आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड शहराच्या शीख असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिरा बा यांना शेतकरी आंदोलनासंदर्भात पत्र लिहिले आहे. ब्रिटिश एज्युकेशनल अँड कल्चरल असोसिएशन ऑफ शीख (BECAS) ने 14 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, काही लोक शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात पंजाबच्या मातांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. असे व्हायला नाही पाहिजे आणि या प्रकरणी तुम्ही तुमच्या मुलाशी बोलावे असे आवाहनही या पत्रात करण्यात आहे.
BECAS चे अध्यक्ष त्रिलोचन सिंग दुग्गल म्हणाले की, "काही महिला भाजपच्या समर्थनात पंजाबच्या मातांबद्दल दुशप्रचार करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने सुद्धा त्यांच्याविषयी अपशब्दाचा उपयोग करते. तसे होऊ नये."
काय लिहिले पत्रात?
आदरणीय श्रीमती हीराबेनजी,
मोठ्या खेदाने आम्ही आपले पुत्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचे आवाहन करतो. तुम्ही जशा मोदींच्या आदरणीय आई आहात त्याच प्रकारे सर्व मातांचा आदर केला पाहिजे. भारतातील प्रत्येक राज्यात माता समान रुपाने सन्मानित आहे आणि प्रत्येक कुटुंबात त्यांना एक विशेष दर्जा मिळतो. काही भाजप समर्थक अभिनेत्री पंजाबच्या त्या मातांची बदनामी करीत आहेत, ज्या शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनात सामील झाल्या आहेत.
आम्ही मोदीजी आणि त्यांच्या सरकारला आवाहन करतो की, पंजाबच्या मातांबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्यांना थांबवावे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. आपण देशातील आई आणि बहिणींचा सन्मान करण्याची भारतीय परंपरा टिकविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल, अशी आम्हाला आशा आहे.
लोकांचे म्हणणे ऐकणे हे नेत्याचे कर्तव्य
त्रिलोचन सिंग दुग्गल म्हणाले की, "सर्वांना त्यांचा अधिकार मिळायला हवा. भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही हा लोकांच्या मनाचा आवाज आहे. लोक त्यांचा नेता निवडतात. अशा परिस्थितीत लोकांचे ऐकणे एखाद्या नेत्याचे कर्तव्य बनते. आई पंजाबची असो की इतर कुठल्याही राज्यातली. आपण मानवता समजून घ्यायला हवी."
कंगनाच्या विधानानंतर हीरा बा यांना पत्र लिहिण्याचा विचार केला
दुग्गल यांनी सांगितले की, "कंगना रनोट यांच्यासह काही महिला भाजपला पाठिंबा देतात आणि ते मातांबद्दल वाईट भाषा वापरतात. आमच्याकडून हे भावनिक आवाहन आहे की कंगना रनोट देखील एक भारतीय असून भारतातील प्रत्येक मुलीचा आदर केला पाहिजे. जर तिने चूक केली असेल तर पंतप्रधानांनी तिला वडिलकीच्या नात्याने रोखले पाहिजे."
कंगनाने तिच्या एका पोस्टमध्ये शेतकरी चळवळीत सामील वृद्ध महिला शाहीन बागेची आजी असल्याचे सांगत म्हटले होते की, ती 100 रुपयांत आंदोलनात सहभागी होते.
आमच्याकडे हीरा बा यांचा पत्ता नाही
दुग्गल म्हणाले की, "आमच्याकडे हीरा बा यांचा पत्ता नाही. म्हणून आम्ही आमच्या इंटर्नल सर्कलमध्ये पत्र सर्क्युलेट केले होते. आम्हाला आशा आहे की हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल. या संदर्भात आम्ही पंतप्रधान किंवा कोणत्याही सरकारी संस्थेशी संपर्क साधला नाही."
BECAS भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देते
BECAS परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलांना भारतीय संस्कृतीची माहिती देते. ही संघटना भारताच्या परंपरेशी संबंधित कौटुंबिक मूल्यांची माहिती देण्यासाठी उपक्रम राबवते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.