आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डदारू पिऊन लोक आंधळे होतात, पण दवाखान्यात जात नाही:मॅडम… ही कसली बंदी, मुलाला चमच्याने भरवावे लागतेय

दीप्ती मिश्राएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवर के तबीयत खराब भईल त लोग कहे लागल कि अस्पताल ले जइबु त केस हो जाई, पुलिस पकड़ ली। ओकरा डर से हम घरे पे गांव के डॉक्टर से इलाज करावे लगनी। हम ना जननी कि पुलिस से पहिले यमराज पकड़ लिहें।

(जेव्हा दीराची तब्येत बिघडली, तेव्हा लोक म्हणू लागले की, त्याला दवाखान्यात नेले तर केस होईल. त्यामुळे आम्ही घरी डॉक्टरांना बोलावले आणि उपचार केला. आम्हाला काय माहिती डॉक्टरांच्या आधी त्यांना यमराज पकडून नेतील.)

इतकं बोलून बिहारच्या छपरा जिल्ह्यात राहणाऱ्या बसंती देवी यांना अश्रू अनावर झाले. त्या सांगतात की, 'आता सगळं लुटले गेले. दारू पिऊन आधी दीराचा मृत्यू, नंतर नवरा वारला. मला दोन मुली आहेत, मी त्यांचे लग्न कसे करणार? कमावणारेच गेले.

बसंती देवी सांगतात, 'पिणारे जीव गमावून बसतात, आंधळे होतात आणि विक्रेते पैसे घेऊन पळून जातात. बंदीचा काय उपयोग?
बसंती देवी सांगतात, 'पिणारे जीव गमावून बसतात, आंधळे होतात आणि विक्रेते पैसे घेऊन पळून जातात. बंदीचा काय उपयोग?

बिहारमध्ये सध्या दारूमुळे खळबळ उडाली आहे. छपरा, सिवान, मुझफ्फरपूर, बेगुसरायसह अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 72 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक लोक आंधळे झाले आहेत. पोलिसांच्या भीतीने लोक दवाखान्यात जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. मेल्यावरही अंत्यसंस्कार गुपचूप करावे लागतात.

ब्लॅकबोर्ड मालिकेतील या लोकांना भेटण्यासाठी मी बिहारला पोहोचले.

माझा पहिला मुक्काम पाटण्यापासून 35 किमी अंतरावर असलेल्या वैशाली जिल्ह्यातील देशराजपुरा गावात होता. येथे 2 डिसेंबर रोजी कच्ची दारू प्यायल्याने डीपीएस शाळेच्या मुख्याध्यापकासह तिघांचा मृत्यू झाला होता. मुख्याध्यापकांचे कुटुंब केरळला परतले आहे.

दारूच्या व्यसनामुळे जीव गमावलेल्या राहुल पासवान यांच्या कुटुंबाची मी भेट घेतली. छोट्या झोपडीसारखं घर. त्याची आई दयावंती दारात उदास होऊन बसलेली आहे. वडील राम प्रवेश जवळच शेतात काम करत हेाते. त्यात कोबीची लागवड केलेली आहे.

मी विचारले काय झाले?

दयावंती रडायला लागते. तिला बोलता येत नव्हते. रडत रडत ती म्हणते, ‘हमरा के छोड़ के कहां गईलअ ए बबुआ। (बेटा, तू आम्हाला सोडून कुठे गेला आहेस)'

दयावंती सांगतात की, वृद्धत्वाचा आधार व्हावा यासाठी ज्याचे पालनपोषण केले तो क्षणार्धात निघून गेला.
दयावंती सांगतात की, वृद्धत्वाचा आधार व्हावा यासाठी ज्याचे पालनपोषण केले तो क्षणार्धात निघून गेला.

थोड्या वेळाने स्वतःवर नियंत्रण ठेवत ती म्हणते, 'चुलत बहिनीचे लग्न होते. रात्रभर काम केले पहाटे 5 वाजता घरी येऊन झोपला. दिवसा त्याच्या वडिलांनी हाक मारली की चल कोबी तोडायला शेतात जाऊ या. तो म्हणाला- माझी तब्येत ठीक नाही, उद्या काम करेन. त्यानंतर त्याला झोप लागली.

काही वेळाने उलट्या होऊ लागल्या. मला वाटले की, त्याने रात्री काहीतरी चुकीचे खाल्ले असावे, म्हणूनच हे असे होत आहे. उलटी साफ केल्यानंतर मी माझ्या कामाला लागले. थोड्या वेळाने त्याने हाक मारली की, अम्मा काही दिसत नाहीये.

त्यानंतर आम्ही घाबरलो. त्याचे वडील त्याला डॉक्टरांना भेटण्यासाठी हाजीपूरला घेऊन गेले, पण तेथून तो जिवंत परतला नाही. त्याचा मृतदेहच घरी आला.

यानंतर दयावंती पुन्हा रडू लागते. शेजारच्या काही महिला त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात.

राहुल गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनहर बाजार येथे चाऊमीन विकायचा. तो इतका कमावायचा की कुटुंबाला दोन वेळची भाकरी मिळायची. आता घराच्या एका कोपऱ्यात रिकाम्या सॉसच्या बाटल्यांचा ढीग आहे.

राहुलने दारू प्यायली होती का?

राम प्रवेश सांगतात की, 'तो नशेत होती की नाही, कुणास ठाऊक. मुलगा वडिलांसमोर दारू पितो का...? आमच्या मुलाने दारू कोठून आणली ते सांगा, नाहीतर तुरुंगात टाकू, अशी धमकी पोलिस देतात. आता तो गेला, तर दारू कुठे विकली जाते हे कसे सांगू?

राम प्रवेश अजूनही पोलिस केसला घाबरतात. पोलिस पुन्हा पुन्हा येत आहेत, आम्हाला कधी अडकवतील ते कळत नाही, असे ते म्हणतात.
राम प्रवेश अजूनही पोलिस केसला घाबरतात. पोलिस पुन्हा पुन्हा येत आहेत, आम्हाला कधी अडकवतील ते कळत नाही, असे ते म्हणतात.

वास्तविक गावातील लोक दबक्या आवाजात सांगतात की, 'हे बघा, राहुल मॅडम दारू प्यायल्याने मेला. त्या रात्री राहुलने पार्टीत दारू प्यायली होती, मात्र पोलिसांच्या भीतीने हे कोणी मान्य केले नाही. अन्यथा पोलिस कुटुंबालाही त्यात गोवतील आणि सरकारकडून कोणतीही भरपाई मिळणार नाही.

राम प्रवेशशी बोलून मी पुढच्या मुक्कामाला निघाले. दरम्यान, मला फोन आला की, पोलिस रामप्रवेश आणि त्यांच्या दोन मुलांना घेऊन गेले आहेत. राहुलच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

यानंतर मी छपरा जिल्ह्यातील मशरक पंचायतीच्या बेहरौली गावात पोहोचते. झोपडीसारखे घर, दारात 20 दिवसांची मुलगी घेऊन गुडीया बसलेलेली आहे. त्यांचे लग्न होऊन एक वर्षही झाले नाही. त्यापूर्वीच दारूने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तिच्या दीराचाही दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे.

गुडियाचे गेल्या वर्षी जानेवारीत लग्न झाले होते. यावेळी नवीन वर्षात ती तिच्या पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर जाणार होती.
गुडियाचे गेल्या वर्षी जानेवारीत लग्न झाले होते. यावेळी नवीन वर्षात ती तिच्या पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर जाणार होती.

गुडिया म्हणते, 'संध्याकाळी अचानक ते म्हणाले की डोकं दुखतंय, चक्कर येतेय, काहीच दिसत नाहीये. आम्ही त्यांना आधी मशरक, नंतर छपराकडे नेले, पण काही उपयोग झाला नाही. तेथून डॉक्टरांनी पाटण्याला रेफर केले, मात्र वाटेतच त्यांना जीव गमवावा लागला.

मोठ्या दीराला तीन लहान मुले आहेत. मला एक मुलगी आहे. कमवायला कोणीच उरले नाही. आता सर्वांचा भार आमच्यावर आहे. सरकार म्हणते की, जो पिईल तो मरेल. विक्री होते, म्हणूनच लोक पितात ना. मग काय विष मिसळून सगळ्यांना मारणार का?

यानंतर मी मुझफ्फरपूरला पोहोचते. येथे मी 19 वर्षांचा अद्वैत (नाव बदलले आहे) आणि त्याचे वडील सुबोध कुमार भेटतात.

सुबोध नाराजीच्या स्वरात सांगतात की, 'इथे दारू मिळते असे कोणी सरकारला सांगितले तर सरकार मान्य करणार नाही. सरकार म्हणते पूर्ण दारूबंदी आहे, मग ती पिऊन लोक मरतात कसे?
सुबोध नाराजीच्या स्वरात सांगतात की, 'इथे दारू मिळते असे कोणी सरकारला सांगितले तर सरकार मान्य करणार नाही. सरकार म्हणते पूर्ण दारूबंदी आहे, मग ती पिऊन लोक मरतात कसे?

सुबोध सांगतात की, 'साधारण जुलै महिन्यातील घटना आहे. अद्वैत एका लग्नाला गेला होता. तेथे काही लोकांनी त्याला दारू पाजली. घरी परतल्यावर त्याला उलट्या होऊ लागल्या. मग म्हणाला, काही दिसत नाही. आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. उपचार केले, पण उपयोग झाला नाही.

त्याच्यावर कोलकाता येथे उपचार केले असता त्यांची दृष्टी गेली असल्याचे आढळून आले. आता तो बरा होऊ शकत नाही. तरीही आम्ही हार मानलेली नाही, आता चेन्नईत उपचार घेत आहेत. दृष्टी परत येईल की, नाही हे तीन वर्षांनी कळेल असे डॉक्टर सांगतात.

माझा तरुण मुलगा एका रात्रीत आंधळा झाला. कार-बाईक चालवणाऱ्याला बोट धरूनच चालवावे लागत आहे. आंघोळ करू शकत नाही आणि कपडेही घालू शकत नाही. चमच्याने भरवावे लागते. त्याचे शिक्षण सुटले. आमचा व्यवसाय कोलमडायला आला आहे. सरकारला, दारूला की स्वतःला दोष द्यायचा हे समजत नाही.

मी अद्वैतशी बोलायचा प्रयत्न केला तर तो हसून टाळतो. तेव्हा तो म्हणतो, 'मॅडम, मी बारावीत आहे. शिकून नोकरी करायची होती, पण आता डीएम व्हायचे आहे.

का?

जेणेकरुन मी दारू बंदी कायदा रद्द शकेन.

मी म्हणते ते तर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येते.

यावर अद्वैत हसला.

अद्वैतला अजूनही विश्वास बसत नाही की तो आता पाहू शकणार नाही. त्याच्या वडिलांनी त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
अद्वैतला अजूनही विश्वास बसत नाही की तो आता पाहू शकणार नाही. त्याच्या वडिलांनी त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

मी थोडे पुढे जाते. मी मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय प्रमोदला भेटले. प्रमोद हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. दोन वर्षांपूर्वी आईचे कर्करोगाने निधन झाले. दु:खात वडील दारू पिऊ लागले.

प्रमोद सांगतो की, 'या वर्षी साधारण सप्टेंबर महिन्यातील घटना आहे. पप्पा घरी दारू प्यायचे. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. 20 दिवस व्हेंटिलेटरवर राहिले. जीव वाचला, पण जीवन मृत्यूपेक्षा भयंकर झाले. त्याची दृष्टी गेली.

पप्पा दुकान चालवायचे. त्याच्या उपचारासाठी दुकान विकावे लागले. पैशांची कमतरता असल्याने आम्ही आमची मोटरसायकलही विकली. अडीच लाख रुपये खर्च झाले, पण आशा नाही.

आधी महिन्यात 10-12 हजार रुपये कमावायचाे, पण आता मी बाहेर कमावायला जाऊ शकत नाही. दिवसभर वडिलांची लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते.

याच गावातील एका व्यक्तीने सांगितले की, मॅडम दारूमुळे परिसरातील शेकडो लोकांचे डोळे गेले आहेत, मात्र पोलिसांच्या धाकाने ते गप्प आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे ते बाहेर उपचार घेतात, जो गरीब आहेत त्यांना घरीच बसावे लागते.

प्रमोद सांगतात की, पप्पांना दारू पिण्याची सवय आहे. बिहारमध्ये मिळत नसेल तर ते बाहेर जाऊन प्यायचे.
प्रमोद सांगतात की, पप्पांना दारू पिण्याची सवय आहे. बिहारमध्ये मिळत नसेल तर ते बाहेर जाऊन प्यायचे.

मी विचारतो, दारूबंदी करूनही दारू कशी मिळते?

मशरक पंचायतीचे प्रमुख अनिल सिंह म्हणतात की, “तस्कर शेजारील राज्यातून बिहारमध्ये दारू आणतात आणि नंतर अनेक पटींनी जास्त किमतीत येथे विकतात. ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे किंवा त्यांनी दृष्टी गमावली आहे, ते दलित आणि मजूर कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते महागड्या दारूऐवजी कच्ची दारू पितात.

रामप्रवेश म्हणतात की, मिळते, म्हणूनच पीतात. नाराजी व्यक्त करताना सुबोध कुमार म्हणतात की, सरकारला सर्व माहीत आहे, कुठे भट्ट्या चालतात, दारू कुठे मिळते. पोलिस दारू माफियांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देतात. तर दारू पिणाऱ्यांना तुरुंगात टाकतात.

कच्ची दारू कुठे बनते?

मुखिया अनिल सिंह म्हणतात, 'जुन्या खंडर मध्ये, जंगल आणि नदीत तरंगणाऱ्या बोटींवर भट्ट्या चालतात. त्यावर उसाचा रस, महुआची फुले, तांदूळ, बटाटे, जव आणि मका उकळवून कच्ची दारू तयार केली जाते. अधिक मादक बनविण्यासाठी, मादक गोळ्या देखील त्यात टाकल्या जातात.

आम्ही आणि तुम्ही शोधले तर दारूच्या भट्ट्या सापडणार नाहीत, पण कच्ची दारू कुठे मिळते हे पिणाऱ्यांना बरोबर कळते.

पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मृत्यूचे प्रमाण वाढले - माजी डीजीपी

बिहारचे माजी डीजीपी अभयानंद म्हणतात की, “लोकांना दारूबंदी कायद्याची भीती वाटते. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने लोक लवकर रुग्णालयात जात नाहीत. पोलिसांनी पुढे येऊन कारवाई करून उपचार केले असते तर इतके मृत्यू झाले नसते. दारू माफियांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास दारू पिणाऱ्यांपासूनच सुरू होतो. नाव सांगितले नाही तर पोलिस मारहाण करतात आणि सांगितले की, दारू माफियां मारतात.

बिहार सरकारच्या दारूबंदी विभागातील अबकारी परीक्षक राज पांडे यांच्या मते, बिहार सरकारने या वर्षी मार्चमध्ये दारूबंदी कायद्यात सुधारणा केली. प्रथमच दारू पिताना पकडल्यास 2000 ते 5000 रुपये दंड भरावा लागेल. दुसऱ्यांदा दारू पिताना पकडले तर त्याची रवानगी तुरुंगात होईल. याआधी त्यांना पहिल्याच प्रकरणात तुरुंगात टाकण्यात येत होते.

डॉक्टर म्हणाले - कच्च्या दारूमुळे हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो

सारण जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सागर दुलाल सिन्हा सांगतात की, 'कच्च्या दारूमध्ये विष असते. त्याचा प्रभाव प्रथम यकृत आणि मेंदूवर होतो. पचनसंस्था बिघडते.

साखरेची पातळी झपाट्याने वाढते. ऑक्सिजनची कमी होऊ लागते. फॉर्मल्डिहाइड फॉर्मिक अ‍ॅसिड तयार करण्यास सुरवात करते. त्यामुळे दृष्टी जाते. दुसरे म्हणजे, रक्त देखील घट्ट होते, किडनी काम करणे थांबवते. अशा स्थितीत रुग्णाला वाचवणे अवघड असते.

बिहारमध्ये 2016 मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यात दुर्बल घटकातील लोकांची संख्या मोठी आहे. गेल्या महिन्यातच तीन लाख लिटरहून अधिक दारू जप्त करण्यात आली होती. दारूबंदी होऊनही ना दारू बंद झाली ना दारू पिणाऱ्यांची संख्या कमी झाली. आकडेवारी याची साक्षी आहे. पोलिसांच्या भीतीने लोक महागडी दारू पिऊ शकत नाहीत आणि कच्ची दारू पिऊन रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. ही स्वस्त दारू त्यांच्यासाठी महाग ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...