आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • BJP Specializes In Seizing Power Even After Defeat In Elections, Special Team For That; Successful In 60% Of States

6 वर्षात 7 राज्यांत ‘ऑपरेशन लोटस’:पराभवानंतरही सत्ता बळकावण्यात भाजप माहिर; नेमतात स्पेशल टीम, 60% राज्यांमध्ये झाले यशस्वी

आदित्य द्विवेदी/नीरज सिंह3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे बलाढ्य नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पूर्ण नियोजन करून बंडखोरी केली आहे. मंगळवारी सुरतमध्ये मुक्कामी असलेले बंडखोर आमदार मंगळवारी सकाळी गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. 25 बंडखोर आमदारांपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आता 40 आमदारांपर्यंत पोहोचली आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'ऑपरेशन लोटस' ही भाजपच्या रणनीतीसाठी दिलेली एक संज्ञा आहे, ज्यामध्ये पक्ष परभव झाल्यानंतरही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 6 वर्षात भाजपने 7 राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवले. यामध्ये भाजपला 4 वेळा यश मिळाले आहे, तर 3 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. जाणून घ्या 7 राज्यांच्या 'ऑपरेशन लोटस'ची संपूर्ण कहाणी दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये...

1. मध्य प्रदेशात भाजपची सत्तापालट मोहीम यशस्वी

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

असंतुष्ट काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भाजपच्या बाजूने वळवणे आणि कमलनाथ यांचे सरकार पाडणे. त्यासाठी भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.

काय झालं

2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. बसपा आणि अपक्षांच्या जोरावर काँग्रेसने सरकार स्थापन केले. एकीकडे सरकारकडे भक्कम संख्याबळ नव्हते, तर दुसरीकडे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे पक्षाने दुर्लक्ष केल्यामुळे नाराज होते.

'ऑपरेशन लोटस'साठी ही सर्वात अनुकूल परिस्थिती होती. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी सिंधियाशी संपर्क साधला आणि 9 मार्च 2020 रोजी सिंधिया यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंड केले. या आमदारांना चार्टर विमानाने बंगळुरूला नेण्यात आले.

सर्व प्रयत्नांनंतरही सिंधिया राजी झाले नाहीत आणि कमलनाथ सरकार अल्पमतात आले. 20 मार्च 2020 रोजी, केवळ 15 महिने मुख्यमंत्री राहिल्यानंतर, कमलनाथ यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसचे सरकार पडले. शिवराज सिंह चौहान राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

आता या कथेचे सर्वात शक्तिशाली चित्र पहा…

राजीनामा देण्यापूर्वी कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेचे छायाचित्र. पत्रकारांशी बोलताना कमलनाथ म्हणाले की, कर्नाटकात आमच्या 22 आमदारांना आमिष दाखवून ओलीस ठेवण्यात आले. याचे संपूर्ण राज्य साक्षीदार आहे. राज्यातील जनतेची फसवणूक करणाऱ्या या लोभी लोकांना जनता कधीच माफ करणार नाही.
राजीनामा देण्यापूर्वी कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेचे छायाचित्र. पत्रकारांशी बोलताना कमलनाथ म्हणाले की, कर्नाटकात आमच्या 22 आमदारांना आमिष दाखवून ओलीस ठेवण्यात आले. याचे संपूर्ण राज्य साक्षीदार आहे. राज्यातील जनतेची फसवणूक करणाऱ्या या लोभी लोकांना जनता कधीच माफ करणार नाही.

2. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचा सिंहासन डळमळीत करण्याचा प्रयत्न फसला

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

राजस्थानचे मुख्यमंत्री न झाल्याने संतप्त सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक असलेल्या काँग्रेस आमदारांना भाजपच्या बाजूने वळवणे आणि अशोक गेहलोत यांचे सरकार पाडणे. यासाठी राजस्थान भाजपच्या राज्य युनिटवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

काय झालं

राजस्थानमध्ये 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने 100 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला होता. सीएम अशोक गेहलोत यांनी बसपा आणि अपक्षांना काँग्रेसच्या बाजूने वळवून आपली खुर्ची मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विधानसभेत काँग्रेसचा चेहरा असलेले सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

अशा परिस्थितीत भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'साठी सचिन पायलट हा सर्वात अनुकूल चेहरा होता. राजस्थान भाजपच्या नेत्यांनी त्यांची नाराजी ओळखून त्यांच्याशी संपर्क साधला. 11 जुलै 2020 सचिन पायलट यांनी गेहलोत विरोधात आघाडी उघडली आणि 18 काँग्रेस आमदारांसह गुरुग्राममधील हॉटेल गाठले.

गेहलोतही आपली खुर्ची वाचवण्यासाठी सक्रिय झाले. सर्वप्रथम त्यांनी ज्या आमदारांना मोठे केले त्यांना हॉटेलमध्ये ठेवले. यानंतर 10 ऑगस्ट 2020 रोजी प्रियांका गांधी वाड्रा यांनी सचिन पायलट यांच्याशी बोलून त्यांना सहयोगाची खात्री दिली. येथे गेहलोत यांचा विजय झाला. काँग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपचा डाव फसला.

आता या कथेचे सर्वात शक्तिशाली चित्र पहा…

सचिन पायलटच्या बंडानंतर अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या उर्वरित आमदारांना जयपूरच्या हॉटेल फेअरमाऊंटमध्ये पाठवले, जेणेकरून त्यांना फोडण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये. दुसरीकडे सचिन पायलट यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरूच होते.
सचिन पायलटच्या बंडानंतर अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या उर्वरित आमदारांना जयपूरच्या हॉटेल फेअरमाऊंटमध्ये पाठवले, जेणेकरून त्यांना फोडण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये. दुसरीकडे सचिन पायलट यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरूच होते.

3. कर्नाटकात कुमारस्वामी यांना सत्तेवरून हटवण्याची योजना

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार आपल्या बाजूने करून विधानसभेतील बहुमताचा आकडा कमी करणे आणि भाजपचे सरकार बनवने. भाजपने या संपूर्ण रणनीतीची कमान बीएस येडियुरप्पा यांच्याकडे सोपवली.

काय झालं

2017 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण ते फ्लोअर टेस्ट पास करु शकले नाहीत. सरकार पडले.

यानंतर काँग्रेसचे 80 आणि जेडीएसच्या 37 आमदारांनी मिळून सरकार स्थापन केले. राजकीय पेच संपल्यानंतर दोनच वर्षात जुलै 2019 मध्ये काँग्रेसच्या 12 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी बंडखोरी केली.

काँग्रेस-जेडीएस सरकारला 101 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपने 105 जागा राखल्या होत्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि तेथून फ्लोअर टेस्टचे आदेश देण्यात आले. सरकार फ्लोअर टेस्टमध्ये अपयशी ठरले आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला.

आता या कथेचे सर्वात शक्तिशाली चित्र पहा…

कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर, 26 जुलै 2019 रोजी बीएस येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर, 26 जुलै 2019 रोजी बीएस येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

4. अजित पवारांना फोडण्याचा डाव महाराष्ट्रात अयशस्वी

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

अजित पवारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शिवसेनेचा डाव उधळला. त्याबदल्यात भाजप अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप मागे घेईल.

काय झालं

24 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत फूट पडली.

यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याची घोषणा केली, मात्र त्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना अजित यांच्यासोबत जाण्यापासून रोखले. यानंतर सुप्रीम कोर्टाने फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. फडणवीस यांना बहुमत मिळणार नाही, असे वाटताच त्यांनी 72 तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सरकार स्थापन करण्याची भाजपची रणनीती होती. पण ती अयशस्वी ठरली.

5. गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजपचे सरकार

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

कमी जागा असूनही सर्वात आधी सरकार स्थापनेचा दावा केला

काय झालं

फेब्रुवारी 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही, परंतु काँग्रेस 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. सत्तेच्या चाव्या लहान पक्ष आणि अपक्षांच्या हातात होत्या.

मनोहर पर्रीकर यांनी 21 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. गोव्यातील काँग्रेसचे बहुमत भाजपने हिसकावून घेतले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसने असा युक्तिवाद केला की सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना सरकार स्थापनेसाठी आधी बोलावले पाहिजे होते.

6. अरुणाचल प्रदेशात संपूर्ण काँग्रेस पक्षाचे बंड

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

काँग्रेसचे दोन तृतियांश आमदार फोडून नवे सरकार स्थापन करणे

काय झालं

2014 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने अरुणाचल प्रदेशात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, काँग्रेस नेत्यांमधील वाद कायम समोर येत होता.

अखेर, 16 सप्टेंबर 2016 रोजी, काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि 42 आमदारांनी पक्ष सोडला आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. पीपीएने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले.

7. उत्तराखंडमध्ये सर्वोच्च न्यायालयामुळे भाजपची रणनीती फसली

'ऑपरेशन लोटस'ची रणनीती

मुख्यमंत्रिपदावरून हटवलेले काँग्रेस नेते विजय बहुगुणा यांच्या नाराजीचे भांडवल करून काँग्रेसला फोडून विधानसभेत बहुमत मिळवायचे होते.

काय झालं

2012 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये त्रिशंकू विधानसभा झाली होती. 32 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपला 31 जागा मिळाल्या. अशा स्थितीत भाजपला हा पराभव पचवता आला नाही, पण 2014 मध्ये केदारनाथ दुर्घटनेनंतर काँग्रेसने विजय बहुगुणा यांची जागा घेत हरीश रावत यांना मुख्यमंत्री बनवताच भाजपला येथे आशा दिसू लागल्या.

बहुगुणा यांच्या नाराजीचा फायदा भाजपने घेतला. 18 मार्च 2016 रोजी बहुगुणा यांच्यासह 9 काँग्रेस आमदारांनी बंड केले. मात्र, उत्तराखंडच्या सभापतींनी काँग्रेसच्या नऊ बंडखोरांना अपात्र ठरवल्यानंतर केंद्र सरकारने त्याच दिवशी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंडखोर आमदारांना बाहेर ठेवून फ्लोअर टेस्ट घेण्यात आली. रावत यांनी 11 मे 2016 रोजी बहुमत चाचणी जिंकली. सर्वोच्च न्यायालयामुळे आमदार फोडण्याचा भाजपचा डाव इथेही चालला नाही.

आता सर्वात मोठा प्रश्न : यावेळी महाराष्ट्रात काय होणार?

'ऑपरेशन लोटस' अंतर्गत भाजप दोन प्रकारची रणनीती अवलंबत असल्याचे गेल्या सात राज्यांच्या अभ्यासातून दिसून येते. प्रथम- विरोधी पक्षातील नाराज गटाला आपल्या बाजूने घेऊन सरकार बनवा. दुसरे- छोटे पक्ष आणि अपक्षांना पक्षात घेऊन सरकार स्थापन करा. पहिली रणनीती महाराष्ट्रात दिसत आहे. 40 हून अधिक आमदारांच्या बंडाचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील उद्धव सरकार अडचणीत आले आहे.

बातम्या आणखी आहेत...