आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट बरोबरीचीब्रिटनमध्ये मुला-मुलींसाठी कॉमन टॉयलेट:'मुलीला सासर, मुलाला शेत' देणाऱ्यांना 'जेंडर न्यूट्रल'ची गोष्ट म्हणजे चंद्र गाठण्यासारखी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या 70 व्या वर्षी ते सज्जन प्रथमच अमेरिकेला गेले. बिहारच्या एका सरंजामशाही घरात जन्मलेल्या व पुरुषसत्ताक वातावरणात वाढलेल्या या व्यक्तीला जेंडरच्या बाबतीत बदलणारे जग अगोदरच आवडत नव्हते. त्यांच्या नोकरदार पत्नीने नोकरीसह घर-कुटुंबाची जबाबदारी एकटीने सांभाळत त्यांच्याकडून कोणत्याही भागीदारीची व मदतीची अपेक्षा ठेवली नाही. या गोष्टीसाठी त्यांनी कधीच तक्रारही केली नाही.

मुलींनी शिकावे, नोकरी करावी, पैसा कमवावा यावर त्यांचा आक्षेप नव्हता. पण त्यांनी आई, पत्नी, सून व मोलकरीण या त्यांच्या इतर भूमिकांशी तडजोड करू नये, विशेषतः पुरुषांवर कोणताही सवाल उपस्थित करू नये असे त्यांना वाटत होते.

अमेरिकेत राहणारा आपला मुलगा आपल्या पत्नीला घरकामात मदत करायचा, वॉशिंग मशिनमध्ये कपडे घालायचा, बाळाचे डायपर बदलायचा, भांडी घासायचा व स्वयंपाक बनावयचा यावरही त्यांचा आक्षेप नव्हता.

पण या सर्व गोष्टींबद्दल त्यांची सून आपल्या नवऱ्याचे आभार मानण्याऐवजी ते त्याचे नैसर्गिक कर्तव्य आहे अशा पद्धतीने वागत होती, याचे त्यांना वाईट वाटत होते.

त्यांना खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीच्या मुलाने म्हणजे त्यांच्या नातीने नानांना सांगितले की तो मुलगा किंवा मुलगी नाही. त्याचा जेंडरच्या या बायनरींवर विश्वास नव्हता. आपल्या आजोबांनी आपल्याला He किंवा She च्या जागी They म्हणावे असे त्याला वाटत होते.

काही वर्षे लोटली, पण आजतागायत ते या धक्क्यातून सावरले नाही. जगात नॉन बायनरी लोकांची व जेंडर न्यूट्रल लोकांच्या तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली, पण त्यांना अद्याप स्त्री-पुरुष समानतेची बाब पचनी पडली नव्हती.

अशा लोकांची, जे स्वतःला न पुरुष मानतात, न स्त्री. ते ट्रान्सजेंडरही नसतात. ट्रान्स वूमेनही नसतात. LGBTQ ही नाही. त्यांची केवळ आपल्याला जेंडरच्या मर्यादेत बांधू नका, एवढी माफक इच्छा असते. ते जे आहेत, ते त्यांना तसे होऊ द्या, त्यांना तसे राहण्यासाठी स्वतंत्र राहू द्या.

आयडेंटिटी पॉलिटिक्सचा हा नवा मोर्चा आहे. नवी लढाई. जी इतर युद्धांच्या विरोधात स्वतःचे मुद्दे व प्रश्न घेऊ उभी आहे. जुने लोक, ज्यांना आजही फेमिनिस्ट आयडेंटिटी, फेमिनिस्ट पॉलिटिक्स आंदोलनाच्या गोष्टी सहज पचत नाहीत, त्यांच्या डोक्यावर हा नवा बॉम्ब फुटला आहे.

त्यामुळे आजही नॉन बायनरी लोकांचे प्रश्न महिलांचे स्वातंत्र्य व समानतेच्या प्रश्नांशी व त्यांच्या अधिकारांच्या संघर्षाशी कसे संबंधित आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.

वॉशिंग्टन पोस्टने काही दिवसांपूर्वीच एका प्रदिर्घ लेखाद्वारे एक खास भाकित वर्तवले होते की, नॉन बायनरी लोकांची संख्या वाढल्यामुळे समाज अधिकाधिक जेंडर न्यूट्रल होत जाईल. याचा अर्थ समाजातील स्त्री-पुरुषांतील लिंगभेद मुळासकट नष्ट करणे.

सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटपासून जिथे-कुठे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळा बोर्ड लावलेला असतो, ते सर्वकाही संपणार. केवळ एकच ओळख राहील, की आम्ही सर्व मनुष्य आहोत. आम्ही सर्व समान आहोत.

प्यू रिसर्च सेंटरचा एक अभ्यास सांगतो की, 1997 नंतर अमेरिकेत जन्मलेले 35% तरुण स्वतःला नॉन बायनरी किंवा जेंडर न्यूट्रल मानतात. एखाद्या देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला स्वतःच्या जेंडर आयडेंटिटीची अडचण वाटत असेल, तर याचा अर्थ आहे की, समाजातील पुरुष व स्त्री भेद हळू-हळू मिटत आहे.

पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जेंडर बायनरी संपल्याने समाजातील लिंग भेदभाव संपणार का? तुम्ही स्वतःला काहीही मानत असाल, स्त्री किंवा पुरुष मानत असाल, साडी किंवा स्कर्ट किंवा जींस किवा पँट घालत असाल, तरीही एक विशिष्ट शारीरीक संरचना, बनावट व ओळखीमुळे एका जेंडरला शतकानुशतकांपासून जे प्रिव्हिलेज प्राप्त आहे, ते कसे संपेल?

जगातील 90% संसाधनावर आजही पुरुषांची मालकी आहे. हा भेद मिटेल? एका विशिष्ठ शारीरीक संरचनेमुअळे महिलांवर रेप, हिंसाचार, छेडछाड व शोषणाच्या घटना होतात, त्या संपतील?

खरे सांगायचे तर देशातील बहुसंख्य लोकसंख्येसाठी प्यूचे हे संशोधन व त्याचे निष्कर्ष मंगळ ग्रहाहून आलेल्या एखाद्या एलियनहून कमी नाहीत. त्यांची स्थिती अमेरिकेला गेलेल्या त्या 70 वर्षांच्या व्यक्तीसारखीच आहे.

आपल्या समाजाने अजून येथे किती लिंग भेदभाव आहे व महिलांवरील ऐतिहासिक अन्यायाची मुळे आजही किती खोलवर रूजली आहेत हे मान्य केले नाही.

भारतात अनेक प्रयत्नांनंतरही नोकरीतील महिलांची भागीदारी 20% वर गेली नाही. लीडरशीपमध्येही त्या केवळ 2% आहेत. देशाच्या संसदेतही त्यांचे 10% प्रतिनिधीत्व जगातील सर्वात निम्न पातळीवरील देशांहून थोडेफार चांगले आहे.

जेव्हा शरीरात कॅन्सर वाढत असेल तर मेंटल व इमोशनल हेल्थच्या गोष्टी करणे थोडे हास्यास्पद वाटते. मानसिक आरोग्याचा प्रश्न तेव्हा उपस्थित होईल, तेव्हा शरीराची प्रकृती ठीक असेल. येथे लिंग समानतेची लढाईही योग्यपणे लढली जात नाही. येथील लोक या युद्धांपासून दूर जात आता जेंडर बायनरीच संपवण्याची मागणी करत आहेत. त्यांची स्त्री व पुरुषांच्या सर्वच ओळखी आकाशात फेकण्याची इच्छा आहे.

अमेरिकेसह संपूर्ण जगातील विकसित देशांत होणाऱ्या सुधारणा माझ्या देशासाठी जिज्ञासेचा, ज्ञानाचा विषय असू शकेल, पण ती चिंतेची गोष्ट कदापी नाही. कारण, माझ्या देशाने अजून स्वतःच्या खऱ्या चिंतांचीही खरी काळजी केली नाही.

या देशातील सर्वात मोठ्या न्यायपालिकेलाही नियमित महिलांशी संबंधित आपल्या दर तिसऱ्या निर्णयांत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टीचा पुनरुच्चार करावा लागतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना समान दर्जा आहे. त्यांना बरोबरीचा अधिकार आहे, हे निक्षूण सांगावे लागते. जगातील कोणत्याही विकसित देशात सध्या हे होत नाही. जग या मूळ विचारापासून दूर गेले आहे.

आपण समानतेसाठी कायदा करत आहोत. पण महिलांना ती समानता मिळत नाही. कारण, कुटुंबात बसलेल्या पुरुष प्रमुखाला कायद्याशी काही देणेघेणे नाही. मुलाला शेत व मुलीला सासर मिळेल असा त्याचा स्वतःचा कायदा आहे.

कौटुंबिक हिंसाचार गुन्हा असल्याचे कायदा सांगतो, पण घरच्या प्रमुखाला त्याचा कोणताही धाक नाही. त्यामुळे तो आपल्या मुलीवर घटस्फोटाचा शिक्का बसू नये म्हणून तो वारंवार तिला पुन्हा सासरी पाठवण्याचा आग्रह धरतो.

हुंडा घेणे गुन्हा आहे, असे कायदा सांगतो. पण कुटुंबातील पुरूष मुलीच्या लग्नात हुंडा देतो व मुलाच्या लग्नात घेतो. कायद्याने बलात्कारासाठी कठोर कायदा केला आहे. पण एखादी महिला एकटी सापडली तर आजही पुरुषांच्या कामवासना अजूनही नियंत्रणाबाहेर जाते हे वास्तव आहे.

लैंगिक बायनरींचे निर्मूलन हे समाज सुधारणा व समानतेच्या दिशेने उचलेले एक पुढचे पाऊल निश्चितच असू शकते. पण सध्यातरी आपल्या देशासाठी हे पाऊल चंद्राएवढेच दूर आहे. कारण, आपल्या आजही आपल्याच मातीत चांगले चालताही येत नाही.