आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Black Fungus Will Now Be Treated In Ayushman Bharat, The Scope Of Private Hospitals Will Increase; Know About The Major Changes In Ayushman Yojana

एक्सप्लेनर:'आयुष्मान'मध्ये आता डेंग्यू, कर्करोग, ब्लॅक फंगसच्या उपचारांसह लिंग बदल शस्त्रक्रिया होणार; योजनेतील बदलांविषयी जाणून घ्या सविस्तर

9 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाचा सविस्तर...

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत आरोग्य लाभ पॅकेजचे दर 20 टक्क्यांवरुन 400 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. देशभरात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. त्याचा थेट फायदा कर्करोग, डेंग्यू, ब्लॅक फंगससह इतर अनेक आजारांच्या रुग्णांना होईल. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट 400 आरोग्य पॅकेजच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये काळ्या बुरशीसारख्या (ब्लॅक फंगस) आजारांसाठी नवीन वैद्यकीय व्यवस्थापन पॅकेज देखील जोडले गेले आहे.

तसेच, सरकारच्या 'SMILE' या नवीन योजनेद्वारे आता ट्रान्सजेंडर्सना आयुष्मान भारत अंतर्गत वैद्यकीय संरक्षणही मिळणार आहे आणि या विमा अंतर्गत लिंग परिवर्तन सारख्या शस्त्रक्रियादेखील होणार आहे. सरकारकडून ट्रान्सजेंडरना मिळालेली ही एक मोठी भेट आहे.

या योजनेत सरकारने कोणते बदल केले आहेत? ट्रान्सजेंडरसाठी कोणती घोषणा करण्यात आली आहे? आयुष्मान कार्डने उपचारांच्या मर्यादेत बदल झाला आहे का? हे बदल सामान्यांवर कसा परिणाम करतील? आणि तुम्हीदेखील आयुष्मान कार्ड बनवता येईल का... जाणून घ्या सविस्तर...

प्रथम नवीन बदल समजून घ्या

 • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत आरोग्य लाभ पॅकेज (HBP) मध्ये बदल केले आहेत. या बदला अंतर्गत, शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय प्रक्रियेचे दर 20 टक्क्यांवरुन 400 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
 • एनएचएने म्हटले आहे की, नवीन पॅकेज अंतर्गत सुमारे 400 मेडिकल प्रोसिजर्सचे दर बदलण्यात आले आहेत आणि ब्लॅक फंगस (काळ्या बुरशी)शी संबंधित नवीन मेडिकल मॅनेजमेंट पॅकेदखील जोडण्यात आले आहे. सुमारे 200 पॅकेजेसच्या किंमती बदलण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांकडे पाठवला होता. मंगळवारी संध्याकाळी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आता हे बदल 1 नोव्हेंबरपासून लागू होतील.

कोणत्या कॅटेगरीत दर बदलले आहेत?

हेल्थ बेनिफिट पॅकेजमध्ये केलेल्या बदलांमुळे खाजगी रुग्णालयांत गरीब लोकांना उपचार घेण्याची संधी मिळेल आणि खिशातून कोणताही अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार नाही.

 • रेडिएशन ऑन्कोलॉजी प्रोसिजरमध्ये. रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये हाय एनर्जी रेडिएशनद्वारे कर्करोगावर उपचार केला जातो.
 • डेंग्यू आणि उच्च ताप यासारख्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रक्रियेच्या दरात.
 • ब्लॅक फंगसच्या सर्जिकल पॅकेजमध्ये. म्हणजेच काळ्या बुरशीवर होण्या-या शस्त्रक्रियेत.​​​​​​​ आर्थ्रोडेसिस (हाडांचे फ्रॅक्चर आणि आर्थरायटिसचा उपचार), कोलेसिस्टेक्टॉमी (पित्ताशय काढून टाकण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया), अपेंडिसिस्टेक्टमी (अपेंडिक्सची शस्त्रक्रिया) यासारख्या इतर​​​​​​​ आजारांच्या उपचारांमध्ये.
 • यासह, व्हेंटिलेटरसह आयसीयूचा दर 100%, व्हेंटिलेटरशिवाय आयसीयूचा दर 136%, एचडीयूचा दर 22%आणि रूटीन रूमचा दर 17%पर्यंत वाढविण्यात आला आहे.

ट्रान्सजेंडरसाठी कोणती घोषणा केली गेली आहे?

 • सामाजिक न्याय मंत्रालय सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिविजुअल्स फॉर लाइवलीहुड अँड एंटरप्राइज म्हणजे SMILE ही योजना सुरु करणार आहे. याअंतर्गत ट्रान्सजेंडर्सची लिंग बदल शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय मदत देखील योजनेअंतर्गत समाविष्ट केली जाईल.
 • SMILE योजना दोन वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागली गेली आहे. यामध्ये ट्रान्सजेंडर आणि भिकारी यांच्या पुनर्वसन योजनांचा समावेश आहे. या योजना 12 ऑक्टोबरपासून सुरू केल्या जातील.

या बदलांचा तुम्हाला कसा फायदा होईल?

 • शस्त्रक्रिया आणि प्रक्रियांचे दर वाढल्याने सर्वात मोठा फायदा होईल. दर वाढल्याने ज्या रुग्णालयांमध्ये महागड्या उपचारामुळे लवकर उपचार मिळू शकले नाहीत त्यांनाही उपचाराच्या कक्षेत समाविष्ट केले जाईल. म्हणजेच, मोठ्या हॉस्पिटल चेनमध्येही तुम्ही या योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकाल.
 • दुसरा मोठा बदल म्हणजे पॅकेजमध्ये ब्लॅक फंगस या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. कोविडनंतर अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढले. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • ऑन्कोलॉजीसाठी सुधारित पॅकेजमुळे देशातील कर्करोगाच्या रूग्णांना मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. कर्करोगाच्या महागड्या उपचारांमध्ये या योजनेचा लाभ मिळणे रुग्णांना दिलासा देणारे पाऊल ठरेल.
 • ट्रान्सजेंडर्सची सेक्स चेंज सर्जरी देखील योजनेअंतर्गत समाविष्ट केली जाईल.

5 लाख रुपयांपर्यंत उपचारांच्या मर्यादेत काही बदल झाला आहे का?

 • आयुष्मान भारत अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. या मर्यादेत कोणताही बदल नाही. पूर्वीप्रमाणेच एका कुटुंबाला एका वर्षात 5 लाखांपर्यंत उपचार मिळू शकतात.

आयुष्मान भारत योजना काय आहे?

 • ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून जिचा 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होतोय.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याच्या 3 दिवस आधी आणि 15 दिवसांनंतरपर्यंतचे उपचार आणि औषधे समाविष्ट आहेत.
 • योजनेअंतर्गत, देशातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहेत, जे आयुष्मान भारत योजनेशी जोडले गेलेले आहेत.
 • सध्या आयुष्मान भारतमध्ये 1,669 प्रकारच्या वैद्यकीय पॅकेजचा समावेश आहे. यामध्ये 1080 सर्जिकल, 588 मेडिकल आणि एका अन्य पॅकेजचा समावेश आहे. आयुष्मान भारताचे उद्दिष्ट सर्वांना आरोग्य​​​​​​​ कव्हरेज प्रदान करणे आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोफत आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा प्रदान करण्याचे आहे.
बातम्या आणखी आहेत...