आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरब्रिटिशांच्या साम्राज्यावर कधीही मावळत नव्हता सूर्य:तब्बल 3.5 कोटी चौरस किमीवर होती सत्ता, आता त्याच्या 1 टक्काही उरले नाही

अभिषेक पांडे/नीरज सिंह17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटीश साम्राज्य पुन्हा चर्चेत आले आहे. 70 वर्षांपूर्वी जेव्हा एलिझाबेथ द्वितीय राणी बनली, तेव्हा ब्रिटन हे जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते, परंतु एलिझाबेथच्या कारकिर्दीला सुरूवात होण्याआधीच या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला होता आणि जवळजवळ संपला आहे.

या एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुम्हाला राणी एलिझाबेथ-द्वितीय यांच्या समोरच जगाच्या नकाशावरून कमी झालेले ब्रिटीश साम्राज्य, करोडो किलोमीटर वरुन लाखोंमध्ये कसे आले, याची माहिती देत आहोत.

20 व्या शतकात ब्रिटीश साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता

ब्रिटीश साम्राज्य हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य आहे. 16व्या शतकानंतर ब्रिटनने आपल्या देशाबाहेर जगात पाय पसरायला सुरुवात केली. 16व्या ते 18व्या शतकापर्यंत, ब्रिटनने फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगालसारख्या युरोपीय शक्तींना मागे टाकत जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा पाया रचला.

19व्या शतकात एक काळ असा होता, जेव्हा ब्रिटीश साम्राज्याने जगाचा एक चतुर्थांश भाग व्यापला होता. ब्रिटीश साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नाही अशी एक म्हण त्याकाळी प्रसिद्ध झाली होती.

100 वर्षात ब्रिटिश साम्राज्य कसे कमी झाले ते तीन नकाशांद्वारे पाहा...

नकाशावर लाल रंगातील देश ब्रिटिश साम्राज्य म्हणून दाखवले आहेत.
नकाशावर लाल रंगातील देश ब्रिटिश साम्राज्य म्हणून दाखवले आहेत.
नकाशावर लाल रंगातील देश ब्रिटिश साम्राज्य म्हणून दाखवले आहेत.
नकाशावर लाल रंगातील देश ब्रिटिश साम्राज्य म्हणून दाखवले आहेत.
नकाशावर लाल रंगातील देश ब्रिटिश साम्राज्य म्हणून दाखवले आहेत.
नकाशावर लाल रंगातील देश ब्रिटिश साम्राज्य म्हणून दाखवले आहेत.

एकेकाळी जगाच्या 26% भूभागावर आणि 25% लोकसंख्येवर ब्रिटीश राजवट होती

19व्या आणि 20व्या शतकात ब्रिटिश साम्राज्य हे जगातील सर्वात मोठे साम्राज्य बनले. या काळात ब्रिटनने जगातील 80 देशांवर आणि बेटांवर राज्य केले. 1913-1922 दरम्यान, ब्रिटीश साम्राज्याने जगातील 25% किंवा 45 कोटी लोकसंख्येवर कब्जा केला.

त्या वेळी 3.5 कोटी चौरस किलोमीटर म्हणजेच जगातील सुमारे 26% क्षेत्र या साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते, यावरुनच ब्रिटीश साम्राज्याच्या विशालतेचा अंदाज लावता येतो.

1952 मध्ये एलिझाबेथ राणी बनली तेव्हा 55 देशांवर ब्रिटिशांची सत्ता होती

राणी एलिझाबेथ द्वितीय 1952 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी ब्रिटनची महाराणी बनली. तोपर्यंत ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य मावळायला लागला होता, पण तरीही जवळपास 55 देश आणि बेटे ब्रिटनच्या ताब्यात होती. यानंतर ब्रिटीश साम्राज्याचा झपाट्याने ऱ्हास झाला.

असे मानले जाते की 1997 मध्ये हाँगकाँग चीनच्या ताब्यात दिल्याने ब्रिटिश साम्राज्याचा अंत झाला.

सध्या ब्रिटीश साम्राज्य जगातील केवळ 14 बेटांवर मर्यादीत झाले आहे. यातील बहुतांश बेटे ओसाड आहेत आणि त्यांची एकूण लोकसंख्या केवळ 2.72 लाख चौरस किलोमीटर आहे.

यापैकी काही बेटे फक्त 50 चौरस किलोमीटरची आहेत आणि काहींची लोकसंख्या 100 पेक्षा कमी आहे. यापैकी सर्वात मोठे फॉकलँड बेटे आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 12 हजार चौरस किलोमीटर आहे.

कॉमनवेल्थमध्ये आता 56 देशांचा समावेश

1931 मध्ये स्थापन झालेला कॉमनवेल्थ हा अशा देशांचा एक समूह आहे ज्यावर एकेकाळी ब्रिटनचे राज्य होते. भारतासह एकूण 56 देश कॉमनवेल्थचे सदस्य आहेत. त्यापैकी 52 देशांवर ब्रिटनची सत्ता होती.

तर काही देश असे देखील आहेत, ज्यांवर कधीच ब्रिटनची सत्ता नव्हती. कॉमनवेल्थचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. हे राष्ट्रकुल देश दर 4 वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होतात.

  • आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप आणि पॅसिफिकमधील 56 देश कॉमनवेल्थचे सदस्य आहेत.
  • जगातील 42 सर्वात लहान देशांपैकी 32 राष्ट्रकुल सदस्य आहेत, प्रत्येकाची लोकसंख्या 1.5 लाख किंवा त्याहून कमी आहे.
  • 2.5 अब्ज लोक कॉमनवेल्थ देशांमध्ये राहतात, त्यापैकी 60% पेक्षा जास्त लोक 29 किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत.
  • असे 14 राष्ट्रकुल देश आहेत जे स्वतंत्र आहेत, परंतु त्यांचे राष्ट्रप्रमुख ब्रिटनची राणी किंवा राजा आहेत.
  • भारतासह 36 देश हे प्रजासत्ताक म्हणजे सार्वभौम आहेत, तर कॉमनवेल्थमधील 5 देशांमध्ये ब्रिटनच्या राजा किंवा राणीऐवजी स्वतःचे राजे आहेत.

आता नकाशात पाहा कोणत्या खंडातील किती देश कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट आहेत...

बातम्या आणखी आहेत...