आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
\मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना विचारले की, तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत व्यक्तीला ओळखता का? तेव्हा त्यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, एक व्यक्ती आहे, कारण त्याने कोणाला तरी मदत करण्यासाठी श्रीमंत होण्याची वाट पाहिली. तो कोण आहे, हे जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत -
बिल गेट्स म्हणाले, होय, माझ्यापेक्षाही जास्त श्रीमंत असलेल्या एका व्यक्तीला मी ओळखतो. मीही तेव्हा इतका श्रीमंत व लोकप्रिय नव्हतो; त्या काळात माझी व त्याची भेट झाली होती. मी न्यूयॉर्कच्या विमानतळावर होतो. एका वृत्तपत्र विक्रेत्याला पाहिले. मला एक वृत्तपत्र विकत घ्यायचे होतेे, परंतु माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. तेव्हा वृत्तपत्र विकत घेण्याचा विचार मनातून काढून टाकला. मी दुकानातून परत जाऊ लागलो. मी त्याला म्हटले, ‘माझ्याकडे सुटे पैसे नाहीत.’ यावर तो वृत्तपत्र विक्रेता म्हणाला, ‘मी तुम्हाला हे वृत्तपत्र मोफत देतोय.’ त्याच्या विनंतीवरून मी ते वृत्तपत्र घेतले. योगायोगाने दोन ते तीन महिन्यांनी त्याच विमानतळावर उतरलो. तेव्हाही माझ्याकडे वृत्तपत्र घेण्यासाठी सुटे पैसे नव्हते. त्या विक्रेत्याने पुन्हा वृत्तपत्र मोफत देण्याची तयारी दाखवली. तेव्हा मात्र मी नकार दिला. यावर तो म्हणाला, ‘तुम्ही हे वृत्तपत्र घ्या. मी तुम्हाला माझ्या नफ्यातून हे वृत्तपत्र देतोय. मला काहीच तोटा होणार नाही.’
या गोष्टीला १९ वर्षे उलटून गेली. त्या दरम्यान मी एक यशस्वी उद्योजक झालो होतो. एकेदिवशी अचानक मला त्याची आठवण झाली. मी त्याला शोधू लागलो. सुमारे दीड महिन्याच्या प्रयत्नांनी मी त्याला शोधून काढले. “तू मला ओळखतोस का?’ अशी विचारणा केली. तो म्हणाला, ‘तुम्ही बिल गेट्स आहात.” मी त्याला पुन्हा विचारले, ‘मी तुझ्याकडून कधीकाळी मोफत वृत्तपत्र घेतले होते.’ त्याने उत्तर दिले, “होय, माझ्या स्मरणात आहे. असे दोन वेळा घडले होते.” यावर मी त्याला म्हटले, “त्या दिवशी तू केलेल्या मदतीची परतफेड करायची आहे. मला सांग, तुला आयुष्यात काय पाहिजे? मी तुझी इच्छा पूर्ण करीन.’ यावर तो म्हणाला, ‘सर, असे करून तुम्ही माझ्या मदतीची बरोबरी करत आहात, असे तुम्हाला वाटत नाही का?’ मी विचारले, ‘का?’ तेव्हा तो म्हणाला, ‘मी तुम्हाला मदत केली होती तेव्हा मी एक गरीब वृत्तपत्र विक्रेता होतो आणि आता तुम्ही मला अशा वेळी मदत करणार आहात, जेव्हा आज तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती आहात. त्या मदतीची आजच्या मदतीशी तुलना कशी होऊ शकते?’ त्या दिवशी मला जाणीव झाली की, हा वृत्तपत्र विक्रेता माझ्यापेक्षाही श्रीमंत व्यक्ती आहे. कारण त्याने कोणाला मदत करण्यासाठी श्रीमंत होण्याची प्रतीक्षा केली नव्हती. त्याच्याकडे खूप पैशाऐवजी खूप विशाल हृदय आहे. दुसऱ्याला मदत करण्यासाठी खूप विशाल हृदय असावे लागते, ही प्रत्यक्षात खूप मोठी गोष्ट आहे.
कोणाशीही स्वत:ची तुलना करू नका. जर तसे करत असाल तर तुम्ही स्वत:ला कमी लेखत आहात, स्वत:चा अपमान करून घेत आहात.’- बिल गेट्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.