आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:ब्लॅक आणि व्हाइटनंतर यलो फंगसचा धोका, जाणून घ्या फंगल इन्फेक्शनचे प्रकार आणि त्याचा धोका ?

जयदेव सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये कोण जास्त धोकादायक आहे ?

देशात ब्लॅक फंगसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. बिहारच्या पाटणानंतर हरियाणातील हिसारमध्येही व्हाइट फंगसचे रुग्ण आढळले. तर, ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता गाझियाबादमध्ये यलो फंगसचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, देशात ऑक्सिजन शॉर्टेजमुळे कोरोना रुग्णांना उद्योगांसाठी वापरली जाणारी ऑक्सिजन दिल्यामुळे फंगस इन्फेक्शन वाढल्याचे म्हटले जात आहे.

जाणून घ्या ब्लॅक आणि व्हाइट फंगसशिवाय इतरही फंगल इन्फेक्शन असतात का ? यांची कारणे कोणती आहेत ? यातील कोणता जास्त धोकादायक असतो ? यांची लक्षणे काय आहेत? इंडस्ट्रियल ऑक्सीजनचा फंगल डिजीजमध्ये काय रोल आहे ? कोरोना रुग्णांना का फंगल डिजीजचा जास्त धोका आहे ? आणि याच्यापासून कसे वाचावे...?

किती प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतात ?

फंगल इन्फेक्शन अनेक प्रकारचे असतात. यातील बहुतेक फंगल इन्फेक्शन सभोवतालच्या वातावरणात असतात. यांच्यापासून जास्त धोका नसतो. या वातावरणातील फंगल इन्फेक्शनमध्ये नेल इन्फेक्शन, वजाइनल कँडिडिआसिस, डाग, तोंड आणि गळ्यात होणारे कँडिडा इन्फेक्शन इत्यादी आहेत. हे सर्व इन्फेक्शन सामान्य आहेत. या फंगसप्रमाणे ट्रेमेला मेसेन्टेरिका किंवा यलो फंगसदेखील एक सामान्य फंगस आहे. अनेक फंगल इन्फेक्शन रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होतात. तर, काही इन्फेक्शन जीवघेणेदेखील ठरू शकतात. ब्लॅक आणि व्हाइट फंगस रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होतात.

रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर फंगल इन्फेक्शनचा धोका आहे का ?

रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर इन्फेक्शनशी सामना करता येत नाही. HIV, कँसरचे रुग्ण, ज्या रुग्णांचे ऑर्गन ट्रांसप्लांट झाले किंवा इतर काही औषधांच्या ओव्हर डोसमुळेही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. कोरोना संसर्ग झाल्यावरही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. याशिवाय, हाय डायबिटिक असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये फंगल इन्फेक्शनचा जास्त धोका असतो. याशिवाय, कोरोना रुग्णांना स्टेरॉइड दिल्यावरही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (CDC) ने सांगितल्यानुसार, कमी इम्यून सिस्टममुळे एस्परजिलोसिस, सी नियोफॉर्म्स इन्फेक्शन, न्यूमोसिस्टिस निमोनिया, टैलारोमाइकोसिस, म्यूकरमाइकोसिस (ब्लॅक फंगस) आणि कँडिडिआसिस (व्हाइट फंगस) होतो.

ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये कोण जास्त धोकादायक आहे ?

हेमेटोलॉजिस्ट डॉक्टर वीके भारद्वाज सांगतात की, संक्रमण पसरण्याचा वेग पाहिला, तर व्हाइट फंगस ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक आहे. पण, जर मोटर्लिटी रेटच्या हिशोबाने पाहिले तर, ब्लॅक फंगस जास्त जीवघेणा आहे. ब्लॅक फंगस झालेल्या 54% रुग्णांचा मृत्यू होतो. तर, कँडिडिआसिसच्या अनेक प्रकारांपैकी इन्वेसिव कँडिडा सर्वाधिक जीवघेणा आहे. याच्या 25% रुग्णांचा मृत्यू होतो. अमेरिकन एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC) च्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे. CDC ने व्हाइट फंगसमधील कँडिडा औरिस प्रकारालाही गंभीर म्हटले आहे. हे इन्फेक्शन हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.

यलो फंगसदेखील धोकादायक आहे का ?

डॉक्टरांचे म्हणने आहे की, यलो फंगसला घाबरण्याचे कारण नाही. याप्रकारचे फंगस पर्यावरणात अधिपासून असतात. या फंगसमुळे जीव जाण्याचा धोका नाही. यलोसोबतच इतर प्रकारच्या फंगसनेही जीव जाण्याचा धोका नाही.

इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे देशात फंगल इन्फेक्शन वाढत आहे ?

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, फंगस माती, खराब ऑर्गेनिक पदार्थ आणि जुन्या वस्तुंमध्ये आढळते. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये दुषित पाणी गेल्यावर फंगसचा धोका वाढू शकतो. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना याचा जास्त धोका आहे.

व्हाइट फंगसची काय लक्षणे आहेत ?

कँडिडा नावाच्या फंगसने होणाऱ्या इन्फेक्शनला कँडिडिआसिस (व्हाइट फंगस) म्हणतात. हे फंगस शरीर किंवा शरीराच्या आतील भाग, जसे तोंड, गळा, वजाइना इत्यादींमध्ये होतो. याचा फैलाव वाढल्यावर हे इंटरनल ऑर्गन्स जसे किडनी, हार्ट आणि मेंदुपर्यंत पोहचू शकते. ताप येणे, थंडी वाजणे, याचे सामान्य लक्षण आहेत.

ब्लॅक फंगसची लक्षणे काय आहेत ?

ब्लॅक फंगस झाल्यावर चेहरा सुजणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलटी येणे, ताप येणे, छातीत दुखणे, साइनस कंजेशन, नाकाच्या आत आणि तोडांमध्ये काळे डाग येणे इत्यादी ब्लॅक फंगसची लक्षणे आहेत. डॉक्टर भारद्वाज सांगतात की, फंगस जेव्हा ब्लॅक पिगमेंट तयार करतो, तेव्हा त्याला ब्लॅक फंगस म्हणतात. जेव्हा फंगस पिगमेंट तयार करत नाही, तेव्हा त्याला व्हाइट फंगस म्हणतात.

कोरोना रुग्णांनाच या फंगसचा जास्त धोका का ?

ज्या रुग्णांमध्ये आधीपासून कँसर, डायबिटीजसारखे आजार आहेत किंवा जे अनेक दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये फंगस होण्याची अधिक शक्यता असते.

फंगसपासून वाचण्यासाठी काय करावे ?

फंगल इन्फेक्शन स्वच्छतेशी संबंधित आहे. ब्लॅक फंगसपासून वाचण्यासाठी डॉक्टर डॉक्टर कंस्ट्रक्शन साइट किंवा धुळ असलेल्या परिसरापासून दूर राहण्यास सांगतात. याशिवाय, गार्डनिंग किंवा शेती करताना फुल स्लीव्स आणि ग्लव्ज, मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांजवळ स्वच्छतेची काळजी घेतली जावी. रुग्णासाठी वापरले जाणारे वैद्यकीय उपकरण स्वच्छ असावे.

बातम्या आणखी आहेत...