आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर मुलाखत:लस कशी मिळेल हे केंद्र ठरवेल; आता बिहारपुरताच मुद्दा होता, त्याचा निर्णय आम्ही घेतला - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लव्ह जिहादवर कायदा करण्याबाबत नड्डा म्हणाले...

बिहार निवडणुकांत भाजपच्या प्रमुख नेत्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत सर्वाधिक सक्रिय असलेले नेेते म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे नाव येते. राज्यात निवडणूक प्रचारापासून प्रत्यक्ष मैदानावर एनडीए आघाडीत एकजूट ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती दिसून येते. बिहारमध्ये मोफत कोरोना लसीसारख्या आश्वासनावरून ते पक्षातील दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर संशय यासारख्या मुद्द्यांवर बिहार एडिटर सतीश कुमार सिंह यांनी त्यांच्याशी खास चर्चा केली. त्यातील संपादित अंश...

बिहारमध्ये मोफत लसीबाबत...

> कोरोनाची मोफत लस फक्त निवडणुका होणाऱ्या राज्यांनाच देण्यात येईल काय?

याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. परंतु, यात गैर तरी काय, हेच मला समजत नाही. जाहीरनाम्यात आम्ही पुढील ५ वर्षांत काय करणार आहोत, हे दिलेले असते. आम्ही तेच सांगितले. यात दोन प्रकारे पुढाकार घेतला जातो. एक केंद्र विकत घेऊन सर्वांना देईल. दुसरे राज्यांनी पुढाकार घ्यावा. आमच्या बिहारच्या टीमने येथे सरकार स्थापन झाल्यास मोफत लस देण्याचे ठरवले. आमचे आरोग्यमंत्री तसे सांगत असतील तर त्यात चुकीचे तरी काय आहे?

> परंतु, याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली होती, त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात ना?

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बिहारचाच जाहीरनामा जाहीर केला होता. मात्र, तो कोणाच्या लक्षात न आल्याने हा चर्चेचा मुद्दा ठरला. आम्ही तर जीवरक्षक लस मोफत देतच आहोत.

> मग काय संपूर्ण देशभरात मोफत लस देणार?

ते भारत सरकारलाच ठरवायचे आहे. वेळेवर ते ठरवतीलही. आता बिहारची गोष्ट आहे तर बिहारमध्ये आमच्या टीमने राज्यात मोफत लस देण्याचा निर्णय घेतला.

लोजपाच्या एकतर्फी प्रेमातून...

> चिराग तर आजही पंतप्रधान मोदींचे हनुमान आहेत, यामुळे चुकीचा संदेश तर जात नाही?

प्रसिद्धीमाध्यमांत या सर्व बातम्या केवळ अर्धाच दिवस चालल्या. आता भाजपकडून वक्तव्य आले की, आम्ही एक आहोत. कोणाच्या प्रशंसा करण्याने अथवा कोणी काही बोलल्याने भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. तेव्हाच ते स्पष्टही झाले. खरे तर आमची केडरबेस्ड पार्टी आहे. आमच्याकडे अशा अडचणी येत नाहीत. भाजपसाठी जदयू आणि जदयूसाठी भाजप जाेमाने प्रचार करत आहेत.

> मग हे एकतर्फी प्रेमासारखे आहे काय?

आमच्या पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. लोक जनशक्ती पार्टीमुळे (लोजपा) आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. आमचा पक्ष एक जबाबदार पक्ष आहोत. आमचा स्वभावही तसा नाही.

भाजपच्या दुसऱ्या फळीबाबत...

> पक्षाची दुसरी फळी दिसून येत नाही?

आमच्याकडे काँग्रेस पक्षासारखी पद्धत नाही. तेथे सोनिया आणि राहुल गांधी यांच्यानंतर कोण आहे? आमच्याकडे संसदीय बोर्डापासून कनिष्ठ स्तरापर्यंत नेत्यांची साखळी आहे. राष्ट्रीय टीमची आताचा स्थापना झाली. त्यात ७०% नवे नेते आहेत. दहा वर्षांपूर्वी मी आणि भूपेंद्र यादव राष्ट्रीय टीममध्ये आलो हाेतो. आता ते ज्येष्ठ सरचिटणीस आहेत आिण मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे.

> पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या जागा रिक्त झाल्या, त्यातील एकही भरली नाही.

या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. बोर्डाची स्थापना आता झाली आहे. मी कार्यकारी अध्यक्ष झालो. पुढे निवडणुका होत्या. कोरोना आहे. निवडणुकीनंतर बोर्डाची घोषणा लवकरच केली जाईल.

जंगलराजबाबत

भाजपचा सर्वात मोठा मुद्दा आहे? त्यातून भीती दाखवली जात आहे? याचा परिणाम तरुणांवर होईल?

> युवकांनी जे पाहिले नाही ते त्यांच्या वडिलांनी तर बघितले आहे. तेच त्यांना हे समजावून सांगत आहोत. जे दहा लाख नोकऱ्या देण्याचा वायदा करत आहेत, त्यांनीच २५ लाखांपेक्षा अधिक लोकांना पलायनास भाग पाडले आहे.

तीन निवडणुकांपासून भाजप जंगलराज हाच मुद्दा बनवत आहे?

> हो. कारण त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. नितीशकुमारांनी राजदची साथ का सोडली? जंगलराज आणि बरेच गैरव्यवहार सुरू होते म्हणूनच. राजदने मार्क्सवादी (लेनिनवादी- माले) पक्षाशी हातमिळवणी केली. माले काय आहे? विध्वंसवादी शक्ती. या आघाडीमुळे तर फक्त जंगलराजच येईल.

भाजपने आपल्या वक्तव्यांमध्ये मालेला गरजेपेक्षा अधिक स्थान दिले?

> समाजातील छुप्या लोकांचे सत्य समोर आणणे हेच आमचे मुख्य काम आहे. त्यांच्या विचारांतून व्यक्त होणारा विध्वंस लोकांना सांगणे, ही आमची जबाबदारी आहे.

लव्ह जिहादबाबत

​​​​​​​

लव्ह जिहादवर भाजपशासित राज्ये कायदा बनवत आहेत, केंद्र शासनही असा कायदा करण्याच्या विचारात आहे काय?

> या प्रकरणाबाबत सध्या देशातील कायद्यांच्या तरतुदी पुरेशा आहेत. काही राज्यांना तिथल्या सरकारचे समर्थन होते. त्यांनी आपला मुद्दा मांडला. तरतुदी केल्या. आम्हाला काही बोलायचे असेल तर आम्ही त्यांना सांगू. परंतु केंद्रात असा कायदा करण्याचा कोणताही विचार नाही.

पुलवामाबाबत पाकिस्तानच्या कबुलीचा बिहार निवडणुकीत तुम्हाला फायदा होईल?

> याकडेे आम्ही निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. काँग्रेस मोदींचा विरोध करता करता देशाला विरोध करत आहे, हे आधीपासूनच सत्य होते. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांच्या बोलण्याने ही गोष्ट बदलली नाही. काँग्रेस देशाचा विचार करत नाही, हे पुलवामामुळे सिद्ध झाले आहे.

शेतीविषयक कायद्यांबाबत बराच गोंधळ झाला. त्यात पारदर्शकता नव्हती, असे तुम्हाला वाटते का?

> तसे नाही. कोरोनाचा काळ सुरू होता. संसदेत काय घडतेय हे सगळ्यांना माहीत आहे. अध्यादेश आणावा लागला. मोदीजींना सुधारणांच्या माध्यमातून देशाला पुढे न्यायचे आहे.

आघाडीबाबत

भाजप-जदयूमध्ये बऱ्याच ठिकाणी परस्पर समन्वयाचा अभाव आहे काय ?

> सासाराम, बिहटा, बेतिया, पूर्णिया, सिवान इथे आम्ही बैठका घेतल्या. एखाद-दुसऱ्या ठिकाणी सोडून या सर्व ठिकाणी समन्वय चांगला आहे. आम्ही एनडीएच्या रूपात लढावे, अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आमच्याकडे फक्त समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. आघाडीअंतर्गत आघाडीच्या राजकारणाने नुकसान होणार नाही काय ?

> जागावाटपाच्या सोयीसाठी असे झाले आहे. नितीश आम्हाला आणि भाजप ''व्हीआयपी’ला अॅडजस्ट करेल, असे ठरले आहे. पण आम्ही सर्वांसोबत युती धर्म पाळत आहोत.

अँटी इन्कम्बन्सीबाबत

​​​​​​​

अँटी इन्कम्बन्सीमुळे भाजपचे नुकसान होणार नाही?

> हा एक गोंधळ निर्माण केला गेला आहे. खरं तर, नितीशजींंच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना त्यांच्याशीच केली जात आहे. आता आपण २०१० च्या लोकप्रियतेशी २०२० ची तुलना करत आहात. हे चुकीचे आहे. त्यांच्या लोकप्रियतेची तुलना २०१०शी करायला हवी. जेव्हा महागठबंधन झाले तेव्हा एक मोठा गट त्यांचा समर्थक हाेता आणि जेव्हा त्यांनी आघाडी सोडली, तेव्हा तितकाच मोठा गट त्यांच्यापासून दूर गेला. राजदचे चरित्र बदलले नाही. त्यामुळे नितीश त्यांच्यापासून वेगळे झाले. नितीश यांचा मूळ आधार भाजप-जदयू होता आणि यात तर वाढ झाली.

आमची-जदयूची साथ फक्त तीन वर्षांची, असे मोदीजींना का म्हणावे लागले ?

> तेव्हा मी केंद्रीय आरोग्यमंत्री होतो. मंगल पांडे येथे आरोग्यमंत्री झाले. आम्ही येथे एक एम्स आणि ११ मेडिकल कॉलेज दिले. आता पूर्णिया, सिवान, छपरा, सीतामढी सर्वच ठिकाणी मेडिकल कॉलेज आहेत. आम्ही दरभंगा-पूर्णियामध्ये विमानतळ, मुझफ्फरपूर-सीतामढी-दरभंगामध्ये रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, ब्रिज, ओव्हरब्रिज केले, आता एकही टपरी दिसत नाही, इतका विकास झाला आहे.

भाजपने रोजगाराचा मुद्दा समजण्यात चूक केली ?

> तेजस्वी काय करणार आहे, हे बिहारमधील तरुणांना माहीत आहे. जे आवाज करत आहेत ते राजदचे कार्यकर्ते आहेत. विरोधी पक्षनेता असूनही जो वर्षभर विधानसभेत गेला नाही तो लोकशाहीचा किती आदर करतो. ही लोक लालटेन युगातील आहेत, हे बिहारला कळतेय. हे बिहारला मागे नेतील. एक घोड्यावरून उतरला नाही आणि दुसरा गैरव्यवहाराचा पुतळा होता. ज्या प्रकारचे जंगलराज केले गेले, ते तुम्ही सोडले नाही. तुम्ही अजूनही तेच करत आहात. तुम्ही बदललाच नाहीत. लालटेन युगातून मोदीजी एलईडी युगात घेऊन आले आहेत.

यंदा अमित शहा बिहारला आले नाहीत ?

> कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यानंतर ते आता बरे हाेत आहेत. बिहार निवडणुकीपर्यंत त्यांचे येणे अवघड दिसतेय. पश्चिम बंगालमध्ये त्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक होऊ शकते. अजून त्यांच्या तब्येतीने त्यांना परवानगी दिली नाही. मात्र आता ते बरे आहेत, हे मी स्पष्ट सांगू शकतो.