आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची बातमी:15 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी कोरोनाची लस नाही, मग फ्लूची लस उपयुक्त ठरेल का; जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

जगातील अनेक देशांप्रमाणे आता भारतातही मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लसीमुळे सुरक्षा वाढल्याने पालकांचीही चिंता कमी होणार आहे. मात्र सध्या 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण केले जात आहे. अशा परिस्थितीत 15 वर्षांखालील मुलांचा कोरोनापासून कसा बचाव करायचा, असा प्रश्न निर्माण होतो. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची सुरुवात झाल्यापासून 5 वर्षांखालील मुले मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाली आहेत.

अशा परिस्थितीत जगभरातील तज्ज्ञ बालकांच्या लसीकरणावर भर देत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, लसीकरण न केलेल्या मुलांना इतर लोकांप्रमाणेच संसर्गाचा धोका असतो.

अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या अहवालानुसार, फ्लू (सर्दी-खोकला)चे शॉट्स देखील काही प्रमाणात कोरोनाची तीव्रता कमी करू शकतात. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनेदेखील 5 वर्षांखालील मुलांना इन्फ्लूएंझा लस देण्याची शिफारस केली होती. या परिस्थितीत, ज्या मुलांना अद्याप लस नाही, सीडीसीनुसार, फ्लूची लस त्यांच्यातील कोरोनाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. पण याचा अर्थ इन्फ्लूएंझा लस ही कोविड लसीला पर्याय आहे, असा नाही.

जगातील जवळपास 40 देश मुलांना कोरोनाची लस देत आहेत. आतापर्यंत मुलांमध्ये सौम्य लक्षणे वगळता कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. ही लस भारतातील 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच दिली जात असल्याने, फ्लूचे शॉट्स लहान मुलांसाठी प्रभावी ठरू शकतात.

मुलांच्या लसींबाबत तज्ज्ञ काय सांगतात आणि संशोधनातून काय समोर आले आहे, या मुलांना फ्लूचे शॉट्स देणे किती फायदेशीर आहे? जाणून घेऊया...

बातम्या आणखी आहेत...