आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Brother Sexually Abused Her, Cut Off Her Toes, Even After Mahamandleshwar, Devotees Do Not Want Her As A 'mother'

Sunday भावविश्व:भावाने लैंगिक शोषण केले, पायाचे बोट कापले, महामंडलेश्वर झाल्यानंतरही भाविक ‘माँ’ म्हणून नको ते करतात

पवित्रानंद नीलगिरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या भावाने माझे लैंगिक शोषण केले. तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. घरात खूप भांडण झाले. प्रेमही केलं, पण निष्ठेच्या नावावर फसवलं, तेही चार वेळा. मग ती प्रेमाचा भ्रम सोडून आपले नवे जग निर्माण करायला निघाले. जुना आखाड्याचे हरिगिरी महाराजांकडून दीक्षा घेतली आणि ते संन्यासी झाले. आता मी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर आहे, नाव पवित्रानंद निलगिरी.

आता मी तुम्हाला माझी संपूर्ण कहाणी सांगते...

महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्ह्यात माझा मुलगा म्हणून जन्म झाला. मी तीन वर्षांचा असताना वडील घर सोडून गेले. ते आजपर्यंत परत आलेले नाही. आम्ही आठ भावंडे होतो. पाच भाऊ आणि तीन बहिणी.

मी कुटुंबात सर्वात लहान होतो. सुरुवातीला सर्वांचे प्रेमही मिळाले, पण जसजसे मोठा होत गेला तसतसे माझ्यात मुलींचे हावभाव दिसू लागले. त्यामुळे माझे भाऊ मला मारहाण करायचे. मला म्हणायचे अबे काय मुलीसारखे बोलतो, मुलींसारखे हात हलवतोस.

एवढेच नाही तर घराबाहेरही लोकांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक घरी आले आणि आईला सांगू लागले की तुझा मुलगा मुलीसारखा वागतो. मराठी ब्राह्मण कुटुंबात एक किन्नर जन्म घेईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्यामुळे मला मारहाण होऊ लागली. मी चौथीत असताना पाच भावांनी मला जमिनीवर झोपवून फुटबॉलप्रमाणे लाथ मारल्या. आईने घराबाहेर जाण्यास बंदी घातली.

मी मराठी ब्राह्मण कुटुंबातील आहे. मी किन्नर असल्यामुळे आई आणि भावाला भीती वाटत होती की, माझ्यामुळे समाजात त्यांचा आदर कमी होईल. यामुळे मला खूप मारहाणही झाली.
मी मराठी ब्राह्मण कुटुंबातील आहे. मी किन्नर असल्यामुळे आई आणि भावाला भीती वाटत होती की, माझ्यामुळे समाजात त्यांचा आदर कमी होईल. यामुळे मला खूप मारहाणही झाली.

यानंतरही जेव्हा लोकांचे टोमणे कमी झाले नाहीत तेव्हा समाजामध्ये अब्रु वाचवण्याच्या नावाखाली आईने मला मावशीकडे पाठवून दिले, पण मी तिथेही नाही राहिलो आणि काही महिन्यातच घरी परतलो. घरी आल्यावर पुन्हा सगळ्यांना माझा राग येऊ लागला. ज्याला वाटेल तो मला मारत होता. त्यामुळे आईलाही त्रास होत होता. मात्र, ती काहीच करू शकत नव्हती.

तसेच शाळेत सुद्धा मला शिक्षकांनी खूप मारले. शिक्षक म्हणायचे की, तु मुलींसोबत का राहतो. मला आजही आठवते. तेव्हा मी 9 वीत होतो. भावाने माझ्यावर कुऱ्हाड फेकली. माझ्या पायाची सर्व बोटे कापली गेली.

एकदा भावांच्या मारहाणीला कंटाळून मी स्वतःला जीव देण्याचे ठरवले आणि गावातल्या विहिरीत उडी घेतली, पण माझ्या चुलत भावानेही विहिरीत उडी मारून मला वाचवले. यानंतर एके दिवशी मी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. मला खूप मार लागला, पण मी वाचलो. एकदा मीे विषही प्यायलो, तरीही मी जगलो.

एकदा कुटुंबातील एका लग्नाच्या काळात माझा एक चुलत भाऊ माझ्याजवळ येऊन झोपला. मला वाटले हा तर माझा भाऊ आहे, तो माझ्याजवळ झोपला तरी काही फरक पडत नाही, पण त्याने माझे लैंगिक शोषण केले. एकदा नाही तर अनेक वेळा. जेव्हा-जेव्हा त्याला वाटेल तेव्हा-तेव्हा तो माझे लैंगिक शोषण करत होता.

दहावी पूर्ण केल्यावर मला वाटले, आता खुप झाले. मी इथे राहणे योग्य नाही. घरात एक स्तोत्रांची कॅसेट होती, त्यावर नागपूरच्या एका मंदिराचा पत्ता लिहिलेला होता. त्याच मंदिरात जायचे असे मी ठरवले. आणि सोबतीला घरातून पाच किलो तूर डाळ घेऊन निघालो.

घरातील लोकांच्या मारहाणीला कंटाळून मी दहावीनंतर घर सोडले आणि मंदिरात राहू लागलो. तिथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि नंतर मी संन्यास घेतला.
घरातील लोकांच्या मारहाणीला कंटाळून मी दहावीनंतर घर सोडले आणि मंदिरात राहू लागलो. तिथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि नंतर मी संन्यास घेतला.

हायवेवर एक ट्रक थांबवला आणि त्यात बसून नागपूरला गेलो. रात्रीचे बारा वाजले होते. मंदिराचे दरवाजे बंद होते. मी दार ठोठावले. तिथल्या बाबांना सगळी हकीकत सांगितली आणि म्हणालो आता मला इथेच राहायचे आहे. आणि मी मंदिरात राहू लागलो.

मी रोज देवळात झाडू मारत, देवूळ पुसत असे. भाविकांनी देवाला अर्पण केलेले अन्न मला मिळायचे. महिनाभरानंतर मी तिथल्या एका कापडाच्या दुकानात 300 रुपये महिना पगारावर सेल्समन म्हणून काम करू लागलो. त्यानंतर मी इस्कॉनमध्ये जोडला गेलो. मी त्यांचा प्रचारही केला. त्या बदल्यात माझी जेवणाची आणि राहण्याची सोय झाली.

माझ्या सर्व बहिणी आणि बरेच नातेवाईक नागपुरात राहत होते, पण कोणीही माझ्याशी बोलले नाही किंवा मला त्यांच्या घरी बोलावले नाही. कुटुंबातील सदस्य म्हणून माझा भ्रमनिरास झाला होता. दरम्यान, माझ्या कुटुंबाच्या वतीने इस्कॉनविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला की, त्यांनी आमच्या मुलाचे अपहरण केले आहे. यानंतर इस्कॉनच्या लोकांनी मला तेथून जाण्यास सांगितले.

दुसरीकडे माझा दहावीचा निकाल लागला होता. मी दवाखान्यात रात्रीची नोकरी स्वीकारली. आता मला लक्षात आले होते की, कोणत्याही परिस्थितीत मी माझे शिक्षण सोडता कामा नये. मी 12वी ला प्रवेश घेतला आणि रात्री हॉस्पिटलची नोकरी करून जगू लागलो.

दरम्यान माझी मोठी बहीण माझ्याशी बोलू लागली होती. तीने मला नर्सिंगचा कोर्स करण्याचा सल्ला दिला. तसेच यासाठी तीने मला मदतही केली. बारावीनंतर मी नर्सिंगला प्रवेश घेतला. बहिणीने मला फक्त एका अटीवर मदत करण्यास मान्यता दिली होती. ती म्हणजे मी साडी नेसणार नाही किंवा मेकअपही करणार नाही. नर्सिंगनंतर मी नागपुरातील अनेक हॉस्पिटलमध्ये काम केले.

किन्नर असणे हा गुन्हा नाही. आपल्या ग्रंथातही किन्नरांचा उल्लेख आहे. आम्ही भगवान शंकराचे रूप आहोत. आम्हालाही समाजात मान-सन्मान मिळायला हवा.
किन्नर असणे हा गुन्हा नाही. आपल्या ग्रंथातही किन्नरांचा उल्लेख आहे. आम्ही भगवान शंकराचे रूप आहोत. आम्हालाही समाजात मान-सन्मान मिळायला हवा.

मी ज्या रुग्णालयात काम करत होतो तेथेच एक ट्रान्सजेंडर मुलगाही काम करत होता. हळूहळू त्याच्याशी मैत्री झाली. एके दिवशी त्याने मला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये फिरायला येण्यास सांगितले. या पार्क मध्ये किन्नर, ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटी समुदायातील लोक येत असत. त्या ठिकाणी ब्राह्मण किन्नर, मराठा किन्नर, वाल्मिकी किन्नर, श्रीमंत आणि गरीब असे सर्व विविध प्रकारचे गट होते. शोऑफ जास्त असायचा. फक्त आम्ही सगळे तिथे संध्याकाळीच तेथे भेटायचो.

मधल्या काळात माझी चार अफेअर्सही झाली, पण त्यातला एकही टीकला नाही. सगळेच मला लुटून निघून गेले.

मला आतून वाटले की मी चुकीच्या फॉर्ममध्ये आहे. मी मुलगा नाही आणि किन्नर म्हणून हा समाज इतक्या सहजासहजी माझा स्वीकार करणार नाही. यानंतर मी सारथी नावाच्या संस्था स्थापन केली, हळूहळू ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांना भेटायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली. दरम्यान, एका सेमिनारमध्ये मी प्रसिद्ध किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना भेटलो. त्या मुंबईच्या रहिवासी होत्या. त्यांनी सिम्बायोसिसमध्ये शिक्षण घेतले होते. दिसायला सुंदर, फटाफट इंग्लिश बोलायच्या, त्या अतिशय प्रभावशाली किन्नर होत्या.

2007 मध्ये मी त्यांचा शिष्य झालो. मी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटी समुदायासाठी अनेक सेमिनार आयोजित केले. तेव्हा मला कळले की माझ्या आईने संपत्तीची वाटणी केली आहे, पण मला काहीही दिले नाही. माझा हक्क घेण्यासाठी मी कोर्टात केस दाखल करून माझा हक्क मिळवला.

कारण मलाही पोट आहे, भूक लागते, कपड्यांची गरज आहे आणि मी टाळ्या वाजवून कधीही कमावणार नाही अशी शपथ घेतली होती.

आता किन्नर झाल्यानंतरची माझी कहाणी वाचा...

जे माझे खरे रूप आहे ते सर्वांसमोर यावे असे मी ठरवले. मी स्वतःहून माणसाचा खोटा टॅग काढून टाकला आणि 2013 साली किन्नर झालो. इथून मी माझ्या खर्‍या रुपात काम करायला सुरुवात केली. साडी नेसायला लागले, मेकअप करू लागले.

दरम्यान, 2014 साली सरकारने थर्ड जेंडर विधेयक मंजूर केले, हा आमचा सर्वात मोठा विजय होता. मात्र, आम्हाला अजून बरेच काही साध्य करायचे होते. आम्ही आमचे हक्क कुटुंब, समाज आणि कायद्यातून घेतले आहेत, पण धर्मातून आमचे हक्क घ्यायचे आहेत. धर्माच्या ठेकेदारांनी आमचा हक्क हिरावून घेतला होता. आम्हाला धर्मातून हद्दपार करण्यात आले होते, वास्तविक शिवपुराण, महाभारत, रामायण सर्व ग्रंथांमध्ये किन्नरांचा उल्लेख आहे.

2016 च्या उज्जैन आयाजित कुंभ मेळ्यामध्ये आम्हाला विजय मिळाला. आम्ही मिरवणूक काढली आणि मोठा जमाव आमच्या मिरवणुकीत सामील झाला. यानंतर आम्ही प्रयागराज कुंभमध्येही सहभागी झालो आणि ध्वज फडकावला.
2016 च्या उज्जैन आयाजित कुंभ मेळ्यामध्ये आम्हाला विजय मिळाला. आम्ही मिरवणूक काढली आणि मोठा जमाव आमच्या मिरवणुकीत सामील झाला. यानंतर आम्ही प्रयागराज कुंभमध्येही सहभागी झालो आणि ध्वज फडकावला.

2016 मध्ये जेव्हा उज्जैनमध्ये कुंभ आयोजित करण्यात आला तेव्हा आम्ही 14वा आखाडा म्हणजेच किन्नर आखाडा उभारण्याचा निर्णय घेतला, परंतु आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी यांनी याला कडाडून विरोध केला. त्यांनी असे शब्द वापरले की, ऐकून मनला खुप वेदना होत होत्या. साधू समाजाने आम्हाला काय नाही ऐकवले?

ते म्हणायचे, मुलगा बापाच्या पुढे चालू शकत नाही, तुम्हाला आमचे बोट धरूनच चालावे लागते. ते म्हणायचे की, आता सिग्नलवर भीक मागणारे, नाचणारे, शाहरुख-सलमानबद्दल बोलणारे धर्मावर बोलणार का? दिवसेंदिवस हा वाद वाढत गेला.

मी आणि लक्ष्मी म्हणायचो की आम्ही साधू समाजाच्याही पुढे आहोत, आम्ही साधूच्या पाया पडणार नाही, तर साधू आमच्या पाया पडतील. तुम्ही लोकांनी तुमची लैंगिकता कोणत्याही दुकानातून दोनशे ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम विकत घेतलेली नसल्याचे मी त्यांना सांगितले. आम्ही शिवासोबत आहोत. अर्धनारीश्वर आहोत.

किन्नरांना पेशवाई (मिरवणूक) काढता येणार नाही असा साधूंचा ओऱ्हा होता. मंत्री, संत्री, डीसी या सर्वांनी आमची समजूत घातली आणि आम्हाला येथून परत जाण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही जाहीर केले की, आम्ही रस्त्यावर चौकात नग्न होऊन स्वतःला पेटवून घेऊ, पण धर्माकडून आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही.

मी लक्ष्मीसोबत चर्चा केली आणि आम्ही ठरवले की, परवानगी नसतांनाही आपण पेशवाई काढू. बघू कोण काय करते ते. आम्ही मिरवणूक काढली आणि मोठ्या प्रमाणाात जमाव आमच्या मिरवणुकीत सामील झाला. साधू तर नुसते पाहातच राहिले. आम्ही आमच्या कुटुंबाशी लढलो, समाजाशी लढलो, त्यामुळे आता धर्माच्या ठेकेदारांशी लढणे आमच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती.

2019 मध्ये आम्ही जुना आखाड्यात विलीन झालो. आता आमचा किन्नर आखाडा हा चौदावा आखाडा आहे, पण जुना आखाड्यासोबतच आमचे शाही स्नान आणि पेशवाई आयोजित केली जाते.
2019 मध्ये आम्ही जुना आखाड्यात विलीन झालो. आता आमचा किन्नर आखाडा हा चौदावा आखाडा आहे, पण जुना आखाड्यासोबतच आमचे शाही स्नान आणि पेशवाई आयोजित केली जाते.

दीड महिन्याच्या लढाईनंतर आम्ही जिंकलो आणि साधू समाजाचा पराभव झाला. आम्ही स्वतःचा आखाडा बनवला आणि मी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाले.

एवढे सर्व झाल्यानंतरही अजूनही गर्दीत कोणीतरी हात दाबतो. सोशल मीडियावर म्हणतो ‘माँ’ तुमचा एखादा चांगला फोटो पाठवा. एखादा साधू कानात काहीतरी फुंकून निघून जातो.

वास्तविक साधू समाजाला त्यांचे दुकान बंद होईल अशी भीती होती. तसेच झाले. प्रत्येक कुंभात आमचा पंडाल फुल राहू लागला आणि साधूंचे पंडाल रिकामे राहू लागले. लोक आमच्याकडून आशीर्वाद घेऊ लागले.

अशा परिस्थितीत महंत हरिगिरी महाराजांच्या जुना आखाड्याच्या लोकांनी आम्हाला त्यांच्यात विलीन होण्यास सांगितले. आम्हीही विचार केला आणि जुना आखाड्यात विलीन होण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये आम्ही जुना आखाड्यात विलीन झालो. आता आमचा किन्नर आखाडा हा चौदावा आखाडा आहे, मात्र, आमची पेशवाई आणि शाही स्नान जुना आखाड्यासोबतच होते.

आता किन्नर आमच्यासोबत शाही स्नान करतील, याचा साधूंनाही खूप त्रास होतो. पण यासाठी आम्ही खूप मोठी लढाई लढलो आहे. आणखीही आपल्याला बरेच काम करायचे आहे. किन्नरांना नोकऱ्यांमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पवित्रानंद निलगिरी यांनी दिव्य मराठीच्या रिपोर्टर मनीषा भल्लासोबत या गोष्टी शेअर केल्या आहेत.