आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Breathprint Will Tell If There Is An Infection In The Stomach, Ulcer Or Cancer; Accurate Diagnosis Than Endoscopy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:श्वासाच्या ब्रीथप्रिंटने समजेल पोटात संसर्ग आहे की अल्सर वा कर्करोग; एंडोस्कोपीपेक्षा अचूक निदान

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोलकाता एनसीबीसीच्या शास्त्रज्ञांकडून विकसित तंत्र

सaडलेल्या श्वासाच्या (उच्छ्वास) ब्रीथप्रिंटद्वारे पोटातील संसर्ग, अल्सर किंवा कर्करोगाचे अचूक निदान करता येणार आहे. कोलकात्यातील एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी पोटातील संसर्गापासून आतड्याच्या कर्करोगापर्यंतचे विषाणू ओळखण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. यात एखाद्या रुग्णाच्या श्वासाचा नमुन्यातून पोटाच्या आजाराची प्राथमिक स्तरावर माहिती होईल. याला ‘पायरो-ब्रीथ’ असे नाव देण्यात आले आहे. केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. माणिक प्रधान यांनी सांगितले,‘पायरो-ब्रीथ’ एका प्रकारे गॅस अॅनालायझर आहे. ते परतलेल्या श्वासांत असलेला वायू व कणांचे विशेष प्रकारची ब्रीथ-प्रिंट स्कॅन करतो. ब्रीथ-प्रिंट ही फिंगरप्रिंटप्रमाणे आहे. ती एका व्यक्तीची दुसऱ्याशी जुळत नाही. कोलकात्यातील साल्टलेक येथील एएमआरआय रुग्णालयात एक हजारांहून अधिक रुग्णांवर याचे प्रोटोटाइप परीक्षण घेण्यात आले. ही चाचणी एंडोस्कोपीच्या तुलनेत ९६% अचूक निदान करते. याचे पेटंट झाले असून टेक्नॉलॉजी ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू आहे. याचे व्यावसायिक उत्पादन पुढील वर्षांपासून सुरू होईल. डॉ. प्रधान म्हणाले, पथकाने पाण्याचे अनेक घटक म्हणजे आयसोटोप्सचा अभ्यास केला. हेलिकोबॅक्टर पायलोरी हा पोटात संसर्ग करणारा एक जीवाणू आहे. जर सुरुवातीलाच उपचार न केल्यास तो पेप्टिक अल्सर आणि पोटाचा व आतड्याच्या कर्करोगाची निर्मिती करू शकतो. आजवर या रोगासाठी एंडोस्कोपी अथवा बायोप्सी करण्याची गरज होती. ती खूप वेदनादायी प्रक्रिया आहे. या तंत्राने वृद्ध, नवजात आणि गर्भवती महिलांना याचा जास्त फायदा होईल.

चाचणीचा खर्च १०० रु.तर एंडोस्कोपीसाठी २.५ हजार

डॉ. प्रधान आणि पाच संशोधकांच्या पथकाने संशोधन केल्यानंतर ‘पायरो-ब्रीथ’ नावाचे उपकरण विकसित केले आहे. बाजारात याची किंमत दहा लाख रुपयांपर्यंत असेल. याउलट एंडोस्कोपी यंत्राची किंमत २५ लाख रुपयांपर्यंत असते. एंडोस्कोपीसाठी अडीच हजार रुपये लागतात. १०० रुपयांपेक्षाही कमी खर्चात याची चाचणी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...