आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Bulldozer Loudspeaker Controversy Vs Indian Politics | Marathi News Top Ten Political Tools That Shook The Nation

दिव्य मराठी इंडेप्थ:बुलडोझर- लाऊडस्पीकरआधी हे 10 टूल्स ठरले राजकारणाचे शस्त्र; जाणून घ्या चरख्यापासून हातोड्यापर्यंतची कहाणी

निकिता अग्रवाल8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारताच्या राजकारणात आजकाल दोन यंत्रांची मोठी चर्चा आहे- पहिले बुलडोझर आणि दुसरे लाऊडस्पीकर. बेंजामिन होल्टने 1904 मध्ये बुलडोझरचा शोध लावला आणि ग्रॅहम बेलने 1876 मध्ये लाऊडस्पीकर बनवला; त्यांचा हा शोध एक दिवस भारतात सर्वात मोठे राजकीय हत्यार बनेल असे दोघांनाही वाटले नसेल. तथापि, सामान्य लोकांच्या उपयोगाची गोष्ट देश आणि जगात एका मोठ्या पॉलिटिकल टूलच्या रूपात उदयास येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

दिव्य मराठी इंडेप्थमध्ये आज आपण अशाच 10 पॉलिटिकल टूल्सची कहाणी जाणून घेऊ, ज्यांनपी देश आणि जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली...

1. यूपीतून निघून दिल्लीच्या रस्त्यांवर पोहोचली बुलडोझरची कारवाई

 • एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अनेकदा दिसणारे पिवळ्या रंगाचे बुलडोझर हे सध्या भारताच्या राजकारणात चर्चेचा विषय आहेत. याची सुरुवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. 2017 पासून आतापर्यंत भूमाफियांच्या ताब्यातून 67 हजारांहून अधिक सरकारी जमीन मुक्त केल्याने त्यांना 'बुलडोझर बाबा' म्हटले जाऊ लागले.
 • यूपीमध्ये, कडक कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठी आणि माफियांवर कारवाई करण्यासाठी बुलडोझर मुख्यमंत्री योगींच्या सुशासनाचे प्रतीक बनले. 2022 मध्ये झालेल्या यूपी निवडणुकीदरम्यान भाजपनेही 'यूपी की मजबूरी है, बुलडोझर जरूरी है' असा नारा दिला होता.
 • त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी खरगोन हिंसाचाराच्या वेळी दंगलखोरांच्या बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर केला. यानंतर त्यांचे नाव 'बुलडोझर मामा' असे ठेवण्यात आले.
 • त्याचवेळी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. मात्र, त्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली होती, जी अद्यापही कायम आहे.

2. राज ठाकरेंच्या वक्तव्याने लाऊडस्पीकरवरून राजकारण सुरू झाले

 • मंदिरे, मशिदी आणि लग्नसोहळ्यांमध्ये दिसणार्‍या लाऊडस्पीकरचा प्रतिध्वनी महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंतच्या राजकारणात काही काळ ऐकू येत आहे. वास्तविक, महाराष्ट्रात नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
 • नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी मशिदीच्या 100 मीटर परिसरात अजानच्या 15 मिनिटे आधी किंवा नंतर कोणतेही धार्मिक गाणे वाजवू नये, असे आदेश दिले. या आदेशानंतर वाद वाढला.
 • यादरम्यान यूपीमध्ये लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांतील मंदिर-मशिदीतून ध्वनिक्षेपके हटवण्यात आली. सीएम योगींनी धार्मिक स्थळांवरील 10,923 लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देशही दिले आहेत.
 • एप्रिलच्या अखेरीस यूपीच्या 12 झोन आणि आयुक्तालयातील धार्मिक स्थळांवर लावलेले 6,031 लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी 29 हजार 674 धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकांचा आवाज विहित मानकांनुसार निश्चित करण्यात आला.

3. CM नितीश यांनी PMOला पाठवले होते 1 लाखाहून अधिक DNA नमुने

 • 2015 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी पंतप्रधान कार्यालयात 1 लाख लोकांचे डीएनए नमुने पाठवले होते. खरं तर, बिहार निवडणुकीपूर्वी परिवर्तन रॅलीमध्ये पीएम मोदी म्हणाले होते की, सीएम नितीश यांच्या डीएनएमध्ये समस्या आहे, म्हणूनच ते वारंवार त्यांच्या राजकीय मित्रांना सोडतात.
 • या वक्तव्यामुळे संतापलेल्या नितीश यांनी पंतप्रधान मोदींविरोधात ‘शब्द वापसी’ मोहीम सुरू केली होती. ते म्हणाले की, बिहारमधील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए सारखाच आहे. आम्ही पीएमओमध्ये डीएनए चाचणीसाठी बिहारमधील लोकांना केस आणि नखांचे नमुने पाठवत आहोत.
 • पीएमओने हे नमुने घेण्यास नकार दिला होता. यानंतर नितीश टोमणे मारत म्हणाले होते, तुम्हाला नको असेल तर परत करा. या संपूर्ण प्रकरणावर नितीश यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते.

4. 1988 पासून सुरू आहे निवडणुकीआधी रथयात्रेचा ट्रेंड

 • निवडणुकीच्या काळात राजकारणी जनतेला आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबतात. कोणी पायी पदयात्रा काढतात तर कोणी रथयात्रा काढतात. राजकारणात पहिल्यांदाच माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांनी रथयात्रेची सुरुवात केली होती.
 • वर्ष होते 1988. व्हीपी सिंग बोफोर्स घोटाळ्याविरोधात देशभर आवाज उठवत होते. यावेळी चौधरी देवीलाल यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी मेटाडोरमध्ये बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या मेटाडोरचे नाव क्रांती रथ आणि या प्रवासाला क्रांती रथयात्रा असे नाव देण्यात आले. परिणामी, 1989च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 543 पैकी 197 जागा कमी झाल्या.
 • रथयात्रा चलनात आणण्याचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना जाते. व्हीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने दुसरी रथयात्रा काढली. तिला स्वर्ण जयंती रथयात्रा असे नाव देण्यात आले, ज्याचा उद्देश राम मंदिराची उभारणी हा होता.
 • 25 सप्टेंबर 1990 रोजी लालकृष्ण अडवाणी गुजरातमधील सोमनाथ मंदिरातून मेटाडोरमध्ये बसले, ते अयोध्येला जाणार होते. मात्र, त्याआधीच अडवाणींना बिहारमध्ये अटक करण्यात आली. रथयात्रा अपूर्ण राहिली आणि यासोबतच व्हीपी सिंह सरकारचा कार्यकाळही अपूर्ण राहिला. अडवाणींच्या अटकेनंतर भाजपने व्हीपी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले.

5. काँग्रेसने केली होती रेडिओ क्रांती

 • 60-70 च्या दशकात मनोरंजनाचा मुख्य स्त्रोत असलेल्या रेडिओने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींनी 1942 मध्ये 'करो या मरो'चा नारा दिल्यानंतर आंदोलकांना पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी वृत्तपत्रांवरही अनेक निर्बंध लादण्यात आले होते.
 • 9 ऑगस्ट 1942 रोजी काही युवक काँग्रेस समर्थकांनी एक बैठक घेतली होती, ज्यामध्ये वृत्तपत्राऐवजी रेडिओ वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • इंग्लंडमधून तंत्रज्ञान शिकून आलेल्या नरिमन अबराबाद प्रिंटरने ट्रान्समीटर बनवला आणि काँग्रेस कार्यकर्त्या उषा मेहता यांनी प्रसारणाची जबाबदारी सांभाळली. रेडिओ स्टेशनला 'द व्हॉइस ऑफ फ्रीडम' असे नाव देण्यात आले.
 • 14 ऑगस्टला आवाज आला - 'हा काँग्रेस रेडिओ आहे. तुम्ही आम्हाला भारतातील एका स्थानावरून 42.34m बँडवर ऐकत आहात.
 • काँग्रेसचे रेडिओ प्रसारण केवळ 80 दिवस चालले. 12 नोव्हेंबर 1942 रोजी पोलिसांनी छापा टाकून काँग्रेस रेडिओच्या सर्व लोकांना अटक केली.
 • पीएम मोदींचा 'मन की बात' असो किंवा छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचा लोकवाणी कार्यक्रम, 80 दिवसांत क्रांती आणणारा रेडिओ आजही देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

6. स्वदेशी चळवळीचा पाया होता चरखा

 • 1862 मध्ये ब्रिटनमध्ये 67% कापूस (सूत) भारतातून मँचेस्टरला अत्यंत स्वस्त दरात पाठवला जात होता. तिथल्या यंत्रांनी बनवलेले कपडे स्वस्त होते. त्यामुळे बाजारात त्याची मागणी वाढू लागली. त्यामुळे भारतातील हातमाग बाजार संकुचित होऊ लागला.
 • हातमाग कामगारांच्या समस्या लक्षात घेऊन महात्मा गांधींनी विदेशी कापडांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली, ज्याचे चरखा हे सर्वात महत्त्वाचे टूल बनले.
 • गांधींनी लोकांना चरख्यापासून बनवलेले खादीचे कपडे घालण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे हातमाग कामगारांना रोजगार तर मिळालाच शिवाय स्वदेशी चळवळीचा पायाही घातला गेला.
 • 1921 मध्ये महात्मा गांधींनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी विदेशी कपड्यांची होळी केली. त्याच वर्षी स्वतंत्र भारतासाठी बनवलेल्या ध्वजात चरख्याचाही समावेश करण्यात आला. भारताच्या तिरंगा ध्वजात समाविष्ट असलेले अशोक चक्रदेखील चरखामधून घेतले आहे.

7. दांडीयात्रेत 50 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते

 • मीठ हा आपल्या अन्नाचा सर्वात महत्वाचा भाग आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का, की ते फक्त अन्नच नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा देखील एक महत्त्वाचा भाग राहिले आहे. भारतावर राज्य करताना इंग्रजांनी लोकांवर मिठावर कर लादला. या अंतर्गत कोणालाही मीठ बनवण्याची किंवा विकण्याची परवानगी नव्हती. ब्रिटिश सरकार मिठावर प्रचंड कर वसूल करत असे.
 • 31 जानेवारी 1930 रोजी महात्मा गांधींनी व्हाईसरॉय इरविनन यांना 11 मागण्यांचे पत्र लिहिले. तसेच मीठा टॅक्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. हे इंग्रजांनी नाकारले. त्यानंतर 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला त्याला दांडी मार्च असे नाव देण्यात आले.
 • सुमारे 80 जणांसह दांडीयात्रेला सुरुवात झाली. ३८६ किमीचा हा मोर्चा दांडीला पोहोचला तोपर्यंत ५० हजारांहून अधिक लोक सामील झाले होते. दांडीत समुद्रकिनारी पोहोचल्यावर महात्मा गांधींनी बेकायदेशीरपणे मीठ बनवले आणि ब्रिटिशांचा मीठ कायदा मोडला. पुढे तो एक मोठा मीठ सत्याग्रह झाला आणि हजारो लोकांनी मीठ बनवले आणि विकले.

8. रोट्यांपासून ब्रिटीशांवर मानसिक दडपण बनवले गेले

 • भारताच्या स्वातंत्र्यासाठी विविध चळवळी सुरू झाल्या होत्या. त्यासाठी कधी चरखा तर कधी मीठ हे हत्यार बनवण्यात आले. 1857 च्या क्रांतीदरम्यान असेच एक हत्यार बनले होते कमळाचे फूल आणि रोटी.
 • फेब्रुवारी 1857 मध्ये एक अनोखी मोहीम सुरू झाली. रात्रीच्या वेळी भारतभर घरे आणि पोलिस चौक्यांमध्ये हजारो रोट्यांचे वाटप करण्यात आले. ज्या लोकांच्या घरी या रोट्या पोहोचल्या, ते अशा आणखी रोट्या बनवून इतर घरात वाटायचे.
 • यानंतर नानासाहेबांचे रणनीतीकार तात्या टोपे यांचे दूत प्रत्येक छावणीत कमळाची फुले घेऊन गेले. कमळाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला समान संख्येने पाकळ्या होत्या. पाकळ्या तुटल्यानंतर छावण्यांमधून परत आलेल्या देठांवरून किती सैनिक क्रांतीत सामील होतील हे स्पष्ट होत होते.
 • या संपूर्ण मोहिमेचा उद्देश ब्रिटिशांवर मानसिक दबाव टाकणे हा होता. रोटी आणि कमळ वाटल्याची माहिती मिळताच ब्रिटीश अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली. या मोहिमेत देशभरातील सुमारे ९० हजार पोलिसांचा सहभाग होता. विशेष म्हणजे त्याकाळी या रोट्या ब्रिटीश पत्रांपेक्षाही वेगाने लोकांच्या घरी पोहोचत होत्या. हे विशेषतः ब्रिटीशांना त्रासदायक होते.

ही झाली देशाच्या राजकारणात वापरल्या जाणाऱ्या राजकीय टूलविषयी माहिती. जागतिक इतिहासातही असे अनेक टूल सापडतात, ज्यामुळे दहशत निर्माण झाली. आम्ही येथे अशा दोन टूलविषयी सांगत आहोत...

9. I Can't Breathe पासून सुरु झाले वांशिक भेदभावाविरुद्ध युद्ध

 • I Can't Breathe म्हणजेच 'मी श्वास घेऊ शकत नाही'. मिनियापोलिसमध्ये अखेरचा श्वास घेत असताना जॉर्ज फ्लॉइडच्या तोंडातून बाहेर पडलेले हे शब्द 2021 मध्ये जगभरात जातीय भेदभावाविरुद्ध क्रांती घडवून आले.
 • 46 वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड हे आफ्रिकन-अमेरिकन समुदायाचे होते. जॉर्ज फ्लॉयड यांना दुकानात बनावट बिल वापरल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. जॉर्जवर $20 (सुमारे 1500 रुपये) च्या बनावट नोटांचा वापर करून दुकानातून खरेदी केल्याचा आरोप होता.
 • यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी आठ मिनिटे जॉर्जयांची मान गुडघ्यांनी दाबताना दिसून आले. व्हिडिओमध्ये जॉर्ज म्हणत होते, की मी श्वास घेऊ शकत नाही (आय कांट ब्रीद). त्यानंतर फ्लॉइडचा नंतर मृत्यू झाला.
 • या घटनेनंतर संतप्त लोक रस्त्यावर आले. केवळ अमेरिकेतच नाही तर जगभर आय कान्ट ब्रीदचे बॅनर, पोस्टर आणि टी-शर्ट घालून रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी केली. यादरम्यान घोषणा देण्यात आली - #BlackLivesMatter
 • अमेरिकन गायिका गॅब्रिएला सार्मिएन्टो विल्सन (एच.ई.आर.) हिनेही आय कान्ट ब्रीदवर एक गाणे तयार केले, जे खूप लोकप्रिय झाले.

10. विळा-हातोडा हे रशियन क्रांतीचे प्रतीक होते

 • 1917 ते 1923 पर्यंत चाललेल्या रशियन क्रांतीच्या काळापासून हातोडा आणि विळा हे साम्यवादाचे प्रतीक आहेत. रशियन राज्यक्रांतीनंतर हळूहळू चळवळी आणि निदर्शनांमध्ये त्याचा अवलंब करण्यात आला.
 • यामध्ये हातोडा कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना दर्शवतो तर विळा हे शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून घेतले होते.
 • विळा-हातोडा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जाणारे पहिले पोलिटिकल टूल असल्याचे म्हटले जाते. मेर्डी, मोल्दोव्हापासून केरळपर्यंत सर्व कम्युनिस्ट पक्ष हातोडा आणि विळा चिन्ह वापरतात.
बातम्या आणखी आहेत...