मदतीसाठी स्थापन गट एएपीआयचे संस्थापक शेखर नरसिंहन सांगतात, अमेरिकेतील भारतीयांना वाटायचे की, बायडेनच अमेरिकेला एकत्र करू शकतात. या गटाने १५ ऑगस्ट २०२० ला बायडेन आणि हॅरिस यांच्यासाठी रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत बायडेन यांनी सांगितले की, कशाप्रकारे भारतीय अमेरिकी त्यांच्या पक्षासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत.

अमेरिका-भारत उद्योग परिषदेच्या चेअरपर्सन निशा बिस्लाव सांगतात, बराक ओबामा यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत झाले आहेत. बायडेन यांच्या कार्यकाळात यात आणखी वाढ होईल. ओबामा प्रशासनाच्या वेळी निशा २०१३ ते २०१७ पर्यंत दक्षिण आशियायी प्रकरणांत असिस्टंट सेक्रेटरी आॅफ स्टेट होत्या. शेखर सांगतात, बायडेन भारतासाठी सकारात्मक धोरण स्वीकारणारे आहेत. भारत खूप महत्त्वाचा सहकारी असल्याचे बायडेन यांना माहिती आहे.

चीनचा सामना करण्यासाठी बायडेन भारताशी मैत्री करतील

माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल म्हणाले, मागील दोन दशकात भारत व अमेरिकेचे संबंधात एवढी प्रगती झाली आहे की,आता प्रशासन वा सरकार बदलणे असंगत झाले आहे. या वर्षात अमेरिका व भारत दोघांनीही वेगवेगळ्या स्वभावाचे पंतप्रधान, राष्ट्रपती व विपरित विचारसरणीच्या पक्षांना येता-जाता पाहिले आहे. मात्र, धोरणात बदलाऐवजी संबंध दृढ झाले आहेत. चीनचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासन भारतासोबत संबंध आणखी दृढ करेल.

बातम्या आणखी आहेत...