आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:ब्लॅक फंगसचे कारण इंडस्ट्रियल ऑक्सिजन आहे का? कोविड -19 च्या संसर्गाशिवायही ब्लॅक फंगसचा धोका उद्भवू शकतो का?

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घेऊयात या संसर्गाची कारणे कोणती असू शकतात…

देशात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट भयंकर होती. मात्र ती ओसरत असतानाच काही राज्यांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीच्या केसेस समोर येऊ लागल्या. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. वैद्यकीय भाषेत याला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात. गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, आतापर्यंत 18 पेक्षा जास्त राज्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले असून ही संख्या वाढत आहे. यामागील कारण काय आहे?

काही तज्ज्ञ म्हणतात की, एप्रिल-मे महिन्यात जेव्हा कोविड - 19 च्या दुसर्‍या लाटेत केसेस वाढल्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय वापराकडे वळवला गेला. कुठेतरी हे ब्लॅक फंगसचे कारण असू शकते. परंतु केवळ इंडस्ट्रीयल ऑक्सिजनच या संसर्गाचे कारण आहे का? मग ज्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते, अशा रुग्णांनाही हा त्रास का जाणवू लागला आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही गुडगावच्या सी.के. बिर्ला हॉस्पिटलमधील डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल मेडिसिनचे डॉ. तुषार तयाल यांच्याशी बातचीत केली. सोबतच मध्यप्रदेशात करण्यात आलेल्या एका स्टडीचीही मदत घेतली, ज्यात ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचे प्रथमच विश्लेषण केले गेले.

जाणून घेऊयात या संसर्गाची कारणे कोणती असू शकतात…

ब्लॅक फंगस म्हणजे काय?

 • हा एक बुरशीजन्य आजार आहे. जो 'म्युकर मायकॉसिस' नावाच्या बुरशीमुळे होतो. ज्यांना पूर्वीचा काही आजार आहे किंवा शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी करणारी किंवा शरीरातील इतर आजारांशी लढण्याची शक्ती कमी करणारी औषधे घेणा-यांना हा आजार होतो. हे शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते.
 • मुख्यतः आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे वातावरणात असलेली बुरशी आपल्या शरीरात पोहोचते. जर शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास हे संक्रमण तिथून शरीरात पसरू शकते. जर सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान झाले नाही, तर डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. किंवा ही बुरशी शरीरातील ज्या भागात पसरली, शरीराचा तो भाग निकामी होऊ शकतो.
इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफमध्ये दिसणार्‍या म्युकरेल्स बुरशीमुळे काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) चा संसर्ग होतो.
इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफमध्ये दिसणार्‍या म्युकरेल्स बुरशीमुळे काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) चा संसर्ग होतो.

ब्लॅक फंगस कोठे आढळते?

 • हा खूप गंभीर, परंतु एक दुर्मिळ संसर्ग आहे. ही बुरशी वातावरणात कुठेही आढळू शकते, विशेषत: जमिनीवर आणि सडलेल्या सेंद्रिय बाबींमध्ये. उदाहरणार्थ, पाने, कुजलेले लाकूड आणि कंपोस्ट खतात काळी बुरशी आढळते.

काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) साठी इंडस्ट्रीयल ऑक्सिजनला दोष का दिला जात आहे?

 • कोरोनाच्या दुस-या लाटेत एप्रिल-मे महिन्यात प्रत्येक मोठ्या शहरात रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने इंडस्ट्रीयल ऑक्सिजनच्या वैद्यकीय वापरास परवानगी दिली. यानंतर ज्या ज्या इंडस्ट्रीत ऑक्सिजनचा वापर होतो, तेथून ऑक्सिजन रुग्णालयात पोहोचू लागला. इंडस्ट्रीयल ऑक्सिजनची शुद्धता 94-95% असते तर रुग्णालयात वापरल्या जाणार्‍या ऑक्सिजनची शुद्धता 99% असते. डॉ. तयाल सांगतात की, वैद्यकीय ऑक्सिजन शुद्धतेसाठी अनेक प्रक्रियेतून जाते. ज्या सिलिंडरमध्ये लिक्विड ऑक्सिजन स्टोअर केले जाते, त्याचे सर्वप्रथम निर्जंतुकीकरण होतो. त्या तुलनेत इंडस्ट्रीअल ऑक्सिजन सिलिंडर इतके स्वच्छ नसतात. ते नियमितपणे स्टराइल आणि निर्जंतुकीकरण केले जात नाहीत. या सिलिंडर्समध्ये लहान गळती होण्याचा धोका असतो.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्यात रुग्णालयांनी रूग्णांना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, केंद्र सरकारने उद्योगांना ऑक्सिजनचा वापर करण्यास मनाई केली आणि ते वैद्यकीय वापरासाठी वळविले.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्यात रुग्णालयांनी रूग्णांना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, केंद्र सरकारने उद्योगांना ऑक्सिजनचा वापर करण्यास मनाई केली आणि ते वैद्यकीय वापरासाठी वळविले.

इंडस्ट्रीअल ऑक्सिजन हे ब्लॅक फंगसचे एकमेव कारण आहे?

 • नाही. एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, कोविड - 19 च्या उपचारांत स्टेरॉईड्स वापर ब्लॅक फंगसचे एक कारण आहे. सध्या कोरोना विषाणूची लागण होणे हे फंगल इन्फेक्शनच्या केसेस वाढण्यामागे एक मोठे कारण आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये, मग ते त्यातून पूर्ण बरे झालेले असो किंवा नसो, म्युकर मायकॉसिसच्या सर्वात जास्त केसेस आढळून येत आहेत.​​​​​​​
 • कोविड-19 आजारात स्टेरॉईड्सने फुफ्फुसांमधली सूज कमी केली जाते. तसेच कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा जेव्हा अति-सक्रीय होते त्यावेळी शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ नये. तो तसा होऊ नये, यासाठीसुद्धा स्टेरॉईड्स देतात. स्टेरॉईड्समुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि यामुळे डायबेटीक किंवा ज्यांना डायबिटीज नाही, अशांच्याही रक्तातली शुगर​​​​​​​ लेव्हल वाढते, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
 • नॅशनल हेल्थ मिशन एमपीच्या 743 म्युकर मायकॉसिस (ब्लॅक फंगस) रुग्णांच्या विश्लेषण अहवालात असे म्हटले आहे की, 75% कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. कोरोनाच्या उपचारात 73% लोकांना स्टेरॉइड्सही देण्यात आले नाहीत.

कोविड -19 ची लागण झाली नसली तरी ब्लॅक फंगसची लागण होऊ शकते का?

 • होय, मध्य प्रदेशच्या स्टडी रिपोर्टनुसार, बिहारसह इतर राज्यांतून नोंदविण्यात आलेल्या घटनांनी याची पुष्टी केली आहे. मध्य प्रदेशच्या ब्लॅक फंगस अ‍ॅनालिसिस रिपोर्टनुसार, संक्रमित रूग्णांपैकी 38% असे लोक आहेत ज्यांना कोरोना कधीच झाला नाही. पण ब्लॅक फंगसची लागण झाली होती.
 • तज्ज्ञ म्हणतात की, शरीरात काळ्या बुरशीचा प्रवेश कोरोना विषाणू बाहेर पडल्यानंतर होतो. कोविड -19 च्या 14 दिवसानंतर रुग्णाला अँटीव्हायरल उपचारांची आवश्यकता नसते. केवळ काळ्या​​​​​​​ बुरशीचा उपचार केला पाहिजे.

ब्लॅक फंगसचा धोका सर्वाधिक कुणाला आहे?

 • ज्यांना डायबिटीज आहे आणि उपचारासाठी त्यांना स्टेरॉईड्स देण्यात आलेत त्यांना म्युकर मायकॉसिस होण्याचा धोका सर्वाधिक आहे. मात्र, रुग्णाला डायबिटीज नसेल आणि त्याला स्टेरॉईड देण्यातआले असतील, अशांमध्येही म्युकर मायकॉसिसच्या केसेस आढळल्या आहेत.
 • ज्यांच्यावर कुठल्या प्रकारची ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे, त्यांनाही फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. याशिवाय, किमोथेरपी सुरू असलेले कॅन्सर रुग्ण किंवा जे डायलिसिसवर आहेत, अशा रुग्णांची​​​​​​​ रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांनाही म्युकर मायकॉसिसचा धोका असतो.

याची लक्षणे कोणती?

 • या रोगाची लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर संक्रमण आहे यावर अवलंबून असतात. चेहर्‍याच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलट्या होणे, ताप, छातीत दुखणे, सायनस कंजेशन, तोंडाचा वरचा भाग किंवा नाकात काळे फोड असणे, जे नंतर वेगाने गंभीर रुप घेते.

ब्लॅक फंगसवर उपचार कसे केले जातात?

 • डॉ. तयाल यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला काळ्या बुरशीची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यासंबंधीचे औषध शासनाच्या अधिकृत केंद्रांमधून मिळू शकते. अँटीफंगल औषधांच्या​​​​​​​ वापरासह, डोळा आणि नाकात संसर्ग वाढल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. उपचारांमध्ये एम्फोटेरिसिन B (Amphotericin B), पोसेकोनाजोल (Posaconazole) आणि आइसेवुकोनाजोल​​​​​​​ (Isavuconazole) यासारख्या अँटीफंगस
औषधांचा वापर केला जातो. काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे डोळे काढावे लागतात. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.
औषधांचा वापर केला जातो. काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे डोळे काढावे लागतात. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.

स्पर्शातून हा आजार पसरतो का?

 • नाही.. हा एक संसर्गजन्य रोग नाही, म्हणजेच, ही बुरशी एका रुग्णापासून दुस-या रुग्णात पसरत नाही, परंतु या आजारात 54% रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, एवढा हा आजार धोकादायक आहे.
 • यूएसची एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या अहवालात असे म्हटले आहे की, शरीरात कोणत्या भागात हे संक्रमण आहे त्यावरुन मृत्यूचे प्रमाण वाढू किंवा कमी होऊ शकते.
 • उदाहरणार्थ, सायनस इन्फेक्शनमध्ये मृत्यू दर 46% आहे, तर फुफ्फुसातील संसर्ग झाल्यास मृत्यू दर 76% असू शकतो आणि आजारपणात संसर्ग झाल्यास मृत्यु दर 96% इतका असू शकतो.
 • डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ही बुरशी शरीरातील ज्या भागात आढळते, त्या भागाचा ती नाश करते. अशा परिस्थितीत जर हा संसर्ग डोक्यात झाला तर ब्रेन ट्यूमरसह अनेक प्रकारचे रोग होतात, जे जीवघेणे ठरतात. वेळेवर उपचार केल्यास हे टाळता येऊ शकते. जर तो मेंदूपर्यंत पोहोचला तर मृत्यूदर 80% आहे.

हे कसे टाळता येईल?

 • भोपाळच्या डॉ. पूनम चंदानी म्हणतात की, बांधकाम स्थळापासून दूर राहा, धुळीच्या ठिकाणी जाऊ नका, बागकाम किंवा शेती करताना फुल स्लीव्स असलेले ग्लव्स घाला, मास्क घाला. ज्या ठिकाणी पाणी गळती आहे किंवा ड्रेनेजचे पाणी साचले आहे, अशा ठिकाणी जाऊ नका.
 • ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. कोरोना बरा झाल्यानंतरही नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. जर फंगसची काही लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. यामुळे, फंगस प्रारंभिक टप्प्यात निदान होऊन वेळेवर उपचार करणे शक्य होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...