आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हखुदीराम यांचा ब्रिटिशांवर बॉम्ब हल्ला:वयाच्या 18व्या वर्षी फासावर, लोक त्यांच्या राखेचे ताईत घालू लागले

शंभू नाथ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही कथा 1905 पासून सुरू होते जेव्हा, 14 वर्षाच्या मुलाने स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले. 1906 मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात काढलेल्या रॅलीतून त्याला ब्रिटिशांनी अटक करून तुरुंगात बेदम मारहाण केली. तो बाहेर पडला, बॉम्ब बनवायला शिकला आणि पुढच्याच वर्षी 1907 मध्ये त्याने बंगालच्या गव्हर्नरवर बॉम्ब टाकला. इतकेच नाही तर जानेवारी 1908 मध्ये दोन ब्रिटीश अधिकाऱ्यांवर बॉम्ब फेकून तो पळून गेले. काही महिन्यांनंतर, 30 एप्रिल 1908 रोजी, न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड यांची बग्गी उडवली त्या नंतर त्याला अटक करण्यात आली.

तीन महिन्यांनंतर, 11 ऑगस्ट रोजी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तो हसत-हसत फासावर गेला. या स्फोटात न्यायाधीश बचावले, मात्र, या मुलाने चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि अशफाकउल्ला या सारख्या अनेकांना मार्ग दाखवला. या मुलााचे नाव होते खुदीराम बोस... ते सर्वात लहान वयाचे हुतात्मा होते. असे वीर जे शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाले होते की, 'मी तुम्हालाही बॉम्ब बनवायलाही शिकवू शकतो.'

खुदीराम बोस यांना सुनावणीसाठी घेवून जातांना. न्यायालयात न्यायमूर्तींनी निकाल दिला तेव्हा खुदीराम हसले. त्यावर न्यायाधीश म्हणाले की, तुम्हाला शिक्षेचा अर्थ समजलेला दिसत नाही. त्यावर बोस म्हणाले, 'मला निकालाचा अर्थ पूर्णपणे समजला आहे. आणि वेळ मिळाल्यास मी तुम्हालाही बॉम्ब कसा बनवायचा हे शिकवेल.'
खुदीराम बोस यांना सुनावणीसाठी घेवून जातांना. न्यायालयात न्यायमूर्तींनी निकाल दिला तेव्हा खुदीराम हसले. त्यावर न्यायाधीश म्हणाले की, तुम्हाला शिक्षेचा अर्थ समजलेला दिसत नाही. त्यावर बोस म्हणाले, 'मला निकालाचा अर्थ पूर्णपणे समजला आहे. आणि वेळ मिळाल्यास मी तुम्हालाही बॉम्ब कसा बनवायचा हे शिकवेल.'

खुदीराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगालमधील (आताच्या पश्चिम बंगाल) मिदनापूर येथील हबीबपूर या छोट्याशा गावात झाला. पाटण्यापासून सुमारे 80 किमी अंतरावर मुझफ्फरपूर जिल्हा आहे, येथे तो रस्ता आजही दिसतो जिथे स्फोट करुन खुदीरामने ब्रिटिश राजवटीची झोप उडवली होती. ट्रॅफिक जॅमशी झुंज देत मी शहरातील कंपनी बाग परिसरात पोहोचलो तेव्हा मला दिवाणी न्यायालयाच्या भिंतीलगत खुदीराम बोस यांचे स्मारक दिसले. त्यावर लिहिले आहे - 'भारताचे सर्वात तरुण क्रांतिकारक अमर शहीद खुदीराम बोस यांचे स्मारक स्थळ.'

मुझफ्फरपूर दिवाणी न्यायालयाच्या भिंतीवर प्रफुल्लचंद चाकी आणि खुदीराम यांचे पुतळे आहेत. प्रफुल्ल यांनी 1 मे 1908 रोजी स्वत:वर गोळी झाडून घेतली. तर खुदीराम यांना 11 ऑगस्ट रोजी फाशी देण्यात आली.
मुझफ्फरपूर दिवाणी न्यायालयाच्या भिंतीवर प्रफुल्लचंद चाकी आणि खुदीराम यांचे पुतळे आहेत. प्रफुल्ल यांनी 1 मे 1908 रोजी स्वत:वर गोळी झाडून घेतली. तर खुदीराम यांना 11 ऑगस्ट रोजी फाशी देण्यात आली.

समोर दोन स्वातंत्र्यप्रेमी दिसतात. रुंद छाती, दनकड बाहू, चेहर्‍यावर स्वाभिमान असलेले हे पुतळे आहेत. मात्र, मूर्तींसमोर वाढलेली झुडपे, कारंजावरील शेवाळ, रंग उडलेल्या भिंती, बंद पडलेला बल्ब... सध्याच्या उपेक्षेची कथा सांगतात. मात्र, या स्मारकाच्या उभारणीचे श्रेय घेण्यासाठी अनेक दगडी फलकांची एकमेकांत स्पर्धा सुरू असल्याचे दिसते.

114 वर्षांनंतरही खुदीराम आणि प्रफुल्ल अन्यायाविरुद्ध उभे

कंपनी बाग आजही मुझफ्फरपूरच्या महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. त्यात सर्व आवश्यक सरकारी कार्यालये आणि जिल्हा न्यायालये आहेत. 600 किलोमीटरचा प्रवास करून खुदीराम आपला साथीदार प्रफुल्ल चंद चाकीसोबत याच ठिकाणी पोहोचले होते. दोघेही मुझफ्फरपूरला पोहोचले आणि 8 दिवस धर्मशाळेत राहिले. 30 एप्रिल 1908 रोजी, दोन साथीदार आंब्याच्या झाडामागे लपले आणि न्यायाधीश किंग्सफोर्डच्या बग्गीची प्रतीक्षा करू लागले. बग्गी पाहताच त्यांनी बग्गीवर बॉम्ब फेकून पळ काढला.

खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी मिळून न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड यांच्यावर बॉम्ब फेकला. यात न्यायाधीश वाचले मात्र, 30 एप्रिल 1908 च्या या घटनेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजला. क्रांतीची मशाल पेटवण्यात या घटनेने महत्त्वाची भूमिका बजावली.
खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी मिळून न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड यांच्यावर बॉम्ब फेकला. यात न्यायाधीश वाचले मात्र, 30 एप्रिल 1908 च्या या घटनेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजला. क्रांतीची मशाल पेटवण्यात या घटनेने महत्त्वाची भूमिका बजावली.

या घटनेला 114 वर्षे उलटून गेली, पण त्या काळातील सर्व इमारती आजही या शहरातील तीच कथा सांगत आहेत. ज्या क्लबमध्ये ब्रिटीश अधिकारी दारू प्यायचे, न्यायाधीशांचे घर आणि कार्यालयही येथे आहे. किंग्सफोर्ड या क्लबमधून बग्गीमध्ये परतणार होते मात्र, त्यांच्या जागी दोन महिला परत आल्या आणि तो वाचला. आज ते आंब्याचे झाड राहिले नाही, ज्याच्या मागे दोन्ही क्रांतिकारक लपून दिवसभर किंग्जफोर्डची वाट पाहत होते.

ज्या क्लबमध्ये ब्रिटीश अधिकारी दारू प्यायचे त्या क्लबच्या मुख्य गेटचे हे चित्र आहे. 1885 मध्ये ब्रिटीश सरकारने ते भाडेतत्त्वावर दिले होते.
ज्या क्लबमध्ये ब्रिटीश अधिकारी दारू प्यायचे त्या क्लबच्या मुख्य गेटचे हे चित्र आहे. 1885 मध्ये ब्रिटीश सरकारने ते भाडेतत्त्वावर दिले होते.

पुसा रोड रेल्वे स्टेशन नव्हे तर खुदीराम बोस रेल्वे स्टेशन म्हणा सर

बॉम्ब फेकल्यानंतर, खुदीराम बोस आणि प्रफुल्ल यांना वाटले की त्यांनी किंग्सफोर्ड मारला गेला. मात्र, नंतर त्यांना कळाले की, या बग्गीत त्यांच्या जागी ब्रिटीश बॅरिस्टर प्रिंगल केनेडी यांची पत्नी आणि मुलगी बसली होती. या हल्ल्यात दोघीही ठार झाल्या.

पोलिस खुदीराम आणि प्रफुल्लच्या मागे होते. त्यांना रेल्वे रुळाच्या मार्गावरुन मिदनापूरला परत यायचे होते. त्या दोघांप्रमाणेच मी मुझफ्फरपूरपासून मिदनापूरच्या दिशेने 40 किमी चालत निघालो, तर रस्त्यात वॅनी पुसा गावात पोहोचतो. हे तेच रेल्वे स्टेशन आहे, जिथे खुदीराम बोसला अटक करण्यात आली होती. मी जेव्हा या स्थानकाचा मार्ग विचारला तेव्हा एक स्थानिक तरुणाने मला अडवले आणि म्हणाला, 'पुसा रोड रेल्वे स्टेशन नाही खुदीराम बोस रेल्वे स्टेशन म्हणा सर. या जुन्या नावाने तुम्ही पोहोचू शकणार नाही.

न्यायाधीशांवर बॉम्ब फेकल्यानंतर, खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी दोघेही पोलिसांपासून वाचण्यासाठी रेल्वे रूळाच्या जवळून धावले. रात्रभर चालल्यानंतर दोघे 1 मे 1908 रोजी सकाळी पुसा रोड स्टेशनवर पोहोचले.
न्यायाधीशांवर बॉम्ब फेकल्यानंतर, खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी दोघेही पोलिसांपासून वाचण्यासाठी रेल्वे रूळाच्या जवळून धावले. रात्रभर चालल्यानंतर दोघे 1 मे 1908 रोजी सकाळी पुसा रोड स्टेशनवर पोहोचले.
स्थानिक लोक सांगतात की, बॉम्ब फेकून पळालेले बोस आणि प्रफुल्ल यांना भूक लागली. तेव्हा खाण्यासाठी येथे थांबले. यादरम्यान त्यांना पोलिसांनी ओळखले. बोस पकडले गेले तर प्रफुल्ल पळून गेले.
स्थानिक लोक सांगतात की, बॉम्ब फेकून पळालेले बोस आणि प्रफुल्ल यांना भूक लागली. तेव्हा खाण्यासाठी येथे थांबले. यादरम्यान त्यांना पोलिसांनी ओळखले. बोस पकडले गेले तर प्रफुल्ल पळून गेले.

पुसा रोड रेल्वे स्थानकापासून 53 किमी अंतरावर असलेल्या मोकामा स्थानकावर प्रफुल्लला पोलिसांनी घेरले. तो लढला आणि जेव्हा त्याला पकडले जाईल असे वाटले तेव्हा त्याने शेवटची गोळी झाडून स्वतःला मारले. ब्रिटीश हवालदाराने प्रफुल्लचा शिरच्छेद केला आणि त्याला मुझफ्फरपूर तुरुंगात नेले, जिथे खुदीरामने त्याला नमन केले. एवढ्यानेच ओळख पटली.

तुरुंग नव्हे, आमच्यासाठी तीर्थक्षेत्र!

ही कथा यानंतर मला घेऊन जाते मुझफ्फर सेंट्रल जेलमध्ये. ज्याला आता खुदीराम बोस सेंट्रल जेल म्हणूनही ओळखले जाते. या कारागृहातील एक कक्ष अजूनही रिक्त आहे. त्याच्या भिंतीवर लिहिले आहे- ‘एक बार विदाई देऊ मां घूरे आसी…हांसी-हांसी चोरबे फांसी देखबे भारतवासी।’ याचा अर्थ होतो की, 'आई मला एकदा निरोप दे, मी लवकरच परत येईन. संपूर्ण भारतातील लोक मला पाहतील आणि मी हसत हसत फासावर लटकेल.' येथे बोस यांना फाशी दिलेली जागा देखील आहे.

तुरुंगातील त्याच्या कोठडीशिवाय त्यांना ज्या दोरीने फासावर लटकवण्यात आले ती दोरी आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

खुदीराम बोस यांना याच तुरुंगात फाशी देण्यात आली. असे म्हणतात की जेलर जेव्हा कधी खुदीरामला पाहायचा तेव्हा तो हसत असल्याचेच दिसायचा. ज्याला फाशी द्यावी लागणार आहे तो इतका बेफिकीर कसा असू शकतो, असा प्रश्न जेलरला पडला होता.
खुदीराम बोस यांना याच तुरुंगात फाशी देण्यात आली. असे म्हणतात की जेलर जेव्हा कधी खुदीरामला पाहायचा तेव्हा तो हसत असल्याचेच दिसायचा. ज्याला फाशी द्यावी लागणार आहे तो इतका बेफिकीर कसा असू शकतो, असा प्रश्न जेलरला पडला होता.

भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.अजित कुमार सांगतात की खुदीराम यांच्यावर केवळ 5 दिवसांसाठी खटला चालवण्यात आला होता. बॉम्ब बनवून फेकल्याची कबुली खुदीरामन यांनीच दिली होती.

तुरुंगाबाहेर पानाचे दुकान लावणारे शंकर सांगतात की, आजही देश झोपलेला असताना, बोस यांच्या प्रत्येक पुण्यतिथीला म्हणजेच 11 ऑगस्टला आम्ही रात्री 2 वाजता तुरुंगात जाण्यासाठी रांगा लावतो. लोकांसाठी हे तुरुंग आहे, आमच्यासाठी ते तीर्थक्षेत्र आहे. मात्र, खुदीराम बोस यांच्या सेलमध्ये सहजासहजी प्रवेश दिला जात नाही.

खुदिराम बोसच्या धाडसाने ब्रिटिश न्यायाधीशही थक्क झाले होते

13 जून 1908 रोजी खुदीराम बोस यांना या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना विचारले, 'तुला या निर्णयाचा अर्थ कळला का?' यावर खुदीरामने उत्तर दिले, 'हो, मला समजले, माझे वकील म्हणाले की, मी बॉम्ब बनवण्यासाठी खूप लहान आहे. मात्र, तुम्ही मला संधी दिलीस तर मी तुम्हालाही बॉम्ब बनवायला शिकवू शकतो.’ खुदिरामच्या या उत्तराने न्यायाधीशही थक्क झाले होते.

मुझफ्फरपूर तुरुंगातील अनेक कथांपैकी एक कथा अशीही आहे की, त्यांना फाशी देणारा जल्लाद त्यासाठी तयार नव्हता. त्याला जबरदस्ती तयार करण्यात आले. फाशीनंतर तो बराच वेळ रडत होता.

11 ऑगस्ट 1908 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. नंतर त्यांची मोठी बहीण बंगालमधील मिदनापूरहून मुझफ्फरपूरला आली आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. बंगालमधून शेकडो लोक आले आणि त्यांची राख घेऊन गेले, त्यांच्या राखेचे ताईत बनवून त्यांनी परिधान केले.

त्याच्या हौतात्म्यानंतर, खुदीराम इतके लोकप्रिय झाले की बंगालच्या विणकरांनी एक विशिष्ट प्रकारचे धोती विणण्यास सुरुवात केली, ज्याच्या काठावर 'खुदिराम' लिहिलेले होते. बंगालमध्ये तरुण ते धोतर अभिमानाने घालत असत.

खुदीराम बोस यांनी तुरुंगाच्या भिंतीवर लिहिले होते- 'आई मला एकदा निरोप दे, मी लवकरच परत येईन. संपूर्ण भारतातील लोक मला पाहतील आणि मी हसत हसत फासावर लटकेल.'
खुदीराम बोस यांनी तुरुंगाच्या भिंतीवर लिहिले होते- 'आई मला एकदा निरोप दे, मी लवकरच परत येईन. संपूर्ण भारतातील लोक मला पाहतील आणि मी हसत हसत फासावर लटकेल.'

न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड यांनाच लक्ष्य का करण्यात आले?

कर्झनने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. या निर्णयाच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात अहिंसक आंदोलने करण्यात आली, त्याअंतर्गत विदेशी मालाची होळी करण्यात आली.

खुदीराम बोस आणि त्यांचे इतर क्रांतिकारक साथीदार चळवळीची रणनीती ठरवण्यासाठी अनेकदा ब्रिटीश अधिकाऱ्यांपासून लपून गुप्त बैठका घेत. बंगालचे अरबिंदो घोष 'वंदे मातरम' नावाच्या वृत्तपत्रात विदेशी मालाची होळी केल्याच्या बातम्या छापत होते, पण ब्रिटिश सरकारची दडपशाहीही चालूच होती.

तेव्हा न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड कलकत्त्यात (आता कोलकाता) बऱ्यापैकी कुप्रसिद्ध होते. त्याचे कारण म्हणजे क्रांतिकारकांना उघडपणे फटके मारण्यापासून ते विविध प्रकारच्या क्रूर शिक्षेपर्यंतचे निर्णय ते देत होते. इथेच खुदीराम बोस यांनी बदला घेण्याचे ठरवले आणि बिहारपर्यंत त्यांचा पाठलाग केला.

खुदीराम हे भगतसिंग-आझाद यांचे आदर्श

मुझफ्फरपूरच्या आरडीएस कॉलेजमधील राज्यशास्त्राचे माजी प्रमुख डॉ. अरुण कुमार सिंह म्हणतात की, किंग्सफोर्डवर बॉम्ब फेकण्यापूर्वी खुदीरामने बंगालच्या गव्हर्नरवर बॉम्ब फेकण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. त्या काळात जिथे काँग्रेस ब्रिटीश सरकारशी चर्चा करण्याचा सल्ला देत होती, तिथे बोस यांच्या हौतात्म्यानंतर असे क्रांतिकारक समोर आले ज्यांनी थेट ब्रिटिश सत्तेशी संघर्ष केला. 1907 मध्ये, कॉंग्रेसचे मवाळवादी आणि जहाल मतवादी पक्षात विभाजन झाले.

जहाल परंपरेत सामील असलेले शहीद भगतसिंग असो, राजगुरू असो, अश्फाक उल्ला खां असो किंवा चंद्रशेखर असो, या सर्वांवर खुदीराम बोस यांचा प्रभाव दिसून येतो. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रात या घटनेशी संबंधित संपादकीय लिहिले तेव्हा त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली.

या हौतात्म्याचा परिणाम बिहारच्या तरुणांवर बराच काळ दिसला, अजित सिंह यांच्या मते, पुढील 20 वर्ष संपूर्ण उत्तर बिहारमध्ये नवीन क्रांतिकारांमध्ये सक्रियता दिसून आली.

नेहरूंनी मुझफ्फरपूरला येण्यास नकार का दिला?

खुदीराम बोस यांच्यावर माहितीपट बनवणारे सीके पाराशर यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही भारतात खुदिराम यांच्या बाबत वाद सुरूच होता. बोस यांच्या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी करावे अशी स्मारक समितीची इच्छा होती. नेहरूंच्या सचिवाने एका पत्रात उत्तर दिले की बोस हे मूलगामी क्रांतीचे समर्थक होते आणि नेहरूंचा अहिंसेवर विश्वास होता, ते येऊ शकणार नाहीत. त्यानंतर बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.

बातम्या आणखी आहेत...