आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डडॉक्टर म्हणाले - नवऱ्यासोबत झोपताना दुखत नाही का?:भूल न देताच ऑपरेशन केले, पती म्हणायचा- मुलगा झाला नसबंदी करून घे

लेखक: दीप्ति मिश्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मला ऑपरेशन टेबलवर झोपवण्यात आले. पोटावर कोल्ड जेल सारखे काहीतरी लावून मग कट केला लावला. मी वेदनेने ओरडले, जीव घायकुतीला आला. वरून डॉक्टर माझ्यावरच रागावले. म्हणाले, 'शस्त्रक्रिया करायला त्रास होतो आणि नवऱ्यासोबत झोपताना त्रास होत नाही?'

त्याने चार-पाच जणांना बोलावले. सर्वांनी माझे हात पाय धरले, तोंड दाबले आणि पुन्हा कापले. एक महिना उलटला, पण वेदना कमी झाल्या नाहीत. टाक्यांमध्ये पू भरलाय. नीट चालता येत नाही. घरच्यांना वाटते मी नाटकं करतेय.'

असे बोलताना प्रतिमाचे डोळे पाणावले. प्रतिमा ही बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील अलौली ब्लॉकची रहिवासी आहे. ती त्या 23 महिलांपैकी एक आहे ज्यांचा आरोप आहे की त्यांना भूल न देताच नसबंदी करण्यात आली.

प्रतिमा सांगते दोन मुली होत्या. त्यानंतर मुलगा झाला. तेव्हापासूनच घरचे लोक नसबंदीसाठी दबाव टाकायला लागले.
प्रतिमा सांगते दोन मुली होत्या. त्यानंतर मुलगा झाला. तेव्हापासूनच घरचे लोक नसबंदीसाठी दबाव टाकायला लागले.

या महिलांना भेटण्यासाठी मी दिल्ली ते पाटणा असा 1250 किलोमीटरचा प्रवास करून अलौलीला पोहोचले…

लोकांना पत्ता विचारत मी प्रतिमाच्या घरी पोहोचले. गेटवर आकृती ब्युटी पार्लर नावाचा बोर्ड लावलेला आहे. आतल्या खोलीत एक मोठा आरसा आहे. मेकअपच्या वस्तू ठेवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला धूळीने माखलेले शिवणयंत्र आहे. जवळच खाटेवर न शिवलेले कपड्यांचा ढीग पडलेला आहे. 30 वर्षीय प्रतिमा पार्लर चालवते. शस्त्रक्रियेनंतर काम ठप्प झाले आहे.

राजीव कुमार हे प्रतिमाचे पती आहेत. गावात शेती करता. मी विचारते - प्रतिमा कुठे आहे? उत्तर मिळते - ती तिच्या माहेरी मुंगेरला गेली आहे.

राजीवशी झालेल्या संभाषणाचा किस्सा मी नंतर सांगेन. इथून 50 किलोमीटरचा प्रवास करून मी मुंगेरला प्रतिमाला भेटायला पोहोचते. अनेक दिवसांपासून ती बेडवर पडून असल्याचे कुटुंबीय सांगतात. बाहेर येत नाही. मी आत गेल्यावर प्रतिमा बेडवरून खाली उतरते आणि खुर्चीवर बसते.

प्रतिमा म्हणते, सासरी ठिक देखभाल होत नव्हती, म्हणून माहेरी आले आहे.
प्रतिमा म्हणते, सासरी ठिक देखभाल होत नव्हती, म्हणून माहेरी आले आहे.

मी विचारले - तब्येत कशी आहे?

उत्तर आहे- 'टाके निघाले आहेत, परंतु त्या ठिकाणी पू झाला आहे. मी औषध घेत आहे. उपचारासाठी सात हजार रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. मला चालता येत नाही आणि काम करता येत नाही.'

तुम्ही शिलाई करता का?

ऑपरेशन झाल्यापासून मला कापडाचा एक तुकडाही शिवता आला नाही. अर्धे शिवलेले कपडे पाहून लोक येतात आणि परत जातात. पार्लरही बंद आहे. आता मला जाणीव होत आहे की मी ऑपरेशन करून खूप मोठी चूक केली आहे.

प्रतिमा ब्युटी पार्लर चालवते. सोबत शिलाईही करते. कपड्यांचा ढिग सांगतो की खूप दिवसांपासून प्रतिमा काम करू शकत नाही.
प्रतिमा ब्युटी पार्लर चालवते. सोबत शिलाईही करते. कपड्यांचा ढिग सांगतो की खूप दिवसांपासून प्रतिमा काम करू शकत नाही.

त्या दिवशी काय झाले?

12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता माझ्या पतीने मला सामुदायिक आरोग्य केंद्रात सोडले. ऑपरेशन रूममध्ये चार बेड होते. तीन महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या वेदनेने ओरडत होत्या. मी घाबरले, आत जायला नकार देऊ लागले.

तेव्हा नर्सने सांगितले की, या महिला नशा करतात, म्हणून त्यांना वेदना होत आहेत. तु नशा करत नाहीस तर तुला घाबरण्याची गरज नाही. काही होणार नाही काळजी करू नको. मला वाटले नर्स म्हणत असेल तर ती बरोबर असेल. मी नश करत नाही, मग मला वेदना का होतील?

थोड्या वेळाने डॉक्टर आले. मला वाटले ते ऑपरेशनपूर्वी एखादी सुई टोचतील. मला भूल देतील. येताच त्यांनी मला झोपायला सांगितले. पोटावर कोल्ड जेल सारखे काहीतरी लावले आणि झटकन चीर मारली. मी जोरजोरात ओरडू लागले. डॉक्टरांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाही.

त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अजून नाटक करशील तर टाके उघडेच सोडेन असे म्हणू लागले. मी म्हणाले - मी बाहेर जाऊन सर्वांना सांगेन. त्यावर ते म्हणाले, 'तुझ्यासारख्या कित्येक आल्या आणि गेल्या. तू माझे काहीही बिघडवू शकणार नाही.

नंतर माझ्या कमरेवर सुई टोचली. मला झोप आली. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या पतीला सर्व प्रकार सांगितला, परंतु त्यांनी हे स्वीकारण्यासच नकार दिला. म्हणाले, तु खोटे बोलत आहेस, वेदना होत असल्याचे नाटक करत असल्याचे ते म्हणाले. मग मी कंपाउंडर आणि नर्सला बोलावून त्यांच्या तोंडून सगळं वदवून घेतलं. तेव्हा नवऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला.

प्रतिमा म्हणते की मला वाटले ऑपरेशनपूर्वी डॉक्टर भूलीचे इंजेक्शन देईळ. पण त्यांनी थेट कट केले.
प्रतिमा म्हणते की मला वाटले ऑपरेशनपूर्वी डॉक्टर भूलीचे इंजेक्शन देईळ. पण त्यांनी थेट कट केले.

माझ्यासोबत घडलेला प्रकार आशा कार्यकर्तीला सांगितला होता. मीडिया पोहोचला, मी सगळी गोष्ट सांगितली. पतीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी ते मान्य केले नाही, कारण मी वेदना सहन केल्या होत्या, मी मरता-मरता वाचले होते. त्या दिवशी माझ्याबरोबरच इतर 10 महिलांच्या बाबतीतही असेच घडले.

नसबंदीचा निर्णय तुमचा होता का?

निर्णय माझा आहे की नाही याने काय फरक पडतो. तीन मुलं झाली. दोन मुली आणि एक मुलगा. आता मुलगा झाला आहे तर लवकर ऑपरेशन करून घे असे घरातले म्हणायचे. जर मलाच करायचे आहे तर मग करून घेतले.

तुमचे पतीही नसबंदी करून घेऊ शकत होते?

काय म्हणताय तुम्ही… त्यांनी नसबंदी करून घेतली असती तर मला कशाला त्रास सहन करावा लागला असता? आमच्याकडे पुरुष नसबंदी करत नाही. मी कधीही पुरुष नसबंदी झाल्याचे ऐकले नाही. पूर्वीचे लोक म्हणायचे की कुणी विना तिकीट ट्रेनमध्ये पकडले तर टीटी पकडून त्याची नसबंदी करतात. लोक घाबरायचे. पुरुष हौस म्हणून नसबंदी थोडेच करतील.

प्रतिमाशी बोलल्यानंतर मी 47 किलोमीटरचा प्रवास करून जोगिया गावात पोहोचले. इथे मला पूजा देवी भेटली. नसबंदी केल्यानंतर सासरच्यांनी त्यांना बळजबरीने त्यांना माहेरी पाठवले आहे.

झोपडीसारखे गवताचे घर. दारात मातीची छोटी चूल आहे. आत खुर्चीवर पूजा चादर ओढून बसली आहे. तिच्या मांडीवर एक लहान मुलगी आहे. काही भांडी आणि स्वयंपाकघरातील सामान मागे ठेवले आहे.

जेव्हा मी ऑपरेशनचा उल्लेख करते तेव्हा हसऱ्या चेहऱ्याची पूजा निराश होते. बोलणे टाळण्याचा प्रयत्न करते. मी तिला धीर देते.

पूजा दोन महिन्यांच्या मुलीला मांडीवर घेऊन बसली आहे. सांगते, 'पती ऑपरेशनच्या वेळीही आले नाही आणि त्यांनी पैसेही पाठवले नाही'
पूजा दोन महिन्यांच्या मुलीला मांडीवर घेऊन बसली आहे. सांगते, 'पती ऑपरेशनच्या वेळीही आले नाही आणि त्यांनी पैसेही पाठवले नाही'

पूजा सांगते, 'ऑपरेशनदरम्यान मी शुद्धीवर होते. मला वेदना होत होत्या. मम्मी-मम्मी ओरडत राहिले, पण ऐकायला कुणीच नव्हतं. आता टाके काढले आहेत, पण जखम अजूनही आहे.'

मी विचारले तुझा नवरा कुठे आहे?

नाराजीच्या स्वरात पूजा म्हणते, 'आम्ही हरियाणात मजूर म्हणून काम करतो. चार वर्षांचा मुलगा आहे. मला दोन महिन्यांपूर्वीच मुलगी झाली. तेव्हापासून ते मागे लागले होते की ऑपरेशन करून घे. मी येण्यापूर्वी ऑपरेशन केले पाहिजे.

सासूबाईही मागे लागल्या होत्या. रोज म्हणायच्या की मुलगा म्हणत असेल तर ऑपरेशन करून घे. सरकार पैसेही देईल. त्यांनी आशालाही सांगितले होते. नसबंदीसाठी ती रोज घरी येत होती.'

ती म्हणते, 'मी मरता-मरता वाचले, पण ना नवरा आला ना पैसे पाठवले. सासूनेही हात झटकले. आता मी एकटीच त्रास सहन करतेय.'

माझा पुढचा मुक्काम बुधवा-हरिपूर होता. अरुंद रस्त्यावरून चालत ती 30 वर्षांच्या दयामणीला भेटायला पोहोचले. 5 मुलांची आई दयामणीचा पती परप्रांतीय मजूर आहे.

दयामणि सांगते की मी आजपर्यंत कोणत्याही पुरुषाच्या नसबंदीविषयी ऐकले नाही. आमच्याकडे महिलाच नसबंदी करतात.
दयामणि सांगते की मी आजपर्यंत कोणत्याही पुरुषाच्या नसबंदीविषयी ऐकले नाही. आमच्याकडे महिलाच नसबंदी करतात.

ती म्हणते, 'मी माझ्या पतीला रोज सांगत होती की आता ऑपरेशन करणार नाही. तुम्ही आल्यावर करवून घेईन, पण प्रत्येक वेळी ते रागवायचे. म्हणायचे, मी बोलतोय तर शांतपणे ऐक आणि जाऊन नसबंदी करून घे. रोजच्या भांडणांनी मी कंटाळले होतो. म्हणूनच ऑपरेशन केले.'

तुम्ही तुमच्या पतीला नसबंदी करायला का नाही सांगितले?

मी त्यांना का सांगू...? पुरुष नसबंदी करून घेतात का?

मी त्यांना सांगते की होय, स्त्रियांप्रमाणे पुरुषांचीही नसबंदी केली जाते. यावर ती म्हणते, 'मला माहित नाही. आजपर्यंत मी एकाही पुरुषाची नसबंदी झाल्याचे ऐकले नाही. असे झाल्यास ते कमजोर होतील.

पुरुषांना भीती, नसबंदी केल्यास ते कमजोर होतील

प्रतिमा यांचे पती राजीव म्हणतात, 'आजपर्यंत आमच्या गावात एकाही पुरुषाची नसबंदी झालेली नाही. तुम्ही सांगत आहात म्हणून मला कळले. याआधी मला डॉक्टर किंवा आशा कोणीही सांगितले नाही. पुरुष नसबंदी करतात हे मला आधी कळले असते तर मी ते केले असते. बायकोलाही त्रास झाला नसता.'

राजीव म्हणतात मला माहिती असते की पुरुष नसबंदी करतात तर मीच केली असती. मला कुणी याबद्दल सांगितले नाही.
राजीव म्हणतात मला माहिती असते की पुरुष नसबंदी करतात तर मीच केली असती. मला कुणी याबद्दल सांगितले नाही.

दरम्यान, एक तरुण म्हणतो, 'ऐका मॅडम... पुरुष शेती करतो. जड काम करतो. अशा स्थितीत त्याला नसबंदी करायला वेळ कुठे असतो. त्याचे पुरुषत्व गेले तर? महिला फक्त घरीच राहतात, त्यामुळे त्यांची नसबंदी केली पाहिजे.'

मी कॅमेरा त्या तरुणाकडे केल्यावर तो निघून जातो

अलौली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सांगतात, 'पुरुषांना असे वाटते की जर त्यांनी नसबंदी केली तर ते कमजोर होतील, काम करू शकणार नाहीत, ते पुरुषच राहणार नाहीत. जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही वर्षभरात केवळ दोनच पुरुषांची नसबंदी करण्यात आली आहे.'

बिहारमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या सुधा वर्गीस म्हणतात, 'पुरुषांचे काम फक्त लग्न करणे, पत्नीला घरी आणणे आणि तिला गर्भवती करणे आहे. मुलांचे संगोपन, शिक्षण, घर, शेती या सर्व जबाबदाऱ्या स्त्रियांच्याच आहेत. जर पत्नीचे दुखत असेल, जखमी असेल, आजारी असेल किंवा तिचा जीवही जावो, नसबंदी तर तिलाच करायची आहे.'

जिल्ह्यात वर्षभरात केवळ 10 पुरुषांची नसबंदी

नसबंदीसाठी महिलांना 2000 रुपये, तर पुरुषांना 3000 रुपये मिळतात. असे असूनही पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) अहवालानुसार, खगरिया जिल्ह्यात एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान 6,328 महिलांनी नसबंदी केली, तर संपूर्ण जिल्ह्यात फक्त 10 पुरुषांची नसबंदी झाली.

जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो तर, NFHS-5 नुसार, 37.9% स्त्रिया जन्म नियंत्रणासाठी नसबंदी करतात. त्याच वेळी, पुरुषांची संख्या केवळ 0.3% आहे. मूल न होण्याची जबाबदारी केवळ महिलांवरच कशी लादली जात आहे, याची साक्ष ही आकडेवारी देते.

वेगवेगळ्या महिलांशी बोलत असताना मला समजले की, अनेक महिलांची त्यांच्या कुटुंबीयांकडून जबरदस्तीने नसबंदी केली जाते, पण त्या असहाय आहेत. इच्छा असूनही त्या तिच्या नवऱ्याला विरोध करू शकत नाही, कॅमेऱ्यावर काहीही बोलू शकत नाही. त्या म्हणते, 'मॅडम, बातमी करून तुम्ही निघून जाल, त्यानंतर आमचं काय होईल, आम्हाला आमच्या नवऱ्यासोबत राहावं लागेल, नाही का?'

बातम्या आणखी आहेत...