आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • BJP Offers For Sachin Pilot, BJP Sachin Pilot, Congress, When BJP Proposed Lt Governor Of Jammu Kashmir Post For Sachin Pilot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपने तीनदा दिला प्रस्ताव:ज्योतिरादित्य बंडखोर झाले तेव्हाच भाजपने पायलट यांना दिली होती काश्मीरच्या राज्यपाल पदाची ऑफर! पण त्यावेळी पायलट यांनी दिला होता नकार

10 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • पायलट काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावई असल्याने भाजपला वाटले होते ऑफर स्वीकारतील

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट भाजपच्या संपर्कात असल्याने सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. परंतु, सचिन पायलट आणि भाजपमध्ये संपर्क झाल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जेव्हा मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपची वाट धरली, त्यावेळी पायलट यांच्याशी भाजपने संपर्क साधला होता. पायलट यांचा बंड ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीच्या कथानकाशीच जोडून पाहिला जात आहे. प्रत्यक्षात भाजपने पायलट यांना आपल्याकडे घेण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केला. परंतु, अद्याप यश मिळालेले नाही.
मार्चमध्ये भाजपात सामिल झाले होते शिंदे
11 मार्च रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या 22 आमदारांनी पक्ष सोडला. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला. यानंतर मध्य प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता आली. तसेच भाजपने शिंदे यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेत पाठवले.

1. भाजपने पायलट यांना दिली होती काश्मीरच्या राज्यपाल पदाची ऑफर
ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट काँग्रेसचे यूथ आयकॉन होते. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हाच भाजपने पायलट यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला होता. भास्करच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने पायलट यांना जम्मू आणि काश्मीरचे उप-राज्यपाल करणार असल्याचे सांगितले होते. पायलट काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचे जावई आहेत. त्यामुळे, काश्मीरची परिस्थिती ते हाताळू शकतील असे भाजपला वाटले होते. परंतु, पायलट यांनी राजस्थान सोडण्यास नकार दिला होता.

2. दुसऱ्या प्रयत्नात दिला होता राज्यसभा सदस्यत्वाचा प्रस्ताव
पायलट यांनी काश्मीरची ऑफर नकारल्यानंतर भाजपने त्यांना सोडले नव्हते. यानंतरही आणखी एकदा भाजपने पायलट यांच्याशी संपर्क साधला आणि राज्यसभा निवडणुकीत आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आकड्यांचे गणित जुळले नाही आणि ते पायलट यांना राज्यसभा सदस्य करू शकत नव्हते.

3. तिसऱ्या प्रयत्नात भाजपने जफर इस्लाम कनेक्शन वापरले
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपले जुने मित्र सचिन पायलट यांनी दिल्लीत भेट घेतली. यानंतर भाजप प्रवक्ते जफर इस्लाम यांनी पायलट यांच्याशी संवाद साधला. जफर इस्लाम पायलट यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना देत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, ज्योतिरादित्य यांना भाजपमध्ये घेत असताना जफर इस्लाम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

बातम्या आणखी आहेत...