आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय π (Pi) दिनानिमित्त विशेष - गणिताचे सौंदर्य आणि जटिलतेचा जल्लोष
"गणित ही अशी भाषा आहे, ज्यात ब्रह्मांड लिहिलं गेलंय!" – गॅलिलियो गॅलिली
तुम्हाला p (Pi) बद्दल माहिती आहे का? जर तुम्ही आता शिकत असाल तर जरूर माहिती असेल आणि जर तुम्ही एखाद्या व्यवसायात असाल तर तुम्ही इयत्ता नववी, दहावीमध्ये जरूर अभ्यासले असेल. p चे सर्वसाधारण गुणोत्तर 22/7 किंवा 3.14 लिहिले जायचे.
1) आठवत नाहीये, हरकत नाही- आपल्या आसपास पडलेली कोणतीही गोलाकार वस्तू हातात घ्या.
2) आता कोणत्याही स्केलने त्याच्या परिघाची (चारही बाजूंची बाउंड्री) जी मोठी लांबी येईल ती लिहून घ्या. (हे वृत्त वा सर्कलचे व्यास वा डायमीटर आहे).
3) आता एक धागा घ्या आणि तो परिघाच्या भोवती लावून त्याचे अंतरही लिहून घ्या.
4) जर तुम्ही परिघाला व्यासाने विभाजित कराल तर तुम्हाला जवळपास 22/7 वा 3.14 उत्तर मिळेल.
हाच π आहे!
मला कसे कळले की, तुमच्या हातातील गोलाकार वस्तूचे हे उत्तर येईल? जर कोणी या ब्रह्मांडातील कोणत्याही गोलाकार वस्तूसोबत उपरोक्त प्रक्रिया केली तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल. हीच तर गणिताची कमाल आहे.
ब्रह्मांडाची भाषा आहे गणित!
तुम्हाला सर्वांना आंतरराष्ट्रीय π दिनाच्या शुभेच्छा आणि करिअर फंडामध्ये स्वागत!
आंतरराष्ट्रीय π दिन
आजची तारीख आहे 'मार्च, 14' एक खास तारीख आहे, कारण जर मी एका डॉटसह हा आकडा लिहिला तर 3.14 (मार्च वर्षातील तिसरा महिना असल्याने 3) लिहिले जाते, जे Pi च्या गुणोत्तराचे सुरुवातीचे अक्षर आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, 'सिलिकॉन व्हॅली'च्या जवळील शहर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे एक्सप्लोरेटेरियम - अर्थात मॅथ्स आणि सायन्सचे म्युझियम. येथेच सर्वात आधी 1988 मध्ये 'ओशेर लाइफलॉन्ग लर्निंग'चे डायरेक्टर लॅरी शॉ यांनी पहिला Pi दिन साजरा केला होता.
या दिवशी Pi परेड (ज्यात लोक वर्तुळाकार परेड करतात), Pi-कुकिंग, इटिंग अँड थ्रोइंग (खाण्याचा पदार्थ पाय) कंटेस्ट आणि Pi रेसिटेशन कंटेस्ट इत्यादीचे आयोजन केले गेले.
Pi रेसिटेशन कंटेस्टमध्ये तर काही लोकांनी Piचे गुणोत्तर 2000 अंकी संख्येपर्यंत म्हणून दाखवले. Pi एक इर्रेशनल वा अपरिमेय संख्या आहे अर्थात यात डेसिमलनंतर अनंत अंक कोणत्याही क्रमाविना येतात. गुगलची एक जपानी कर्मचारी एमा हारुकाने जून 2022 मध्ये Piची डेसिमलमध्ये 100 ट्रिलियन डिजिट्सपर्यंतची व्हॅल्यू काढून स्वत:चेच तीन वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोडले. ज्यात तिने Pi ची व्हॅल्यू 31.4 डिंपल प्वाइंट्सपर्यंत काढली होती.
अखेर हे सर्व जाणून घेऊन तुम्हाला काय फायदा मिळेल?
याचे अनेक फायदे आहेत, जर तुम्ही Pi मध्ये रुची घेतली, तर मॅथ्सचे जिओमेट्री आणि मेन्सुरेशन (क्षेत्रमिति) यासारख्या विषयांत निष्णात होऊ शकतात. याचे प्रश्न अनेक स्पर्शा परीक्षांमध्ये विचारले जातात. हा विषय इतरांनाही शिकवू शकतात.
याशिवाय ब्रह्मांडातील ही महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला अभ्यास (प्रॅक्टिस) आणि तयारी (प्रिपरेशन) चे महत्त्व लक्षात आणून देते.
Piने प्रेरित 'कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स'च्या 'प्रिपरेशन'ची पद्धत
1) सातत्यपूर्ण प्रॅक्टिस
ज्याप्रमाणे पायमध्ये दशांश स्थानांची असीम संख्या आहे, त्याचप्रमाणे आपल्या कौशल्यांमध्ये आणि ज्ञानात सुधारणा करण्यासाठी नेहमीच जागा असते. आपण एखाद्या स्पर्धेची तयारी करत असलो किंवा करिअर घडवत असलो तरी आपण सतत सराव करून आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. स्पर्धा परीक्षांमध्ये गणिताचे प्रश्न विचारले जावो किंवा नाही, सराव ही यशाची गुरुकिल्ली आहे.
2) ग्रोथ माइंडसेट
Pi चे मूल्य जसजसे वाढत जाते आणि कधीही संपत नाही, तसतशी आपली क्षमता आणि बुद्धिमत्ता नेहमी समर्पण आणि कठोर परिश्रमाने विकसित केली जाऊ शकते. जेव्हा आपण ही मानसिकता अंगीकारतो, तेव्हा आपण आव्हानांना अडथळे म्हणून न पाहता विकासाच्या संधी म्हणून पाहण्याची अधिक शक्यता असते.
3) मोटिव्हेशन
पाय डेसारखा दिवस साजरा केल्याने आपल्याला आपल्या ध्येयांचा पाठलाग करण्यासाठी आणि अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा मिळते. पाय डे प्रेरणा आणि दृढनिश्चयाच्या शक्तीची आठवण करून देतो.
4) मोठ्या ध्येयांचे लहान भागांमध्ये विभाजन करणे
ज्याप्रमाणे आपण Pi चे मूल्य दोन, तीन, पाच किंवा शेकडो अंकांमध्ये गरजेनुसार वापरू शकतो, त्याचप्रमाणे यशस्वी होण्याचा एक मार्ग म्हणजे विशिष्ट आणि साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित करणे. मोठी उद्दिष्टे लहान, अधिक आटोपशीर उद्दिष्टांमध्ये वाटून, आपण वाटेत प्रगती आणि सिद्धीची भावना अनुभवू शकतो.
शेवटी पुन्हा पाय डेच्या शुभेच्छा!
आजचा करिअर फंडा असा आहे की, पाय डे हा गणिताच्या सौंदर्याचा आणि जटिलतेचा उत्सव आहे. आपण गणित किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर करत असलो तरीही अचूकता, तयारी आणि प्रेरणा ही तत्त्वे आपल्याला आपली ध्येये साध्य करण्यात आणि जगात सकारात्मक प्रभाव पाडण्यास मदत करू शकतात.
करून दाखवू!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.