आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 निर्णय, ज्यामुळे BJP ला मिळाल्या 156 जागा:CM-मंत्री बदलले, बड्या नेत्यांचे तिकिट कापले, शहा रोज बूथ स्तरावरून फीडबॅक घ्यायचे

लेखक: अक्षय वाजपेयी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2017 च्या निवडणुकीत BJP ला फक्त 99 जागांवर विजय मिळवता आला होता. गुजरातमध्ये सत्तेत असल्यापासून भाजपला प्रथम 100 पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. नेतृत्वाने यातून धडा घेतला आणि 2022 मध्ये विजयाची तयारी दीड वर्षापूर्वीच सुरू केली. निवडणुकीच्या आठवड्यापूर्वी गृहमंत्री अमित शहांनी बूथ स्तरावरील तयारीचा रोज आढावा घेणे सुरु केले.

त्यांनी दर दुसऱ्या दिवशी बूथ स्तराची बैठक घेतली. प्रचाराचा आढावा घेतला. सभेसाठी ज्या जागा निवडण्यात आल्या. त्या का निवडल्या यावरही शहा यांनी सविस्तर चर्चा केली.

पक्षाचे नेते सांगतात की, त्यांच्या बैठका कित्येक तास चालायच्या. केंद्रिय मंत्री, मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले गेले. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा या यादीत टॉपवर होते.

PM मोदींच्या 31 सभा, 3 रोड शो याच्याशिवाय भाजपने निवडणुकीत अनेक प्रयोगही केले. जे यशस्वी ठरले.

विक्रमी विजयाचा मार्ग तयार करणारे 7 निर्णय

1. निवडणुकीच्या एक वर्ष आधी संपूर्ण सरकार बदलले

विधानसभा निवडणुकीच्या सुमारे 1 वर्ष आधी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींसह संपूर्ण मंत्रिमंडळच बदलले. रुपाणींना हटवून पहिल्यांदाच निवडून आलेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. नो रिपीट फॉर्म्युल्यासह जुन्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर विधानसभा अध्यक्षही बदलण्यात आले.

भारतीय राजकारणात भाजपने पहिल्यांदाच असा प्रयोग गुजरातमध्ये केला. हा प्रयोग आता पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. पूर्ण सरकारच बदलण्यात आल्याने सत्ताविरोधी लाट संपुष्टात आली. नव्या मंत्रिमंडळात जातीय आणि प्रादेशिक गणिते जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या तीन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. पाटीदार समुदायाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह पटेल समुदायातील सर्वाधिक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

कोव्हिडनंतरची गुजरातमधील पहिली निवडणूक होती. कोव्हिडनंतर अव्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून सरकारवर खूप टीका झाली होती. लोकांमध्ये राग होता. भाजपने रुपाणी सरकार बदलल्यानंतर हा राग संपुष्टात आला.

2. रुपाणी आणि नितीन पटेल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू

ग्राऊंडवरून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे भाजपने मोठ्या नेत्यांचे तिकिट कापण्याचा धोकाही पत्करला. मेहसाणातून नितीन पटेल यांचे तिकिट कापण्यात आले. अशाच पद्धतीने ऑगस्ट 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मुख्यमंत्री राहिलेल्या विजय रुपाणींचेही तिकिट कापण्यात आले. रुपाणी 1987 पासून राजकोटच्या राजकारणात सक्रीय होते. ते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले होते. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर येत सांगितले की आमची निवडणूक लढण्याची इच्छा नाही.

3. फक्त विजयाची क्षमता पाहिली, काँग्रेस नेत्यांना तिकिट मिळाले

भाजपने गुजरातमध्ये विजयाच्या गणितानुसार तिकिट वाटप केले. 42 आमदारांचे तिकिट कापले. 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना संधी दिली. सूत्रांनी सांगितले की, परफॉर्मन्स लिस्टमध्ये 80% पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या 25% आमदारांचे तिकिट पक्षाने कापले होते. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या ज्या नेत्यांच्या विजयाची शक्यता होती त्यांना तिकिट देण्यात आले.

4. 2017 मध्ये पराभव झालेल्या मतदारसंघात आधी प्रचार सुरु केला

2017 मध्ये मोरबी, सुरेंद्र नगर, अमरेली अशा जागांवर भाजपचा पराभव झाला होता. यावेळी तिथूनच प्रचार सुरु करण्यात आला. सौराष्ट्रात तर भाजपचा प्रचार निवडणुकीच्या 6 महिन्यांच्या आधीच सुरु झाला होता. पक्षाने नव्याने पन्ना प्रमुख नियुक्त केले. जनतेत ज्यांच्याविषयी राग आहे अशा आमदारांना वगळण्यात आले. मोदी आणि अमित शहांनी अशा जागा कव्हर केल्या जिथे 2017 मध्ये भाजपला अडचणींचा सामना करावा लागला होता.

5. मंत्र्यांचे तिकिट कापण्यातही मागे पाहिले नाही

सप्टेंबर 2021 मध्ये भाजप नेतृत्वाने गुजरातचे पूर्ण सरकारच बदलले. तेव्हा एकूण 24 जणांना मंत्री करण्यात आले होते. यात 10 कॅबिनेट आणि 14 राज्य मंत्री होते. या निवडणुकीत पक्षाने 5 मंत्र्यांचे तिकिट कापले. ज्यांना तिकिट मिळाले त्यापैकी 19 जण विजयी ठरले. केवळ एकाच मंत्र्याचा पराभव झाला. निकालांवरून सिद्ध होते की, मंत्रिमंडळ बदलणे आणि नवे मंत्री बनवणे भाजपसाठी योग्य ठरले.

6. बंडखोरांना कठोरतेने हाताळले

मोठ्या नेत्यांचे तिकिट कापल्यानंतरही भाजपला ग्राऊंडवर काहीही गैरव्यवस्थापन दिसले नाही. बंडखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या 12 नेत्यांना भाजपने निवडणुकीदरम्यान निलंबित केले. नितीन पटेल आणि विजय रुपाणींसारख्या मोठ्या नेत्यांचे तिकिट कापले. मात्र यापैकी कुणीही बंडखोरीची हिंमत केली नाही.

7. 'मी गुजरातचा पुत्र' विजयासाठी मोठा फॅक्टर

गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार आरके मिश्रा म्हणतात - नरेंद्र मोदींनी केलेले 'मी गुजरातचा पुत्र' हे आवाहन निवडणुकीती विजयाचा मोठा फॅक्टर ठरला. त्यांनी गुजरातमध्ये वारंवार या वाक्याचा पुनरुच्चार केला. आम आदमी पक्षाने थेट काँग्रेसचेच नुकसान केले. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस आणखी चांगले प्रदर्शन करू शकत होती. मात्र यावेळी आपने त्यांचे मोठे नुकसान केले. याचा थेट फायदा भाजपला झाला.

ज्येष्ठ पत्रकार दर्शन देसाईंच्या मतेही भाजपच्या विजयाचे कारण काँग्रेसच आहे. ते म्हणतात की, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गुजतकडे पाहिलेही नाही. भारत जोडो यात्रा केली, मात्र गुजरात छोडो केले.

निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेस नेते अध्यक्ष निवडीत व्यस्त होते. जेव्हा तोडगा समोर येत होता तेव्हा राष्ट्रीय निरीक्षक अशोक गहलोत आणि गुजरातचे प्रभारी रघू शर्मा दोघांचेही लक्ष काँग्रेसवर होते. कारण दोघेही राजस्थानचे आहे. प्रियंका गांधी गरब्याच्या वेळी येणार होत्या. पण आल्या नाही. राहुल गांधी आले पण उशीरा.

दुसरे म्हणजे, काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार स्वतःच्या ताकदीवर एकट्याने उभा राहिला. केंद्रीय नेतृत्वाकडून प्रचारासाठी कोणतीही संसाधने आणि पाठिंबा मिळाला नाही. गुजरात काँग्रेसच्या नेतृत्वातील अर्धा डझन मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. त्यांना आपली जागाही वाचवता आली नाही. पराभवानंतरही त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असते. तिकिट वाटपातही त्यांना भूमिका हवी असते. आदिवासी काँग्रेसचे मजबूत मतदार आहेत. पक्ष त्यांनाही सांभाळू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...