आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMC अर्थसंकल्पातील 52 हजार कोटी कुठे-कुठे खर्च होणार:वाचा, बजेटची 10 ठळक वैशिष्ट्ये, महापालिकेचा इतिहासही घ्या जाणून...

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी शनिवारी बीएमसीचा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला आहे. बीएमसीच्या इतिहासात अर्थसंकल्पाने प्रथमच 50 हजार कोटींचा आकडा पार केल्याचे पालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जाणून घेऊया बीएमसीच्या यंदाच्या अर्थसंकल्पाची 10 मुख्य वैशिष्ट्ये...

1) मुंबई महापालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, इतिहासात पहिल्यांदाच 50 हजार कोटींचा आकडा पार केला

2) मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासकांनी सादर करण्याची 1985 नंतर ही पहिलीच वेळ

3) मुंबईसाठी सर्वात महत्वाचा ठरू शकणाऱ्या गत ठाकरे सरकारच्या महात्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी 3,545 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद

4) बजेटच्या 52 टक्के म्हणजेच 27,247 कोटींची रक्कम भांडवली खर्चावर तर 48 टक्के म्हणजेच 25,305 कोटींची रक्कम महसूलावर खर्च होणार

5) गोरेगाव-मुलूंड लिंक रोडसाठी 1060 कोटींची तरतूद

6) वाहतूक आणि रस्ते प्रकल्पांसाठी 2825 कोटींची तरतूद

7) मुंबई तुंबू नये यासाठी सुमारे 2800 कोटींची तरतूद

8) "हिंदूह्यसम्राट बाळासाहेब ठाकरे- आपला दवाखाना"साठी अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतूद

9) विविध प्रसूतिगृहांसाठी अर्थसंकल्पात 1680.19 कोटींची तरतूद

10) टिळक पूल (दादर), रे रोड रेल्वे पूल आणि भायखळा पूर्व पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 2100 कोटी रुपयांचा निधी

भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. मुंबई महापालिकेकडे 90 हजार कोटींच्या ठेवी आहेत.

मुंबई महापालिकेच्या इतिहासाविषयी थोडक्यात

  • 1805- असंघटीत पद्धतीने महानगरपालिकेचे गठन.
  • 1845- महापालिकेच्या निधीच्या व्यवस्थापनासाठी नागरी सप्तप्रधान मंडळाची स्थापना
  • 1858- त्रिसदस्य आयुक्त मंडळाची स्थापना.
  • 1865- एक महापालिका आयुक्त आणि जस्टिसेस् ऑफ पीस मिळून बनलेल्या मंडळाची स्थापना. गव्हर्नर सर बॅटल फ्रेरेंनी सर ऑर्थर क्रॉफर्ड यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. क्रॉफर्ड यांनी शहरात अनेक सकारात्मक बदल केले. त्यांचेच नाव क्रॉफर्ड मार्केटला देण्यात आले आहे.
  • 1872- 64 सदस्य असलेल्या महापालिकेची रीतसर स्थापना. करदात्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला (मुंबई अधिनियम क्र. 3-1872).
  • 1873- लोकशाही पध्दतीवर आधारित महानगरपालिकेची पहिली सभा, दिनांक 4 सप्टेंबर 1873 रोजी भरली.
  • 1907- प्राथमिक शिक्षणविषयक संपूर्ण जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आली.
  • 1922- फक्त करदात्यांऐवजी, भाडेकरुंनाही मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. (मुंबई अधिनियम क्र. 4).
  • 1931- अध्यक्ष हे नामाभिधान महापौर याप्रमाणे बदलण्यात आले. (मुंबई अधिनियम क्र. 21).
  • 1933- दि. 1 ऑक्टोबर 1933 रोजी सुधार विश्वस्त मंडळ हे मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आले. (मुंबई अधिनियम क्र. 13-1933).
  • 1947- दि. 7 ऑगस्ट 1947 रोजी ’बेस्ट“ कंपनी लिमिटेड महानगरपालिकेत विलीन झाली.
  • 1950- उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आले. (मुंबई अधिनियम क्र. 7-1950).
  • 1952- मुंबई महानगरपालिका खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी संस्था बनली. (मुंबई अधिनियम क्र. 48-1950).
  • 1957- विस्तारित उपनगरे महानगरपालिकेत विलीन करण्यात आली. (मुंबई अधिनियम क्र. 58-1956).
  • 1963- 140 एकसदस्य मतदारसंघांची स्थापना म्हणजेच वॉर्डांची निर्मिती.
  • 1968- महापालिकेची पहिली निवडणूक घेण्यात आली. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 33-1966).
  • 1972- महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून मराठीस (राज्यभाषा) मान्यता देण्यात आली.
  • 1973- महानगरपालिकेची शताब्दी साजरी करण्यात आली.
  • 1976- अनुसूचित जातींच्या नगरसेवकांकरिता मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले.
  • 1982- महापालिकेची सदस्यसंख्या 140 वरून 170 इतकी वाढविण्यात आली.
  • 1984- दि. 1 एप्रिल 1984 पासून प्रशासकाची नियुक्ती.
  • 1985- प्रशासकाची नियुक्ती चालू ठेवण्यात आली. दि. 25 एप्रिल 1985 रोजी 170 जागांसाठी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.
  • 1991- एकसदस्य मतदारसंघांची संख्या 221 इतकी निश्चित करण्यात आली.
  • 1992- महिलांकरिता 30 टक्के जागांच्या आरक्षणासह 221 जागांसाठी नववी सार्वत्रिक निवडणूक.
  • 2002- सदस्यांची संख्या 221 वरुन 227 करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...