आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात गेमचेंजर ठरू शकतो नोझल स्प्रे:कॅनडाच्या कंपनीचा दावा- आमचा स्प्रे कोरोना रोखण्यात 99% प्रभावी, काही महिन्यातच भारतात उपलब्ध होईल

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅक्सिनेशन हेच कोरोनाशी लढण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले जात आहे, परंतु भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रत्येकाला इतक्या लवकर लस देणे शक्य नाही. या दरम्यान, कॅनेडियन कंपनी 'सॅनोटाईज' चा एक नोझल स्प्रे जगभरात चर्चेचा विषय होत आहे. सेनोटाइजचा असा दावा आहे की, हा स्प्रे ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील क्लिनिकल ट्रायलमधून गेला आहे, ज्यामध्ये तो 99 टक्के प्रभावी ठरला आहे.

नोझल स्प्रे कसे कार्य करते? भारतात कधीपर्यंत येणार? किती किंमत असेल? अशाच काही प्रश्नांवर भास्करने हा नोझल स्प्रे बनवणारी कंपनी 'सॅनोटाईज'च्या संस्थापक गिली रेगेवे यांच्याशी चर्चा केली...

प्रश्न : कंपनीचा असा दावा आहे की, हा नोझल स्प्रे 99% प्रभावी आहे, या दाव्यावर कोणती संस्था शिक्कामोर्तब करत आहे?
उत्तर
: आमचा दावा हवा-हवाई नसून टेस्टच्या निकालावर आधारित आहे. नोझल स्प्रेची टेस्टिंग आम्ही आमच्या लॅबमध्ये केल्यानंतर त्याचा मॅन्युफेक्चरिंग फॉर्मुला यूएसच्या यूटा स्टेट युनिव्हर्सिटीला (Utah State University) पाठवला. तेथे विद्यापीठाच्या अँटी व्हायरल इंस्टीट्यूटने लॅब टेस्ट केल्यानंतर हा 99 नाही तर 99.9% प्रभावी असल्याचे सांगितले.

आम्ही जगातील सर्वात चांगली आणि विश्वासार्ह पद्धती 'डबल ब्लाइंड प्लेसबो कंट्रोल' वापरली. त्यासाठी दोन गट तयार केले गेले. एका ग्रुपला प्लेसबो म्हणजेच सामान्य नोझल स्प्रे देण्यात आला आणि दुसर्‍याला सॅनोटाईज नोझल स्प्रे देण्यात आला. गटातील कोणालाही काय देण्यात आले ते माहिती नव्हते. आम्हाला यामध्ये असे आढळून आले की, 24 तासांच्या आत सॅनोटाईज नोझल स्प्रेचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये 95% पर्यंत व्हायरल लोड कमी झाला. यासोबतच 3 दिवसाच्या आत व्हायरल लोडमध्ये 99 टक्क्यांनी घट झाली. हे सर्व कोविड पॉझिटिव्ह लोक होते. हा निकाल जागतिक स्तरावर प्रसिद्ध ‘जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे.

प्रश्न : कोरोनाविरूद्ध हा स्प्रे कसे कार्य करतो?
उत्तर :
या नोझल स्प्रेची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे ज्या केमिकलपासून बनवलेले आहे, ते आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात आधीच उपस्थित आहे. हा नोझल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडपासून बनलेला आहे. हा रासायनिक घटक आपल्या शरीरातील प्रत्येक भागात आधीपासून असतो, म्हणून मानवी शरीराला याच्यासोबत ऍडजेस्ट करण्यात कोणतीही अडचण येत नाही. नायट्रिक ऑक्साईड हे अँटी इफेक्टिव्ह मायक्रोबियल म्हणजेच बॅक्टेरिया आणि व्हायरसची ग्रोथ रोखणारे केमिकल आहे. हे एखाद्या हॅन्ड सॅनिटायझरप्रमाणे काम करते. आपण स्प्रे घेतल्याबरोबर ते सर्वात पहिले नाकात एक बॅरिअर क्रिएट करते. हा बॅरिअर नॉन स्पेसिफिक व्हायरसला लगेच नष्ट करतो. एकीकडे बॅरिअरमुळे व्हायरस नष्ट होतो आणि दुसरीकडे नायट्रिक ऑक्साईड नाकातील उपस्थित रिसेप्टर्सच्या पेशींमध्ये विषाणूच्या प्रवेशास ब्लॉक करते.

प्रश्न : भारतात हे लोकांना कधी आणि कुठे मिळू शकते? संपूर्ण देशात एकाच वेळी किंवा इतर काही प्लॅनिंग आहे?
उत्तर :
भारतात आम्ही एका पार्टनरच्या शोधात आहोत. बर्‍याच कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे. काही मोठ्या फार्मा कंपनींसोबत आमची चर्चा सुरु आहे. आम्ही आत्ता त्यांची नावे सांगू शकत नाहीत, परंतु मला वाटते की लवकरच आम्हाला आमचा पार्टनर मिळेल. त्यानंतर भारतात अप्रूव्हल घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या मी एवढेच सांगू शकते की, सॅनोटाईज नोझल स्प्रे लवकरच भारतात येईल. हे आमच्या भारतीय पार्टनर कंपनीवर अवलंबून आहे की, ते सर्वप्रथम कसे आणि कोठे वितरीत करू इच्छित आहेत.

प्रश्न : याच्या वापरावर सरकारचेसुद्धा काही नियंत्रण असेल का? एखाद्या डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन किंवा इतर काही अटी असतील का?
उत्तर :
आता लगेच आम्ही काहीही सांगू शकत नाही. एकदा पार्टनर कंपनीबरोबर करार झाल्यानंतर, भारताची सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन-CDSCO आमच्या कागदपत्रांची समीक्षा करेल, त्यानंतर ते नश्चित करतील की नोझल स्प्रे चा वापर कशाप्रकारे केला जाईल, प्रिस्क्रिप्शनच्या आधारे किंवा त्याशिवाय. अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही देशाच्या ड्रग पॉलिसीवर अवलंबून असतो.

बातम्या आणखी आहेत...