आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘ठोडी ते काला तिल कुड़िए...तेनु काला चश्मा जंचदा वे…’ काही दिवसांपूर्वी नॉर्वेमध्ये एका पाकिस्तानी लग्नात परदेशी मुलांचा नाचतानाचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला होता.
तेव्हापासून जगातील सर्व देशांतील लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. ही पहिली वेळ नाही की, लग्न समारंभ आणि मेजवानीत नॉर्वे आणि भारताचे मिलन झाले आणि एखादी गोष्ट जगभर प्रसिद्ध झाली. शेवटच्या वेळी हे सोळाव्या शतकात घडले होते आणि तेव्हाही याचा संबंध पंजाबशी होता.
नॉर्वे आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी सुरू झाली भोज पद्धत
वास्तविक, सोळाव्या शतकात जवळपास एकाच वेळी नॉर्वे आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी मोठ्या सामूहिक मेजवानीच्या दोन सर्वात लोकप्रिय परंपरा सुरू झाल्या. नॉर्वेच्या श्रीमंत व्यापाऱ्यांनी शाही लोकांसोबत स्वतःची खास मेजवानी सुरू केली, ज्याला आपण बुफे म्हणतो.
यामध्ये खाद्यपदार्थ खास पद्धतीने सजवून महागड्या भांड्यांमध्ये प्रदर्शनी लावली जायची आणि पाहुणे आपल्या आवडीचे पदार्थ खायचे. त्याच सुमारास पंजाबमधील एका मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा नानक याने गरिबांना सामूहिक भोजन द्यायला सुरुवात केली, ज्याला आपण लंगर म्हणतो. सुमारे 500 वर्षांत लंगर 'कॅनडा'पर्यंत पोहोचली. तर आता बुफे पद्धतीशिवाय यूपी-बिहारमध्ये लग्न पार पडत नाही.
फ्रान्समधून बुफे पद्धतीची सुरुवात, चवीपेक्षा शो ऑफच जास्त
पंजाबी गाण्यांवर नाचण्याची इच्छा होईल, हे तर कळते. पण प्रश्न असा आहे की, असे काय झाले की नॉर्वेचा बुफे उत्तर भारतीय लग्नसोहळ्यांचा अविभाज्य भाग बनला?
याची सुरुवात फ्रान्समधून झाली. स्कॅन्डिनेव्हियन देशांची ही परंपरा राजेशाही असलेल्या फ्रान्समध्ये पोहोचली आणि तेथील उच्चभ्रू वर्गाला ती खूप आवडली.
वास्तविक, त्या काळातील फ्रेंच मेजवानीत पदार्थाच्या चवीपेक्षा त्याच्या दिखाव्यावर जास्त भर असायचा आणि बुफेमध्ये भांड्यांपासून फळे आणि भाज्यांपर्यंत सर्व प्रकारच्या कलाकृती बनवण्याची संधी मिळायची.
वसाहती काळात मेजवानीची ही पद्धत जगभरात लोकप्रिय झाली, परंतु स्वतंत्र भारतातील उत्तर भारतीय विवाहांमध्ये ती लोकप्रिय होण्याची वेगळी कारणे आहेत.
पंगतीत बसण्यापासून ते उभे राहून खाण्यापर्यंतचा प्रवास
भारतात दीर्घकाळापर्यंत सामूहिक मेजवानीचा अर्थ होता पंगत. म्हणजेच पंगतीत बसून जेवणे. एका विशिष्ट कालावधीपर्यंत यासोबत कुल्हड दिले जायचे. नंतर प्लास्टिकचे पारदर्शक ग्लास ठेवले जाऊ लागले. जे पकडून ठेवणे ही जेवणाऱ्याची जबाबदारी असते.
या देशी खाण्याच्या पद्धतीतील मेनू जवळपास ठरलेला आहे. पुरी, कचोरी, रस्सेदार भाजी, गोड भोपळ्याची भाजी, पंचमेल, लाडू आणि रायता.
खाण्यापिण्याच्या पद्धतीबद्दल आपण पुढेही बोलू, पण बुफेला जाण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेऊया.
सर्राटा किंवा सन्नाटा हा भारतीय पंगतांचा प्राण होता
या रायताला काही ठिकाणी सन्नाटा किंवा सर्राटा असेही म्हणतात. सर्राटा म्हणणारे ते सर्र आवाज करून पिण्याशी याचा संबंध जोडतात. तर सन्नाटा म्हणणारे सांगतात की, यातील मिरची काही वेळ व्यक्तीला सन्नाटा देते.
या ग्रामीण मेजवानीपासून ते उच्चभ्रू बुफेतील मुख्य बदल हा मेन्यूचा होता. दाल मखनी, पनीर आणि नान हे शहरी रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पदार्थ होते.
मेन्यूतील बदलासह जेवण वाढण्याची पद्धत बदलली
विवाहात हे पदार्थ करणे म्हणजेच संपत्तीचे प्रदर्शन करणे. आता फरशीवर बसून नानसोबत मटर पनीर खाणे आणि प्लेटमध्ये चाऊमिन गुंडाळून खाणे चांगले वाटणार नाही. म्हणून आधी टेबल-खुर्चीवर बसून खाण्याचा ट्रेंड आला. पण काही वेळातच 'स्वतःच वाढून घेण्याची पद्धत रूढ झाली.
आजकाल प्रत्येक कार्यक्रमात बुफेची व्यवस्था केली जाते, पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर गोंधळासारखे वातावरण निर्माण होणार नाही.
मुळात स्वत:च वाढून घेण्याचे आणि एका हातात ताट घेऊन खाण्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे यजमानाला जास्त वाढप्यांची गरज पडत नाही.
लोक कितीही प्रभावशाली असले तरी ते आपल्या आवडीनुसार जेवण वाढून घेतात. अनेक पदार्थ बनवण्याची शक्यता वाढते आणि त्यांचे प्रमाणही कमी होते.
अनेक भारतीय पदार्थ असे जे बुफे पद्धतीत खाणे कठीण आहे
दुसरीकडे, बुफेला काही मर्यादाही आहेत की, तुम्ही असे कोणतेही अन्न एका हाताने धरून खाऊ शकत नाही, ज्यासाठी चाकू आणि काटा दोन्ही आवश्यक आहेत. तसेच, जर जेवणात एक मुख्य डिश आणि इतर साइड डिश असतील तर, आपल्याला टेबलची गरड पडतेच.
म्हणूनच, दक्षिण भारत, ईशान्य, बंगाल, आसाम यांसारख्या ठिकाणी पारंपरिक लग्नाचे जेवण बसूनच केले जाते. आता, एका हाताने फिश हुक उचलून भाताबरोबर कसा खाता येईल ना?
मुख्य डिशची संकल्पना संपली, सर्व डिशचे महत्त्व समान
दुसरीकडे, उत्तर भारतीय मेन्यूमध्ये मुख्य डिशची संकल्पना नाही. आता मटर पनीर, शाही पनीर, कढई पनीर, बटर चिकन, नान, मिसळ रोटी, जीरा राईस काहीही असो सर्व मेन डिश आहे.
म्हंटलं तर 'सबका साथ सबका विकास'चं खरं दृश्य फक्त लग्नाच्या मेजवानीतच पाहायला मिळतं, जे राजू श्रीवास्तव यांनी एकदा म्हटलं होतं की गुलाब जामुन रायतामध्ये मिसळल्यावर दही वड्यासारखा अनुभव येतो.
बुफेनंतर भारतात फाईन डायनिंगची पद्धत
गेल्या काही वर्षांत भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये टेबल्स पुनरागमन करत आहेत. वास्तविक, बिग फॅट इंडियन वेडिंगचा अर्थ आहे की असे काहीतरी केले जावे, जे शेजारी आणि नातेवाईकांनी कधीच केले नाही.
जेव्हा प्रत्येकजण बुफेत करायला लागला, तेव्हा काहीतरी नवे दाखवण्यासाठी फाईन डायनिंग तर करावेच लागते. तुम्ही यापूर्वी अशा एखाद्या लग्नात गेला असाल जिथे जपानी, कोरियन, लेबनीज, थाई किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ असेल आणि काय करावे हे समजत नसेल, तर फाइन डायनिंग आणि त्याच्याशी संबंधित सर्व नियम आणि कायदे समजून घेऊया.
रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनर करताना ग्राफिकमध्ये दिलेल्या या छोट्या गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे.
गेल्या काही दशकांपासून भारतात फाइन डायनिंग लोकप्रिय
पारंपारिकपणे फाइन डायनिंगचा अर्थ म्हणजे असे एखादे रेस्टॉरंट जिथे तुम्ही बसून चमचा, काटा, चाकू इ.सह जेवण कराल. वेटर तुमच्या प्लेटमध्ये जेवण वाढेल.
जेवणानंतर हात धुण्यासाठी एक वाटी कोमट पाणी, लिंबाचा तुकडा आणि काही गुलाबाच्या पाकळ्या देईल. मात्र गेल्या काही दशकांपासून क्विजीन आधारित फाईन डायनिंग भारतात खूप लोकप्रिय ठरली आहे आणि यात संस्कृतीनुसार काही फरकही असतो.
पुढे आपण चॉपस्टिक्सच्या वापराबद्दल वाचू पण प्रथम आपण ग्राफिक्समधून पाहू की, कटलरी कशी वापरायची...
90 च्या दशकात पालक मुलांना घेऊन जायचे आणि म्हणायचे, चला, आज तुम्हांला डोसा खाऊ घालू किंवा कुठल्यातरी छान रेस्टॉरंटमध्ये छोले-भटुराची मेजवानी असायची. आता चर्चा होते की आज जपानी किंवा इटालियन ट्राय करूया...
भारतात मेनलँड चायना, ओह कोलकाता, बुखारा, सवर्णा भवन यांसारख्या फूड चेन आहेत, ज्या विशिष्ट शैलीचे अन्न देतात. तुम्ही यापैकी कोणत्याही ठिकाणी गेल्यावर काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा.
15 दिवसांच्या सरावाने चायनीज किंवा जपानी खाण्याची पद्धत शिका
बिल कोण भरणार याचेही नियम आहेत
विनोदांबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल सोशल मीडियावर एका गोष्टीवर बरेच जोक्स आहेत ते म्हणजे बिल कोण भरणार. काही वर्षांपूर्वीपर्यंत एक अलिखित नियम होता की बिल मुलेच भरणार. आता बिल वाटणीच्या चर्चेने वेगळाच रंग घेतला आहे.
पैसे देण्याबाबत काही मूलभूत नियम आहेत, जे समजण्यास अतिशय सोपे आहेत. ज्या काळात लोकांचा असा विश्वास होता की फक्त पुरुषच बिले भरतील, त्या काळात फार कमी महिला काम करायच्या. आता तसे नाही. त्यामुळे बिल यजमानाने भरले पाहिजे.
लंच किंवा डिनरच्या अनेक चर्चा झाल्या आहेत, तर आता या ग्राफिकमधून त्याचे शिष्टाचार जाणून घेऊया.
म्हणजे तुम्ही एखाद्याला जेवणासाठी आमंत्रित केले आहे, मग तुम्ही बिल भरा. तुम्ही स्त्री असोत की पुरुष. जर तुम्ही पहिल्यांदाच भेटत असाल किंवा बरेचदा एकत्र जेवणारे मित्र असाल तर अर्धे अर्धे करण्यात काहीच वाईट नाही.
यालाच आजकालचे तरुण 'लेट्स गो डच' म्हणतात, ज्याला अनेकदा अमेरिकन सिस्टीमही म्हणतात. जर तुम्ही भरपूर अन्न खाल्ले असेल आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीने फक्त कॉफी घेतली असेल तर बिल अर्धे वाटणे योग्य नाही.
होय, जर समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने, पदाने किंवा परिस्थितीने खूप मोठी असेल आणि बिल भरण्याबद्दल बोलली असेल, तर ती स्वीकारली पाहिजे. असे न करणे असभ्य वाटू शकते.
लंच आणि डिनरनंतर तुम्हाला जेवण कसे वाटले ते तुम्ही तुमच्या काट्या आणि चमच्याने सांगू शकता. ग्राफिक पहा.
अमेरिकेत टिप देणे अनिवार्य आहे, भारतात ऐच्छिक
बिलानंतर टिपची गोष्ट येते. टिपचे नियम अमेरिकन संस्कृतीत इतर जगापेक्षा वेगळे आहेत. अमेरिकेत, टिप काही प्रमाणात अनिवार्य आहे आणि सेवा प्रदात्याचा हक्क मानला जातो. भारतासारख्या देशात ते ऐच्छिक आहे.
जर कोणी तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना चांगली सेवा दिली असेल, तर टिप देणे ही चांगली गोष्ट आहे. बिल भलेही क्रेडिट कार्डने भरले जात असले तरी, टीप रोख स्वरूपात दिली जाऊ शकते. नसल्यास, स्वाइप करताना असे म्हणू शकता की इतकी रक्कम टिप म्हणून जोडून घ्या...
बाहेरील जेवणाने तुमची शांतता हिरावून घेऊ नये
टिप देणे आणि बिल भरणे हा फाईन डायनिंगचा अविभाज्य भाग आहे. परंतु अनेक अर्थतज्ञांचा असा विश्वास आहे की मिलेनियल पिढीच्या निवृत्तीचा मोठा भाग फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जेवण्यातच संपून जाईल. माझ्या लहानपणाबद्दल सांगायचे तर, रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाणे केवळ विशेष प्रसंगी होते.
म्हणजे तुमचा पहिला पगार आला, म्हणून तुम्ही आई-वडिलांना एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेले. यानंतर लग्नासाठी मुलगी दाखवायला आणि डेटवर जाण्यासाठीही लोक कॉफी डे साठी जायला लागले. आता काम करतानाही लोक स्टारबक्समध्ये मॅकबुक घेऊन बसलेले दिसतात.
विवाहित लोकांसाठी त्यांच्या वीकेंडच्या छंदासोबतच मुलांच्या पिझ्झा पार्टीचीही जबाबदारी असते. सामान्य शहरी मिलेनीयल कपल आता महिन्यातून किमान दोन वेळा तरी बाहेर जेवतात.
छोट्या बचतीमुळे दीर्घ काळावधीत मोठा फरक पडतो
आता दर महिन्याला तुमचा बाहेर खाण्यावर होणारा खर्च तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 5-7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर तुम्ही याचा विचार करायला हवा. यासारख्या छोट्या बचतीमुळे दीर्घकाळात काय फरक पडतो.
असा विचार करा, जर 2500 रुपये दरमहा 30 वर्षे जमा केले आणि सरासरी 14-15 टक्के परतावा मिळत असेल, तर 30 वर्षे वयाच्या व्यक्तीकडे 60 व्या वर्षी निवृत्त होताना 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल.
बाहेरचे अन्न खिशासाठी भारी, कंबरही होते मोठी
बरं, बाहेर खाल्ल्याने तुमच्या खिशातील बचत कमी होत नाही, तर ते तुमच्या कंबरेवरील चरबीही वाढवते. दिवंगत शेफ अँटोइन बॉर्डन हेही कधीही सोमवारी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये मासे वगैरे खात नव्हते. ते सांगायचे की रेस्टॉरंट कितीही मोठे असले तरी तिथे गुरुवारी संध्याकाळी किंवा शुक्रवारी सकाळी मांस येते, जेणेकरून वीकेंडला सेवेची कमतरता भासू नये.
यानंतर जे काही उरते ते सोमवारी सूप, स्टू किंवा इतर काही बनवून खपवले जाते. जर चव चांगली असेल तर भरपूर लोणी घालून काम चालवले जाते.
अँटोइन बोर्डेन यांची स्टोरी आपण बटर चिकनच्या कथेसह जोडू शकतो. ज्याची निर्मितीच रात्रीचे उरलेले चिकन खपवण्यासाठी झाली होती.
आता इतके लोणी आणि चीज तुमच्या यकृतावर खूप वाईट परिणाम करतात. उच्च कॅलरीयुक्त अन्नामुळे फॅटी लिव्हर ही आजच्या घडीला एक सामान्य समस्या बनली आहे. फॅटी लिव्हर म्हणजेच यकृतावर चरबीचा थर साचणे हा त्याचा दुष्परिणाम आहे. अशा परिस्थितीत आहारावर नियंत्रण ठेवून तो बरा होऊ शकतो.
जीवन जगण्याचे नाव आहे आणि चांगले अन्न आपल्या सर्व इंद्रियांना तृप्त करते. म्हणून बाहेर जेवायला जा आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. फक्त काही चातुर्य आणि काही मर्यादा लक्षात ठेवा.
(अनिमेश मुखर्जी फूड आणि फॅशन ब्लॉगर आहे)
ग्राफिक्स: सत्यम परिडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.