आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी महत्त्वाची बातमी:अनेक महिन्यांपासून व्यायाम करत आहात पण अद्याप परिणाम दिसत नाहीये?, मग आता रक्त तपासणीतून कळेल कोणता व्यायाम तुमच्यासाठी परफेक्ट आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्त तपासणीतून कळेल उत्तम व्यायाम

स्वतःसाठी उत्तम व्यायाम निवडणे हे लोकांसाठी एक आव्हान आहे, परंतु हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांना आढळले की, रक्तात आढळणारी विशेष प्रकारच्या प्रथिनांची पातळी हे सांगते की, कोणत्या व्यायामाचा व्यक्तीच्या शरीरावर कसा परिणाम होईल? म्हणजे कोणता व्यायाम कोणत्या व्यक्तीसाठी उत्तम असेल.

हार्वर्ड मेडिकल स्कूलचे वैद्यकीय प्राध्यापक आणि बेथ इस्रायल डिकॉनेस मेडिकल सेंटरचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रमुख डॉ. रॉबर्ट गेर्स्टेन यांच्या म्हणण्यानुसार नवे अध्ययन सांगते की, मॉलिक्युलर प्रोफाइलिंग टूल्स तयार करून व्यक्तीचा एक्सरसाइज प्लॅन तयार करता येतो.

654 लोकांवर केले संशोधन
प्रोफेसर डॉ. रॉबर्ट गेर्स्टेन यांनी 654 लोकांचा व्यायामानंतर केलेल्या चाचण्यांच्या डेटाचे विश्लेषण केले. व्यक्तीच्या शरीरात 100 हून प्रथिने असतात व ते विविध व्यायामांचे शरीरावर होणारे परिणाम सांगतात, असे आढळले. शरीरातील वेगवेगळे ब्लड मॉलिक्यूल्स व्यायामावर कसे प्रतिक्रिया देतात, यावर आधारित हा अभ्यास मे महिन्यात नेचर मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झाला आहे.

व्यायाम करणारे कायम उत्साही राहतात
व्यायामाविषयी अनेक संशोधन व अभ्यासात असे आढळले आहे की, दररोज व्यायाम करणार्‍यांचे आरोग्य वाढते. ते दीर्घायुषी होतात आणि आनंदी तसेच एनर्जेटिक देखील राहतात. परंतु आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांसाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम योग्य असतो, हे अद्याप माहित नव्हते.

जुळ्या मुलांवर सारख्या व्यायामाचा भिन्न प्रभाव
अभ्यासात असे आढळून आले आहे की, समान डीएनए असलेल्या जुळ्या मुलांचे शरीर देखील एकाच व्यायामात वेगवेगळा प्रतिसाद देते. या अभ्यासाने हार्वर्ड युनिव्हर्सिटी, बोस्टनमधील बेथ इस्रायल डिकॉनेस मेडिकल सेंटर आणि इतर संस्थांच्या शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले.

टिश्यूतील मोठ्या आणि कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल्सची चाचणी
शास्त्रज्ञांनी या अभ्यासामध्ये सामील असलेल्या विविध वयोगटातील आणि वंशाच्या 654 पुरुष आणि स्त्रियांच्या रक्ताचे बारकाईने परीक्षण केले. यानंतर वॉलंटियर्सनी पाच महिने एरोबिक व्यायाम केला. वॉलंटियर्सच्या व्यायामापूर्वी आणि नंतर दोन्हीही डेटा तपासणीतून कोणत्या प्रकारचा व्यायाम एखाद्या व्यक्तीसाठी योग्य आहे, हे समजू शकले. त्यांच्या टिश्यूजमध्ये बनलेले मोठे आणि कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल्स जेव्हा ब्लड स्ट्रीममध्ये रिलीज झाले, तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित केले गेले.

व्यायामाशी संबंधित 147 प्रथिने
147 प्रथिने लोकांच्या बेसिक फिटनेसशी संबंधित असल्याचे निष्कर्षांतून दिसून आले. प्रथिनांची संख्या कमी किंवा जास्त असल्यावरुन लोकांच्या फिटनेसबद्दल समजते. तसेच शास्त्रज्ञांनी स्टेट ऑफ द आर्ट मॉलिक्युलर टूल्सच्या उपयोगातून रक्तात आढळणाऱ्या अशा 102 प्रथिनांचा शोध लावला, ज्यांची पातळी हे सांगते की, व्यायामाने व्यक्तीची एरोबिक क्षमता कुठपर्यंत वाढते.

मॉलिक्यूलर प्रोफायलिंग साधनांची मदत मिळणार
डॉ. रॉबर्ट म्हणाले की, अभ्यासाच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की, मॉलिक्यूलर प्रोफाइलिंग टूल्स सर्वोत्तम व्यायामाच्या योजनेत मदत करतील.

यात आणखी संशोधनाची गरज असली तरी रक्त तपासणीतून योग्य व्यायाम शोधण्याच्या दिशेकडे हे एक चांगले पाऊल असल्याचे सिद्ध होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...