आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • C Reactive Protein (CRP) Test; Coronavirus Disease 2019 Testing Basics | How Does It Help Patients? All You Need To Know

एक्सप्लेनर:कोविड -19 मध्ये RT-PCR आणि CT-स्कॅनबद्दल खूप ऐकलं असेल, पण आता CRP ही टेस्ट काय आहे? ही टेस्ट इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी कशी उपयुक्त आहे?

रवींद्र भजनी4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • CRP चाचणी म्हणजे काय? जाणून घ्या यासह बरंच काही...

भारतात कोविड - 19 च्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला. दरदिवशी रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारी विक्रमी पातळी गाठत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी संबंधित प्रत्येक चाचणी महत्त्वपूर्ण झाली आहे. आता डॉक्टर रुग्णांच्या RT-PCR आणि CT-स्कॅन व्यतिरिक्त इतरही चाचण्या करुन घेत आहेत. या चाचण्यांद्वारे रुग्णांमध्ये कोविड - 19 संक्रमणाची तीव्रता ट्रॅक केली जात आहे.

CRP ही अशी एक रक्त तपासणी आहे, ज्याद्वारे शरीरात संक्रमण किती वाढले आहे, हे शोधले जाते. ही चाचणी काय आहे आणि कुणाला करायला हवी, हे समजून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील रेस्पिरेटरी मेडिसिन आणि पल्मोनोलॉजी कंसल्टंट डॉ. राहुल कुमार आणि नवी दिल्लीतील मणिपाल हॉस्पिटल येथे क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन कंट्रोल कन्सल्टंट डॉ. दिल्ली नवीन कुमार यांच्याशी बातचीत केली.

CRP चाचणी म्हणजे काय?

 • CRP म्हणजेच सी-रिअ‍ॅक्टिव प्रोटीन. आपले शरीर एका केमिकल फॅक्ट्रीप्रमाणे काम करते. जेव्हा एखादा बाह्य विषाणू किंवा संसर्ग होतो, तेव्हा शरीरात बर्‍याच रासायनिक प्रक्रिया सुरू होतात. त्यापैकी एक म्हणजे इनफ्लेमेशन किंवा सूज. यावेळी यकृतामध्ये सी-रिअ‍ॅक्टिव प्रोटीन (सीआरपी) निर्माण होते. हे एक ब्लड मार्कर आहे, जे शरीरात इन्फेक्शनची पातळी वाढवते.
 • ही एक सामान्य रक्त चाचणी आहे. रक्ताचा नमुना घेऊन CRP पातळी मोजली जाते. काही मिनिटांत याचा निकाल येतो. सीआरपी पातळी जितकी जास्त असेल तितके इन्फेक्शन अधिक असते. डॉक्टर औषधांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.

CRP चाचणी कोणाला आणि कधी करायला हवी?

 • सौम्य ते मध्यम कोविड -19 लक्षणं असलेल्या रुग्णांना सीआरपी चाचणीची आवश्यकता नाही. परंतु जर संसर्गाच्या 5 दिवसानंतर जर रुग्णामध्ये गंभीर लक्षणे दिसली तर ही चाचणी करणे आवश्यक असते. लक्षणे वाढत असल्यास किंवा नवीन लक्षणे आढळल्यास CRP ब्लड टेस्ट केली पाहिजे. जर त्याची पातळी वाढलेली दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
 • रुग्णाला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे असतील तर त्याची सीआरपी चाचणी केली जाऊ शकते. ही चाचणी वेळेवर केल्याने इन्फेक्शन सौम्य आणि मध्यम ते गंभीर होण्यापासून थांबवता येते. ही चाचणी सहसा अशा लोकांची केली जाते ज्यांच्या शरीरात गंभीर बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संक्रमण आहे. ही चाचणी संक्रमणाची पातळी समजून घेण्यात मदत करते.

ही चाचणी रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविना स्वतः ठरवून करु शकतो का? या चाचणीसाठी किती खर्च येतो?

 • नाही.. ही स्वतः ठरवून करता येईल, अशी टेस्ट नाही. रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता पाहूनच डॉक्टर ही टेस्ट करायची की नाही, याचा निर्णय घेतात. सहसा ही चाचणी 500 रुपयांमध्ये होते. वेगवेगळ्या प्रयोगशाळा यासाठी कमी-अधिक शुल्क आकारू शकतात.

CRP चा सामान्य स्तर किती असतो? ही चाचणी कोणत्या धोक्यापासून सावध करते?

 • सामान्यत: सीआरपीची सामान्य कंसंट्रेशन पातळी 30-50 मिग्रा / डीसीलिटर असते. परंतु जेव्हा ही पातळी वाढते तेव्हा धोका वाढू लागतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असून CRP पातळी 70 युनिटपेक्षा जास्त असते, तेव्हा शरीरातील डिफेन्स सिस्टमचे प्रोटीनच शरीराला हानी पोहचविण्यास सुरुवात करतात.
 • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर रुग्णात सी-रिअ‍ॅक्टिव प्रोटीन 70 युनिट्सपेक्षा अधिक असतील तर त्याला स्टिरॉइड्स देण्याची आवश्यकता असते. जर सीआरपी लेव्हलमध्ये याहून अधिक वाढ झाली तर व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते किंवा रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. स्टिरॉइड्स अशा रुग्णांची जगण्याची शक्यता 70% पर्यंत वाढवते.
बातम्या आणखी आहेत...