पहिल्यांदाच आई झाल्या आहात ही बातमी वाचा:बाळ झोपलेले असेल दूध पाजणे टाळा, सतत रडत असेल तर आईला बदलावा लागेल आहार
जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदा आई होते तेव्हा मातृत्वाशी संबंधित अनेक गोष्टी तिच्यासाठी नवीन असतात. बाळाला दूध पाजतानाही तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
आज कामाच्या गोष्टीत आपण स्तनपानासंबंधी काळजी कशी घ्यायची आणि आईने बाळाला दूध पाजताना कसे बसावे? याबद्दल जाणून घेऊ..
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत स्त्रीरोगतज्ञ डॉ.रितू सेठी आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप जैन यांच्याकडून जाणून घेऊ..
सर्वप्रथम WHO काय म्हणते ते पहा-
- 6 महिन्यांपर्यंतच्या बाळांना पूर्णपणे स्तनपान दिले पाहिजे. म्हणजेच, त्याला फक्त आईचे दूध द्या.
- 2 वर्षापर्यंतच्या बालकांना बाहेरील दुधासोबत आईचे दूध पाजावे.
- 6 महिन्यांपर्यंत, बाळाचा आहार पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असतो, म्हणून मातांनी त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
बाळाच्या जन्मानंतर आईने बाळाला पहिल्यांदा दूध कधी पाजावे?
- जेव्हा आई पहिल्यांदा बाळाला आपल्या मिठीत घेते तेव्हाच दूध पाजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- बाळाच्या जन्मानंतर आईचे शरीर विशेष दूध तयार करते, ज्याला कोलोस्ट्रम म्हणतात.
- हे दूध बाळाला अनेक प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवते.
लक्षात घ्या..
- आईला झोप येत असेल तर झोपताना बाळाला दूध पाजणे टाळा.
- स्तनपानाच्या वेळी काही अडचण येत असेल तर धीर धरा.
- ब्रेस्ट फीडिंगच्या सरावाने आई परिपूर्ण होऊ शकते.
बाळाला किती वेळा दूध पाजायला हवे?
- बाळाला वारंवार दूध पाजल्याने आईच्या स्तनात दूध तयार होऊ लागते.
- नवजात बालकांना दिवसातून 8 ते 12 वेळा दूध पाजले जाऊ शकते.
- जेव्हा भूक लागते तेव्हा बाळ संकेत देते जे आईला समजले पाहिजे.
- भूक लागताच बाळ हातपाय हलवते.
- जास्त भूक लागताच मूल जोरजोरात रडू लागते.
स्तनपान करणाऱ्या आईचा सकाळपासून रात्रीपर्यंतचा आहार कसा असायला हवा?
- सकाळपासून रात्रीपर्यंत आईच्या आहारात 3 वेळा जेवण आणि 3 नाश्ता असावा.
- मानवी दुधात 90% पाणी असते, आई जितके जास्त पाणी पिईल तितक्या अजस्त दुधाची निर्मिती होईल.
- हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने अशक्तपणाचा त्रास होणार नाही आणि हे सर्व दुधाद्वारे बाळाला मिळते.
- हाय प्रोटीन आहाराने आईच्या शरीरात ऊर्जा राहील, सुस्ती येणार नाही आणि बाळही निरोगी राहील.
- दलिया, साबुदाणा, मसूर डाळ, हे सर्व दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढवतात. याचा दररोजच्या आहारात समावेश करा.
- स्तनपान करणाऱ्या महिलांनी डेअरी प्रॉडक्ट्सपासून दूर राहावे. त्यामुळे गॅसचा त्रास होतो.या काळात दही खाणे चांगले असून दह्यामध्ये प्रोटिन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यासोबतच यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे स्तनपान करताना पचन चांगले राहते.
जन्मानंतर दोन-तीन महिने बाळांना पोटशूळ म्हणजेच (पोटात वेदनांचा त्रास) होतो. अनेक वेळा नवजात बालक सतत रडत राहिल्याने त्यांच्या पोटात दुखते. जर आई बाळाला निरोगी आणि योग्य प्रकारे दूध पाजत असेल, तरीही बाळ 3 तासांपेक्षा जास्त रडत असेल, तर समजा की बाळाला पोटशूळ झाला आहे.
जर मुलाला पोटशूळ असेल तर आईने स्वतःला अशा प्रकारे तयार केले पाहिजे..
- आईने असे काहीही खाऊ नये ज्यामुळे पित्ताचा त्रास होतो.
- कोबी, ब्रोकोली अशा गोष्टी ज्यामुळे गॅसचा त्रास होतो ते खाणे टाळा.
- मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
- दूध पाजल्यानंतर बाळाने ढेकर दिल्याची खात्री करून घ्या.
- बाळाला थोड्या अंतराने दूध पाजा म्हणजे दूध पचेल.
स्तनपान करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवा
- आहार निरोगी ठेवा, पालेभाज्या घ्या, प्रोटीनयुक्त आहार घ्या.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अन्नात अतिरिक्त कॅलरीज घेऊ नका.
- भरपूर पाणी प्या, कॉफी, कोल्ड आणि एनर्जी ड्रिंक्स टाळा.
- बाळाला नियमित स्तनपान करा वरचे खाद्य देऊ नका.
- स्तनपानच्या वेळी तणाव टाळा
- विश्रांती आवश्यक आहे कारण सर्व ब्रेस्ट फीडिंग हार्मोन्स मेंदूमधून रिलीज होतात.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
स्तनपान करताना काय खाणे टाळावे?
- आहार निरोगी नसेल तर दुधाचे प्रमाण कमी होते.
- जर्नल पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कॅफीन आईच्या शरीरातून दुधापर्यंत पोहोचू शकते.
- जेव्हा बाळ दूध पिते तेव्हा त्याचे पोट कॅफिन पचवू शकत नाही.
- त्या कमी वयात बाळांच्या पोटात गॅस्ट्रिक ज्यूस चे प्रमाण मोठ्यांपेक्षा कमी असते.
- चॉकलेट, चहा, कोल्ड्रिंक्स, सोडा पिणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते.
- स्तनपान करणाऱ्या महिलांनी मध्यपान टाळावे.
- स्तनपान करत असताना ज्या सीफूडमध्ये पाऱ्याचे परिमाण अधिक असते ते खाणे टाळावे.