आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नानंतर शेजारच्या गावातून इथे आले तेव्हा 14 वर्षांची होते. लग्नाच्या पोटलीत चुनरी आणि दागिन्यांसोबत काळ्या कपड्यांचा जोडाही होता. शोक म्हणजेच मातमचा जोडा. कोणाच्याही मृत्यूची बातमी कळली की लगेच काळी चुनरी ओढून बाहेर पडायचे. आपल्या उंबऱ्यापासून त्या घराच्या दरवाजापर्यंत रडत जायचे. लोक विणकाम-शिलाई, गाणे आणि वाजवण्याचा सराव करतात, आम्ही रडण्याचा सराव करतो.
एका मोठ्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ दापू देवीच्या भुवया वयामुळे पांढऱ्या झाल्या आहेत. चक्रीवादळानंतर सुन्या पडलेल्या खडकांसारखे डोळे. निंबोडा गावातील ही महिला पैसे घेऊन मोठ्या घरांत रडण्याची परंपरा नाकारते.
मात्र, रडणे, विशेष कपडे, प्रशिक्षण अशा गोष्टी नकळत सांगितल्या जातात. मध्येच त्या त्यांच्या शैलीत रडूनही दाखवतात, पुन्हा थांबतात. 'मोठा परिवार आहे माझा. जीवितांसमोर रडणे चांगले नाही. फक्त मृत्यूवरच रडतो.'
दापू शोकाचा रियाज करणाऱ्यांपैकी आहेत. ज्यांना भेटण्यासाठी आम्ही राजस्थानच्या रेवदार तालुक्यात पोहोचलो. अरवलीतील खूपच सुंदर हिरवेगर्द डोंगर आणि रंगीबेरंगी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेल्या माऊंट अबूपासून जेमतेम 100 किमी अंतरावर निंबोडा गाव आहे.
गाव जवळ येईपर्यंत हिरवळ कमी होते. दाट झाडांऐवजी काटेरी झुडपे आणि धूळ. कडक उन्हामुळे डोळे मिणमिणता. ही उष्णता आणि धुळीत वसले आहे दापू देवींचे गाव. सुमारे एक हजार मतदार असलेल्या जमिनीचे अनेक तुकडे आहेत. प्रत्येक भागावर विशिष्ट समाजाच्या लोकांची वस्ती.
मेघवाल समाज हा तो समाज आहे, ज्यांच्या स्त्रियांच्या रडण्यात गाण्यांपेक्षा जास्त जुंबिश(चढउतार) असतात.
मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. दोन वर्षांपूर्वी येथील एका 'मोठ्या घरात' मृत्यू झाल्यानंतर रुदालींचा एक गट त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी येथे आला होता. ही गोष्ट वृत्तपत्रांत आली आणि मग गदारोळ झाला, जो मोठ्या मुश्किलीने शांत झाला.
आता रुदाली ही संज्ञा ऐकल्यावर लोक इथे असे पाहतात जसे की तुम्ही डायनासोरचा पत्ता विचारत आहात. ही गोष्ट वेगळी की ते बोलता-बोलता असेही मान्य करतात की गावातील गरीब लोक 'प्रतिष्ठित' लोकांच्या घरी निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी जातात. का? कारण ते त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे असतात.
जिवंत असूनही गायब झालेल्या या रुदालींना भेटण्यासाठी आम्ही करोटी गावात पोहोचलो, तिथून काही स्थानिक लोक आम्हाला निंबोडाला घेऊन गेले. दापू देवींचे गाव! त्या वस्तीपर्यंत, जिथे तुम्हाला खाट टाकून बसवले जाईल, परंतु कुटुंबातील सदस्य उभे राहतील. कुठेही, कितीही गर्मी असली तरी, तुम्हाला पाणी आणि चहा देण्याची 'चूक' होणार नाही. त्याचे कारण समजणे अवघड नाही.
खूप महिला आणि मुलींमध्ये दापू बसल्या आहेत. आमचे संभाषण दुसर्यांसोबत सुरू होते, परंतु त्यांच्यापर्यंत येऊन संपते. निळ्या बॉर्डरची लाल चुनरी ओढलेल्या दापू वारंवार सर्वांना गप्प राहण्याचा इशारा करतात. जेव्हा मी वय विचारले तेव्हा म्हणाल्या - 70 ओलांडले असेल. या गावात कधीपासून आहात? बालपणात इथेच खेळले असे सांगताना त्या हसतात. 70 पारवाले हास्य.
दापू म्हणतात- गावात कोणी वारले तर आम्ही 10-15 बायका जमायचो आणि रडत त्याच्या घरी जायचो. कुणी छाती बडवायचे, कुणी धुळीत लोळायचे. जी मोठ्याने रडेल तिला चांगले समजले जायचे.
अनेकदा तर असे झाले की ज्याच्या घरी मृत्यू झाला, त्यांचे अश्रू थांबले. मग आमचे काम आणखी महत्त्वाचे होते. आम्ही रडत रडत तिच्या बांगड्या फोडायचो, चुनरी काढायचो आणि काळी चुनरी तिच्यावर टाकायचो. हे सगळं असं व्हायचं की तिलाही रडू यायचं. मग ती इतकी रडायची की बेशुद्ध व्हायची. रडण्या खंड पडू नये म्हणून घरातील बायका मध्ये-मध्ये पाणी शिंपडून तिला उठवायचे.
तुम्ही रडताना गाणेही गाता का?
गातो, असे सांगताना दापू छातीवर हात आदळत काहीतरी गुणगुणतात, पण अचानक थांबतात. आपल्या आजूबाजूला पाहून त्या हसत्ता आणि म्हणतात - असे रडणे म्हणजे अपशकुन आहे. माझे मोठे कुटुंब आहे. प्रत्येकजण जिवंत आहे. तुम्ही पण बसला आहात (माझ्याकडे बोट दाखवत). रडणे हे फक्त मेलेल्यांसाठीच असते.
दापू जेव्हा किस्से सांगतात तेव्हा मी लक्षपूर्वक पाहते. हातात जाड लोखंडी कडे. पायात लोखंडी साखळी. एका बोटात लोखंडी अंगठी. गळ्यात काळा धागा, ज्यावर सेफ्टी पिनचा गुच्छ झुलत आहे. सोगचा म्हणजेच शोकाचा श्रृंगार!
तिथेच माझ्या शेजारी बसलेली बाई माझ्याकडे बघत म्हणाली - ती विधवा आहे. विधवा अशाच जगतात. असे म्हणत त्या महिलेने तिचे हात दाखवायला सुरुवात केली, ज्यात पांढऱ्या बांगड्या, पायात पैंजण आणि गळ्यात प्लास्टिकच्या रंगीत माळा होत्या. सोबतच तिचा फोटोही काढायला सांगते, जणू जिवंत नवरा हे तिचे काही यश असावे.
दापू हळू आवाजात टोकतात – पण रडताना आपण सगळे सारखे कपडे घालतो. काळी किंवा आकाशी चुनरी. सोबत फुल स्लीव्ह ब्लाउज, ज्याला कौशली म्हणतात. आणि फेटका म्हणजेच घागऱ्यासारखा दिसणारा कपडा, जो तिला एक चतुर्थांश घेरतो. हे सगळं घातल्यावर डोळ्यांतून आपोआप अश्रू यायला लागतात.
एखाद्या अनोळखी किंवा दूरच्या माणसाच्या मृत्यूवर आपण कसे रडू शकतो? माझ्या प्रश्नात एक शहरी शंका होती, ज्याला हवेत उडते उत्तर मिळाले - संबंध तर सर्वांसोबतच असतो. आणि काहीच नाही तर मानुख-मानुख(मनुष्य)चे नाते असतेच. आपोआप रडू येते.
टोळीची निगराणी करणारा एक तरुण मुलगा हे सांगतो. इकडे दापू गप्प आहे, जणू ती आतल्या आच त्या वेळांचा हिशेब करत आहे, जेव्हा तिला इच्छा असूनही रडू आले नव्हते. अर्ध्या काळोख्या रात्रींचा, अर्ध्या झोपलेल्या नशीबाचा. अर्ध्या उठलेल्या आशांचा. थांबलेल्या प्रत्येक अश्रूची उणीव त्या कदाचित दुसऱ्यांच्या मृत्यूत भरून काढत असाव्या.
विचारपुस झाली. मी निघणार तोच आपले खरबडे हात माझ्या हातावर हळुवारपणे ठेवून त्या म्हणाल्या - माझ्यासोबत सेल्फी (त्या त्याला सैफी म्हणत होत्या). मी एक सेल्फी घेऊन बाहेर पडले. जिथे त्याच गावातील दुसऱ्या वस्तीतील आणखी एका चेहऱ्याला मला भेटायचे आहे.
कन्या देवी! जुनाटपणाने पिवळी पडलेली पांढरी चुनरी ओढलेली ही बाई दापू देवीची अधुरी गोष्ट पुढे नेत रडण्याची 'तयारी' सांगते. एखाद्या घरात रडताना केवळ आवाजच काढत नाही तर बोलतही असतात.
उदाहरणार्थ, एखाद्या तरुण मुलाचे निधन झाले असेल तर आईचे दु:ख सांगून रडतात. पतीच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीच्या दुःखात रडतात. म्हाताऱ्यांच्या मृत्यूवर अश्रू कमी येतात. पण रडायचे तर असतेच! यासोबत आपले जुने अश्रूही मिसळतो.
तुम्ही स्वतःसाठी कधी रडलात?
जेव्हा नवरा मेला तेव्हा. दिवसा रडायचे, रात्री रडायचे. झाडू मारताना रडायचे, स्वयंपाक करताना रडायचे. कोणी आले तर जोरजोरात रडायचे, नाहीतर हळूहळू हुंदके द्यायचे. ती पहिली वेळ होती जेव्हा मी स्वःसाठी मोकळेपणाने रडले.
हे सांगताना कन्यादेवी सतत हसत होत्या. जेव्हा मी कारण विचारले तेव्हा पटकन म्हणाल्या - आता मरायला आले. खूप रडले. दात पडण्याआधी थोडं हसून घेते.
त्यांच्या शेजारी त्यांची नात प्रवीणा बसली होती. ती मारवाडीचे हिंदीत भाषांतर करत होती. ती म्हणते- मला कधी रडू येत नाही. सासरी जाईन, तेव्हा मग काय होईल माहीत नाही. कदाचित मलाही आजी आणि आई सारखे रडायला जावे लागेल.
या संभाषणात, पैसे घेऊन रडण्याविषयी कोणीही काहीही बोलले नाही. खोदून खोदून विचारल्यावर सरपंच प्रतिनिधी (महिला सरपंचांचे पती स्वतःला गावात याच नावाने संबोधतात) गणपत सिंग म्हणतात – गावात सगळे एकोप्याने राहतात. प्रतिष्ठित लोक नेहमी गरिबांच्या पाठीशी असतात. त्यांना मदत करतात. अशा वेळी प्रतिष्ठित कुटुंबात काही घटना घडली तर गावकरी स्वत: त्यांच्या घरी जाऊन रडतात. कोणीही जबरदस्ती करत नाही.
गणपतसिंग हे सद्गृहस्थ आहेत. गावात विकासाच्या अनेक झलक ते दाखवतात.
रस्ते पक्के होत आहेत. कच्च्या घरांमध्ये विटा घालू लागल्या. शेतकऱ्यांनी एरंड आणि टोमॅटोसारखी सुपीक पिके घेण्यास सुरुवात केली, परंतु या सर्वांमध्ये स्त्रिया जवळजवळ गायब आहेत, जसे की स्वतः त्यांच्या सरपंच पत्नी.
निघताना कन्यादेवीचा फोटो काढाण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावातील एक वृद्ध जवळ येऊन बसले. चेहऱ्यावर रुबाब, पिळदार मिशा. तर कन्या देवींसह बाकीच्या स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन अंग आखडून उभ्या होत्या. एक पूर्ण, पण बेरंग फोटो!
ब्लॅकबोर्डच्या या स्टोरीही वाचा...
लोखंडी दरवाजांमागे बंद मुली:रात्री 2ला दिवसाची सुरुवात, बाबाच कृष्ण बनून मुलींना रासलीलेसाठी करायचा उद्युक्त
या बातमीत कुणाचेही हुंदके नाही, कुणाचेही डबडबलेले डोळे दिसणार नाही. कुणी आक्रोश करून रडणार नाही, ना धोक्यांबद्दल कुणी सांगेल. इथे केवळ एक इमारत आहे. बंद दरवाजे आहेत आणि मुली आहेत. जगापासून तुटलेल्या त्या मुली, ज्यांनी यूट्यूबवर 'बाबा'चा व्हिडिओ पाहून घर सोडले आणि दिल्लीच्या रोहिणीतील एका आश्रमात कैद झाल्या. असे तुरुंग, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही.(वाचा पूर्ण बातमी)
मुलीवर गँगरेप, आपल्या घरात 700 दिवसांपासून कैद कुटुंबीय:भावाला नोकरी मिळेना, इंटरव्ह्यूत ओळख पटताच देतात नकार
इथेच ती दलित समुदायातील मुलगी राहत होती, जिचा सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झाला. गोष्ट इथेच थांबली नाही. अपरात्रीच तिच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.